जळगाव ः प्रतिनिधी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकार्यांच्या व्यवसायरोध भत्त्याच्या वसूलीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र शासन, शिक्षण सह-संचालक, कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी – बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. याबाबत हकीकत अशी की, याचिकाकर्त्या डॉ. सोनाली सिध्दार्थ कांबळे या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नोकरीत असताना खाजगी वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर शासकीय सेवेतील डॉक्टर कर्मचार्यांना नियमित पगाराखेरीज अतिरिक्त व्यवसायरोध भत्ता अनुज्ञेय ठरतो. नियुक्तीपश्चात डॉ.कांबळे यांना देय व्यवसायरोध भत्ता नियमित अदा करण्यात…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत जळगाव नागरी प्रकल्पाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणाच्या कार्याचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रफीक तडवी, बालविकास प्रकल्प अधिकारी तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी आदी उपस्थित होते. जिल्हधिकारी राऊत म्हणाले की, समाज हेच कुटुंब समजून स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या संकटात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली. तसेच अंगणवाडीच्या सेवा प्रभाविपणे राबवण्याकरीता निरंतर प्रयत्न केले. जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक प्रकल्पातील…
जळगाव ः प्रतिनिधी विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचे सोमवारी पोलिस मुख्यालयातील वसाहतीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी या बाजारात शेतकर्यांकडू थेट ग्राहकांनी ९० ते ९५ हजारांचा शेतमाल खरेदी केला.पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक यांच्या प्रयत्नाने थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेवर आधारित हे शेतमाल विक्री केंद्र आहे. या केंद्रात शेतकर्यांनी सेंद्रीय केळी, पपई, पेरू, मेहरूणची बोरे, भाजीपाल्यामध्ये हादगा, शेवगा, भरीत वांगे, कांदा, मशरुम तसेच हिमाचल प्रदेशातील शुद्ध मध, केळीवर प्रक्रिया केलेले पदार्थ, गीर…
जळगाव ः प्रतिनिधी बीएचआर पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आला आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात छापेमारी करून कागदपत्र नेले आहेत. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम साखला, सुजीत बाविस्कर (वाणी) व कमलाकर कोळी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यावर आज मंगळवारी सुनावणी आहे. २२ डिसेंबर रोजी या अर्जांवर सुनावणी होती परंतु सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी खुलासा सादर करण्यासाठी वेळ मागून घेतली होती.त्यामुळे आज ५ जानेवारी रोजी सुनावणी आहे. पुणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी आहे. सुजीत बाविस्कर, धरम साखला, महावीर जैन, विवेक ठाकरे व…
जळगाव ः प्रतिनिधी दीपस्तंभतर्फे लुईस ब्रेल यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यात डोळसांनीही ब्रेल लिपीचे धडे घेतले. केवळ सहा टिंबातून संपूर्ण बाराखडी बोटात आली, असा अनुभव या उपक्रमाचा लाभ घेतलेल्यांनी सांगितला. प्रकल्पातील दोघा अंध विद्यार्थ्यांनी १५ दृष्टीहिन सकार्यांसह ३० डोळस सहकार्यांना ब्रेल लिपी शिकवली.लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त दीपस्तंभच्या मनोबल केंद्रातील दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लुईस ब्रेल यांनी अंधासाठी ही भाषा शोधून अंधांनाही डोळसांच्या रांगेत बसवले आहे. संवेदना ही अंधांना निसर्गाकडून मिळालेली मोठी देणगी आहे. सहा टिंबातून ब्रेल लिपी तयार होते. या सहा टिंबातून अंध व्यक्ती केवळ एक-दोन वाक्य नव्हे तर मोठ-मोठे ग्रंथ तयार…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नवीन रायपूर येथे दि.