Author: saimat team

जळगाव : प्रतिनिधी शहरातील वाटीका आश्रमाजवळील राष्ट्रीय महामार्गावर एका ५० वर्षीय पादचार्‍याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अज्ञात वाहनधारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील कांचननगर परिसरातील भरत रामचंद्र सोनवणे (वय ५०) हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काल रात्री वाटीका आश्रम परिसरात राहणारे त्यांचे मित्र मगन काळे यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. सदर कार्यक्रम आटोपून भरत सोनवणे हे कांचननगरकडे जाण्यासाठी १० वाजेच्या सुमारास पायी निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरुन जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात सोनवणे हे गंभीर जखमी…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव नजीक पपईची वाहतूक करणारे आयशर ट्रक पलटी होत झालेल्या अपघातात १५ मजुरांचा जागीच गुदमरुन मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात सहा जण गंभीर जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. या अपघातात मृत मजुरांमध्ये रावेर तालुक्यातील आभोडा येथील ११, विवरा, रावेर, केर्‍हाळा येथील ४ असे एकूण १५ जणांचा समावेश आहे. अपघातातील मृतांमध्ये आभोडा येथील एकाच कुटुंबातील ११ जणांचा समावेश असून त्यात दोन बालक तर सहा महिलांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. यावल तालुक्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्दैवी घटना असल्याने संपूर्ण यावल रावेर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या उदात्त हेतूने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ आणि पंचायत समिती शिक्षण विभागा यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विध्यार्थ्यासाठी आणि खुल्या गटात इच्छुक व्यक्तीसाठी तालुकास्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. सध्याचा कोऱोना काळ लक्षात घेता सदर स्पर्धा ही ऑनलाईन घेण्यात येत आहे. इच्छुक सहभागींनी आपला वकृत्वाचा व्हिडिओ तयार करून तो यु ट्युबला डाउनलोड करून त्याची लिंक अंतर्नाद प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या व्हाटस अप ला टाकावयाची आहे.प्राथमिक फेरी ऑनलाईन होणार आहे आणि अंतिम फेरी बक्षीस वितरणाच्या दिवशी होणार आहे. वकृत्व स्पर्धा ४…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी अनूसुचित जातीसाठी राखीव असलेल्या बांभोरी येथील सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या सचिन यशवंत बिर्‍हाडे यांना पोलीसासमक्ष बेदम मारहाण करुन अपहरण करणार्‍या भिकन नन्नवरे व त्यांच्या गावगुंडावर तातडीने गुन्हा नोंदवून या प्रकारची पूर्वकल्पना व तक्रार करुनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बांभोरी प्र.चा. धरणगाव येथील सरपंचपद अनूसुचित जाती संवर्गासाठी राखीव झाले आहे. बांभोरी येथील ग्रामपंचायत निवडणूकीत अनूसुचित जातीच्या जागेतून सचिन यशवंत बिर्‍हाडे हे एकमेव उमेदवार विजयी झाल्याने ते सरपंचपदी विराजमान होतील हे निश्चित झाले होते. मात्र एक दलीत…

