फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या दुसर्या संभाव्य लाटेची परिस्थिती असताना स्कोर नगरपालिका अंतर्गत येणार्या कॉलनी भागांमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे.कॉलनी भागांमध्ये गेल्या महिन्याभरापासून घंटागाडीची घंटा वाजलीच नाही.त्यामुळे घराघरांमध्ये केराच्या बादल्या भरून कचरा साचला आहे.हाच कचरा महिलावर्ग आपल्या सोयीच्या ठिकाणी टाकून देतात. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. गटारीतील काढलेली घाण उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने ती घाण कोरडी होऊन परिसरातील डुकरे त्याच ठिकाणी पसरवित असतात. त्यामुळे स्वच्छतेचा अविर्भावात असलेल्या नगरपालिकेने स्वच्छतेच्या नावाने कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा स्वच्छतेचा पार बोजवारा उडाला आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता एकूण पाच घंटागाडी व पाच ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यासाठी नगरपालिकेकडे आहे. मात्र प्रत्यक्षात…
Author: saimat team
जळगाव ः विशेष प्रतिनिधी जळगाव महापालिकेच्या सभा ,महासभा आणि स्थायीच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या काहीं नगरसेवकांनी अतिक्रमण विभागातील कर्मचारी व अधिकारी अतिक्रमणधारकांकडून पैसे घेतात असे आरोप बर्याचदा केले आहेत.त्यांच्या आरोपात तथ्य आहे असे वाटण्याचे कारण म्हणजे शहर कधीच अतिक्रमणमुक्त झालेले नाही.किंबहुना शहरातील कोेणत्याही भागातील अतिक्रमणे, हॉकर्स कायमस्वरूपी हटविण्यात आलेली नाहीत.विशेेष म्हणजे महापालिका अतिक्रमण विभागाची कारवाई नेमकी हटविण्याची की संंवर्धनाची असा प्रश्न पडतो.तो प्रश्न रास्तच म्हटला पाहिजे.तसे यासाठी की, या विभागातील कर्मचारी हॉकर्स-भाजीवाले,फळ विक्रेते आदींना हटविण्याचे नाही,तर फक्त हुसकविण्याचे काम करतात. आताची लहान मुले लपंंडाव हा खेळ खेळत नाहीत त्यामुळे आताच्या पिढीला लपंडाव म्हणजे काय व कोणता खेळ हे समजावून…
जळगाव : प्रतिनिधी परिवर्तनच्या साहित्य अभिवाचन महोत्सवात डॉ. चंद्रशेखर फणसळकर लिखित ‘परवा आमचा पोपट वारला’ या कथेच्या अभिवाचनाचा प्रयोग रंगकर्मी अतुल पेठे यांनी सादर केला. एका छोट्याशा गोष्टीतून निर्माण होणारे विनोद व त्याला सशक्त अभिवाचनाची जोड मिळाली तर निर्मिती प्रभावी होऊ शकते याचा अनुभव रसिकांना आला. अभिवाचनाचा बुधवारचा प्रयोग खान्देशातील प्रसिद्ध लेखक, कवी प्राचार्य किसन पाटील यांच्या साहित्यातील योगदान व कार्याला समर्पित केला होता. अतुल पेठे यांचं दिग्दर्शक म्हणून नाट्यक्षेत्रात सर्वांना परिचित आहे; पण त्यांनी अभिवाचन इतक्या सहजपणे व उत्कटपणे सादर केले. अभिवाचनाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून या अभिवाचनाकडे पहाता येऊ शकतं, या कथेचा गाभा अत्यंत संवेदनशील होता. प्रयोग सुरू…
जळगाव : प्रतिनिधी महापालिकेने गाळेधारकांना बजावलेली बिले अवाजवी असल्याने लाखो रूपये भरणे शक्य होणार नाही. प्रशासनाने सोमवारपासून गाळे सील करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या निर्णयाची प्रतिक्षा करायला तयार नाही. गाळेधारकांवर मोठे संकट उभे राहणार असल्याने शुक्रवारपासून (दि.५ मार्च) चौदा व्यापारी संकुलातील सर्व गाळे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. महापालिका प्रशासनाने व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांना थकीत रकमा भरण्याचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा सोमवारपासून गाळे कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर गाळेधारक संघटनेच्या पदाधिकार्यांची बुधवारी दुपारी पत्रकार परिषद झाली. या वेळी पांडुरंग काळे, राजस कोतवाल, युवराज वाघ, तेजस देपुरा, पंकज मोमाया, विलास…
जळगाव ः प्रतिनिधी केंद्र सरकार गॅस सिलेंेडरच्या आणि इंधन दरात सातत्याने वाढ करत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल ३ वेळा गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली. ही वाढ अनुक्रमे २५, ५०, २५ इतकी वाढवली गेली. मार्च महिन्यात पहिल्याच दिवशी २५ रुपये वाढ केली.गॅस सिलेंडरचा आजचा भाव ८२७ रुपये असुन स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्यात इतकी वाढ केली. यामुळे सर्वसामान्य जनता, गृहिणी त्रस्त झाले आहेत त्यांचे जगणे असह्य झाले असुन बजेट बिघड़ले आहे. तरीही नरेंद्र मोदी महागाईच्या मुद्यांवर ना बघत आहेत, ना बोलत आहेत ,ना ऐकत आहेत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण न करणारे मोदी सरकार असून, इंधन दरवाढ, महागाई यामुळे मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला…
