Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी ब्रिज कम्युनिकेशन ही दृकश्राव्य माध्यमात कार्य करणारी उत्तर महाराष्ट्रातील आघाडीची निर्मिती संस्था असून गेल्या २५ वर्षात ६०० पेक्षा जास्त माहितीपट, ४ चित्रपट व ५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती या संस्थेने केली आहे. भविष्यात आपल्या भागात चित्रपट, मालिका आणि वेब सिरीजची निर्मिती करणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक, निर्माता-दिग्दर्शक मिलींद पाटील यांनी आज दुपारी एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी संस्थेच्या नविन अत्याधुनिक सिनेमा कॅमेर्‍याचीसुध्दा माहिती दिली. संस्थेचे हे रौप्य महोत्सव असून अत्याधुनिक सिनेमा कॅमेरा व लेन्सेसच्या माध्यमातून दर्जेदार निर्मिती करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आतापर्यंत निर्मितीसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर या सारख्या शहरांवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र आता…

Read More

फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी शासनाच्या निसर्ग बचाव कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छ भारत संकल्पनेचा स्वीकार करून स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये महाराष्ट्राच्या वेस्ट झोन मध्ये ८२ रँकिंग मिळविलेल्या नगरपालिकेतील अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छतेचा पार बोजवारा उडाला आहे. शहरामध्ये ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. यामुळे शहरवासीयांचा मुख्याधिकारी साहेबांना प्रश्न आहे की, आम्हाला न्याय मिळेल का ? स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करून विविध ठिकाणी सोयीसुविधा नगरपालिकेकडून तयार करण्यात येतात मात्र त्याची टिकाऊ व यशस्वी अंमलबजावणी होत नाही. शहराची साफसफाई करण्यासाठी लाखो रुपयाचा स्वच्छतेचा वार्षिक ठेका देण्यात आला आहे. या ठेक्यापोटी कोटी ठेकेदाराला लाखो रुपये नगरपालिकेने मोजून दिले मात्र पंधरा-वीस दिवसातून एक…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी मराठी साहित्य विश्वातील नव्वोदोत्तरी साहित्यात विशेषतः कवितेच्या प्रांतात कवी अशोक कोतवाल हे महत्वाची कविता लिहिणारे कवी म्हणून ओळखले जातात. त्यांची कविता ही समाजजिवनाच्या वास्तवाची मांडणी तर करतेच पण आपल्या आत आपला शोध घ्यायला आपल्याला प्रवृत्त करते म्हणून ही कविता आज महत्वाची असल्याचे प्रतिपादन कवी अशोक कोतवालांची कविता या कार्यक्रमात परिवर्तनच्या कलावंतांनी केले. संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन संस्थेचा साहित्य अभिवाचन महोत्सव सुरू आहे, आज महोत्सवाच्या पाचव्या दिवशी हा कार्यक्रम सादर झाला. यात कोतवालाच्या मौनातील पडझड, कुणीच कसं बोलत नाही, नुसताच गलबला या संग्रहातील कविता कलावंतांनी सादर केल्या. यात फ्रॉक, मुलं वाद घालताय, मधल्या सुटीतून पळून जाणार्‍या मुलांचे मनोगत,…

Read More

जळगाव ः विशेष प्रतिनिधी कोणाचा कुणाकडून काटा काढायचा तर त्यासाठी सुपारी द्यावी लागते. सुपारी हा शब्द प्रयोग फक्त काटा काढण्यासाठीच वापरला जातो असे नाही.तर एखाद्याकडून कोणतेही काम करून घ्यायचे व त्यासाठी त्याला जो मोबदला देण्याचे ठरते ते सुद्धा सुपारी देण्यासारखेच म्हणा.असाच प्रकार आपल्या जळगाव महानगरपालिकेत झाला असावा अशी शंका जळगावकर नागरिकांना आहे.शहरा जवळची पाच गावे महानगरपालिका हद्दीत आणण्याचा जो प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्याबद्दलही बिल्डर्स आणि डेव्हलपर्स (विकासक)यांच्याकडून त्यांनी सुपारीच घेतली असावी असे येथील एक सभ्य व्यक्तीने म्हटले आहे इतकेच नव्हे तर, अहो आपलेच आपल्याकडून होत नाही मग यासाठी इतका अट्टाहास का ? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. आपल्या महापालिकेच्या…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी फैजपूर प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्यावर गेल्या २४ फेब्रुवारी रोजी रात्री वाळू माफियांकडून जीवघेणा हल्ला झाला. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर चार दिवसात पुन्हा यावल तालुक्यात किनगाव येथील मंडळ अधिकारी सचिन तुळशीराम जगताप यांच्या छातीवर वाळू माफियाकडून जोरदार बुक्का मारून, शासकीय कामात अडथळा आणून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून यावल पो.स्टे.५ वाळू माफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे महसूल व पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील किनगाव मंडळ अधिकारी सचिन तुळशीराम जगताप यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.२८ फेब्रुवारी रोजी रात्री २१:४० वाजता तहसीलदार महेश पवार…

