Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी मनपाचे माजी उपमहापौर तथा कोळी समाज संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश बुधो सोनवणे (वय ५९) यांचे मंगळवारी दुपारी कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले. गेल्या चार ते पाच दिवसापासून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. तत्कालिन महापौरांनी राजीनामा दिल्याने सोनवणे यांच्याकडे काही दिवस महापौरपदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता. ते राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे यांचे वडील होत. गेल्या वर्षी चार माजी नगरसेवकांचा कोरोनाने बळी घेतला होता. त्यापाठोपाठ माजी गणेश सोनवणे यांचे देखील निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली असा परिवार आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी वीज ही अत्यावश्यक सेवा असून, कोरोनाच्या संकटातही जीवावर उदार होऊन महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना अखंडित व दर्जेदार सेवा देण्यासाठी कार्यरत होते. मात्र ग्राहकांनी वीजबिले न भरल्याने थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे भविष्यातही अशीच कायम अखंडित सेवा देण्यासाठी व वीज खरेदीसाठी महसुलाची गरज आहे. त्यासाठी ग्राहकांना दिलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची रक्कम वसूल करावी, असे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक तथा मुख्यालयाचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले. जळगाव परिमंडलात मागील वर्षभरापासून अनेक ग्राहकांनी एकही वीजबिल भरलेले नाही. यात काही विभाग कार्यालयाची वसुली अत्यंत असमाधानकारक असून सर्वांनी बिल वसुली मोहीम प्रभावीपणे राबवावी तसेच वीजबिल भरण्यासाठी थकबाकीदार…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी तालुक्यातील भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसेतर्फे येथील संतोषी माता हॉलमध्ये पाच जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा मोजक्या वर्‍हाडींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आले. विशेष म्हणजे या उपक्रमात एका प्रज्ञाचक्षू जोडप्याचाही समावेश होता. अवाजवी खर्च टाळण्यासाठी हा सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला. भोरगाव लेवा पंचायतीतर्फे भुसावळ येथील संतोषी माता हॉलमध्ये सामूहिक विवाह पार पडला. यात लोकेश कोल्हे व राजश्री चौधरी, कौतिक भारंबे व विनीता चौधरी, अक्षय फेगडे व विशाखा चौधरी, हर्षल चौधरी व विजया भोसले तर प्रज्ञाचक्षू जोडपे दीपाली बाळू उबाळे व मंगेश अशोक धिवरे या जोडप्यांचा सामूहिक विवाह पार पडला. यावेळी भोरगाव लेवा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महापौरपदाची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असतांनाच महानगरपालिकेतील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपाचे २७ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचे वृत्त येऊन धडकल्यामुळे भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री गिरीषभाऊ महाजन व आ. राजूमामा भोळे यांना जोरदार धक्का बसला असून ‘संकटमोचक’च संकटात सापडल्याची प्रतिक्रिया जनमानसात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शिवसेनेने महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक सर्व शक्तीनिशी लढविण्याची जय्यत तयारी केली असून आज सकाळी या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज मनपातून घेण्यात आले आहे. महापौरपदी जयश्री सुनिल महाजन तर उपमहापौरपदासाठी भाजपाचे कुलभूषण पाटील (बंडखोर) यांना संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मनपा निवडणुकीला अडीच वर्षाचा कालावधी झाला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लेवा पाटीदार कम्युनिटीच्या फेसबुक पेजवर लेवा डान्स आयडॉल २०२१ च्या ऑनलाईन स्पर्धेत जळगावच्या अपंग मानसी पाटीलहिने दैदिप्यमान यश संपादन करत स्पर्धेतील ‘लेवा डान्स आयडॉल २०२१’ व लेवा पाटीदार कम्युनिटी फेसबुक अ‍ॅडमिन चॉईस असे पुरस्कार प्राप्त केले आहे. “लेवा डान्स आयडॉल २०२१” ही ऑनलाईन डान्स स्पर्धा, लेवा टीचर्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित लेवा पाटीदार कम्युनिटी“ या फेसबूक ग्रुपवर समाजातील सुप्त कलागुणांना चालना मिळावी, लहानापासून थोरा पर्यंत प्रत्येकाला या उपक्रमाच्या माध्यमातून आपली कला सहजतेने सादर करता यावी, या गोष्टीचा विचार करून “लेवा डान्स आयडॉल २०२१“ हा उपक्रम शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या समन्वयक बंधु-भगिनींच्या सहकार्याने राबविण्यात…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी नव्या महापौर निवडीला अवघे तीन दिवस बाकी असताना अकस्मात घडलेल्या राजकीय भूकंपामुळे पक्षीय समिकरणे वेगाने बदलू लागली आहेत.मावळत्या महापौर भारती सोनवणे यांचे पती आणि भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे या घडामोडींमध्ये रात्री उशिरापर्यंत भाजप नेत्यांबरोबर होते मात्र, त्यांच्या गटाचे म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक भाजपला प्रतिसाद देत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहेे. रविवारी रात्री कैलास सोनवणे हे जळगाव विमानतळावर जमलेल्या भाजप नेत्यांबरोबर होते.भाजपच्या नगरसेवकांशी ते फोनद्वारे संपर्क करीत होते. मात्र, त्यांच्या गटाचे म्हणून ओळखले जाणारे १० ते १२ नगरसेवक त्यांच्यासमवेत नव्हते,अशीही खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्यापैकी अनेकांशी संपर्कच होत नव्हता तर कोणी तब्बेत बरी नाही, कोरोनाची…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी सुरवातीला जळगाव-औरंगाबाद हा द्विपदरी महामार्ग बनविण्याचे ठरले होते परंतु जळगाव-औरंगाबाद मार्गावर जास्त रहदारी होत असल्यामुळे भविष्यातील रहदारी विना अडथळा होण्यासाठी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नांनी द्विपदरी महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची मान्यता मिळाली. मागील चार वर्षांपासून प्रगती पथावर असलेल्या जळगाव-औरंगाबाद महार्गाचे बरेचसे काम प्रलंबित आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सदर रस्त्याचे अंतिम टप्प्यात असलेले काम लवकरात लवकर पूर्ण होणे बाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना निर्देश दिले. जळगाव-औरंगाबाद मार्गे पुणे-नगर येथपर्यंत पुढील प्रवास करणार्‍या वाहनांमार्फत या रस्त्याचा प्रचंड प्रमाणात उपयोग करण्यात येतो. त्यामुळे या रस्त्याची उपयोगिता आणि वैशिष्ट्यता…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील वरणगाव येथे पिस्तूलाचा धाक दाखवून व्याजाची वसूली केल्याचा दाखल गुन्ह्याप्रकरणी रिपाईचे राजू सुर्यवंशी यांना भुसावळ येथून पोलीसांनी कोम्बींग ऑपरेशनदरम्यान त्यांच्या घरातून अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी व त्यांचे बंधू अनंत सुर्यवंशी यांच्या विरोधात वरणगाव पोलीसात पिस्तूलाचा धाक दाखवून व्याजाची वसूली करण्यासाठी धमकावण्यासह दागिने हिसकावल्याचा आरोप करत फिर्यादी संजय त्रिलोकनाथ खन्ना (वय ५६, रा.साईनगर, दर्यापूर शिवार, वरणगाव फॅक्टरी) यांनी गुन्हा दाखल केला होता. सदर फिर्यादीवरुन वरणगाव पोलीसात भादंवि ३९२, ४५२, ५०४, ५०६ आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी राजू सुर्यवंशी यांचा…

