जळगाव : प्रतिनिधी येथील बसस्थानकात बस रिव्हर्स घेत असतांना अचानक मागच्या चाकात आल्याने कानळदा येथील (अंदाजे वय ६०) वृध्द महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने बसस्थानकात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मनमाडहून भुसावळकडे जाणारी बस (क्र.एम.एच.१४-बीटी.०५६४) वरील चालक बसला फलाट क्र.१६च्या समोर रिव्हर्स घेवून लावत असतांना बसचा धक्का लागून देवकाबाई नारायण सपकाळे या पडल्या व बसच्या मागील चाकात आल्या. या अपघातात देवकाबाई यांच्या डोक्यावरुन मागचे चाक गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला व त्या जागीच गतप्राण झाल्या. या घटनेने काही वेळ बसस्थानकात प्रचंड तणाव निर्माण झाला…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने रात्री ११ वाजेच्या सुमारास भव्य मशाल रॅली काढत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजीनगरपासून शिवतिर्थ मैदानापर्यंत मिरवणूक काढत रात्री १२ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल रात्री अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने रात्रीच शिवजयंती महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वात भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मशाल रॅलीमध्ये शेकडो तरुणांसह कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला. मशाल रॅली ढोल ताशाच्या व फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवाजीनगरमधून मार्गस्थ झाली. रॅलीची सरुवात शिवाजीनगरमधील छत्रपती…
यावल ः प्रतिनिधी यावल नगरपालिका कार्यालयात आज दि.१९ शुक्रवार रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याहस्ते तसेच यावल नगरपरिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावल नगरपालिका कार्यालयात ‘राजा रयतेचा’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी बबन तडवी कार्यालयीन अधिक्षक बडे, स्थापत्य अभियंता योगेश मदने, स्वच्छता निरीक्षक शिवानंद कानडे, सहाय्यक कर निरीक्षक निकेतन बयाणी, यावल नगरपालिका वरिष्ठ लिपीक राजेंद्र गायकवाड, वसुली लिपीक अनिल चौधरी, रवींद्र बारी, मधुकर गजरे, श्री.काटकर, संतोष नन्नवरे, असदउल्लाखान अब्दुल्लाखान, रफीक अहमद…
अमळनेर ः प्रतिनिधी राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रमुख व जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांची बाजार समितीच्या सभापतीपदी सर्वानमुते बिनविरोध निवड झाल्याबद्दल ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन यांनी शाल व बुके देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अमळनेर बाजार समितीवर शासन नियुक्त प्रशासनमध्ये मुख्य प्रशासक म्हणून जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या ६० वर्षात प्रथम एका महिलेला सभापतिपदाचा कारभार पाहता येणार आहे. अमळनेर येथील बाजार समितीच्या तालुक्यातील नऊ जणांची प्रशासकीय मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात राज्य शासनाच्या सहकार व वस्त्रोद्योग मंडळाने मंजुरी दिली असून त्यांच्या निवडीचे पत्र बाजार समितीला प्राप्त झाले आहेत.…
जळगाव : प्रतिनिधी दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेचे संलग्नित १५०० चे वर बचत गट आहेत. बचतगटाच्या माध्यमातून बँकेशी १५,००० चे वर महिला संलग्नीत झालेल्या आहेत. या माध्यमातून बँक फायनान्शियल इन्क्लुजनचे महत्वपूर्ण कार्य करीत आहे. बचत गट हे फायनान्शइल इन्क्लुजन साठी महत्वाचे माध्यम आहे. बहुतेक बचत गट हे उद्यमशिल असून बचत गटातील अनेक महिला उद्योजिका आहेत. परंतु त्यांच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होत नसते. त्यातही कोरोनाच्या काळात महिलांना रोजगार मिळणे कठीण झाले होते, तेव्हाही बँकेने विविध प्रकारे रोजगार मिळवून देण्यास मदतीचा हात पुढे केला. महिला स्वावलंबनाचे तसेच सक्षमीकरणाचे कार्यक्रम बँक विविध माध्यमातून राबवत असते. जेणेकरुन त्यातील महिलांना रोजगारसंधी उपलब्ध होईल…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासनाच्या आदेशानुसार अशासकीय प्रशासक म्हणून एकूण १८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.