Read More

पाचोरा ः प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील गिरणा नदी पात्रासाठी वाळू ठेका देण्यात आलेला आहे.शासकीय नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असून ज्यांना नदीमधील वाळूचा उपसा गैरमार्गाने होत असल्यास त्यास शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ग्रामपंचायत समिती नियुक्ती करण्यात आली असली तरी ग्रामपंचायत मोरख्याच आपल्या स्वतःच्या पॉवरमध्ये दिवस-रात्र जेसीबी द्वारे ट्रॅक्टरने वाळू काढून डंपर द्वारे वाहतूक करत असल्याची जोरदारक चर्चा सुरु आहे.यावरुन कुंपणच शेत खात असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. सर्व काही बोगस पावत्यांचा व मॅजिक पेनचा खेळ सुरू असून याची सखोल चौकशी करण्यात यावी व सदरचा ठेका रद्द करण्यात यावा अशी मागणी होत आहे. शासनाने दिलेल्या वाळू ठेक्यापेक्षा जास्त उचल होत…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या महामारी मुळे सर्वच शाळा गेल्या वर्षभरापासून बंद आहेत आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाइन पद्धतीने घेतला जातोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय एम जे कॉलेज जळगावच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व घरात बसून निर्माण झालेला आळस दूर व्हावा व मनोरंजनाचे एक साधन मिळावे आणि त्यातूनच विद्यार्थी घडावा या उद्दिष्टाने कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेे आहे. सदर कला महोत्सव हा १ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान राबवला जाणार असून त्यासाठी चित्र कला ,कार्यानुभव ,मिमिक्री ,एकल गायन ,वाद्य वादन ,एकल नृत्य, बालगीते, कोळी गीते ,देशभक्तीपर गीते ,शेतकरी नृत्य, भांगडा ,गुजराती नृत्य या सर्व प्रकारच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये १७ डिसेंबर १९ रोजी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यासोबत अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २०९/१९ प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यात भादवी कलम ३७६,३६३,३५४,३६६ व पोकसो कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा नोंद असून पाच आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपण पत्र दाखल झाले असून त्याचा न्यायालयातील स्पेशल केस क्रमांक ९६/२० आहे. या पाच आरोपींपैकी चार आरोपींची जामीनावर सुटका झाली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. मुख्य आरोपी बनसोडेची पुनरावृत्ती यातील प्रमुख आरोपी सुमित उर्फ मोन्या सुधाकर बनसोडे रा. समतानगर जळगाव यांनी त्याच पीडितेला दि.२३ फेब्रुवारी रोजी पुनश्च अपहरण करून घेऊन गेला म्हणून पीडितेच्या आईने पुनश्च…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी गांधीजींना नाकारायचे, गांधीजींना हद्दपार करायचे अशा वल्गना समाजात अनेकस्तरातील लोक करीत असतात. कितीही नाकारायचा म्हटला तरी गांधी स्वीकारलेच कसे जातात, असे अभ्यासपूर्ण सादरीकरण परिवर्तन अभिवाचन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी परिवर्तनच्या कलावंतांनी केले. ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील लिखित व दिग्दर्शित गांधी नाकारायचा पण नाकारणार कसा?’ या नाटकाचे अभिवाचन करण्यात आले. अभिवाचनातून गांधी विचारांचे विरोधक, त्यांच्या प्रश्नांमागील वास्तव व इतिहासाचे वस्तुनिष्ठ दाखले देत हे अभिवाचन सादर केले. सहज गमतीत सुरू झालेली चर्चा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समाज न्यायालयात आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करते. त्यांच्यावर खटला चालवला जातो. त्यांच्यावर विविध आरोप करण्यात येतात. गांधींच्या माध्यमातून इतिहासाचं आकलन, एकूणच असलेले समज, समाज माध्यमातून…

Read More

मलकापुर : प्रतिनिधी शहरातील स्थानिक सिनेमा रोडवरील मुख्य बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास दुकानांना आग लागल्याची घटना घडली. या लागलेल्या आगीत सात दुकाने जळून खाक होत दुकानांमधील करोडो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्थानिक सिनेमा रोडवरील मुख्य बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत संत रमेती राम टोबॅको, सुरजमल अ‍ॅन्ड कंपनी, गांधी बुक डेपो, हारूण अजीज यांची दुकाने व गोडाऊन जळून खाक झाली तर अग्रवाल स्टोअर्स व हिरालाल दिपचंद अग्रवाल यांच्या दुकानांचेही आगीत मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या सुमारास आगीची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व अग्नीशमन दलाला प्राचारण करण्यात आले होते. तर पोलीसांसह अग्निशमन दलाने तात्काळ…

Read More