Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी मेहरुण परिसरातील प्रभाग क्र.१४ मधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील विविध नागरी समस्यांबाबत नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन यांना सामाजिक कार्यकर्त्या अनुताई कोळी यांचे निवेदनाद्वारे साकडे शहरातील सत्तांतरानंतर नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यात त्यांना विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह सामाजिक कार्याकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत महापालिका क्षेत्रातील समस्यांबाबतही अवगत करण्याचे प्रयत्न चालविले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अनुताई कोळी यांनी नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मेहरुण परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या समस्यांबाबत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, या उद्यानात सकाळी व संध्याकाळी वॉकींग करणार्‍या नागरीकांची मोठी वर्दळ असते. त्यात ज्येष्ठ…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील स्वराज्य पॅनलचे प्रमुख भिकन नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पॅनल निवडून आले आहे. त्यात सचिन बिर्‍हाडे हे सरपंचपदी तर उपसरपंचपदी सौ. तुळसाबाई भिकन नन्नवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल पाटील यांनी कामकाज पाहिले.नवनिर्वाचित सरपंच सचिन बिर्‍हाडे व उपसरपंच तुळसाबाई नन्नवरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील जैन इरिगेशनचे चित्रकार आनंद पाटील यांच्या चित्राचे राज्यस्तरीय कॅमलिन आर्ट फाऊंडेशनच्या चित्रकला प्रदर्शनात निवड झाली आहे. कला स्पर्धांमध्ये कॅमलिन आर्ट फाऊंडेशनचे नाव जगात नावाजलेले आहे. दर वर्षी आयोजित होणार्‍या या स्पर्धेत हजारों स्पर्धक भाग घेत असतात. चार पुरस्कार व्यावसायिक चित्रकार तर बारा चित्र विद्यार्थी विभागात राष्ट्रीय पुरस्कार दिली जाताता. पोर्ट्रेट, लँडस्केप, स्टील-लाईफ व क्रिएटिव्ह पेंटिंग अशा प्रकारात प्रवेशिका मागविण्यात येते. सदरील स्पर्धेत जळगावचे चित्रकार आनंद पाटील याचे पोर्ट्रेट (व्यक्ती) चित्र या प्रकारातील बाबा ह्या चित्राची निवड झाली आहे. हे जल रंगातील आहे. यापूर्वी मुंबई येथील जे जे. अपलाइड आर्ट कॉलेजमध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना वर्ष २००३…

