पाचोरा ः प्रतिनिधी तालुक्यातील सामनेर येथे पाचोरा जळगाव हायवे रस्त्यावर आज पहाटे ५ : ३० वाजेच्या दरम्यान महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशदारासमोर दोन महिला पायी मॉर्निग वॉक करुन परतत असतांना अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने दोघी महिला जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे सामनेर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील महिला रोज मॉर्निंग वॉकला जात असतात. आज पहाटे साडे पाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी सामनेर ते लासगाव दरम्यान रोज पुरुष व महिला सकाळी मॉर्निंग साठी गेले होते. यावेळी सकाळी पाच ते साडे पाचच्या दरम्यान मनिषा साहेबराव…
Author: saimat team
पाचोरा : गणेश शिंदे तालुक्याला लागूनच असलेल्या जळगाव जिल्ह्यातून धावणार्या पी.जे रेल्वे मार्गाचा रुंदीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेवून याबाबत नवीन अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या निर्णयामुळे सोयगाव तालुक्याला दिलासा मिळाला आहे. सोयगाव परिसरातून फास्ट मुंबईला जाण्यासाठी आधार ठरलेली पाचोरा ते जामनेर रेल्वे मार्गाचे आता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवीन अर्थसंकल्पात या रुंदीकरणाची तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे आता पाचोरा-जामनेर पी.जे रेल्वे अधिक जोरात होणार असल्याने सोयगावकरांचा मुंबई प्रवास अधिक फास्ट होणार आहे. पाचोरा आणि जामनेर या दोन तालुक्यांना जोडणारा पी.जे रेल्वे मार्गाचे आता रुंदीकरण करण्यात येणार आहे. पाचोरा-जामनेर ही पी.जे रेल्वे सोयगाव तालुक्याच्या सीमारेषेवरून धावते त्यामुळे या…
चोपडा ः प्रतिनिधी भारतीय पत्रकार महासंघाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नंदलाल मराठे तर जिल्हा सरचिटणीसपदी संजीव शिरसाठ यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे. भारतीय पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांनी सदर निवडीचे पत्र दिले असून सन-२०२३ पर्यंत ही नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारिता क्षेत्रात गेली २१ वर्षांपासून नंदलाल मराठे हे कार्यरत आहेत.चोपडा तालुका पत्रकार संघ,जिल्हा पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ,महाराष्ट्र पत्रकार संघ आदी संघटनेत त्यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतीय पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नवलसिंग राजपूत यांनी सदरील निवड केली आहे. संजीव शिरसाठ यांनी देखील दीर्घकाळ पत्रकारिता केली असून…
मुक्ताईनगर ः प्रतिनिधी मतदार संघातील वढोदा व मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अंतर्गत मुक्ताईनगर, बोदवड व वढोदा वनक्षेत्रातील वनविभागाची तसेच सामाजिक वनिकरण अंतर्गत येणारी विविध विकास कामे गेल्या एक वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे रखडलेली होती. प्रलंबित विकास कामांना तात्काळ मंजुरी मिळून निधी प्राप्त व्हावा तसेच बहूप्रतिक्षेत असलेल्या वढोदा व्याग्र प्रकल्प अशा प्रमुख मागण्यांसंदर्भात आ.चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी वनमंत्री राठोड यांनी मतदार संघातील विविध विकास कामे आणि व्याग्र प्रकल्प आदींबाबत अनुकूल असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले, शुभम शर्मा, स्वीय सहायक प्रवीण चौधरी आदी उपस्थित…
जळगाव ः प्रतिनिधी राज्याचे राजकारण बदलतेय. महाविकास आघाडी पाय रोवतेय. हे सरकार टिकणार, चालणार आहे. कार्यकर्ते पक्षात टिकवून ठेवण्यासाठी विरोधी पक्ष सरकार पडणार असल्याच्या वावड्या उठवतोय. त्यांच्या अहंपणामुळे सरकार पडले.अद्यापही त्यांचा तो अहंमपणा सुटलेला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संवाद यात्रेनिमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. त्यानिमित्त आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा बैठकीत श्री.खडसे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी होते. जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, गफ्फारभाई मलिक, माजी आमदार अरुण पाटील, मनीष जैन, कल्पनाताई पाटील, अभिषेक…
