Author: saimat team

यावल ः प्रतिनिधी दि. २७ रोजी चौथा शनिवार व दि.२८ होळी आणि दि.२९रोजी धुलिवंदननिमित्त शासकीय सुटी आल्याने तसेच यावल तहसीलदार वगळता काही महसुल अधिकारी,कर्मचारी आणि अनेक तलाठी,सर्कल हे आपल्या मुख्यालयाठिकाणी राहत नसल्याची सुवर्णसंधी साधून वाळूतस्करांनी अवैध वाळू वाहतूक खुलेआम करून ट्रॅक्टर सुसाट वेगाने पळवून मोठा उच्चांक गाठला. यावल पोलीस सुद्धा दिवस-रात्र बंदोबस्त करून सकाळी तीन ते सहा वाजेच्या दरम्यान साखर झोपेत राहत असल्यामुळे वाळू तस्करांना पोषक वातावरण निर्मिती झाली होती तरी आता महसूल आणि पोलिस विभाग नेहमीचे शासकीय कामकाज करताना वाळूतस्करांविरुद्ध काय कडक कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. यावल तहसील कार्यक्षेत्रात तसेच यावल व फैजपूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आव्हाणे शिवारात आज सकाळी शेतात काम करणार्‍या शेतमजुरावर अचानकपणे रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यात शेतमजुर ठार झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील आव्हाणे येथे कैलास उत्तम नाईक (वय ३०) हा शेतमजुरी रहिवासाला असून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतमजुरी करुन करतो. नेहमीप्रमाणे हा तरुण आपल्या कुटुंबियांसह आव्हाणे शिवारात दादर कापण्यासाठी गेला होता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास आई-वडिल, पत्नीसह काही मजुरांसह दादर कापत असतांना शेताच्या बांधावर लपलेल्या मोठ्या रानडुकराने अचानक कैलास नाईक याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कैलास गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ नेत असतांना आव्हाणे फाट्याजवळच…

Read More

यावल : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथे एका महिलेची आजारास कंटाळून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.२९ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्यापूर्वी दहिगाव येथील राहणार्‍या कोकीळाबाई प्रकाश पाटील (वय ६०) यांनी आजाराला कंटाळून नायगाव रोडवरील दहिगाव शिवारातील राजु दगडू पाटील यांच्या शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. याबाबत मयत महिलेचे मेहुणे छन्नु पाटील (रा.नेरी, ता.जामनेर) यांनी दिलेल्या माहितीनुसार यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस कर्मचारी असलम खान हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली नजीक दापोरे येथील २७ वर्षीय तरुणाने बाहेरुन फिरुन येतो असे सांगत घरातून निघून जात रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोलीनजीक दापोरा येथील विशाल शांताराम पवार (वय २७) हा तरुण आई व बहिणीसह रहिवासाला आहे. विशाल हा शिक्षण करीत असतांना आईसोबत मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मागील बर्‍याच दिवसांपासून तो कर्जबाजारीपणामुळे तणावात असल्याचे ग्रामस्थांच्या चर्चेतून समजते. काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आईला तो म्हणाला की, जरा मी बाहेरुन जावून येतो असे म्हणत तो…

