जळगाव ः प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार प्रा.ई.वायुनंदन यांनी मावळते कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडून काल सकाळी स्वीकारला. सर्वांना सोबत घेऊन या विद्यापीठाच्या विकासासाठी बांधील असल्याची ग्वाही प्रा.वायुनंदन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली. प्रा.पी.पी.पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्यामुळे कुलपती तथा राज्यपालांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती केली. सोमवार दि ८ मार्च रोजी सकाळी प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडून प्रा.वायुनंदन यांनी पदभार स्वीकारला. कुलगुरुंच्या दालनात झालेल्या छोटेखानी समारंभात बोलतांना प्रा.वायुनंदन म्हणाले की, चार वर्षापुर्वी आजच्याच दिवशी मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुलगुरु म्हणून पदभार स्वीकारला होता.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त…
Author: saimat team
फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांच्या धाडी नदी सुशोभीकरण कामातील रस्त्याचे सहा महिन्यातच बारा वाजले आहे. हा रस्ता ठीकठिकाणी उखडलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नगरपालिकेला सुमारे अडीच ते तीन कोटी रक्कम धाडी नदी पात्र सुशोभीकरण करण्यासाठी दिले गेले होते. हे काम २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. या कामांतर्गत धाडी नदीच्या काठावर संरक्षण भिंत व श्रीराम टाकी ते लक्कड पेठ नजीक खिरोदा रस्ता असे कॉंक्रिटीकरण करण्यात आले. या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण पूर्ण होऊन सहा महिनेच झाले मात्र हा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून उखडलेल्या परिस्थितीची आज अवस्था झाली आहे.…
जळगाव : प्रतिनिधी केसीई सोसायटी शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जनजागृती अभियान शुक्रवारी मास्कबाबत अभियान राबवण्यात आले. कोरोनाचा कहर टाळायचा असेल तर मास्क घाला,असे सांगतानाच ज्यांनी मास्क घातले अशा १०० नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन प्रोत्साहित करण्यात आले, तर ज्यांनी मास्क लावले नव्हते अशा ३०० नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. ४०० जणांना सकारात्मक संदेश देण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य वाहतूक निरीक्षक देविदास कुनगर उपस्थित होते. त्यांनी रस्ते सुरक्षा, कोरोनासंबधी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी अध्यक्षीय भाषणात कोरोना जनजागृती संदर्भात मनोगत व्यक्त केले. कोरोना पुन्हा वाढतो आहे. त्यामुळे सध्या मास्क वापरणे…
अमळनेर : प्रतिनिधी येथील शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे दरवर्षाप्रमाणे महाराष्ट्रात नावाजलेले तापी-पूर्णा राज्यस्तरीय साहित्य व इतर पुरस्कार नुकतेच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी घोषित केले. पुरस्कारार्थी मध्ये सुप्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड ( मुंबई ) जीवन गौरव पुरस्कार, चिंतामण शिरोळे (सटाणा ) जीवनगौरव पुरस्कार, ह.भ.प. सुनील माळवे (नाशिक) आदीशक्ती संत मुक्ताई अध्यात्म सेवा पुरस्कार , भागवत दगडू राठोड (कु-हा -काकोडा ता. मुक्ताईनगर) कल्याणराव भवर (ता. अंबड जि. जालना) तुकाराम जावळे ( ता. पैठण जि. औरंगाबाद) यांना बळीराजा शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार, उत्कृष्ट संचलनासाठी दिपाली केळकर व डॉ. मृण्मयी भजक (मुंबई ) यांना तर साहित्य पुरस्कार कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध कादंबरीकार तथा राष्ट्रपती…
जळगाव : प्रतिनिधी उन्हाळ्याची चाहूल लागताच पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. यंदा मार्च महिना लागताच उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे सध्याचे तापमान लक्षात घेता पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारी शहरातील वेगवेगळ्या रहिवासी भागात जाऊन पक्ष्यांसाठी पाणी पिण्याची मातीची भांडी वाटप केली. अभियानात शुक्रवारी पहिल्या टप्प्यात पन्नास भांडी घरोघरी जाऊन देण्यात आली. नागरिकांनी आपल्या परिसरात पक्ष्यांना पाणी व धान्य ठेवावे असे आवाहन या वेळी करण्यात आले. पुढील काही दिवसांत हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे. शहरातील गिरणा टाकीच्या मागील परिसर, रामानंद नगर, स्टेट बँक कॉलनी, स्वातंत्र्य चौकातील कॉलन्यांत राबवलेल्या या उपक्रमात अध्यक्षा वैशाली पाटील, नीता भंडारी, सोनल पाटील यांनी सहभाग नोंदवला.