Read More

जळगाव ः  प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील हे “कार्यकर्ता परिवार संवाद यात्रा“ या कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौर्‍यावर होते.यावेळी त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळात वेळ काढून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते व शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले योगेश देसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सौ.पौर्णिमा देसले यांनी त्यांचे औक्षण करत देसले कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी देसले कुटुंबियांशी निवांतपणे गप्पा करत आस्थेवाईकपणे विचारपूस केली.यावेळी त्यांच्यासोबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील,राष्ट्रवादी ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील,कार्याध्यक्ष विलास पाटील, समन्वयक विकास पवार, माजी आमदार मनीष जैन, संजयदादा गरुड, डॉ.रिझवान खाटीक,राजू मोरे,भरत…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी पु. ना. गाडगीळ गॅलरीत परिवर्तनच्या दशकपूर्ती निमित्ताने खान्देशातील ३५ चित्रकारांनी एकत्र येऊन शोध’ चित्रप्रदर्शनात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ चित्रे रेखाटून परिवर्तनच्या दर्शपूर्तीला अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी महापौर भारती सोनवणे यांनी कॅनव्हासवर चित्र रेखाटून केले. या उपक्रमास चित्रकार राजू बाविस्कर, राजू महाजन, विजय जैन, विकास मलारा, नितीन सोनवणे, प्रदीप पवार, यशवंत गरूड, श्याम कुमावत आदीसह ३५ चित्रकार राबवत आहे. परिवर्तनच्या दशकपूर्ती निमित्ताने खान्देशातील ३५ चित्रकारांनी आपली एकत्र मोट बांधत परिवर्तनच्या कार्याला मानवंदना म्हणून शोध’ हे चित्रप्रदर्शन रविवारी भरवण्यात आले. सर्व चित्रकारांनी एकत्र येऊन परिवर्तनच्या १० वर्षांचा प्रवास जाणून घेत रंगमंचावरील काळ व अवकाश या सोबतच प्रकाश…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी राजस्थानी ब्राह्मण संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या वेळी महानगराध्यक्षपदी डेव्हलपर्स बिल्डर सत्यनारायण खटोड यांची बिनविरोध निवड झाली.मावळते अध्यक्ष घनश्याम नागोरी यांनी खटोड यांचे नाव सूचवले त्यास माजी अध्यक्ष विश्वनाथ जोशी यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर खटोड यांनी त्यांच्या वर्षभराच्या कार्यकाळानंतर सर्व भाषिक ब्राह्मण समाजातील युवकांसाठी परशुराम चषक क्रिकेट स्पर्धा’ १० मार्च ते १४ मार्च २०२१ दरम्यान घेण्याची घोषणा केली तसेच सर्व राजस्थानी ब्राह्मण समाजात आपआपसात रोटी-बेटी संबंधांसाठी वधु-वर परिचय संमेलन घेण्याचे व समाज भवन बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी कार्याध्यक्षपदी गोपाल पंडित, सचिव शिवप्रसाद शर्मा, सहसचिव किशन अबोटी, कोषाध्यक्ष महेंद्र पुरोहित, उपाध्यक्ष संजय व्यास,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जनता सहकारी बँकेने सर्वसामान्य जनतेचा सामाजिक,सांस्कृतिक व आर्थिक आशय जपत प्रगति केली असून बँकेने नुकताच रु.३००० कोटी एकत्रित व्यवसायाचा टप्पा गाठला आहे तसेच सामाजिक गरज ओळखून बँक आपले धोरण ठरवीत असते व त्या अनुषंगाने समाजाच्या गरजा पूर्ण करण्यावर बँकेचा भर असतो असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष श्री अनिल राव यांनी आपल्या मनोगतात केले. काल रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल,जळगाव येथे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झाली.सभेस सुमारे ७०० सभासद उपस्थित होते. बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अविनाश आचार्य यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर बँकेची प्रगती सुरु असून समाजातील शेवटच्या घटकाला सक्षम करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. बँकेच्या प्रगतीत बँकेचे स्थापनेपासूनचे…

Read More

जामनेर ः विशेष प्रतिनिधी मी पुन्हा येईन, म्हणणार्‍यांनी माझे तिकीट कापले तेव्हाच ते थांबले, पुन्हा येण्याचा प्रश्नच आला नाही. ज्या पक्षासाठी आयुष्याची ४० वर्ष खर्ची घातली, ज्यांना राजकारणात मी जन्माला घातले ते मला झाले नाही, ते तुम्हाला काय होतील,असा खडा सवाल माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी काल जामनेर येथील राष्ट्रवादी परिवार संवाद सभेत केला. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद बैठक पक्षाचे वरीष्ठ नेते प्रदेश अध्यक्ष तथा आघाडी सरकार मधील जलसंपदा मंत्री जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकतेच पदार्पण केलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बोदवड चौफुल्ली वरील बोहरा मंगल कार्यालयात काल रात्री झाली. यावेळी एकनाथराव खडसे…

Read More

जळगाव ः विशेष प्रतिनिधी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे जागेवर जाऊन पहिली.त्यामुळे होणारी अडचण आणि अडथळे त्यांच्या लक्षात आले, आणि लागलीच तशी वादग्रस्त अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय झाला.त्याचप्रमाणे आयुक्त साहेबांनी आता संपूर्ण शहरात फेरफटका मारावा आणि रस्त्यांची अवस्था तसेच शहरातील अस्वच्छता पहावी व त्याबद्दलही निर्णय घ्यावा अशी मागणी शहरातील सहनशील लोकांनी केली आहे. जळगावकर नागरिक खरोखरच अत्यंत सहनशील आहेत.परिसरात कितीही घाण असो,कचरा कुंड्या फुल्ल झालेल्या असोत,गटारी तुडुंब भरून रस्त्यावरून गटाराचे पाणी वहात असो,दोन दिवसांच्या अंतराने मिळणारे पाणी लाईन फुटली किंवा गळती झाली तर चार दिवसांनंतर मिळो,स्ट्रीट लाईट बंद असो,घरापर्यंत जाण्याचा रस्ता खडतर का असेना सारेकाही…

Read More