Read More

चाळीसगाव ः प्रतिनिधी कोरोना संसर्गजन्यरोग प्रमाण वाढत असल्याने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी शासकीय जनता कर्फ्युचे आदेश दिले. चाळीसगाव येथे शनिवार व रविवार दोन दिवस कडक बंदला चाळीसगावकरांनी १०० टक्के प्रतिसाद दिला आहे. काल रात्री चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी शहरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. ठीकठिकाणी पोलीस आहेत. खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीवदादा देशमुख, नगराध्यक्ष आशालता चव्हाण,प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत सताळकर, तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, डीवायएसपी कैलास गावडे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व कोरोना बचाव समितीचे, वर्धमान धाडीवाल, नानासाहेब बागुल, दिलीप घोरपडे, लक्ष्मण शिरसाठ, योगेश भोकरे, मुराद…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटट ऑफ इंडियाच्या जळगाव सी.ए. विद्यार्थी शाखेस सन २०२०-२१ या वर्षामध्ये केलेल्या विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट शाखा म्हणून तृतीय पुरस्कार आणि थखठउ ेष खउ-ख स्तरावरील उत्कृष्ट शाखा म्हणून द्वितीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे जळगाव सी. ए. विद्यार्थी शाखेचे वर्ष २०२०-२१ चे अध्यक्ष सी.ए. सौरभ सुभाष लोढा यांनी घोषित केले. सदर पुरस्कार दि. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या ७१व्या वार्षिक सोहळ्यात जळगाव सी. ए. विद्यार्थी शाखेला देण्यात आला. नवी दिल्ली आय.सी.ए.आय. चे मा. अध्यक्ष सी.ए. अतुल गुप्ता यांच्या हस्ते जळगाव सी.ए. विद्यार्थी शाखेस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी नवी…

Read More