जळगाव ः प्रतिनिधी कोणतेही पुरावे नसताना राज्याच्या विरोधी पक्षनेत्याने विधानसभेत जळगावातील न घडलेल्या घटनेबद्दल आरोप केले. हा त्यांचा उथळपणा असून प्रसिद्धीसाठी विरोधक किती आसूसलेले आहेत हे त्यातून समोर आले आहे. त्यांनी आता जळगावसह संपूर्ण राज्याची माफी मागावी, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी टीका केली. शहरातील महिलांच्या शासकीय वसतिगृहात गंभीर स्वरुपाचे गैरप्रकार पोलिसांनी केले, असे आरोप प्रसिद्ध झाल्यानंतर कोणतीही शहानिशा न करताच देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्यावर भाषण केले. या गैरप्रकारची चित्रफित उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विधानसभेत गोधळ झाला. त्यामुळे जिल्ह्याचीच नव्हे तर राज्याचीही बदनामी झाली आहे. जबाबदार विरोधीपक्ष म्हणून पुरेशी खात्री करून मगच त्यांनी…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाने अत्यवस्थ असलेल्या रुग्णांसाठी नाममात्र दरात रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचा उपक्रम राबवण्यात येतो आहे. जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत ‘सेवारथ’ नावाने पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णांची संख्या शेकडोच्या संख्येने वाढली. काही गंभीर रुग्णही समोर येत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना हॉस्पिटलला दाखल करण्याची वेळ आली आहे. काही रुग्णांना वेळप्रसंगी सिटीस्कॅन तपासणी करण्यासाठी न्यावे लागते. नातेवाईकांना संसर्ग होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते. बर्याच वेळा रुग्णांना ऑक्सिजन लावून तपासणी करावी लागते. या पार्श्वभूमीवर सेवारथ परिवाराच्या वनीने कोरोना तसेच नॉन कोवीड रुग्णांसाठी अल्पदरात ऑक्सिजन रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे. शहरासह तालुक्यातील तसेच इतर तालुक्यांतील रुग्णांना या…
फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या दुसर्या संभाव्य लाटेची परिस्थिती असताना स्कोर नगरपालिका अंतर्गत येणार्या कॉलनी भागांमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे.कॉलनी भागांमध्ये गेल्या महिन्याभरापासून घंटागाडीची घंटा वाजलीच नाही.त्यामुळे घराघरांमध्ये केराच्या बादल्या भरून कचरा साचला आहे.हाच कचरा महिलावर्ग आपल्या सोयीच्या ठिकाणी टाकून देतात. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. गटारीतील काढलेली घाण उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने ती घाण कोरडी होऊन परिसरातील डुकरे त्याच ठिकाणी पसरवित असतात. त्यामुळे स्वच्छतेचा अविर्भावात असलेल्या नगरपालिकेने स्वच्छतेच्या नावाने कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा स्वच्छतेचा पार बोजवारा उडाला आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता एकूण पाच घंटागाडी व पाच ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यासाठी नगरपालिकेकडे आहे. मात्र प्रत्यक्षात…
जळगाव ः विशेष प्रतिनिधी जळगाव महापालिकेच्या सभा ,महासभा आणि स्थायीच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या काहीं नगरसेवकांनी अतिक्रमण विभागातील कर्मचारी व अधिकारी अतिक्रमणधारकांकडून पैसे घेतात असे आरोप बर्याचदा केले आहेत.त्यांच्या आरोपात तथ्य आहे असे वाटण्याचे कारण म्हणजे शहर कधीच अतिक्रमणमुक्त झालेले नाही.किंबहुना शहरातील कोेणत्याही भागातील अतिक्रमणे, हॉकर्स कायमस्वरूपी हटविण्यात आलेली नाहीत.विशेेष म्हणजे महापालिका अतिक्रमण विभागाची कारवाई नेमकी हटविण्याची की संंवर्धनाची असा प्रश्न पडतो.तो प्रश्न रास्तच म्हटला पाहिजे.तसे यासाठी की, या विभागातील कर्मचारी हॉकर्स-भाजीवाले,फळ विक्रेते आदींना हटविण्याचे नाही,तर फक्त हुसकविण्याचे काम करतात. आताची लहान मुले लपंंडाव हा खेळ खेळत नाहीत त्यामुळे आताच्या पिढीला लपंडाव म्हणजे काय व कोणता खेळ हे समजावून…
जळगाव : प्रतिनिधी परिवर्तनच्या साहित्य अभिवाचन महोत्सवात डॉ. चंद्रशेखर फणसळकर लिखित ‘परवा आमचा पोपट वारला’ या कथेच्या अभिवाचनाचा प्रयोग रंगकर्मी अतुल पेठे यांनी सादर केला. एका छोट्याशा गोष्टीतून निर्माण होणारे विनोद व त्याला सशक्त अभिवाचनाची जोड मिळाली तर निर्मिती प्रभावी होऊ शकते याचा अनुभव रसिकांना आला. अभिवाचनाचा बुधवारचा प्रयोग खान्देशातील प्रसिद्ध लेखक, कवी प्राचार्य किसन पाटील यांच्या साहित्यातील योगदान व कार्याला समर्पित केला होता. अतुल पेठे यांचं दिग्दर्शक म्हणून नाट्यक्षेत्रात सर्वांना परिचित आहे; पण त्यांनी अभिवाचन इतक्या सहजपणे व उत्कटपणे सादर केले. अभिवाचनाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून या अभिवाचनाकडे पहाता येऊ शकतं, या कथेचा गाभा अत्यंत संवेदनशील होता. प्रयोग सुरू…