पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर येथे नुकताच प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा काल सकाळी संशयास्पद मृत्यु झाल्यानंतर आता विष प्राशन केलेल्या तिच्या पतीचाही मृत्यु झाला आहे. याबाबत वृत्त असे की, पाळधी येथील प्रशांत विजयसिंग पाटील या तरुणाचे गावातील आरती विजय भोसले हिच्याशी प्रेम होते.यातून त्यांनी पळून जाऊन विवाह केला होता. काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते. यानंतर अचानक काल सकाळी आरतीचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली होती.तिचा मृतदेह अर्धनग्नअवस्थेत सापडला होता तर मागील खोलीत तिचा पती प्रशांत हा देखील बेशुध्दावस्थेत आढळून आला होता. आपल्या मुलीचा सासरच्या मंडळीनेच खून केल्याचा दावा तिच्या माहेरच्यांनी करून जळगाव सिव्हिलमध्ये तिचा मृतदेह स्विकारण्यास नकार दिला होता. अखेर…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या १९व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा काल सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात श्रीगणेशा झाला. तीन दिवसीय महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शरयू दाते हिने गायलेल्या भजन, शास्त्रीय-उपशास्त्रीय गायनाने तर आश्विन श्रीनिवासन आणि त्यांच्या सहकार्यांनी सादर केलेल्या बासरी वादनाने महोत्सव चांगलाच रंगला. कोरोनाच्या संकटातील तब्बल १० महिन्यांनंतर जळगावकर रसिकांनी संगीताची अलौकिक अनुभूती अनुभवली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून आसन क्षमतेच्या ५० टक्के रसिकांनाच बालगंधर्व महोत्सवास प्रवेश देण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर भारतीताई सोनवणे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक मुकेशकुमार सिंग, विक्रमसिंग नेगी, बँक ऑफ महाराष्ट्राचे परिमंडळ…
जळगाव ः प्रतिनिधी तब्बल ४२ वेळा रक्तदान करणारे संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील यांचा जिल्हा शल्य चिकित्सक नागोजीराव चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व राजपूत करणी सेना खान्देश विभागातर्फे नववर्षानिमित्ताने काल कांताई सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक नागोजीराव चव्हाण, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे, करनी सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील, विजय निकम, किशोर रायसाकडा, पराग कोचुरे, भगवान मराठे, कमलेश देवरे, संतोष ढिवरे,धर्मेश पालवे, संजय तांबे, दीपक सपकाळे, डॉ. सुरेश पाटील, विलास राजपूत, अमोल कोल्हे, जितू पाटील, किशोर नेवे, राजेंद्र वाणी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव ः प्रतिनिधी नाना शंकरशेठ यांना भारतरत्न मिळावा व संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी शासनस्तरावर साजरी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेतर्फे जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुंबई शहराचे आद्यप्रवर्तक नाना शंकरशेठ यांनी इंग्रजांच्या काळी रेल्वे सुरु करण्याकरीता दिलेली व्ही. टी. स्टेशनची जागा ही त्यांची वडिलोपार्जित होती. ती जागा त्यांनी इंग्रज सरकारला मोफत दिली. मुंबई विद्यापीठ, एलफिस्टन कॉलेज, मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई विद्यापीठ आणी महत्वाचे म्हणजे जवळ जवळ १८५३ साली पहिली मुलींची शाळा आदी अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या. मुंबईत अनेक रस्ते, दवाखाने उभारले. भारतात पहिली जहाज कंपनी देखील सुरु केली.…
अमळनेर ः प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कर्मचार्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व निःपक्ष व निर्भीडपणे करावे. निवडणूक प्रक्रियेतील आपले कर्तव्य समजून घ्यावे व आपल्याकडून चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी आपली नेमणूक होईल त्याठिकाणी तेथील पोलीस पाटील व इतर कर्मचारी मदत करतील. त्यामुळे आपण निवडणुकीचा कोणत्याही प्रकारचा बाऊ न करता निवडणूक प्रक्रिया प्रामाणिकपणे निःपक्षपणे पार पाडावी, असे अमळनेर येथील शिवाजी नाट्य सभागृहात ग्रामपंचायत निवडणूक प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार वाघ मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी शिवाजी नाट्य सभागृहात अमळनेर तालुक्यातील प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. प्रात्यक्षिक निवडणुकीचे तलाठी पिंटू चव्हाण, वाल्मिक पाटील यांनी करून दाखवले. यावेळी…
