Author: saimat team

जळगाव : प्रतिनिधी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसनं परफेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता जळगाव महापालिकेत शिवसेनेने भाजपला जोरदार दणका दिला आहे. भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेने जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकत महापौरपदी जयश्री सुनिल महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांनी विजय मिळविला आहे. शिवसेनेने ही लढत ४५ विरुध्द ३० अशा फरकाने जिंकत महापालिकेवर भगवा फडकविला आहे. त्यामुळं सलग दुसरी महापालिका भाजपच्या हातातून निसटली आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडींमुळं बॅकफूटवर असलेल्या महाविकास आघाडीसाठी विशेषत: शिवसेनेसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. महापालिकेत भक्कम बहुमत असलेल्या भाजपला महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची खात्री होती. मात्र राजकारणाच्या सारीपटावर निश्‍चितता कधीच नसते, हे पुन्हा जळगाव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या सोबत मागील वर्षभरापासून भक्कमपणे उभ्या असलेल्या लोकसंघर्ष मोर्चाचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून आकस्मिक परिस्थितीत माणुसकीची शिकवण देणारे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. ते लोकसंघर्ष मोर्चाने सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, महानगर पालिकेचे आयुक्त प्रदीप कुलकर्णी, लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, माजी उपमहापौर करीम सालार, डॉ. स्नेहल फेगडे, अब्दुल गफ्फार मलिक, डॉ. क्षितिज पवार, डॉ. घोलप इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पैशांअभावी कुणीही आरोग्यव्यवस्थेपासून वंचित राहू नये यासाठी लोकसंघर्ष मोर्चाने शासकीय तंत्रनिकेतन मध्ये कोविड केअर सेंटर सुरु केले…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कैलास दिनकर तायडे यांची बहुमताने तर उपाध्यक्षपदी अजय आनंदराव सोमवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी विश्‍वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड करण्यात आली. पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास तायडे हे कै. इंदिराबाई पाटणकर नवीन मराठी शाळा, शिवाजीनगर, जळगाव येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर नवनिर्वाचित उपाध्यक्ष अजय सोमवंशी हे व्ही.एच. पटेल प्राथमिक विद्या मंदिर, चाळीसगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्था ही आपल्या सभासदांना अल्पव्याजदरात १० लाख रुपयांपर्यंत कर्ज देणारी जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था आहे. संस्था कुठल्याही प्रकारच्या ठेवी न…

Read More

फैजपूर ः प्रतिनिधी मयत झालेल्या हिंदू कोरोना रुग्णाचे लांबवर असलेले नातेवाईक वेळेवर पोहचू शकत नसल्याने फैजपूर शहरातील मुस्लिम तरुणांनी मयत व्यक्तीचे पार्थिव न्हावी ग्रामीण रुग्णालयातून हलविण्यापासून तर स्मशानभूमीत पोहचवत अंत्यविधीसाठी सहकार्य करून माणुसकीचे एक अनोखे दर्शन घडविले. यावेळी रुग्णालयात केवळ मयताची पत्नी, शालक उपस्थित होते. या शालकाने अग्निडाग देवून सोपस्कार पूर्ण केले. भालोद, (ता.यावल) येथील ६० वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाली होती. त्याला अत्यवस्थ स्थितीत बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास न्हावी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांची डॉ. अभिजित सरोदे यांनी तपासणी करून मृत झाल्याचे त्यांनी घोषित केले. दरम्यान, मृत व्यक्ती सोबत यावेळी केवळ त्याची पत्नी उपस्थित होती. तर…

Read More

धानोरा, ता. चोपडा ः वार्ताहर आज प्रामाणिकपणा संपलेला नाही. त्यातील उत्तम उदाहरण म्हणजे धानोरा (ता.चोपडा) येथील तरुण शिक्षक पत्रकार प्रशांत सोनवणे यांना येथील सेंट्रल बँकेत जास्तीचे मिळालेले ५० हजार रुपये क्षणाचा विलंब न करता त्यांनी लगेच परत केले.त्यांच्या या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक होत आहे. धानोरा येथील पत्रकार व श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक प्रशांत सोनवणे यांचे गावातच ग्राहक सेवा केंद्र आहे. त्या निमित्त बँकेत नेहमीच ये-जा असते. दि.१७ रोजी दुपारी १ वाजता बँकेत दोन वेगवेगळ्या खात्यावरील रक्कम काढली असता त्यात ५० हजार रुपये जास्तीचे आले, असे लक्षात आले. त्यांनी घरी न जाता बँकेत जास्तीचे मिळालेले पैसे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी लेवा पाटीदार समाजातील युवा पिढीला शिक्षण, प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा, उद्योग, समाजकारण आदी विषयांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने लेवा यूथ फोरमची स्थापन करण्यात आली. ऑनलाइन पद्धतीने आयोजित कार्यक्रमात या फोरमचे उद्घाटन झाले. त्यात नाशिक येथील सहायक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे यांनी समाजातील तरुणांनी स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:चा ठसा उमटवला पाहीजे, असे प्रतिपादन केले. डोंबिवली येथील हर्षल भंगाळे, प्रा.डॉ.राम नेमा, निशा अत्तरदे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. ऑनलाइन झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला मंडळाच्या सचिव स्नेहल अत्तरदे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर मानसी चौधरीने गणेश वंदना सादर केली. प्रास्ताविकात फोरमचे अध्यक्ष हर्षल भंगाळे यांनी लेवा समाज अधिक सशक्त व्हावा, हेच फोरमचे…