Read More

यावल : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील किनगावातून घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सत्तार बिस्मिल्ला पिंजारी (वय ४२) रा.किनगाव खुर्द हे २६ मार्च रोजी आपल्या मित्रासोबत फैजपूर येथे गेले होते व ते रात्री ८ वाजता किनगाव येथे आपल्या गावी परतल्यावर रात्री त्यांनी आपल्या घरासमोर लावलेली बजाज पल्सर हे दुचाकी वाहन कुणीतरी घेवून गेल्याची बाब २७ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते घराबाहेर आल्यावर आदी सर्वत्र शोध घेतल्यावरसमजले. अखेर पिंजारी यांनी बजाज पल्सर या कंपनीची सुमारे ४० हजार रूपये…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील जैन स्पोर्टस् अकॅडमीची खेळाडू तथा जैन फार्म फ्रेश फूडस् लि.च्या मसाला प्रकल्पातील सहकारी, स्वीमिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्र शासनाचा एकलव्य पुरस्कारप्राप्त खेळाडू कांचन चौधरी यांनी बंग्लोर येथे नुकत्याच झालेल्या ’पॅरा स्वीमिंग चॅम्पीयनशीप’ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी ३ सुवर्ण व एक रौप्य पदक पटकाविले. कांचनच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन व सहव्यवस्थापकीय संचालक तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीचे संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले. जळगाव जिल्ह्यात खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, या मुख्य उद्देशासाठी जैन इरिगेशनतर्फे जैन स्पोर्टस् ऍकॅडमीची निर्मिती करण्यात आली आहे. या ऍकॅडमीतील खेळाडू कांचन योगेश चौधरी हिला शालेय शिक्षण…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी परिवारातर्फे देवकर महाविद्यालयातील शासकीय आयुर्वेद कॉलेजला कोरोना रुग्णांसाठी एक लाख ६८ हजार रुपयांचे सहा ऑक्सीजन मशिन देण्यात आले. शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करुन सेवारथ संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रोटरी मिटडाऊनचे माजी अध्यक्ष दिलीप गांधी व सहप्रांतपाल डॉ.अपर्णा मकासरे यांच्या पुढाकारातून ऑनलाईन मिटींगच्या माध्यमातून अवघ्या दोन दिवसात या मशिनसाठी निधी संकलन करण्यात आले. रोटरी क्लब जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे प्रत्येकी दोन तर रोटरी क्लब जळगाव मिडटाऊन आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे प्रत्येकी एक अशा सहा ऑक्सीजन मशिन १२ रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील मजुर वर्गाला एमआयडीसीच्या खुल्या भुखंडामधून रस्ता देण्यात यावा याबाबत मनसे जनहित कक्षाचे महानगराध्यक्ष संदीप मांडोळे यांच्याकडून गेल्या ८ वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे. याची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दखल घेत सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांना स्थळ निरिक्षणाचे आदेश दिले होते, त्या अनुषंगाने सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी नुकतीच एमआयडीसीचे अधिकारी परिसरातील रहिवासी व तक्रारदार यांच्या सोबत प्रत्यक्ष स्थळाला भेट दिली व विकास न झालेल्या खुल्या भूखंडातून कामगारांना ये-जा करण्याकरिता रस्ता देता येईल, याबाबत सविस्तर माहिती घेतली. दरम्यान, परिसरातील हजारो मजुर ४ कि.मी. च्या फेर्‍याने एमआयडीसीमध्ये जातात. जास्त संख्येने महिला आहेत. परिसरतील डी ४५/२ हा खुला भूखंड…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाचे संकट गडद होत असल्यामुळे शहरासह जिल्ह्यात जिल्हा प्रशासनातर्फे लॉकडाऊनसह कडक निर्बंध लागू करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून २८ ते ३० मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.या दरम्यान अत्यावश्यक सेवा व वृत्तपत्र वितरणला सुट देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आदेश असतांनाही जळगाव शहरात काही वृत्तपत्र वितरकांना पोलीस नाहक त्रास देत असल्याच्या घटना घडत असून त्याबद्दल वृत्तपत्रसृष्टीत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या २८ मार्च रोजी जुने बस स्टॅड,रेल्वे स्टेशन व नविन बस स्थानक परिसरातील वृत्तपत्र वितरण स्टॉलधारकांना पोलिसांनी दमदाटी करुन स्टॉल बंद करण्यास भाग पाडले. याबद्दल एका पोलीस अधिकार्‍यांकडे भ्रमणध्वनीव्दारे तक्रारही करण्यात…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी एरंडोल येथील कोविड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात होळी सणानिमित्त तेथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना प्रांताधिकारी विनय गोसावी, भोजन पुरवठा करणारे कृष्णा धनगर यांनी सरप्राइज म्हणून आज पुरणपोळीचे जेवण देऊन सर्वांना आश्‍चर्यचकित केले. एरंडोल येथील कोविड केअर सेंटर येथे ८७ तर ग्रामीण रुग्णालयात २८ असे दोन्ही ठिकाणी १०५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या ठिकाणी क्वारंटाईन असलेले व ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण हे बहुतेक ग्रामीण भागातील आहे. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी येथे उपचार घेणार्‍या रुग्णांना होळीनिमित्त आपल्या घराची आठवणी येऊ नये म्हणून त्यांच्यासोबत हा सण साजरा करण्याचे ठरवले. त्यानंतर होळीला कोविड सेंटरमधील सर्व रुग्णांना पुरण-पोळी, खीर, भात, आमटी,…

Read More