Author: saimat team

जळगाव : प्रतिनिधी कामगार नेते रविंद्र सपकाळे यांच्या १७ व्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कामगारांना मास्क वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, बारदान व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदू राठी, उपसभापती इंद्रराज सपकाळे, हमाल मापाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉमेश सपकाळे, सरचिटणीस शरद चौधरी, नंदू पाटील, शशी बियाणी, सुकदेव शेळके, बन्सी खरात, अंबादास बटुळे, अजिनाथ जपकर, विश्वनाथ बोरुडे, अरुण राजपूत यांच्यासह कामगार उपस्थित होते.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जळगाव शहराची विमानसेवा येत्या २ मार्चपासून नांदेड शहराशी जोडली जाणार आहे.जळगावहून अवघ्या साडेचार तासांत नांदेडला पोहोचता येईल.त्यासोबतच अहमदाबाद-जळगाव या मार्गावरील विमान फेर्‍या दररोज होणार आहेत. मुंबईसाठी आठवड्यातून चार दिवस विमानसेवा उपलब्ध होणार आहे. कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे खंडित केलेली व नंतर अल्प प्रमाणात सुरू झालेल्या विमानसेवेला प्रवाशांचा सातत्याने प्रतिसाद लाभत आहे. येत्या मार्च महिन्यापासूनच्या नव्या वेळापत्रकानुसार हे बदल होणार आहेत. उडाण योजनेत ट्रू-जेट कंपनीतर्फे अमदाबाद-जळगाव व जळगाव-मुंबई या मार्गावर विमान सेवा देण्यात येते. लॉकडाऊन नंतर सुरुवातीला नियमितपणे असणार्‍या या सुविधा अमदाबाद-जळगाव या मार्गावर आठवड्यातून दोन वेळा व जळगाव-मुंबई ही केवळ एक वेळा सुरू होती. त्यामुळे अनेक व्यावसायिक व…

Read More

जळगाव : विशेष प्रतिनिधी चोपडा- शिरपूर रस्त्यावर असलेल्या टोल नाक्याच्या शासकीय जागेत सार्वजानिक बांधकाम विभागाच्या एका उच्च पदस्थ अधिकारीने दांडगाई करत अधिकाराचा गैरवापर करून भागीदारीने कॅन्टीनचा व्यवसाय सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.अनेक वेळा संबंधित खात्याचे जबाबदार अधिकारी गणेश पाटील यांना सदराचा व्यवसाय बंद करण्यासंदर्भात शिवसैनिकांच्या मागणीवरून आमदार लताताई सोनवणे यांनी सूचना करूनही त्यांनी या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्यामुळे शिवसैनिकात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या उन्मत्त अधिकार्‍याच्या वागण्याविरोधत आता शिवसैनिकांनी देखील कार्यकारी अभियंता सोनवणे यांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते शासकिय विश्रामगृहाच्या व्हिआयपी रूममध्ये वडा पाव व मिसळचा व्यवसाय थाटण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे अधिकरी गणेश पाटील व शिवसैनिक यांच्यात जबर…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील नॉलेज सिटीमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षिक व मौखिक परिक्षा सुरु असतांनाच एका माजी नगरसेवकासह चौघांनी कॉलेजच्या आवारातच हैदोस माजवत प्राचार्य डॉ. विलास पाटील यांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती.दरम्यान, सदर प्रकरणी प्राचार्य डॉ.पाटील यांच्या जबाबावरुन धरणगाव पोलीसात माजी नगरसेवकासह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,याच कॉलेजमधील दुसर्‍या प्रकरणात शोभा नायर यांच्या फिर्यादीवरुन विनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील खान्देश बहुउद्देशीय संस्था संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी नार्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास मुलचंद पाटील हे जळगाव येथील दिपीका हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असतांना त्यांच्याकडून जबाब नोंदविण्यात आला.…

