यावल, प्रतिनिधी । मालवणी येथील क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याचे मुंबईच्या महापौर सौ.किशोरी पेडणेकर आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.अर्थात क्रीडासंकुलाचे ‘टिपू सुलतान’ हे नामकरण अनधिकृत आहे,हेच यातून स्पष्ट होते.टिपू सुलतान ‘हिंदवी स्वराज्य विरोधक’ होता.त्याच्या नावाचे क्रीडासंकुल छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात का?असा प्रश्न उपस्थित करत या क्रीडासंकुलाचे नामकरण रहित करा,तसेच या क्रीडासंकुलाच्या प्रवेशद्वारावर असलेला ‘टिपू सुलतान क्रीडासंकुल’ हा फलक त्वरित काढण्यात यावा,अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली. या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीचे सतीश सोनार यांनी राज्याचे मुख्यमंत्री, मुंबईच्या महापौर आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात दिली. ‘क्रूर टिपू सुलतान : दक्षिण भारत का…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । प्रत्येक वर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिवस साजरा केला जातो. इंडियन डेंटल असोशिएशनच्या सदस्य डॉ. भाग्यश्री किशोर बडगुजर यांचा ‘जागतिक कर्करोग दिना’च्या पार्श्वभूमीवर विशेष लेख. कॅन्सर विरोधात लढा देणे व देशात जनजागृती करणे हा या दिवसाचा एकमेव उद्देश आहे. मुख कर्करोग ही भारतासह जगासमोरची एक प्रमुख समस्या आहे. दरवर्षी जवळपास ९ कोटी ६ लाख लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे होतो. हा पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे. गेल्या तीन दशकांपासून गुटखा युवकांच्या मनावरील अधिराज्य करत आहे. महाविद्यालयीन युवकांना तर धूम्रपानाचे व्यसन जडले आहे. आधी मुख कर्करोगाचे प्रमाण वयाच्या पन्नाशीनंतर आढळून येत होते आता वीस वर्षे व त्यावरील युवकात…
जळगाव, प्रतिनिधी । वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत केलेली अरेरावी आणि उद्धट वर्तणूकी विरोधात महाराष्ट्रामध्ये आंदोलने तसेच निवेदने दिली जात आहेत. जळगावात देखील शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्राध्यापकांनी सौरभ विजय यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या वर्तणुकीचा निषेध करत निदर्शने केली. तसेच अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांना निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक असोसिएशन वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय यांना भेटण्यासाठी गुरुवारी ३ फेब्रुवारी रोजी गेले होते. त्यावेळी शिक्षक असोसिएशनच्या पदाधिकार्यांशी सौरभ विजय यांनी उद्धट व असभ्य वर्तणूक केली. त्यामुळे…
रावेर, प्रतिनिधी । तालुक्यात असलेल्या सावदा येथील आठवड्या बाजाराच्या परिसरात खंडेराव मंदिरासमोरील रस्त्याच्या कडेला बाजाराच्या ओट्यास कार लावून ३ चोरट्यांनी पूर्वनियोजितपणे शेळ्यांना त्यांचे आवडते खाद्य पदार्थ मक्या व जवारी टाकून त्यांना वाहन पर्यंत आणून दिवसाढवळ्या ३ ते ४ शेळ्यांना चोरीच्या उद्देशाने थेट कोंबून नेत असताना येथील स्थानिक सै.हसन सै.अलाउददीन उर्फ लाला या धाडसी तरुणांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव उधळल्याने चोरट्यांची कार व एका चोरटेचा ओप्पो या कंपनीचा मोबाईल फोन देखील पोलिसांच्या हाती लागल्याची घटना दि.२४ जानेवारी २०२२ च्या दिवशी समोर आली होती. सदरील धाडसी तरुणामुळे शेळ्या सह चोरट्यांनी त्याची कार क्र.एम एच ०२ ऐवाय ५१२९ घटनास्थळी सोडून पळ काढला.या दरम्यान एका…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनांच्या अंतर्गत सन २०२२-२३ साठी शासनाकडून ४५ कोटी ९१ लाख रूपयांचा निधीस मान्यता मिळाली असली तरी जिल्ह्यातील कार्यान्वयीन यंत्रणांकडून जिल्हा नियोजन समिती कडे अतिरिक्त १९ कोटी ९३ लाख निधीची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आदिवासी उपाययोजना संदर्भातील राज्यस्तरीय बैठकीत केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले असून यामुळे जिल्ह्यासाठी अतिरिक्त १० कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून आदीवासी भागातील खराब रस्त्यांची दुरूस्ती, साठवण बंधार्यांची निर्मिती व डागडुजी, सांस्कृतीक भवन उभारणी आणि एपीजे अब्दुल कलाम पोषण आहार योजनांसाठी अतिरिक्त निधी मिळणार असून जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागांना याचा लाभ होणार आहे. यावेळी…
जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीतर्फे आज विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. या लेखी निवेदनात दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहे की, उत्तर प्रदेश राज्यात निवडणूक प्रचार सभा आटपुन लोकसभेचे खासदार व एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असोदोद्दीन ओवेसी यांच्या कार वर गोळीबार करून हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याचा तीव्र निषेध करून, आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी व खासदार ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महिलां बाबत जे वक्तव्य केले ते निषेधार्थ असून त्यांनी आमच्या महिला खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री पंकजा मुंडे…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा बँकेकडे मनपाची लिंकिंग शेअर्स अंदाजे रक्कम एक कोटी रुपये आहेत. बँक तोट्यात असल्याचे कारण देत जिल्हा बँकेने ही रक्कम मनपाला देण्यास नकार दिले असल्याने स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले आहेत. महापालिकेवर देखील बँकेचे कर्ज होते, त्यावेळी बँकेने एक रक्कम बाबत महापालिकेला ज्या प्रकारे सहकार्य करणे अपेक्षित होते. त्या प्रकारे कोणतेही सहकार्य केले नव्हते. त्यावेळी तत्कालीन सरकारने महानगरपालिका आर्थिक अडचणीत होती. म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, जलसंपदा मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांच्याकडून मा. आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात हुडकोच्या कर्जाच्या संदर्भात आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती आपण संचालक असून…
जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांतर्गत सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत न्यायालयीन कामकाजाकरीता सरकारी खर्चाने पॅनेलवरील वकील नियुक्त केले जातात. नियुक्त केलेल्या वकिलांना नियमाप्रमाणे मानधन देण्यात येते. तसेच त्यांना टायपिंग, ड्राफ्टिंग, स्टॅम्पिंग, झेरॉक्ससह किरकोळ कागदपत्रांसाठी कार्यालयामार्फत खर्च दिला जातो. सदरच्या कामांकरीता कोणी पैश्यांची मागणी केली, तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समितीकडे किंवा दूरध्वनी क्रमांक 0257- 2221474, ई- मेल आयडी : jalgaondlsa@yahoo.com, अमळनेर : 02587- 228163, भडगाव : 02596- 213004, चाळीसगाव : 02589-223044, चोपडा : 02586- 220292, एरंडोल : 02588- 244639, जामनेर : 02580- 230080, मुक्ताईनगर : 02583-234546, पाचोरा : 02596- 244390, पारोळा : 02597-292776,…
जळगाव, प्रतिनिधी । गेल्या 26 जानेवारी 2022 रोजी नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन पथसंचलन 2022 अतंर्गत ‘आजादी का अमृत महोत्सव’चा एक भाग म्हणून राजपथावर भारताचे लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक वैविध्य दाखविले गेले. यात शहरातील नूतन मराठा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेची सीनिअर अंडर ऑफिसर सोनाली विकास पाटील (रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव) हिने महाराष्ट्रातील मुलींचे प्रतिनिधित्व करीत पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनरमध्ये गार्ड कमांडर म्हणून मानवंदना दिली. यामुळे तिला संरक्षण मंत्रालयातर्फे प्रथम गार्ड कमांडर म्हणून सन्मानित करण्यात आले. सोनालीच्या रूपाने जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालय तसेच जिल्ह्याला हा प्रथमच बहुमान मिळालेला आहे. ही समस्त जळगावकरांसाठी गौरवपर आणि अभिमानास्पद बाब आहे. समस्त जळगावकरांच्या वतीने महापालिकेतर्फे…
सातारा, वृत्तसंस्था । कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथे त्यांची चौकशी करून नंतर त्यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाची राज्य महिला आयोगाने दाखल घेतली आहे. बंडातात्या यांचे विधान संतापजनक असून महिलांच्या आत्मसन्माला धक्का बसला आहे. दरम्यान, सातारा शहर पोलिसांनी याची दखल घेऊन कडक कारवाई करावी. तसेच याचा अहवाल दोन दिवसात राज्य महिला आयोगाला सादर करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. काल साताऱ्यात वाईन विक्री निर्णयाविरोधात वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी आंदोलन केले. यावेळी…