Author: saimat team

फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी आई-वडिलांची पुण्याई व अथक परिश्रमातून यश संपादन केलेला सौरभ उमाकांत पाटील हा आपल्या देशासाठी भविष्यातील तेजस्वी तारा असल्याचे परमपूज्य संत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. येथील सतपंथ मंदीर संस्थानमध्ये त्याचा थोर पराक्रमी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ, पेन भेट देऊन सत्कार केला. पुणे विद्यापीठातून एमएस्सी परीक्षेत सर्वप्रथम येऊन त्याने नेट-जेआरएफ परीक्षेत भारतातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला असून जळगाव जिल्ह्यासाठीच नव्हे तर आपल्या देशासाठी गौरवास्पद बाब म्हणजे बंगलोर येथील जगप्रसिद्ध तथा नामवंत संशोधन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) यामध्ये ‘हवामान व अवकाश शास्त्र’ या उपयुक्त विषयात संशोधन कार्यासाठी त्याची निवड…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भाजपा सांस्कृतिक सेलच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवगान स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा नुकताच सातार्‍यात झाला. याप्रसंगी भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, छत्रपती उदयनराजे भोसले, सांस्कृतिक सेलचे प्रदेश प्रमुख शैलेश गोजमगुंडे, कांता नलावडे, भरत पाटील, लक्ष्मण सावजी, नंदेश उमाप, सौ. विनता जोशी, विसुभाऊ बापट उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १५ हजार कलावंतांच्या सहभागाने ३९ ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीतून, वैयक्तिक व सांघिक मिळून ७८ संघ अंतिम फेरीत पोहचले होते. परंतु राज्यातल्या ठाकरे सरकारने कोविडचे कारण पुढं करत शिवजयंती साजरी करण्यावर घातलेल्या बंधनांना झुगारत, भाजपा सांस्कृतिक सेलने शिवगान स्पर्धेची अंतिम फेरी किल्ले अजिंक्यताराच्या साक्षीने सातार्‍यात पार पाडली. या वेळी परिक्षक नंदेश उमाप…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सोसायटी व इतर संस्थांचे २ हजार ३८० ठराव सहकार आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आले आहेत. या ठरावांना मंजुरी मिळाल्यानंतर मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पाठवण्यात आलेल्या ठरावांमध्ये ८६१ विविध कार्यकारी सोसायटी तर १५२१ इतर संस्थांच्या ठरावांचा समावेश आहे. जिल्हा बँकेची निवडणूक घेण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी ज्योती लाठकर यांनी ११ फेब्रुवारी रोजी आदेश दिले होते. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने २३ डिसेंबर २०१९ रोजीच्या मतदार यादीच्या दिलेल्या कार्यक्रमामध्ये सुधारणा केली. २७ ते ३१ जानेवारी या मुदतीत थांबलेली संस्था सभासद प्रतिनिधीचा ठराव दाखल करण्यासाठी १५ ते २२ फेब्रुवारी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमीत्त जैन पाईप्सचा उपयोग करून १५० फूट लांब व १२० फूट रुंद असे सुमारे १८ हजार चौरस फुट असे मोठ्याभाऊंचे भव्य मोझ्याक आर्ट मधील पोर्ट्रटे जैन व्हॅली परिसरातील ‘भाऊंची सृष्टी’ येथे साकारत आहे. या कलाकृतीचे जागतिक स्तरावरील विक्रमाची नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भवरलालजी जैन यांचे हे पोट्रेट अत्यंत कल्पकतेने जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने अवघ्या सात दिवसात साकारले. ही कलाकृती कायमस्वरूपी स्थापित करण्यात आलेली आहे. जागतिक विक्रम प्राप्त होणार्‍या या कलाकृतीला भाऊंच्या सृष्टीतील नयनरम्य अशा भाऊंच्या वाटिकेतून पाहता येणार आहे. भाऊंच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त…

Read More

पहूर, ता.जामनेर : प्रतिनिधी येथील पाचोरा रोडवरील संतोषीमाता नगर मधील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय विवाहितेने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी जामनेर पोलीसा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाचोरा रोडवरील संतोषीमाता नगरमध्ये योगेश गायकवाड हे पत्नी अर्चना गायकवाड व दोन मुलांसह रहिवासास आहे. योगेश गायकवाड हे महावितरण कंपनीत कामाला असून ते रात्रपाळीसाठी ड्युटीवर गेले होते तर घरी दोघ मुलांसह अर्चना ही एकटी होती. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास अर्चनाचा भाऊ नवल पाटील हा बहिण अर्चना हीस उपचारासाठी हॉस्पीटला न्यायचे…

