Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी मराठी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली अर्पण करून ज्येष्ठ पत्रकारांसाठी मानधन योजनेची कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी शासना दरबारी लढा तीव्र करण्याचा निर्धार काल पत्रकारांनी केला. जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात दुपारी हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष दिलीप शिरुडे यांनी पत्रकार दिन छोट्याखानी स्वरुपात साजरा करण्याबाबत भूमिका विशद केली. आगामी काळात संघातर्फे एक दिवसीय कार्यशाळा लवकरच घेण्याबाबत त्यांनी जाहीर केले.विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय बापू पाटील यांनी ज्येष्ठ पत्रकारांच्या मानधना संदर्भात शासनाने ठरवलेल्या जाचक अटी शिथिल करण्यातसंदर्भात माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांच्याशी भ्रमणध्वनीवर मागण्यांबाबत…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी दैनंदिन जीवनात स्वयंपाकासाठी गरीबापासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांसाठी महत्त्वाच्या अशा खाद्यतेलाचे भडकलेले दर हा सध्या घराघरातील चिंतेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे, हे दर वाढले म्हणून शेतकर्‍यांना दोन पैसे अधिक मिळत आहेत किंवा व्यापारी नफेखोरी करीत आहे,असे नाही तर या महागाईचा भडका केंद्र सरकारने भरमसाठ वाढविलेल्या आयात शुल्कामुळे उडाला असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.व्यापारी वर्गाकडूनही आता यासंदर्भात आवाज उठू लागला लागला आहे. तेल भाव वाढीमुळे जनता बेजार झाले असून आता व्यापारीही याबाबत आश्चर्य व्यक्त करीत आहे. भारत मुळातच खाद्यतेलाचा आयात करणारा देश असतानाही दिवाळीत खाद्यतेलाच्या आयातीवर केंद्र सरकारकडून ४ टक्के आकारले जाणारे आयातशुल्क आता थेट २३ टक्के…

