जळगाव ः प्रतिनिधी युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त शहरातील लिलाई अनाथाश्रम येथील मुलांना तसेच शहरातील गरजू एकूण १२४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये शाळेची बॅग, वही, पेन, पेन्सील, स्केल, रबर, शार्पनर, स्केचपेन इत्यादी चा समावेश होता. यासह काही प्रेरणादायी पुस्तके सुद्धा वाटप करण्यात आले. यामध्ये मुख्यत: पद्मश्री डॉ. भंवरलालजी जैन लिखित प्रोत्साहनपर पुस्तके देण्यात आले. सर्व साहित्य लिलाई अनाथाश्रमाचे अधिक्षक विठ्ठल पाटील यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, सचिव-अमित जगताप, उपाध्यक्ष-संदिप सुर्यवंशी, पियुष हसवाल, प्रितम शिंदे, अमोल गोपाल, राहूल चव्हाण, प्रशांत वाणी, अर्जून भारूळे, भवानी अग्रवाल,…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी जळगावातील किंग प्रोडक्शन या गाणे निर्मिती आणि चित्रपट निर्मिती संस्थेने किंग प्रोडक्शन या नावाने यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून नुकतेच पदार्पण करीत असून या पदार्पणानिमित्त ’प्रियतमा ’ आणि ’गंध दरवळला’ या गाण्याचे अल्बम लॉन्चिंग केले जाणार असल्याची माहिती निर्माते नागेश जाधव आणि प्रशांत जाधव यांनी काल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी बोलताना निर्माते नागेश जाधव आणि प्रशांत जाधव म्हणाले की, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना आपल्या उपजत कलागुणांची सादरीकरण करण्याची संधी मिळत असते मात्र त्यांना कुणाच्या तरी सहकार्याची आवश्यकता असल्याने अशा कलाकारांना जगासमोर आणून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या अंगभूत असलेली सुप्त गुण समाजासमोर यावेत…
जळगाव ः प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश ५५ वे प्रदेश अधिवेशन ७ फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड या ठिकाणी झाले. प्रदेश अधिवेशनामध्ये सन २०२१-२२ साठी अभाविप अध्यक्ष म्हणून प्रा.सारंग जोशी व प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांची निवड करण्यात आली आहे. अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांचे आज सकाळी ७ वाजता जळगाव शहरात आगमन झाले. यावेळी जळगाव शाखेच्या वतीने ढोल ताशा, फटाके वाजवत फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले. यावेळी महानगराच्या प्रथम नागरिक महापौर भारतीताई सोनवणे यांनी जळगाव नगरीत प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांचे स्वागत केले तसेच प्रदेश मंत्री यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला हार घालून रॅलीची…
पारोळा : प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दाखवा, आता डॉ. सतिश पाटलांच्या जोडीला खान्देशात नाथाभाऊ आल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढलेली असून विरोधी पक्ष किती ही सांगत असेल तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राहिल आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच असतील असा दावा करुन भाजपाने राज्यात सत्तेची स्वप्ने पाहु नये असा टोला ना. जयंत पाटील यांनी लगावला. पारोळा येथील विजयानंद मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत कार्यकर्त्यांनी संवाद साधतांना ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी पालकमंत्री डॉ. सतिश पाटील, गुलाबराव देवकर, आ.अनिल पाटील, माजी आ.मनिष जैन, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी खा.अॅड.वसंतराव…
फैजपूर, ता.यावल : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या पाडळसे येथील स्वामिनारायण मंदिराच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. पाडळसे येथील स्वामिनारायण मंदिरात झालेल्या कार्यक्रमात साकेगाव स्वामिनारायण गुलकुलचे प.पु.स.गु.के.के.शास्त्री, कथा वक्ताश्री शास्त्री नयन प्रकाश दासजी जळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. कोरोनाने विस्कळीत झालेले जीवन पूर्वपदावर येत असताना शाळा सुरू होण्याच्या अगोदर गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे.