Read More

जळगाव : विशेष प्रतिनिधी सध्या जळगाव महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक गाजत आहे.तशा तर सर्वच निवडणुका गाजतात. परंतु जळगावात ही निवडणूक गाजण्यापेक्षा भाजपातील अंतर्कलह आणि फूट गाजत आहे. फक्त जळगावात हा विषय गाजत नसून सार्‍या महाराष्ट्रात चर्चेत आहे. त्याच महत्वाचं कारण म्हणजे हा फक्त भाजप पुरता मर्यादित विषय नाही. तर तो माजीमंत्री आ. गिरीश महाजन यांच्याशी निगडित असल्याने व त्यांच्या नाकावर टिच्चून शिवसेनेने सारा खेळ केल्याने संपूर्ण चर्चा महाजनांभोवतीच फिरते आहे.शहरात याच्या प्रतिक्रिया उत्तम उमटू लागल्या आहेत. एक सर्वसाधारण व्यक्ती की, त्याचे कोणत्याच राजकीय पक्षाशी काहीही घेणे-देणे नाही .त्या व्यक्तीने या घडामोडींवर एकच शब्द उच्चारला यह तो होना ही था !…

Read More

यावल : तालुका प्रतिनीधी शहरात आज सकाळी ८:३० ते ९ वाजेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे तसेच वाळूतस्करांची भजे आणि पोहा नाश्ता खाण्याची पार्टी झाली. यावेळी शासकीय वाहनासह ते कोण कोण कर्मचारी उपस्थित होते? याची प्रत्यक्षदर्शींनी पाहणी केल्याने यावल शहरात अनेक तर्क -वितर्क लावले जात असून, या बाबत प्रांताधिकारी व तहसीलदार खुलासा करतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहेत. यावल येथील बस स्टँड जवळ तसेच जुन्या तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर असलेल्या यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या जे.टी.महाजन व्यापारी संकलनात भजे पोहा शेव चिवडा नाष्टा पाण्याचे दुकान आहे या दुकानात आज सकाळी अवैध वाहतूक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी उद्या गुरूवारी होणार्‍या निवडणूकीसाठी आज शिवसेनेकडून जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपकडून महापौर पदासाठी विद्यमान महापौर भारती सोनवणे यांच्यासह प्रतिभा कापसे व उपमहापौर पदासाठी मयुर कापसे व सुरेश सोनवणे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. सत्ताधारी भाजपच्या गोटातील नगरसेवक शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याने महापालिकेत सत्ताधारी भाजपचे समीकरण बिघडले आहे. दरम्यान, उद्या होणार्‍या निवडणूकीकडे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय धुरीणांचे लक्ष लागून आहे. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या विशेष सभेत नवनिर्वाचीत महापौर व उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अंतर्नाद प्रतिष्ठान व शिक्षण विभाग पंचायत समिती भुसावळ यांच्या सयुंक्त विद्यमाने शिवजयंतीच्या निमित्ताने फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन महावक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती.यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष होते.चार गटातील १७ विजेत्यासह सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक यांना गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी भुसावळ नगरपालिका शिक्षण मंडळ सभापती मुकेश गुंजाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष रघुनाथ सोनवणे,डॉ.भाग्यश्री भंगाळे, नूतन पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे, खासगी प्राथमिक सोसायटी संचालक प्रसन्ना बोरोले ,म. रा. अपंग कर्मचारी व अधिकारी संघटना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अनिल देशपांडे यांची उपस्थिती होती. स्पर्धक, पालक, प्रमुख पाहुणे आणि अंतर्नादच्या सर्व सदस्यांची थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमिटरद्वारे तपासणी करुन आणि ही…

Read More