Read More

जळगाव ः विशेष प्रतिनिधी आपल्याकडे शासकीय,प्रशासकीय ,महापालिकास्तरीय किंवा पोलीस दलाच्या अंतर्गत कोणत्याच कामात सातत्य दिसून येत नाही.परिणामी कारवाई करून थांबविण्यात आलेले कोणतेही अवैध काम,अतिक्रमणे, वाहन धारकांचा बेशिस्तपणा या गोष्टींवर पूर्णपणे प्रतिबंध लागलेला दिसत नाही.संबंधित विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो किंबहुना कारवाईची मोहीम राबविण्यात येते तोपर्यंत सारे काही अलबेल व व्यवस्थित वाटते मात्र मोहीम थांबली किंवा कारवाई करणे थांबले की, ‘पालथ्या घड्यावर पाणी’ ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. महापालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग एखाद्या भागात कारवाई करून दुसरीकडे जाताच त्याच जागांवर अतिक्रमणे पूर्ववत दिसतात.कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍याने अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली की सारे बंद मात्र तो अधिकारी बदलून गेला किंवा त्यानेच थोडी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अगोदरच आर्थिक कंबरडे मोडलेल्या चित्रपटगृह चालकांना आता पुन्हा चित्रपटगृहांवर बंदी आणून त्यांच्यासह कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवनातून उठविण्याचे कटू निर्णय न घेता चित्रपटगृहांना कोरोनाचे नियम पाळत,क्षमतेच्या टक्केवारीत व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे. जिल्हाधिकार्‍यांनी कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आजपासून काही नियम व अटी लागू केल्या आहेत त्यात चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत मात्र लग्न सोहळे व ंमंगलकार्यालयांना काही मर्यादित संख्येपर्यंत परवानगी दिली आहे.हेच धोरण चित्रपटगृहांबाबत घेतले तर चित्रपटगृहातील कर्मचायांवर उपासमारीची वेळ येणार नाही.तसेच नुकत्याच सुरु झालेल्या चित्रपटगृहांना जीवदान मिळेल. याबाबत शहरातील चित्रपटगृह चालकांचे शिष्टमंडळ आज…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई विसपुते यांनी स्वर्गीय सुकन्या निधीचा वाढदिवस जळगाव येथील मुलींच्या बालसुधारगृहात सामाजिक उत्तरदायित्वाने नुकताच साजरा केला.व्यवसायानिमित्ताने त्या बीडला होत्या परंतु वाढदिवसात खंड पडू नये म्हणून त्या तातडीने जळगावी परतल्या! नियतीने एकही वाढदिवस त्यांना साजरा करू दिला नाही परंतु वेदनेचा वेद करीत निरीक्षण गृहातील मुलींमध्ये स्वर्गीय निधी चिरंजीव असून तिचा आत्मा अमर आहे या विशाल मातृभावाने माता यशोदा होत त्यांनी दुःखाचा लवलेश चेहर्‍यावर न दाखवता मुलींमध्ये आनंदात केक कापून निधीचा उत्साहाने अखंडितपणे १६ वा वाढदिवस व्रतस्थपणे साजरा केला. प्रारंभी स्वर्गीय सुपूत्री निधीच्या प्रतिमेचे पुजन वैशाली विसपुते यांनी सुपुत्र यशसह करुन पुष्पांजली…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जामनेरचे कादंबरीकार डॉ. अशोक कौतिक कोळी यांना ‘श्रीमती कमल मनोहर कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. सातारा येथील प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. खान्देशात बोलल्या जाणार्‍या ‘तावडी बोली’ला जाणीवपूर्वक आपल्या कथात्म साहित्यातून अधिष्ठान प्राप्त करून देण्याचे मोलाचे काम अशोक कोळी यांनी केलेले आहे.‘आपल्याला मिळालेला सन्मान हा तावडी बोलीचा सन्मान आहे’,अशी भावना त्यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मौलाना अबुल कलाम आझाद यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ इंगळे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय. एस. महाजन सर व मीनाक्षी चव्हाण यांनी मौलाना आझाद यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी जयप्रकाश महाडिक, अरविंद बंगाली, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, अल्पसंख्याक महानगराध्यक्ष डॉ. रिजवान खाटीक, सलीम इनामदार, संजय चव्हाण, अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनिल माळी, दिलीप माहेश्वरी, राजू तडवी, राजू बाविस्कर, सचिन चव्हाण, ममता तडवी, पदाधिकारी व कार्यकर्ते…

Read More