मुंबई : प्रतिनिधी कोविडच्या आपत्तीमुळे अनेक अडचणी असूनही जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील खेडी व भोकर या दोन गावांना जोडणार्या पुलाच्या कामांसाठी तब्बल १५२ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी तापी नदीवरील खेडी-भोकरी ते भोकर दरम्यान पूल बांधण्याचे आश्वासन दिले होते. या अनुषंगाने कोविडची आपत्ती सुरू असतांनाही मंत्रालयात तीन उच्च स्तरीय बैठका झाल्या. यात जुलै महिन्यातील बैठकीत या पुलाच्या बांधकामाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत १५२ कोटी रूपयांच्या कामाला…
दिल्ली :- राष्ट्रपती राम नाथ कोविंद 4 ते 7 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत कर्नाटक व आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. राष्ट्रपती 4 फेब्रुवारी, 2021 रोजी सायंकाळी बंगलोरला रवाना होतील, ते 5 फेब्रुवारी, 2021 रोजी बंगळुरूच्या येलहंका येथील हवाईदलाच्या तळावरील एअरो-इंडिया-21 च्या समारोप सोहळ्याला संबोधित करतील. कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यांतील माडिकेरी येथे ते 6 फेब्रुवारी 2021 जनरल थिमय्या यांच्या वडिलोपार्जित जुन्या घरात केलेल्या वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन करतील. बेंगळुरू येथील राजीव गांधी आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या 23 व्या वार्षिक पदवीदान सोहळ्याला ते 7 फेब्रुवारी 2021 रोजी उपस्थित राहतील. त्याच दिवशी नवी दिल्लीला परतण्यापूर्वी ते मदनपल्लीच्या सत्संग फाउंडेशनच्या आश्रमाला व आंध्र प्रदेशातील सादम येथील पिपल ग्रोव शाळेला भेट देतील.
पाचोरा ः प्रतिनिधी तालुक्यातील नगरदेवळा येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुलजी सत्तार यांचा शिवसेना पदाधिकारी व मुस्लिम समाजातर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी आ.किशोर पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ढोल-ताशांच्या गजरात आलेल्या मान्यवरांचे स्वागत करीत मिरवणूक कालिंका माता मंदिराजवळून मार्केट यार्डमध्ये आली. यावेळी हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यांच्या समवेत आ. किशोर पाटील, शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, जि.प.सदस्य पदमसिंग राजपूत, राजू राठोड, संपर्क प्रमुख सुनील पाटील, किशोर बारावकर, शरद पाटील, अविनाश कुडे, शिवनारायण जाधव, सुधाकर महाजन, अ.गणी…
जामनेर ः प्रतिनिधी महिलांनी दशसूत्री कार्यक्रम राबवून गट सक्षम करावेत व शाश्वत उपजीविका निर्माण कराव्या. ज्या वस्तू आपण शहरातून गावात मागवतो त्याच गावात कशा मिळतील व निर्माण होतील याकडे लक्ष द्यावे. जेणे करून गावांचा शाश्वत विकास होईल. तसेच महिलांनी एक पूरक व्यवसाय म्हणून गांडूळ खत निर्मिती देखील करावी व ते गांडूळखत आपल्या स्वतःच्या शेतात तसेच उर्वरित खतही शेतकर्यांना विकून त्यातून पैसा कसा मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकर यांनी यावेळी सांगितले. पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकर यांनी तालुक्याला भेट देऊन पाणी फाउंडेशनमध्ये काम करणार्या गावांना भेटी दिल्या व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी…
अमळनेर ः प्रतिनिधी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसी-आय) सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. सीए नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत अमळगाव येथील सारिका मंगेश झंवर हिने पहिल्याच प्रयत्नात ६० टक्के गुण मिळवून अमळगाव परिसरात पहिली महिला सीए होण्याचा मान मिळवला. सारिकाने मुंबई येथील सिडनॅम कॉलेजमध्येे ‘बी.कॉम’चे शिक्षण पूर्ण केले असून सीए परीक्षेची त्यादरम्यान ती तयारी करत होती. सारिकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अमळनेर येथे पूर्ण केले होते. इयत्ता १० वीमध्ये ती ९५ टक्के गुण मिळवून डी.आर.कन्या शाळेतून द्वितीय क्रमाकाने उत्तीर्ण झाली होती. तर १२ वीला जळगाव येथील एम.जे.कॉलेजमध्ये ९१ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यात ती उत्तीर्ण झालेली होती. अमळगाव…