Read More

अमळनेर ः प्रतिनिधी तालुक्यातील कळमसरे येथील रहिवासी व वसंतनगर येथील उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील उपक्रमशील व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष पत्रकार प्रा. हिरालाल पाटील यांना ‘युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य’ या युवा चळवळीमार्फ़त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र त्यांना कालच प्राप्त झाले असून त्यांना दि.१० जानेवारी रोजी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यात युवा चळवळीत कार्य करणार्‍या युवकमित्र परिवारातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय युवा संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी संमेलनात राज्यातील उत्कृष्ट कार्य करणार्‍यांना ‘युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य’ या युवा चळवळीमार्फ़त विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात कळमसरे (ता.अमळनेर) येथील…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकार्‍यांच्या व्यवसायरोध भत्त्याच्या वसूलीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र शासन, शिक्षण सह-संचालक, कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी – बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. याबाबत हकीकत अशी की, याचिकाकर्त्या डॉ. सोनाली सिध्दार्थ कांबळे या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नोकरीत असताना खाजगी वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर शासकीय सेवेतील डॉक्टर कर्मचार्‍यांना नियमित पगाराखेरीज अतिरिक्त व्यवसायरोध भत्ता अनुज्ञेय ठरतो. नियुक्तीपश्चात डॉ.कांबळे यांना देय व्यवसायरोध भत्ता नियमित अदा करण्यात…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत जळगाव नागरी प्रकल्पाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणाच्या कार्याचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रफीक तडवी, बालविकास प्रकल्प अधिकारी तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी आदी उपस्थित होते. जिल्हधिकारी राऊत म्हणाले की, समाज हेच कुटुंब समजून स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या संकटात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली. तसेच अंगणवाडीच्या सेवा प्रभाविपणे राबवण्याकरीता निरंतर प्रयत्न केले. जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक प्रकल्पातील…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी विकेल ते पिकेल या योजनेंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचे सोमवारी पोलिस मुख्यालयातील वसाहतीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी या बाजारात शेतकर्‍यांकडू थेट ग्राहकांनी ९० ते ९५ हजारांचा शेतमाल खरेदी केला.पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक यांच्या प्रयत्नाने थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेवर आधारित हे शेतमाल विक्री केंद्र आहे. या केंद्रात शेतकर्‍यांनी सेंद्रीय केळी, पपई, पेरू, मेहरूणची बोरे, भाजीपाल्यामध्ये हादगा, शेवगा, भरीत वांगे, कांदा, मशरुम तसेच हिमाचल प्रदेशातील शुद्ध मध, केळीवर प्रक्रिया केलेले पदार्थ, गीर…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी बीएचआर पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आला आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात छापेमारी करून कागदपत्र नेले आहेत. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम साखला, सुजीत बाविस्कर (वाणी) व कमलाकर कोळी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यावर आज मंगळवारी सुनावणी आहे. २२ डिसेंबर रोजी या अर्जांवर सुनावणी होती परंतु सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी खुलासा सादर करण्यासाठी वेळ मागून घेतली होती.त्यामुळे आज ५ जानेवारी रोजी सुनावणी आहे. पुणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी आहे. सुजीत बाविस्कर, धरम साखला, महावीर जैन, विवेक ठाकरे व…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी दीपस्तंभतर्फे लुईस ब्रेल यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यात डोळसांनीही ब्रेल लिपीचे धडे घेतले. केवळ सहा टिंबातून संपूर्ण बाराखडी बोटात आली, असा अनुभव या उपक्रमाचा लाभ घेतलेल्यांनी सांगितला. प्रकल्पातील दोघा अंध विद्यार्थ्यांनी १५ दृष्टीहिन सकार्‍यांसह ३० डोळस सहकार्‍यांना ब्रेल लिपी शिकवली.लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त दीपस्तंभच्या मनोबल केंद्रातील दिव्यांग आणि अनाथ मुलांसाठी या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लुईस ब्रेल यांनी अंधासाठी ही भाषा शोधून अंधांनाही डोळसांच्या रांगेत बसवले आहे. संवेदना ही अंधांना निसर्गाकडून मिळालेली मोठी देणगी आहे. सहा टिंबातून ब्रेल लिपी तयार होते. या सहा टिंबातून अंध व्यक्ती केवळ एक-दोन वाक्य नव्हे तर मोठ-मोठे ग्रंथ तयार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नवीन रायपूर येथे दि.१५ रोजी सात जागेसाठी होऊ घातलेल्या ग्रामपंचायती निवडणुकीसाठी एकूण १४ उमेदवार रिंगणात असून त्यातून वार्ड १ मधून पुष्पबाई सिताराम परदेशी व उषाबाई दिलीप परदेशी तर वार्ड क्र.२ मधून रजनी नितीन सपकाळे हे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. रायपूर येथे ७ जागेसाठी दि.१५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी तीन वार्ड असून वार्ड क्र.१ मध्ये ३ जागेसाठी लढत होत असून महिला राखीव मध्ये पुष्पाबाई सिताराम परदेशी या बिनविरोध विजयी झाल्या तर ओबीसी महिला राखीवमध्ये उषाबाई दिलीप परदेशी बिनविरोध विजयी झाल्या. तर वार्ड क्र.१ मध्ये…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील काव्यरत्नावली चौकात शिक्षणाच्या आद्यप्रर्वतक आणि देशातील पहिल्या शिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने सामाजिक आंदोलनातील पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. प्रारंभी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या स्मृतीस ‘नमन सावित्रीला’ या क्रांतीकारी ओवीचे अ‍ॅड.कोमल गोंधळी यांनी सादरीकरण करून वंदन करण्यात आले. त्याचसोबत छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी ‘सावित्रीमाईचा जन्मोत्सव’ या पन्नास पुस्तकांचे उपस्थितांना मोफत वितरण केले. याप्रसंगी मुकूंद सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनसंघर्षावर विविध उदाहरणे देऊन क्रांतीमुल विचार मांडून प्रबोधन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिचंद्र सोनवणे यांनी करून सुत्रसंचालन प्रा.प्रितीलाल पवार…

Read More