Read More

जळगाव ः विशेष प्रतिनिधी आपल्या देशात,राज्यात,जिल्ह्यात,गावात किंवा शहरात प्रशासन किंवा पोलिसांकडून करण्यात येणारी कोणत्याही स्वरूपातील कारवाई हंगामीच म्हटली पाहिजे कारण एकतर तक्रारी होतात त्यावेळी किंवा कोणतीही दुर्घटना झाली की कारवाईचा बडगा उगारला जातो. संबंधितांवर कारवाईचा फार्स केला जातो, प्रसंगी दंडात्मक कारवाई होते.उदाहरण द्यायचे झाले तर चेन्नई येथील फटाक्यांच्या कारखान्याचे देता येईल(राष्ट्रीय)तेथे फटाक्यांच्याय कारखान्यात स्फोट झाला.काही बालकांसह कित्येक कामगार मृत्युमुखी पडले.पोलीस आणि प्रशासनाने लगेच धाव घेतली असता त्या कारखान्यात अग्नी विरोधक व अन्य सुरक्षिततेच्या सुविधा आढळून आल्या नव्हत्या.त्याविरुद्ध गंभीर कारवाई केली गेली. जळगाव शहराच्या राजकमल टॉकीज चौकात पाच वर्षांपूर्वी नंदकुमार नामक अग्रवाल यांच्या होलसेल फटाका विक्रीच्या दुकानात भरदिवसा आग लागली होती.त्याची…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी अवधुतांच्या कृपाशिर्वादाने येथील खळवाडी परिसरातील श्रीपंत मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा साजरा होत असून या निमित्ताने आजपासून श्रीपंत गुरुचरित्र पोथी पारायणाची सरुवात करण्यात आली असून त्यांची सांगता २५ रोजी श्रीपंत मंदिराच्या वर्धापनीदिनी होणार आहे. पारायण प.पू.सुपडूमामा हंबर्डीकर यांच्या वाणीमधून होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी पारायणास बसणार्‍या भाविकांना सुरक्षित अंतर ठेवत बसविले असून सॅनिटायझर व मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. शहरातील खळवाडीमधील वेडीमाता मंदिर रोडवरील (बाबा टेन्ट हाऊस अ‍ॅन्ड कॅटर्सजवळ) श्रीपंत मंदिराचा वर्धापन दिन २५ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. नऊ वर्षापूर्वी माघ शुक्ल १३ दि.२५ फेब्रुवारी २०१२ रोजी श्री सद्गुरु पंत महाराजांच्या फोटोचे अनावरण…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी भुसावळ जवळ असलेल्या तसेच यावल तालुका कार्यक्षेत्रात असलेल्या तापी नदीपात्रातून आणि नदीच्या किनार्‍या लगतच्या भागातून मशनरीच्या माध्यमातून डबर,मुरूम इत्यादी गौण खनिजाचे उत्खनन करून दररोज हजारो ब्रास विना परमिट गौणखनिज अनधिकृतपणे वाहतूक करून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे.याकडे संबंधित यावल तहसीलदार यांच्यासह सर्कल, तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बांधकाम क्षेत्रातील ठेकेदारांकडून आणि रितसर नाममात्र परमिट काढून गौण खनिज वाहतूक करणार्‍यांमधून होत आहे. तापी नदीपात्रातून आणि तापी नदीच्या काठावर अधिकृत स्टोन क्रशर उद्योग सुरू आहेत एकूण ११ स्टोन क्रशर धारक आहेत हे सर्व स्टोन क्रशर तालुक्यातील अंजाळे,अकलुद,कासवा शिवारात असल्याची अधिकृत नोंद यावल तहसील मध्ये आहे यातील…

Read More

चाळीसगाव ः प्रतिनिधी नुकतीच दोन दिवसांपूर्वी राज्य शासन व पणन महामंडळाच्या वतीने चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यात मुख्य प्रशासक म्हणून दिनेश पाटील यांच्यासह १७ जणांची नियुक्ती करण्यात आली. कोविड संसर्गामुळे तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून व्यापार्‍यांसह शेतकर्‍यांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे ही बाब लक्षात घेता आज पहाटे ६ वाजता नूतन प्रशासकांनी भेट देत सर्वांना अचंबित केले.यावेळी ईश्वरसिंग ठाकरे, संजय चव्हाण, भीमराव खलाणे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कोतकर आदी उपस्थित होते मास्क लावा, काळजी घ्या अशा प्रकारच्या सुचना देत विक्रीसाठी भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकर्‍यांशी हितगूज केले. योग्य भाव मिळतो का?काही अडचणी आहेत का?असा संवाद साधत…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी खेळाडूंनी कोणताही खेळ चिकाटी व सातत्य ठेवून खेळले व बुद्धिबळसारखा खेळ खेळल्यास खेळाडू हा आपले चांगले करिअर घडवु शकतो त्यामुळे चांगले खेळ खेळा व त्याला आपल्या जीवनात आत्मसात करा असे भावनिक आवाहन जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लोकसंघर्ष मोर्चा आयोजित शिवजयंतीनिमित्त खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे,सचिन धांडे, डॉ.ए.जी. भंगाळे, डॉ.विकास बोरोले ,साजिद शेख ,अ‍ॅड. विजय पाटील, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे फारुक शेख,अंकुश रक्ताळे, अनिस शाह,मुकुंद सपकाळे, विष्णू भंगाळे, अयाजअली, मुकेश टेकवानी, दिलीप सपकाळे, अमोल कोल्हे, स्मिता वेद,प्रवीण ठाकरे यांची उपस्थिती होती. समारोपीय प्रस्तावना लोक संघर्षाच्या प्रतिभा शिंदे यांनी सादर…

Read More

जळगाव ः विशेष प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका शहरात कोणतेच नवीन विकास कामे करीत नाही,पण महापालिकेत जे राबतात त्या कर्मचार्‍यांचे वेतन तरी वेळेवर मिळायला हवे.आता ते सुद्धा मिळण्याची व्यवस्था नाही .जानेवारी महिन्याचा पगार आज पावेतो कर्मचार्‍यांना मिळालेला नाही आणि सुट्या आल्यामुळे जानेवारीचे वेतन मिळायचे असेल तर २२ फेब्रुवारी नंतरच मिळेल अशी शक्यता कर्मचार्‍यांनी सांगितली आहे.त्यामुळे सार्‍याच अडचणी असल्याचे सांगतानाच याकामी महानगरपालिका आस्थापना विभागाची अनास्था कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. जळगाव महापालिका कर्मचार्‍यांचा वेतनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असा म्हटला जात होता. काही वर्षांपूर्वी तर तीन -चार महिने कर्मचार्‍यांना वेतन मिळत नव्हते.त्यांना कधी कोणत्या महिन्याचे वेतन मिळाले हे तपासावे लागत होते म्हणजे जानेवारीचे वेतन एप्रिलमध्ये…

Read More