जळगाव : बुलडाणा (Buldhana) येथे ट्रक आणि कारमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात मुक्ताईनगरमधील काँग्रेस जिल्हा सचिवाला प्राण गमवावे लागले. कॉंग्रेसचे जिल्हा सचिव आसिफ खान (Asif Khan) इस्माइल खान यांचा जागीच मृत्यू झाला. आसिफ खान इस्माइल खान हे औरंगाबादहून घरी परत येत होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारास बुलडाणा शिंदखेडजवळ त्यांच्या कारची ट्रकला समोरासमोर धडक झाली. यामध्ये आसिफ यांचा जागीच मृत्यू झाला. खान यांच्यासोबत गाडीत असलेले दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मुक्ताईनगरचे काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव यांचा समावेश आहे. यामुळे मुक्ताईनगर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाचोरा ः प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बु. येथील जितेंद्र देविदास पाटील हे भारतीय सैन्यदलात१०१ मराठा बटालियनमधून २१वर्षाच्या कार्य सेवेतून निवृत्त झाले.त्यांची स्वागत सत्कार रॅली काल रोजी सकाळी येथील रेल्वे स्टेशनपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत काढण्यात आली. सैनिक जितेंद्र पाटील यांनी प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले व त्यानंतर त्यांच्या सत्कार मिरवणुकिला सुरुवात झाली. ओपन जीप फुलांनी सजवून बॅण्ड पथकाच्या माध्यमातून देशभक्तीपर गीत गाऊन भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत सैनिकांचा परिवार, नातेवाईक,मित्र मंडळी व माजी सैनिक देखील सहभागी झाले होते.या वेळी जनता प्रबोधन बहुद्देशीय संस्था व छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा…
फैजपूर ः प्रतिनिधी महिलांच्या हक्कांसाठी खान्देश नारीशक्ती गृपच्या माध्यमातून अध्यक्षा दिपाली चौधरी यांनी महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून महिलांच्या सन्मानार्थ व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करीत असतात. त्याचा फायदा सर्व महिलांनी घेऊन आत्मनिर्भर तथा संघटित होण्याचे आवाहन जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांनी केले. त्या येथील खान्देश नारीशक्ती व दिपाली गृप्स अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांच्यातर्फे आयोजित भव्य आत्मनिर्भर महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, रावेर पं.स.सदस्या योगिता वानखेडे, महिला मुक्ती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संगिता भामरे, ज्येष्ठ निरसेविका शकुंतला भारंबे, माजी नगराध्यक्षा आशालता चौधरी, सपना राणे, विद्या सरोदे,…
अमळनेर ः प्रतिनिधी राजकारणात पडझडही सुरूच असते. सत्तेचा अमर पट्टा आयुष्यभर कोणीही बांधून येत नाही. पण जनतेच्या मनात निर्माण केलेले स्थान हे कायम असते. जळगाव जिल्हा म्हणजे हा खान्देशचा एक मुख्य पाया आहे. या जिल्ह्याने या देशाला व जगाला अनेक महापुरुष दिले आहे. उदाहरणार्थ बहिणाबाई चौधरी व बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे अशा थोर व्यक्तींची जडणघडणही जळगाव जिल्ह्यात झाली आहे. साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. राजकारण हे विकास कारणासाठी करावे. ही वृत्ती डोळ्यासमोर ठेवून गेले ४० वर्षे एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यात कार्य करत आहेत. ते सत्तेत असताना जळगावमधील अनेक मोठे प्रकल्प उदयास आले. देशात कुठेही जळगाव जिल्ह्याचे…
मुंबई, : राज्यातील ‘नॉट वेटलँड’ म्हणून पडताळणी झालेल्या साईटस् ची पुन्हा पडताळणी करण्यात यावी, वेटलँडस् च्या जतन आणि संवर्धनाचा समावेश माझी वसुंधरा अभियानात करण्यात यावा, तसेच याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची विभागस्तरावर कार्यशाळा घेण्यात यावी, अशा सूचना पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र राज्य वेटलँड प्राधिकरणाची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाली. बैठकीस पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव तथा प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा श्रीमती मनिषा म्हैसकर, पर्यावरण संचालक नरेद्र टोके, पर्यावरण विभागाचे उपसचिव जॉय ठाकूर उपस्थित होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांच्यासह प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते. पर्यावरण आणि…