जळगाव : प्रतिनिधी बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी विश्व हिंदू परिषदेतर्फे जिल्हाधिकार्यांना एक निवेदन देण्यात आले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे निधी समर्पण अभियान सुरू आहे. १० फेब्रुवारी रोजी दिल्ली शहरातील मंगोलपुरी भागातील बजरंग दलाचे कार्यकर्ते रिंकू शर्मा हे इतर कार्यकर्त्यांसोबत निधी संग्रह करून घरी आले असता काही समाज कंटकांनी त्यांच्यासह कुटुंबीयांवर हल्ला केला. यात रिंकू शर्मा यांचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी हल्लेखोरांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या वेळी देवेंद्र भावसार, राकेश लोहार, रवींद्र नन्नवरे, हरीश कोल्हे, समाधान पाटील, बापू माळी, सागर साबळे, दीपक दाभाडे, चेतन शिंपी आदी उपस्थित होते.
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील फुपनगरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेली कम्युनिकेशन शाखेची इंजिनीयर असलेल्या कु.प्रियंका भास्कर सोनवणे या तरूणीने बिनविरोध विजयी होत गावाची …कारभारी’ होण्याचा सन्मान प्राप्त केला तर उपसरपंचपदी महेश कैलास अत्रे यांचीही बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत फुपनगरी मध्ये जितेंद्र अत्रे यांच्या परिवर्तन विकास पॅनलने सहा जागांवर विजय मिळवित विद्यमान सरपंच शामकांत जाधव यांच्या पॅनलचा पराभव करून बहुमत प्राप्त केले होते. सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत निर्वाचन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी अमोल वानखेडे यांनी काम पाहिले.त्यांना तलाठी ज्ञानेश्वर माळी, ग्रामसेविका अनिता सपकाळे व सेवक प्रकाश पाटील यांनी सहकार्य केले. निवडीप्रसंगी पॅनल प्रमुख जितेंद्र अत्रे,…
कासोदा ः प्रतिनिधी येथील स्थानिक पोलिस ठाण्याच्यावतीने राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत दुचाकींवर कारवाई करून दररोज अनपेड ऑनलाईन दंड आकारण्यात येत आहे . वाढत्या अपघातांची संख्या लक्ष्यात घेता किनगाव येथे झालेल्या आयशर अपघातात १५च्यावर मजुर जागीच ठार झाल्याने जिल्हापोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशानव्ये संपूर्ण जिल्ह्यात नाका बंदी मोहीम राबविण्यात येत आहे , वरिष्ठांच्या आदेशानुसार कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव सर व पीएसआय नरेश ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पो.स्टे.च्या हद्दीत दररोज नाका बंदी करण्यात येत असून दोषींवर कार्यवाही करण्यात येत आहे.या मोहिमेत दुचाकी, तीन चाकी,चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात येत असून चालक परवाना, गाडीचे कागदपत्रे, नंबर प्लेट यासारख्या…
जळगाव : प्रतिनिधी उद्योजक रविंद्र लढ्ढा यांची सुकन्या डॉ. पायल लढ्ढा हिच्या लग्नानिमित्त लढ्ढा परिवारातर्फे भरारी फाउंडेशनच्या शेतकरी संवेदना अभियानांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या चार कुटुंबियांना मसाला व पीठ दळण्याचे यंत्र (चक्की) भेट देण्यात आले. ज्योती मेढे (धामोडी ता. रावेर), अनिता वंजारी (तरडी, ता. पारोळा), सोनाली पाटील (खेडीढोक ता. पारोळा) व मनीषा पाटील (शिरसोदे ता. पारोळा) या आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या महिलांना दळण यंत्र (चक्की) देण्यात आले. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, चिटणीस पंकज लोखंडे, रवी लढ्ढा, ज्योती लढा, श्रीराम पाटील, धनंजय खडके, राजेश न्याती, भरारीचे दीपक परदेशी, विनोद ढगे, सचिन महाजन, सुदर्शन पाटील, दुर्गेश आंबेकर, बंडू पाटील, मोहित पाटील आदी उपस्थित…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चुंचाळे येथून मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरची ट्रॉली लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत ट्रॉलीचे मालकांनी यावल पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, चुंचाळे येथील रहिवाशी तथा ग्रामपंचायत सदस्य सुकलाल यशवंत पाटील यांच्याकडे शेतीकामासाठी ट्रॅक्टर व ट्रॉली आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांची ट्रॅक्टर ट्रॉली (क्र.एम.एच.१९-बीक्यू.००९२) लावली होती. पहाटेच्या सुमारास त्यांना ट्रॉली गायब झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी ट्रॉलीचा चुंचाळे परिसरात शोध घेतला असता ट्रॉली कुठेही दिसून आली नाही. याबाबत यावल पोलीस स्थानकात ट्रॉली मालक सुकलाल यशवंत पाटील यांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