जळगाव : प्रतिनिधी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन न थांबता पर्यावरण संवर्धन विषय हा मुळात आपले कर्तव्य म्हणून आयुष्यभर अंगीकारला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.माझी वसुंधरा अभियानादरम्यान हरित शपथ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या नवी इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. जमादार, कृषी अधिकारी वैभव शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एस. अकलाडे उपस्थित होते. अभियानादरम्यान १५ रोजी हरित शपथ स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने घेतली…
जळगाव ः प्रतिनिधी केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात सुरक्षित मातृत्व आश्वासक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात ७० सुमन बेसिक, ५२ सीईएमओएनसी आणि ७४ बीईएमओसी असे एकूण १९६ केंद्रांची निवड करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील दोन उपजिल्हा रुग्णालये, तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व दोन ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. या केंद्रांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती नियुक्त केली आहे.जिल्हाधिकारी हे समिती अध्यक्ष तर शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण हे सदस्य सचिव व संयोजन असणार आहेत. उपक्रम अंमलबजावणी देखरेखसाठी समिती उपक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थांना भेट देणार्या सर्व गर्भवती महिला, नवजात बालकांना मोफत सेवा मिळण्याचा हक्क आहे. तथापि सर्व आरोग्य संस्थांमध्ये सर्व सुविधा…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील जलचक्र शिवारातून अज्ञात चोरट्यांनी एका शेतामधील १४ हजार रुपये किंमतीची पानबुडी मोटरसह केबल चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील जलचक्र परिसरातील शेतशिवारात बोदवड येथील अशोक देविदास जडे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात बोदवड पंचायत समितीकडून अनुदान तत्वावर पानबुडी मोटरसह केबल लावण्यात आले होते. सध्या शेतात कामे नसल्याने पानबुडी मोटर बाजूला काढून ठेवली होती. २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी पानबुडी मोटरसह केबल चोरून नेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात जगन राऊत यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल…
बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय गतीमंद तरुणीवर त्याच गावातील तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोदवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात घडल्या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय तरुणी गतीमंद असून ती आईवडिलांसोबत रहिवासाला आहे. गतीमंदपणा असल्याने तरुणी वेडसरपणा करते. या कारणामुळे तिच्या वडिलांनी तिला आपल्या घराच्या बाहेर ओट्यावर खाटेला दोरीने बांधून ठेवले होते. २६ डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेस पिडीत तरुणीच्या घरात कुणीही नसतांना त्याच गावातील एका तरुणाने तरुणीच्या वेडसरपणाचा गैरफायदा घेवून तिच्यावर बलात्कार केला. सदर प्रकार ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी पिडीत तरुणीच्या आईवडिलांना…
भुसावळ : प्रतिनिधी श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी आपला खारीचा वाटा असावा. कारण प्रभु रामचंद्र हे प्रत्येक हिंदूच्या हृदयातील अढळ असे स्थान आहे. त्यामुळे ऐतिहासिक कार्य होत असून आपल्याला या धार्मिक कार्यात सहभागी होता आले हे आपले भाग्य असून यासाठी प्रत्येकाने आपले आर्थिक योगदान दिले पाहिजे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी केले. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्य निर्माणासाठी निधी संकलन समितीद्वारे काशिराम नगर परिसरात कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठक ही छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी, नपाच्या माजी शिक्षण समिती सभापती तथा भाजप महिला आघाडी शहराध्यक्ष मिना…