यावल ः तालुका प्रतिनिधी तालुक्यातील फैजपूर नगर परिषदेमार्फत फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन १९३६ चे संकल्प चित्र उभारणी करण्याच्या कामाच्या रकमेत लाखो रुपयांचा अपहार झालेला असल्याने अपहारीत रकमेची जबाबदारी निश्चित करून शासनाकडे कठोर कार्यवाहीची शिफारस करण्याची मागणी तक्रारदार ललीतकुमार चौधरी यांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जळगाव यांच्याकडे केली आहे. दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात श्री. चौधरी यांनी नमूद केले आहे की, दि.५ डिसेंबर २०१८ रोजी केलेल्या तक्रारीनुसार तसेच जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती नियुक्त चौकशी समिती अहवालानुसार तथा निष्कर्षानुसार एकाच निविदा प्राप्त मक्तेदार यांनी निविदा मॅनेज केलेले आहेत व सर्व स्पर्धक निविदांचे इसारा रक्कम एकाच खात्यातून भरलेले आहेत, निविदा…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांचा त्यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याबद्दल , जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती व राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्था धुळे,श्री दत्तप्रभू अँग्रो इंडस्ट्रीज प्रा.लि. सावेर ता.शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार व कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सक्षम महिला सन्मान हे दोन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यापैकी राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार हा प्रदुषण नियंत्रण अधिकारी सौ. सौजन्या पाटील, गट शिक्षण अधिकारी सौ. सुरेखा देवरे,चोपडा नगरपरिषद च्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. मनिषा…
जळगाव ः प्रतिनिधी शहरात अस्वच्छतेच्या तक्रारी प्रचंड वाढल्या आहेत. कामगार वेळेत काम पूर्ण करत नसल्याने समस्येत भर पडत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. आगामी काळात सरप्राईज व्हिजिट देऊन कामगारांची हजेरी तपासली जाईल. अस्वच्छतेच्या तक्रारी वाढल्यास संबंधित भागातील अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत आरोग्य सभापती जितेंद्र मराठे यांनी कोणाच्याही दबावात काम करू नका असा सल्ला दिला आहे. आरोग्य सभापतीपदी जितेंद्र मराठे यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली.त्यात नागरिकांकडून येणार्या तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या समस्या जाणून घेत त्यातून मार्ग काढण्याच्या सूचना दिाल्या. बैठकीला सहायक आयुक्त पवन पाटील उपस्थित होते. ठरवून दिलेल्या वेळेत…
जळगाव ः प्रतिनिधी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या जळगाव सीए शाखा व जळगाव सीए विद्यार्थी शाखेला सन २०२०-२१मध्ये केलेल्या विशेष कामगिरीबद्दल डब्ल्यूआयआरसी ऑफ आयसीएआयस्तरावरील उत्कृष्ट शाखा म्हणून द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे जळगाव सीए शाखेचे अध्यक्ष सीए सागर पाटणी यांनी घोषित केले. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे दरवर्षी महाराष्ट्र, गुजरात, गोवा या स्तरावर चांगली कामगिरी करणार्या सीए शाखांचा गौरव करण्यात येतो. सीए पाटणी यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव सीए शाखेने वर्षभर शैक्षणिकदृष्ट्या विशेष उपक्रम राबवले. तसेच विविध तज्ज्ञांची व्याख्याने, ऑनलाइन वेबिनार, कार्यशाळा, सीए सदस्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, योगा प्रशिक्षण, वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम, गरिबांना अन्नदान, आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलांना…
जळगाव ः प्रतिनिधी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली बॉक्स ऑफ हेल्प व जनऔषधी केंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्ताने शहरातील खंडेराव नगरात सॅनिटरी नॅपकिन व मास्कचे वाटप बॉक्स ऑफ हेल्पच्या संस्थापक अध्यक्षा सुधाताई काबरा यांच्याहस्ते करण्यात आले. सामाजिक कार्यात नियमित अग्रेसर असणारे बॉक्स ऑफ हेल्पतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. संस्थेतर्फे महिलांसाठी तसेच विद्यार्थींनींसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहरातील खंडेराव नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील अंगणवाडीत गरजू महिलांना सॅनिटरी नॅपकिन व मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुधाताई काबरा म्हणाल्या की, सध्या शहरात कोरोना सारख्या विषाणूने थैमान माजविले आहे. त्यासाठी आपण आपल्यासह परिवाराची…
फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी मागील काही वर्षांमध्ये फैजपूर नगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कर्तव्य ठिकाणी न राहता शासनाकडून उकळलेला निवासभत्ता, बोगस टीए व डीए अलाऊंसच्या रक्कमा तसेच विकास कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार येथील रहिवासी ललित नामदेव चौधरी व निलेश मुरलीधर राणे यांनी वेळोवेळी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे लेखी तक्रारी करून पाठपुरावा केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी याकामी एक स्थानिक चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीत फैजपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी अहवाल तात्काळ पाठवण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने या चौकशी समितीचे स्थानिक…
जळगाव : प्रतिनिधी वाळू वाहतूक करणार्या तसेच भरधाव वेगाने धावणार्या डंपरने आज सकाळी आणखी एक बळी घेतला. शहरातील इच्छादेवी चौकापुढे राष्ट्रीय महामार्गावर सिध्दी विनायक हॉस्पिटलजवळ झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीवर बसलेला एक व्यक्ती जागीच ठार झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेसंदर्भात प्राप्त माहिती अशी की, सिंधी कॉलनी रोडवरील आंबेडकर गृहातील रहिवासी सिध्दार्थ त्र्यंबक मोरे (वय ५५)हे रेमंड मध्ये प्रॉडक्शन विभागात नोकरीला आहेत. ते रेमंडमधील सहकार्यासोबत दररोज कामावर जात होते. नित्याप्रमाणे आज सकाळी त्यांना अक्षय विजय पाटील (वय ३०, मुळ रा. वढोदा, ता. चोपडा ह.मु. शिवम नगर जळगाव) याने सिंधी कॉलनीतील भाजी मार्केटपासून दुचाकीवर घेतले. रेमंड कंपनीत जात…
यावल ः तालुका प्रतिनिधी यावल शहरात गुटखा व सुगंधी सुपारी,पान मसाला विक्रीचे काही ठराविक मोठे आणि पुरवठा करणारे विक्रेते असताना किरकोळ ३ टपरी चालकांवर काल रोजी कारवाई झाल्याने तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची चतुराई लक्षात घेता यावल शहरात व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संपूर्ण यावल शहरात,बुरुज चौक तथा पोलीस स्टेशन जवळील भागात,सुदर्शन चित्र मंदिर परिसरात यावल बस स्टँड परिसरात,बोरावल गेट भागात गुटका सुगंधी सुपारी व पान मसाल्याचा माल पुरवठा करणारे ठराविक व्यापारी यावल शहरात आहेत परंतु या मोठ्या दुकानदारांवर कारवाई न करता या भागात गुटखा सुगंधी सुपारी व पान मसाला किरकोळ…
फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी शासनाच्या तिजोरीवर अतोनात आर्थिक भार असताना फैजपूर येथील ताहनगर या वस्ती भागात सुमारे ३१ लाख रुपये खर्चाच्या कॉंक्रिटीकरणाचे काम नुकतेच सुरु करण्यात आले. हे काम चक्क काळया मातीच्या थरावर करण्यात येत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. याकडे मुख्याधिकारी साहेब लक्ष देतील काय? असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक मेहबुब पिंजारी यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपालिकेने ताहनगर मधील या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण केले होते. हा रस्ता बर्यापैकी सुस्थितीत होता. मात्र गेल्या वर्षभरापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईनचे काम या भागात करण्यात आले. त्यामुळे हा रस्ता खराब झाल्याने वर्षभरापासून या वस्तीतील रहिवाशांना अतोनात हाल सहन करावे…
भुसावळ : प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त सोमवार दिनांक ८मार्च रोजी भुसावळ स्पोटर्स अँड रनर्स असोसिएशनच्या लेडीज विंगतर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात काही महिला सदस्यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून धावायला सुरुवात करून आरपीडी रोडवरील ऑर्डनन्स फॅक्टरी गेट व तेथून पुन्हा मैदानावर परत असे अंतर धावून भुसावळ शहरातील तमाम महिला वर्गास आरोग्याचा संदेश दिला. यावर्षी कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या उद्रेकामुळे लेडीज इक्वलिटी रन काही काळासाठी स्थगित करण्यात आल्यामुळे शहरातील महिला वर्गात काहीसे नाराजीचे वातावरण होते. परंतु आजच्या धावण्यामुळे पुन्हा एकदा आरोग्याप्रति उत्साह संचारल्याचे बघावयास मिळाले. विशेष म्हणजे महिला एकट्या न धावता त्यांनी कुटुंबातील सदस्यांना देखील धावण्यासाठी प्रेरित…