जळगाव ः प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अद्ययावत माता व बालसंगोपन केंद्र (एमसीएच विंग) उभारण्यात येणार असून याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये या प्रकारच्या केंद्रांना मंजुरी मिळाली असून यात जळगावचा समावेश आहे. या कामासाठी तब्बल ३३ कोटी १५ लक्ष ९ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. जीएमसीत नवजात शिशूंसह मातांच्या संगोपन व उपचाराची व्यवस्था असली तरी अद्याप येथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध नव्हते. या बाबींची दखल घेत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २०१८ मध्ये जिल्हा रूग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत भव्य माता व बालसंगोपन केंद्र उभारण्यात यावे यासाठी पत्र दिले होते. जिल्हा शल्य…
जळगाव : प्रतिनिधी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून हरिविठ्ठलनगरात महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांतर्गत शिवणकला प्रशिक्षण केंद्रही चालवण्यात येते. या शिवणकला प्रशिक्षण केंद्राला रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे ४ शिवण मशीन देण्यात आले. प्रशिक्षण केंद्रात शिक्षकाची नेमणूक केल्याने व ४ शिलाई मशीन मिळाल्याने या फायदा परिसरातील महिलांना होणार आहे. मशिनचे लोकार्पण करतेवेळी रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा भट, प्रोजेक्ट चेअरमन कमलेश वासवानी, संतोष अग्रवाल, महेंद्र गांधी, राजेश चौधरी, डॉ. विद्या चौधरी, डॉ. प्रिती पाटील, प्राजक्ता वैद्य, केशवस्मृतीच्या संचालिका मनिषा खडके, आरोग्य विभाग समन्वयक भानुदास येवलेकर, जनसंपर्क अधिकारी सागर येवले, सेवावस्ती विभाग व्यवस्थापिका स्नेहा तायडे…
जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षा आतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेला काल शिरपूर व धुळे येथे सुरवात झाली.उत्तर महाराष्ट्र गटात जळगांव व्यतिरिक्त धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्हा संघांचा समावेश आहे. काल ३ मार्च रोजी जळगांव विरुद्ध नंदूरबार असा सामना शिरपूर येथे खेळला गेला.नंदूरबार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.जळगाव संघाच्या बिनीच्या जोडीने मिळालेल्या संधीचा फायदा घेत पहिल्या गड्यासाठी १०७ धावांची (३१ षटके) विजयी भागीदारी केली व पुढे आपल्या निर्धारीत ५० षटकात केवळ ६ गडी गमावून २०६ धावा केल्या यात सलामीवीर नीरज जोशी ६२धावा (१२०चेंडू) व गोविंद निंभोरे ४५ धावा (८७ चेंडू) तर कर्णधार नचिकेत ठाकूरच्या…
जळगाव ः विशेष प्रतिनिधी एका वेळी शहराच्या मध्यवर्ती व मुख्य बाजारपेठेत असलेल्या आणि प्रचंड गजबज असलेल्या शिवाजी रोडवरील हॉकर्सची अतिक्रमणे म्हणजे मोठी वाहतूक समस्या होती. या सानेगुरुजी चौक ते दाणा बाजारपर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक व वर्दळ असतांना फळे,कटलरी समान,पाव-बिस्कीट,टोस्ट खारी आदी बेकरी उत्पादने,मसाला,किराणा,भांडी -पूजेचे समान आणि रेडिमेड कपडे अशी शेकडो दुकाने -हातगाड्या थाटली जात होती. विशेष म्हणजे रस्त्याच्या अगदीच मधोमध डिव्हायडरवर गाड्या लागायच्या आणि त्यांच्या आजू बाजूला आणखी गाड्या लागत असत.रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अधिकृत दुकानदार व त्यांच्या दुचाक्या त्यांच्या दुकानासमोर लागत असत.परिणामी जाणार्या-येणार्या वाहन किंवा पायी चालणारांसाठी फक्त पाच ते सात फुटांचा रस्ता शिल्लक राहायचा.उल्लेखनीय म्हणजे वाहतुकीची ,पायी…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.किसन पाटील (वय ६७) यांचे काल मंगळवारी (२ मार्च) दुपारी साडेचारच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ.किसन पाटील यांनी विविध पदांवर काम केले. मू. जे. महाविद्यालयात पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, रावेर येथील सरदारजी जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी कलाशिक्षक, तसेच एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालयाचे प्राचार्य होते. ते मराठी साहित्य आणि भाषा, समीक्षेतील अग्रगण्य व्यक्तिमत्व होते. चित्रकला, कलेचा इतिहास, सौंदर्यशास्त्र, लोकसाहित्य, लोककला आणि संत साहित्याचे अभ्यासक, जनसंवाद माध्यमे आणि पत्रकारिता क्षेत्रातील मार्गदर्शकही…