जळगाव ः प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे १४ मार्च रोजी नियोजित राज्य सेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या परीक्षार्थींनी काल दुपारी ३.३० वाजता कोर्ट चौकात महाराष्ट्र शासनाविरुद्ध घोषणाबाजी करून परीक्षा नियोजित तारखेला घेण्याची मागणी करीत दीड तास रास्ता रोको केला.अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी समजूत काढल्यानंतर दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी आंदोलन मागे घेण्यात आले.त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना आंदोलकांच्या प्रतिनिधींनी मागण्यांचे निवेदन दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १४ मार्च रोजी राज्य सेवा पूर्वपरीक्षा नियोजित होती. शहरातील १६ उपकेंद्रांवर प्रथम सत्र सकाळी १० ते दुपारी १२ व द्वितीय सत्र दुपारी…
Author: saimat team
यावल ः तालुका प्रतिनिधी तालुक्यातील फैजपूर नगरपरिषदेने शहरातील ओपन स्पेस जागेवर व बगीच्या मधील खेळणी व व्यायाम साहित्य खरेदी प्रकरणात मोठा घोळ के ल्याचे उघडकीस आले आहे. बगीच्यात बसणार्यांसाठी जे ७ बेंच खरेदी केले आहे त्यापैकी एका बेंचची किंमत २६ हजार ५०० रुपये असल्याने साहित्य खरेदी करणार्यांच्या नैतिक पातळीची जोरदार चर्चा संपूर्ण यावल तालुक्यात सुरू असून १८ ऑगस्ट २०१८ व २६ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती कडे केलेल्या तक्रारीनुसार समिती काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत फैजपूर नगरपरिषदेने फैजपूर शहरातील ओपन स्पेस/खुल्या जागांवर तसेच बगीच्यामध्ये खेळणी व व्यायाम साहित्य पुरविणे बसवून देणे इत्यादी…
जळगाव : प्रतिनिधी येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे चोपडा तालुक्यातील सातपुडा परिसरस्थित शेणपाणी व गौर्यापाडा गावात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांचे आरोग्य,आहार व स्वच्छता या विषयावर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच गावातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. ८ मार्च रोजी महिला दिन व १० मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाच्या सुरूवातीस त्यांच्या प्रतिमेला सुती हार घालून अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच रेणुका बारेला, सदस्य गिताबाई बारेला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. यावेळी उपजिल्हा रुग्णालय धरणगाव येथील राष्ट्रीय किशोरी स्वास्थ कार्यक्रमाचे समन्वयक गणेश कुभांर यांनी ’महिलांचे आरोग्य’ याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रतिनिधी सागर चौधरी…
जळगाव ः प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेचे जीवन अत्यंत कठीण व असह्य झाले आहे.यावर केंद्र सरकारने त्वरीत तोडगा काढावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनाव्दारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की,गेल्या ७ वर्षात महागाई, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कुणालाच परवडणार नाही एवढे वाढले आहेत. इंधनाचे भाव वाढल्याने परिणामी वाहतूकीचे खर्चदेखील वाढले व अन्न, धान्य, दैनंदीन वापराच्या वस्तू आदी सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.तसेच अनेक उद्योग, कारखाने, संस्था बंद पडल्या आहेत. करोडो लोक बेरोजगार झाले आहेत, १००हून अधिक दिवस शेतकरी आंदोलनाला पूर्ण झाली आहेत. जळगाव जिल्ह्यात तर रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली…
जळगाव : प्रतिनिधी महापौर व उपमहापौर पदासाठी राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. बुधवारी भाजपच्या पदाधिकार्यांनी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी ८ असे १६ अर्ज घेतले. पक्षात गटबाजी नसल्याचा दावा करणार्या पदाधिकार्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज घेतल्याने पक्षांतर्गत तर्कवितर्क लावले जात आहेत. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अडीच वर्षे पूर्ण झाले आहेत. पहिल्या टर्ममधील दुसर्या महापौर भारती सोनवणे व उपमहापौर सुनील खडके यांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे १८ मार्च रोजी नवीन महापौरांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी ९ मार्चपासून अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, गटनेते भगत बालाणी व स्वीकृत नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी काल…