या सदस्यांनी काल आपल्या पदाचा पदभार स्विकारला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाची निवड २०१५ ते २०२० या कालावधीपर्यंत घेण्यात आली होती. यात सोसायटी हमाल मापाडी, व्यापारी, तज्ञ यासह अन्य अशा १८ सदस्यांची निवड करण्यात आली होती.त्यानुसार १९ सप्टेंबर २०२० रोजी या संचालक मंडळाचा कालावधी संपला होता. त्यानुसार २१ सप्टेंबर २०२० पासून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीची नेमणूक करण्यात आली होती. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटानंतर नुकतेच महाविद्यालय सुरु झाले आहेत. येथील नॉलेज सिटीमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षिक व मौखिक परिक्षा सुरु असतांनाच एका माजी नगरसेवकासह चौघांनी कॉलेजच्या आवारातच हैदोस माजवत प्राचार्य डॉ. विलास पाटील यांना बेदम मारहाण करत दहशत पसविण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल घडली. या घटनेने जिल्ह्यातील शैक्षणिक जगत हादरले असून विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग दहशतीखाली असल्याचे चित्र उभे राहिले आहे. दरम्यान, या गुंड प्रवृत्तीविरुध्द शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांची भेट घेत निवेदन दिले आहे. धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील खान्देश बहुउद्देशीय संस्था संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी नार्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी या महाविद्यालयात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक…
चाळीसगाव : प्रतिनिधी पाटणादेवी मंदिर येथील ट्रस्टच्या चौकशीबाबत साईमतमध्ये वृत्त प्रसिध्द होताच पुरातन विभागाच्या अधिकार्यांचे धाबे दणाणले असून ट्रस्टची सखोल चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे. पाटणादेवी मंदिर येथील ट्रस्ट धर्मदाय आयुक्त जळगाव यांच्यामार्फत रजिस्टर झालेली संस्था ही कुठल्या आधारे रजिस्टर करण्यात आली.नावातच परिसर असताना ही संस्था या संस्थेने भारतीय पुरातत्व मालकीहक्काचा मंदिरावर फलक कुणाच्या आदेशाने अथवा परवानगीने लावण्यात आला. ही संस्था पाटणादेवी गाव पातळीवर असल्याने व संस्था रजिस्टर करताना संस्थेचे ध्येय धोरणे आणि संहिता ही नेमकी कोणती व काय आहत याचीही उलट तपासणी करण्यात यावी.संस्था मान्यतेदरम्यान वन्यजीव पाटणादेवी तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांची…
जळगाव : प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांची काल अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचारादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये कोरोनाची तपासणीही करण्यात आली होती. या तपासणीत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, खा.खडसे यांनी तीन दिवसांपूर्वी वाढीव विज बील तसेच शेतकर्यांच्या प्रश्नांवरुन मुक्ताईनगर येथील आंदोलनात भाग घेतला होता. खा.खडसे यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाच्या तपासण्या कराव्यात असे आवाहन केले आहे.
जळगाव ः प्रतिनिधी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर वन विभागाच्या वतीने देवराई साकारण्यात येत आहे. यासाठी जैन उद्योग समूहाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत (सीएसआर) कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सामाजिक दायित्वातून पहिल्या टप्प्यात सुमारे २१ लाखांची ठिबक सामग्री बसविण्यात येणार आहे. हा प्रकल्प जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या पुढाकाराने आणि पुरातत्त्व विभागाचे सहकार्याने राबविला जाणार असल्याची माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी दिली. याबाबत गौडा म्हणाले की,शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धन आणि विकास प्रकल्पा अंतर्गत किल्ल्यावरील जैवविविधता संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात येते. मात्र ऐन उन्हाळ्यातील चार महिने पाण्याची टंचाई जाणवू लागल्यानंतर झाडांना पाणी देणे अडचणीचे होते. हि अडचण दूर व्हावी…