भुसावळ : प्रतिनिधी येथील भुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे ‘पाल अल्ट्रा हिल सायकलिंग चॅलेंज’ या १०० व ५० किमी सायकलिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत २३ सायकलपटूंनी यशस्वीपणे हा टप्पा पूर्ण केला. ५० किमीसाठी भुसावळ ते खिरोदा व पुन्हा भुसावळ असा मार्ग होता. तर १०० किमीसाठी भुसावळ-खिरोदा-पाल व त्याचमार्गे परत भुसावळ असा मार्ग होता. सहा सायकलपटूंनी १०० किमी, तर १७ जणांनी ५० किमी टप्पा पूर्ण केला. रविवारी सकाळी सहा वाजता डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी डॉ.आंबेडकर मैदानापासून हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली प्रसंगी श्री वाकचौरे यांनी सायकलपटूंनीअवघड अशा मार्गावर सायकल चालवणे आव्हानात्मक असून त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. व नागरिकांच्या…
जळगाव : प्रतिनिधी श्री महालक्ष्मी माता मंदिर ट्रस्ट निशाणे, ता.धरणगाव, जि.जळगाव या मंदिरातर्फे सालाबादाप्रमाणे प्रकट दिन व यात्रोउत्सव आयोजित करण्यात येत असतो. या वर्षी दि.२५ फेब्रुवारी रोजी सदरच्या तिथीप्रमाणे साजरा होणारा उत्सव, कोव्हीड-१९ म्हणजेच कोरोनाचा प्रार्दुभाव असल्यामुळे तसेच वेळोवेळी दिलेल्या शासनाचे आदेश व निर्देशानुसार व जिल्हाधिकारी जळगाव यांनी दि.२८ फेब्रुवारी पर्यंत प्रतिबंध लादल्यामुळे या वर्षी मंदिराच्या परिसरात प्रकट दिन व यात्रोउत्सव आयोजित/साजरा केले जाणार नाही. तरी खेळणी, हॉटेल व इतर दुकानदारांनी मंदिराच्या परिसरात दुकाने लावू नये तसेच व्यवस्थापनाला व प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचप्रमाणे नागरिकांनी दर्शनासाठी सामाजिक अंतर पाळून, मास्क लावून, सॅनिटायझर करुन, गर्दी न करता दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन…
जळगाव ः प्रतिनिधी येथील सरदार वल्लभभाई पटेल शिक्षण मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी पंडित अटाळे, उपाध्यक्षपदी प्रमोद पाटील तर सचिवपदी मिना लोखंडे यांची बिनविरोध निवड झाली. एमआयडीसीतील सुप्रिम कॉलनीतील शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या सरदार वल्लभभाई पटेल शिक्षण मंडळ या संस्थेची २०२० ते २०२५ या कालावधीसाठी नुकतीच निवडणुक पार पडली. संस्थेची निवडणूक प्रक्रिया अविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र रघुनाथ अत्तरदे यांनी काम पाहिले तर त्यांना सागर इच्छाराम झांबरे यांनी मदत केली. संस्थेच्या कार्यकारणीत अध्यक्षपदी पंडित बाजीराव अटाळे, उपाध्यक्षपदी प्रमोद जगन्नाथ पाटील, सचिवपदी मिना दिनकर लोखंडे, सहसचिव…
धानोरा, ता. चोपडा ः वार्ताहर धानोरा ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली असून सरपंचपदी शिवसेनेच्या सुनिता संतोष कोळी तर उपसरपंचपदी विजय चौधरी ांची निवड करण्यात आली. सुनिता संतोष कोळी यांनी गजानन कोळी यांचा पराभव केला. सुनिता कोळी यांना ९ तर गजानन कोळी यांना ८ मते मिळाली. उपसरपंच विजय चौधरी यांना ही ९ मते मिळाली. त्यांनी सावंत महाजन यांचा पराभव केला. सरपंचपद एस.टी.जनरल निघाल्याने पाच उमेदवार दावेदार होते. तत्पुर्वी सरपंच पदासाठी सुनिता कोळी, रज्जाक तडवी, गजानन कोळी यांनी अर्ज दाखल केले होते. रज्जाक तडवी यांनी माघार घेतली. उपसरपंचपदी विजय चौधरी व सावंत महाजन यांचा प्रत्येकी एक अर्ज आला होता.…
मुक्ताईनगर ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा श्रीसंत मुक्ताबाई, योगराज चांगदेव महाराज माघवारी महाशिवरात्री यात्रोत्सव रद्द करण्यात येत असल्याचे तहसीलदार यांनी आयोजीत केलेल्या यात्रा पुर्व आढावा बैठकीत सांगीतले. दरवर्षीप्रमाणे आदिशक्ती मुक्ताबाई व योगराज चांगदेव महाराज या गुरू-शिष्य भेटीनिमित्त माघ कृष्ण दशमी ते महाशिवरात्रीपर्यंत भव्यदिव्य यात्रोत्सव साजरा होतो. राज्यभरातील शेकडो दिंड्यांसह लाखावर वारकरी भाविक या वारीत सहभागी होतात. गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे अनेक उत्सव साजरे करताना शासनाने निर्बंध घातले आहे. यावर्षी दि.८ ते १२ मार्च पर्यंत येत आहे. नेमका याच कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्याने लाकडाऊन नव्याने करण्याचे संकेत आहे. विशेषतः विदर्भातील भाविक जास्त प्रमाणात वारीत सहभागी होतात व तिकडे…