जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामानंदनगर परिसरातील जागृती हौसिंग सोसायटीमधील एका बंद घरात भर दुपारी चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, या चोरट्यांच्या धाडसी प्रकारामुळे जिल्ह्यात पोलीसांचा धाक संपल्याची भावना जनतेमध्ये उमटू लागली आहे. तर चोरट्यांनी आता चक्क दिवसाढवळ्या पोलीसांसमोर आव्हान उभे केले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामानंदनगर परिसरात जागृती हौसिंग सोसायटीमध्ये (प्लॉट नं.३१, गट नं १४८) हरसिंग पाटील हे आपल्या कुटुंबियासमवेत वास्तव्यास आहेत. काल २८ फेब्रुवारी रविवार असल्याने हरसिंग पाटील हे आपल्या परिवारासह कामानिमित्त खोटेनगर परिसरात राहणार्या आपल्या काकांकडे दुपारी २ वाजता गेले होते. जातांना त्यांनी आपल्या घरातील दरवाजाची कुलूपे व्यवस्थित नेहमीप्रमाणे लावून गेले…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली, वसंतवाडी, वराड व वडली या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी ३६ लाखांची तरतुद करण्यात आली आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणासह जलनिस्सारणाची सुविधा केली जाणार आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले. शिरसोली प्र.न. येथे शनिवारी सायंकाळी आयोजीत कार्यक्रमात या रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले. पालकमंत्री पाटील यांनी या रस्त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची सोय होणार आहे. मतदारसंघात याचप्रमाणे विकासकामांचा झंझावात कायम राहणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील, नाना सोनवणे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, कृउबा सदस्य पंकज पाटील, शिरसोली सरपंच प्रदीप…
यावल ः प्रतिनिधी तक्रारीनुसार यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला नाही म्हणून तसेच पोलीस कर्मचारी जातिवाचक शिवीगाळ करून माझ्यावर अन्याय अत्याचार करीत असल्याची लेखी व समक्ष तक्रार यावल येथील माजी नगरसेवक जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस विजय सुपडू गजरे यांनी केली. अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या तक्रार अर्जात माजी नगरसेवक विजय गजरे यांनी म्हटले आहे की, यावल पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी तक्रार अर्जानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी ५ हजार रुपयांची खंडणी मागून, मारहाण करून, दहा ग्रॅम सोन्याची अंगठी व घड्याळ हिसकावून मला जातिवाचक शिविगाळ करून मारहाण व पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवून माझ्यावर अन्याय अत्याचार…
जळगाव ः प्रतिनिधी येथील वर्धमान सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक बी.एस. राठोड यांनी जून २०२० पासून आजतागायत ऑनलाइन पद्धतीने झालेल्या विविध विषयावरील स्पर्धेमध्ये तसेच कोविड-१९ काळात जनजागृतीसाठी आयोजित राज्य ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रश्नमंजुषा सहभागी होऊन सुमारे दीडशे प्रमाणपत्र प्राप्त केली आहेत.त्यांनी केवळ सात -आठ महिन्यात हे यश संपादन केले आहे. कोरोना काळात विद्यापीठ स्तरावर व्यापक स्वरूपात जनजागृती व्हावी म्हणून विविध प्रकारचे स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात प्रश्नमंजुषा, ऑनलाइन वेबिनार असे अनेक स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवले आहेत तसेच माय जिओच्या सरकारी वेबसाईट वरून ५० पर्यंत प्रमाणपत्र मिळवले असून महाविद्यालये व इतर स्वयंसेवी संस्थांकडून विविध…
जळगाव/धुळे/नंदुरबार : प्रतिनिधी राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीजजोडणी, दिवसा ८ तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा, कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती व सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग व कृषी ग्राहकांच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या उद्देशाने राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० जाहीर केले असून, महावितरणद्वारे त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर १ मार्च ते १४ एप्रिल २०२१ पर्यंत कृषी ऊर्जा पर्व राबवले जाणार असून, जनजागृतीसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वाचा शुभारंभ १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात येत…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ-सुरत व भुसावळ-नंदुरबार येथे जाण्यासाठी २ मार्चपासून आता भुसावळहून दररोज गाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तर भुसावळ-बांद्रा टर्मिनसदरम्यान सात मार्चपासून त्रिसाप्ताहिक गाडी सुरू करण्यात येणार आहे. यात गाडी क्रमांक ०९०१४, गाडी क्रमांक ०९००८ व गाडी क्रमांक ०९०७८ या विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांत व … या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. गाडी क्रमांक ०९०१४ अप विशेष गाडी ७ मार्चपासून दर मंगळवार, गुरुवार, रविवार या दिवशी भुसावळहून सायंकाळी ५.४० वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी बांद्रा टर्मिनसला पहाटे ४.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०९०१३ डाऊन ही गाडी ७ मार्चपासून दर मंगळवार, गुरुवार, रविवार या दिवशी बांद्रा टर्मिनसहून…
जळगाव ः प्रतिनिधी ‘जिल्हानिहाय शिक्षक साहित्यिकांचे संमेलनं झाली पाहिजे “असे आवाहन सुप्रसिद्ध कवी तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक प्राथमिक शशिकांत हिंगोणेकर यांनी केले.मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पाचोरा येथील देसले क्लासेस सभागृहात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव संचलित प्रथम शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी कवी हिंगोणेकर अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख कवी विजय लुल्हे,अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी,पत्रकार शिवाजी शिंदे ,सुनील पाटील,डॉ.वाल्मीक अहिरे ,भैय्यासाहेब सोमवंशी,राजेंद्र पाटील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ज्ञानपिठ पुरस्कृत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.पुस्तक भिशी जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी पुस्तक भिशी उपक्रमाची संकल्पना, नियमावली,कार्यपद्धती व पुरक…
जळगाव ः गणेश पाटील चोपडा शिरपूर रस्त्यावर असलेल्या टोल नाक्याच्या शासकीय इमारतीत सार्वजानिक बांधकाम विभागाच्या एका उच्च पदस्थ अधिकार्याने दांडगाई करत अधिकाराचा गैरवापर करून भागीदारीने कॅन्टीनचा व्यवसाय सुरू केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. अखेर यासंदर्भात सायंदैनिक साईमतने वृत्त प्रकाशित केले होते. अखेर या वृत्ताची दखल वरिष्ठांना घेणे भाग पडले अन् सदरची हॉटेल सिल करण्याचे आदेश देण्यात आले व तशी तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. याबाबतीत अनेक वेळा संबंधित खात्याचे जबाबदार अधिकारी गणेश पाटील यांना या ठिकाणचा सदरचा हॉटेल व्यवसाय बंद करण्यासंदर्भात शिवसैनिकांच्या मागणीवरून आमदार लताताई सोनवणे यांनी सूचना करूनही गणेश पाटील यांनी या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते .त्यामुळे शिवसैनिकात…
जळगाव ः प्रतिनिधी जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांचा आज (ता.२५) पाचवा श्रद्धावंदन दिन आहे. कृषिक्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करणार्या भवरलालजींचे स्मरण त्यांच्या सान्निध्यात येणारी माणसं आणि त्यांच्या कर्तबगारीचा परिचय असलेली माणसंही आपआपल्या पद्धतीने गौरव करीत असतात. असाच एक सुंदर प्रत्यय म्हणजे एक मोजेक कलाकृती. जैन पाईप्सचा उपयोग करून जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी ’जैन व्हॅली’ परिसरातील भाऊंची सृष्टी’ येथे १५० फूट लांब व १२० फूट रुंद असे सुमारे १८ हजार चौरस फूट अशी मोठ्याभाऊंची भव्य मोजेक प्रकारातील कलाकृती साकारली. जागतिक नामांकन प्राप्त केलेली ही कलाकृती सलग ९८ तासात साकार झाली आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रतिनिधींनीही याची नोंद घेऊन…
जळगाव ः प्रतिनिधी युवा विकास फाउंडेशन व विष्णू भंगाळे मित्र परिवार जळगावतर्फे ऑनलाइन व्हिडीओ पद्धतीने हनुमान चालीसा पठण स्पर्धा २०२१’ घेण्यात आली. स्पर्धेत ५२७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून व्हिडीओ पाठवले. सोमवारी सरदार पटेल लेवा भवन येथे स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. स्वामी नारायण मंदिराचे स्वामी गोविंद प्रसाद महाराज, स्वामी नयनप्रकाशदासजी महाराज, आमदार सुरेश भोळे, भाईजी मुंदडा, नगरसेवक विष्णू भंगाळे, डॉ. स्नेहल फेगडे, ललित चौधरी, महेश पाटील, प्रा. सुरेश अत्तरदे, योगेश भावसार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. अनुपमा कोल्हे, स्वाती पगारे यांनी सूत्रसंचालन केले. राजेश वारके यांनी आभार मानले. कार्यक्रमास ललित महाजन, महेंद्र पाटील, एकनाथ पाचपांडे, चेतन…