१५ रोजी सात जागेसाठी होऊ घातलेल्या ग्रामपंचायती निवडणुकीसाठी एकूण १४ उमेदवार रिंगणात असून त्यातून वार्ड १ मधून पुष्पबाई सिताराम परदेशी व उषाबाई दिलीप परदेशी तर वार्ड क्र.२ मधून रजनी नितीन सपकाळे हे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. रायपूर येथे ७ जागेसाठी दि.१५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी तीन वार्ड असून वार्ड क्र.१ मध्ये ३ जागेसाठी लढत होत असून महिला राखीव मध्ये पुष्पाबाई सिताराम परदेशी या बिनविरोध विजयी झाल्या तर ओबीसी महिला राखीवमध्ये उषाबाई दिलीप परदेशी बिनविरोध विजयी झाल्या. तर वार्ड क्र.१ मध्ये…
जळगाव ः प्रतिनिधी येथील काव्यरत्नावली चौकात शिक्षणाच्या आद्यप्रर्वतक आणि देशातील पहिल्या शिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने सामाजिक आंदोलनातील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. प्रारंभी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या स्मृतीस ‘नमन सावित्रीला’ या क्रांतीकारी ओवीचे अॅड.कोमल गोंधळी यांनी सादरीकरण करून वंदन करण्यात आले. त्याचसोबत छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी ‘सावित्रीमाईचा जन्मोत्सव’ या पन्नास पुस्तकांचे उपस्थितांना मोफत वितरण केले. याप्रसंगी मुकूंद सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनसंघर्षावर विविध उदाहरणे देऊन क्रांतीमुल विचार मांडून प्रबोधन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिचंद्र सोनवणे यांनी करून सुत्रसंचालन प्रा.प्रितीलाल पवार…
रावेर प्रतिनिधी सध्या सर्वत्र कोरोनामुळे लाकडाऊन आहे सोशल डिस्टनसिंगचा पालन करून लग्नाची धामधूम सुरू आहे. आजच्या काळात लग्नसमारंभ मोठ्या थाटात करण्याची पद्धत रूढ झाली आहे. समाजात तर लग्नसमारंभावर लाखो रुपये खर्च केले जातात. पण रावेर शहरातील सरफराज खान रफीक खान आणि जळगाव येथील अतिक शेख परिवारातील सदस्य तथा शिक्षित दाम्पत्याने बडेजावपणा व अनावश्यक खर्चाला फाटा देत चट मंगनी पट ब्याह’ करून मुस्लिम समाजासमोर एक आदर्श निर्माण केले आहे. रावेर शहरातील मदिना कॉलनी येथील रहिवासी अँग्लो उर्दू शाळेचे शिक्षक व जमाआत ए इस्लामी हिंदचे सदस्य सरफराज खान रफीक खान यांचे सुपुत्र मुजम्मील खान हे बीएस्सी बीएड शिक्षित आहे. त्यांच्यासाठी मुलगी पाहायला…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील लोंढेगाव येथे लग्नासाठी आलेल्या नातेवाईकाची ७१ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबविल्याची घटना घडली. मेहुणबारे पोलीस स्टेशनात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोंढेगाव येथे गयाबाई डिगंबर पगारे यांच्या घरी लग्न असल्यामुळे त्यांचे नातेवाईक अनिता बाविस्कर (वय ४५, रा. मळाने पोस्ट वणी बु॥, ता.जि.धुळे) हे लग्नासाठी आले आहे. सकाळी गयाबाई पगारे यांच्या घरातून अनिता बाविस्कर यांच्या बॅगमधून ७१ हजार रुपये किंमतीची सोन्याची २१ ग्रॅम वजनाची पोत अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. मेहुणबारे पोलीस स्टेशनला अनिता बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. अनवर तडवी करीत आहेत.
चाळीसगाव : प्रतिनिधी खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील शिरसगाव येथे काल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून नराधमास गजाआड करण्यात आले आहे.मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शिरसगाव येथील आरोपी संदीप सुदाम तिरामली (वय ३७) याने दि. ३ रोजी गावातीलच ५ वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून रात्री ८ वाजच्या सुमारास बलात्कार केला. सदर माहिती मुलीने घरात सांगितल्यावर त्यांनी लागलीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नराधमावर गुन्हा दाखल केला तोवर आरोपी पळून गेला होता. सपोनि पवन देसले, उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गोपाळ पाटील, हवालदार…