जळगाव ः प्रतिनिधी उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे (आरटीओ) काल रात्री ९ ते १०.३० वाजेच्या दरम्यान ३१ लक्झरी बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर तीन बसेस जप्त करण्यात आल्या. ही मोहीम राज्यभरात एकाच वेळी राबवण्यात आली. लक्झरी बसेसची साइज वाढवणे, टॅक्स न भरणे, फिटनेस सर्टिफिकेट नसणे आदी कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. आरटीओ श्याम लोही यांच्या नेतृत्वाखाली वाहन निरीक्षक देशमुख यांच्यासह पथकाने मोहिम राबवली. यात प्रामुख्याने गुजरात राज्यात जाणार्या लक्झरींवर कारवाई करण्यात आली. यात जामनेर-सुरत या मार्गावरील १४-०५०२ या साईराम ट्रॅव्हल्स ,मुक्ताईनगर-अहमदाबाद या मार्गावरील शुभ ट्रॅव्हल्स ( जीजे ०५ एव्ही ८५०२) व शिव ट्रॅव्हल्स (जीजे ०१ डी झेड १५१५) या तीन लक्झरीतील…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी महावितरण कंपनीतर्फे वीजबिल वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून थकबाकीदार वीज ग्राहकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जळगाव परिमंडळ अंतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ४ लाख ११ हजार ४६२ वीज थकबाकीदार ग्राहकांना मेसेज, ई-मेलसह पत्राद्वारे या नोटीसा देण्यात आल्या आहेत. १५ दिवसांचा नोटीस काळ पूर्ण केलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. या ग्राहकांकडे १,३४१ कोटी ३ लाख रुपयांची थकबाकी थकीत आहे. कोरोना काळात थकलेल्या वीजबिल वसुलीच्या मोहिमेला महावितरणाकडून गती देण्यात आली आहेे. त्यामुळे ग्राहकांचे आधी टाळेबंदीने आणि आता वाढत्या महागाईमुळे कंबरडे मोडत असल्याने वसुलीचे पडसाद उमटू लागले आहे. विविध राजकीय पक्षांकडून या नोटीसी विरोधात…
जळगाव ः प्रतिनिधी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत शनिवार १३ फेब्रुवारी रोजी जळगाव दौर्यावर येणार आहेत.सकाळी ११ वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात …उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ या अभिनयांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय जळगाव या उपक्रमात उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्या सोडविणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय जळगाव हा कार्यक्रम दि.१३ रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातील व…
जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले. महावितरणाच्या या कृतीच्या निषेधार्थ काल रोजी धरणगाव तालुका भाजपाने महावितरण केंद्रांवर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले. भारतीय जनता पार्टीचे नेते पी.सी.आबा पाटील यांनी आपल्या भाषणात महावितरणच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्या, राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा पुरवठा खंडीत करण्याचा जुलमी निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरीत मागे घ्यावा,फडणवीस सरकारच्या काळात आम्ही कधीच शेतकर्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही,असे सांगितले व महावितरण कार्यालयांना टाळे ठोकले. तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील म्हणाले की, कोरोना काळात जनतेला वीज…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा बँकेसाठी भाजपने सर्वपक्षीय पॅनलची तयारी चालवली असताना राष्ट्रवादीने देखील महाविकास आघाडीच्या दृष्टीने ही निवडणूक लढविण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा दौर्यावर येत असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करून सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठीचे नियोजन निश्चित केले जाणार आहे. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीच्या पॅनलकडूनच ही निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे. भाजपने सर्वपक्षीय पॅनलसाठी विरोधी पक्षातील काही संचालक आणि इच्छुक उमेदवारांशी संवाद सुरू केलेला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने देखील सावध पवित्रा घेत महाविकास आघाडीच्या पॅनलच्या चर्चेला प्रारंभ केला आहे. पुढील आठवड्यात ११ रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्हा दौर्यावर येत आहेत. या दौर्यात चर्चेनंतर पॅनल निर्मितीचा…
मुंबई : प्रतिनिधी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारने संवैधानिक संरक्षण द्यावे. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्र शासनाने मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती संवैधानिक तरतूद करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री.चव्हाण बोलत होते. श्री. चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मार्गात अनेक संवैधानिक व कायदेशीर बाबींचे पेच आहेत. हे पेच दूर करण्यासाठी संसदेच्या पातळीवर आवश्यक ती संवैधानिक तरतूद करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास मराठा आरक्षण व देशातील इतरही अनेक राज्यांच्या आरक्षणाचे प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने…
यवतमाळ: आदिवासी किंवा इतर पारंपरिक वननिवासी हे सुरुवातीपासूनच जंगलांचे संवर्धन करीत आले आहेत. मात्र त्यांना ना हक्काची जमीन, ना सातबारा. केवळ जमीन वाहणे आणि त्यावर उदरनिर्वाह करणे एवढेच त्यांना माहित. आता मात्र शासनाने आदिवासींना वनपट्ट्यांचे मालकी हक्क दिल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल. परिणामी या वनहक्क पट्ट्यांमुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येईल, असे मत राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात 67 आदिवासी लाभार्थ्यांना वनहक्क पट्ट्यांचे वाटप करताना प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक एन. रामाराव, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, उपवनसंरक्षक केशव…
सांगली, दि. 04, (जि. मा. का.) : राज्यातील शेतकरी सदैव स्वत:च्या पायावर उभा राहावा. शासनाची मदत घेण्याची वेळसुध्दा त्यावर येऊ नये या भावनेतून शेतकऱ्यांचे हात सदैव बळकट करण्यासाठी कृषी विभागाने काम करावे. बाजारात जे विकले जाते ते शेतकऱ्याने पिकवावे, जे विकेल ते पिकेल या संकल्पनेवर कृषी विभागाने काम करावे. राज्यातील विविध ठिकाणी करण्यात येत असलेल्या शेतीची माहिती शेतकऱ्यांना कळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी प्रदर्शन घेण्यात येईल. असे प्रतिपादन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले. जत येथे आयोजित माळरान कृषी व पशु प्रदर्शन, कृषी सन्मान सोहळा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी महिला व बाल विकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार विक्रम सिंह सावंत,…
ठाणे : शहापूर तालुक्यातील ९७ आदिवासी गावे आणि २५९ पाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी २७६ कोटी रुपयांच्या भावली धरणाच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी येत्या १५ दिवसात निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच पुढील अडीच ते तीन वर्षात ही योजना पूर्ण करून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल. ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांना गती देऊन प्राधान्याने त्या योजना मार्गी लावण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष…
जळगाव ः सुकदेव शिरसाळे महापालिका उपायुक्त संतोष बाहुळे सध्या शहरातील अतिक्रमण धारकांसाठी कर्दनकाळ ठरले आहेत.शहर अतिक्रमणमुक्त करण्याची त्यांची व प्रशासनाची कारवाई निश्चितच स्वागतार्ह म्हटली जाते परंतु सदर कारवाई करतांना छोट्या व्यावसायिकांवर अन्याय तर मोठ्यांना अभय असे चित्र दिसत असल्याने हातावर पोट भरणारात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे .शहरातील बेसमेंटचा व्यापारी उपयोग करणार्या संकुलांचा विषय थंड बसत्यात पडल्याने मोठ्यांना अभय दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. जळगाव शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि त्याच वेगात वाढत चाललेली वाहनसंख्या व त्या तुलनेत वाहन तळांचा अभाव यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होणे नित्याचेच झाले आहे.त्यातच सर्व प्रमुख रस्ते,रस्त्यांच्या दोन्ही बाजू व सर्वच चौकांना…