Read More

यावल : तालुका प्रतिनीधी राष्ट्रीय आरोग्य अभियान मोहीम अंतर्गत यावल तालुक्यातील न्हावी व यावल येथे ग्रामीण रुग्णालयात लाखो रुपये खर्चून डिलेवरी वार्ड लेबर रूम,वेटिंग रूम,स्टोर रुम इत्यादी खोल्यांचे बांधकाम सुरू आहे.बांधकामाच्या ठिकाणी सुपरवायझर किंवा संबंधित शाखा अभियंता कामाच्या ठिकाणी देखरेखीसाठी राहत नसल्याने बांधकाम रामभरोसे सुरू आहे, तसेच बांधकामा बाबत माहिती सुद्धा मिळू शकत नाही,बांधकाम कोणत्या योजनेतून किती लाखाचे आहे? इत्यादी माहिती फलक बांधकामाच्या ठिकाणी न लावल्यामुळे यावल तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात वरील योजनेअंतर्गत जे बांधकाम काम सुरू आहे त्यातील पिलर चे खड्डे फक्त ४ फूट खोल अंतराचे केले आहेत तर यावल येथील ग्रामीण…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी संजीवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन तर्फे जागतिक रंगभूमी दिना’च्या निमित्ताने पुर्वसंध्येला ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या या काळात जगातील रंगभूमी समोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. तरीही कलावंत विविध मार्गांनी रंगभूमीवर काम करीत आहेत. नाटक करणार्‍या कलावंतासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो. परिवर्तन तर्फे जागतिक स्तरावर मराठी रंगभूमी याविषयावर आज २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात जागतिक रंगभूमीचे अभ्यासक व कादंबरीकार डॉ अविनाश कोल्हे (मुंबई), नाटक या विषयाला वाहिलेलं रंगवाचा हे मासिक गेल्या अनेक वर्षापासून कणकवली येथून प्रकाशीत करणारे संपादक वामन पंडीत, शिवाजी अंडरग्राउंड इन भिमनगर मोहल्ला या…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी सर्व समाजाला सोबत घेऊन चालत जाणारे व समाजावर निःस्वार्थ प्रेम करणारे डॉ. अविनाश आचार्य यांचा सातवा स्मृतिदिन काल डॉ. हुजुरबाजार हॉस्पिटलमध्ये साजरा झाला. डॉ. आचार्य यांच्या प्रतिमेस महापौर जयश्री महाजन माल्यार्पण करत आदरांजली वाहिली. तसेच डॉ. आचार्यांच्या कार्याची ओळख ही पिढ्यानपिढया समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कोरोनाचा संक्रमण काळ संपल्यानंतर जळगाव शहर महानगरपालिका व समस्त जळगावकरांच्या वतीने डॉ. आचार्य व प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना ‘जळगाव रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे महापौर महाजन यांनी सांगितले. यावेळी डॉ. संजीव हुजूरबाजार, डॉ. आरती हुजूरबाजार, शिवम हुजूरबाजार, ऐश्वर्या हुजूरबाजार, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन,…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी दि.२३ मार्च सायंदैनिक साईमत मधे वर्डी येथील ज्वारी उत्पादक शेतकर्‍यांनी बियाणेबाबत केलेल्या तक्रारीसंबंधी ‘दै.साईमत’ वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित होताच लागलीच या तक्रारीची दखल घेत कृषी अधिकार्‍यांनी थेट तक्रारदार शेतकर्‍यांच्या शेतात भेट देऊन ज्वारी पिकांची पाहणी केली. कृषी अधिकार्‍यांनी तक्रारदार शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता ज्वारीची कणसे पुर्ण भरलेले नाहीत त्यामुळे शेतकर्‍यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. प्रशासनाने बियाणे कंपनीला शेतकर्‍यांचे झालेले नुकसान भरपाईचे आदेश द्यावेत. अन्यथा, शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संदीप पाटील यांनी दिला. याप्रसंगी कृषि अधिकारी आर.आर.चौधरी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी.एम.शिंपी, कृषी विज्ञान केंद्र पालचे कृषी शास्त्रज्ञ अतुल पाटील, हायटेक सिडस्चे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर एका २५ ते ३० वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेखाली आल्याने चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. दरम्यान, मृत तरुणाचे ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलीसांनी केली असून याबाबत लोहमार्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ च्या डाऊन साईडवरील रेल्वेलाईन वरील खंबा क्र.४१९/१७ ते ४१९/१९ दरम्यान एका २५ ते ३० वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याच्या चेहर्‍याचा चेंदामेंदा होऊन तो जागीच गतप्राण झाला. सदर घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. मयत तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलीसांनी केले…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या साकेगाव येथे गेल्या महिन्यापासून कोरोना आजाराने थैमान घातले असून दररोज मृत्यूच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत गावात कडक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी आता गावकरी करतांना दिसत आहेत. तालुक्यातील साकेगाव सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र तयार झाल्याचे समोर येत असून गावात गल्लोगल्ली कोरोना आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत असल्याचे सांगितले जात आहे . गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे पदाधिकारी गावातील ग्रामस्थांना आवाहन करीत आहेत मात्र अनेक ग्रामस्थ या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे एवढेच काय तर अजूनही काही ग्रामस्थ काळजी घेत नसून आपापल्या कामानिमित्त भटकंती करताना दिसत आहेत. ग्रामपंचायतीने विनाकारण फिरण्यास…

Read More

जळगाव/भुसावळ ः प्रतिनिधी खिरोदा (ता.रावेर) येथील रहिवासी तथा सप्तपुट ललितकला भवन चित्रकला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी निलेश एकनाथ वाघ यांना ‘आनंदी गोपाळ’ या मराठी चित्रपटासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून भारतीय सिनेक्षेत्रातील ६७ वा सर्वोच्च पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार मिळवणारे ते खान्देशातील पहिले कलावंत ठरले. यापुर्वी फेब्रुवारीत त्यांना मुंबई येथे फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे. संपूर्ण भारतातील विविध प्रांतातून व विविध भाषेतील चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होत असल्याने सिनेसृष्टीत या पुरस्काराला अतिशय मानाचे स्थान आहे.त्यामुळे खिरोदा (ता.रावेर) या क्रांतीभूमीतून पुढे आलेल्या निलेश वाघ यांना ‘आनंदी गोपाळ’ या मराठी सिनेमाच्या उत्कृष्ट…

Read More