भुसावळ ः प्रतिनिधी कोविडच्या काळात घराची सर्वाधिक जबाबदारी महिलांवर आहे अशा वेळी प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शहरातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ.चारुलता पाटील यांनी केले. भुसावळ येथील कला, विज्ञान व पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात आयोजित ऑनलाईन व्याख्यानात डॉ.पाटील यांनी महिलांना आपल्या आरोग्याच्या काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन प्रसंगी बोलत होत्या. नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या महीला कल्यान समितीतर्फे सदरचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कोविडच्या काळात घराची सर्वाधिक जबाबदारी महिलांवर आहे अशा वेळी प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. योगा, एरोबिक, झुंबा, जिम अशा वेगवेगळ्या माध्यमातून महिला स्वतःचे आरोग्य सुधारू शकतात. शिवाय प्रत्येक महिलेसाठी शारीरिक आरोग्यासोबतत मानसिक,…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १३ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा रेट दहा टक्क्यांवर आणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या त्रिसदस्यीय विशेष पथकाने कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काल अधिकार्यांना दिल्या. जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांना सुरुवात केलेली आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णसेवेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय तपासणी पथकाने बुधवारी सकाळी ८ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट दिली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जीएमसीचे प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.…
जळगाव ः विशेष प्रतिनिधी शहरात अतिक्रमण ही समस्या कधीही न संपणारी किंवा न सुटणारी आहे.महापालिकेचाअतिक्रमणविभाग त्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.त्यांच्यावर हप्ते घेण्याचे आरोप सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी सभागृहात अनेकदा केले आहेत.हा अतिक्रमण विभागाचा भाग झाला पण आता महापालिकेकडून पार्किंग (वाहनतळ) चा ठेका घेतलेला मक्तेदारसुद्धा अतिक्रमणधारकांकडून दैनिक ३०० रुपये वसूल करीत असल्याचे धक्कादायक पण अधिकृत गोटातील वृत्त आहे.जुन्या नगरपालिकेच्या जागेवर हा प्रकार सर्रासपणे सुरू असून त्याकडे कर्तव्यदक्ष उपायुक्त संतोष बाहुळे यांनी लक्ष देण्याची मागणी आहे . जळगाव शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात फोफावण्याचे मुख्य कारण म्हणजे खुद्द अतिक्रमण विरोधी पथकाचा नाकर्तेपणा.किंबहुना त्यांची हप्तेखोरी.हप्तेखोरीचा आरोप हा येथील लोकप्रतिनिधींचाच आहे हे विशेष.अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण धारकांशी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील समता नगर परिसरात मित्रांचे आपसात सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला शिष्टाई करणे महागात पडले असून सदर भांडण सोडविणे त्याच्या अंगलट येत भांडण करणार्या दोघांनी त्या तरुणावरच चॉपरने हल्ला केल्याची घटना काल रात्री घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, समता नगर परिसरात राहणारा विक्की रविंद्र इंगळे (वय २१) हा तरुण आपला मित्र मोन्या (पूर्ण नाव माहित नाही) याच्यासोबत महाबळ परिसरात काल रात्री ९ वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी गेला होता. यावेळी समता नगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अशफाक पटेल आणि जयेश कोळी (दोन्ही रा.समता नगर) मोन्याचे किरकोळ कारणावरुन भांडण झाले.…
जळगाव : प्रतिनिधी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.भाजपातर्फे आज दोन्ही पदासांठी नामांकन पत्र मनपातून घेण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक विशाल त्रिपाठी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना दीपक सूर्यवंशी व भगत बालाणी यांनी या दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध होणार, असा आत्मविश्वास व्यक्त केला. मात्र या पदांवर कोणाला संधी मिळणार याबाबत मौन पाळले. दरम्यान माजी मंत्री आ. गिरीष महाजन व आ. राजूमामा भोळे हे दोन्ही पदांबाबतची नावे निश्चित करतील व त्यांनाच संधी मिळणा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर व उपमहापौर या पदांवरून…