अमळनेर ः प्रतिनिधी आज दि.१ गुरुवार रोजी सकाळी ८.३० स्टेट बँक येथे राहुल महाजन व जय योगेश्वर कॉलेज ढेकू रोड येथे प्रसाद शिरसागर व कोंबडी बाजार येथे नगरपरिषदेतर्फे दुपारी ४ ते ७ गणेश शिंगारे अँटिजेंन टेस्ट कॅम्प आयोजन केले. यावेळी प्रांताधिकारी सिमा आहिरे व मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड उपस्थित होते. यावेळी तपासणी कामी राहुल महाजन, लॅब टेक्नॉशियन मनोज निकुंभ, योगेश पाटील हे काम पाहत आहेत. उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांनी जास्तीत जास्त नागरिक व महिलांनी चाचणी करून नियमांचे पालन करावे, असे सांगितले.
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी महापालिकेच्या थकबाकी पोटी सुरु असलेल्या गाळे सीलच्या कारवाईच्या विरोधात बुधवारी श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी भीक मांगो आंदोलन केले. दरम्यान, आज गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु होणारे साखळी आंदोलन स्थगित केले आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या गाळेधारकांनी दुपारी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत भीकमांगो आंदोलन केले. यातून जमा झालेले भीकेचे पैसे महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे. दरम्यान,संध्याकाळी गाळेधारक संघटनेचे पदाधिकारी राजस कोतवाल व तेजस देपुरा यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन महापालिकेच्या भूमिकेच्या विरोधात साखळी उपोषण करीत असल्याचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी संसर्ग वाढीमुळे उपोषण न करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत उपोषण स्थगित…
जळगाव ः प्रतिनिधी समाजवादी पार्टीचे जिल्हा निरीक्षक शेख मोईनुद्दिन इक्बाल अहमद(शेकु)यांच्यातर्फे लॉकडाऊनमध्ये पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना त्यांना चहा व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते साजिद तडवी, प्रशांत झेंडे, अकील पटेल, युसुफ शहा, युसुफ खाटीक उपस्थित होते.यावेळी मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.समाजवादी पार्टीच्या या उपक्रमाचे पोलीस कर्मचार्यांनी स्वागत केले.
जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यात गंभीर व मध्यम स्वरूपाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यक असते. मात्र, शहरात शासकीयसह खासगी रुग्णालये फुल्ल झाल्याने बेड शिल्लक नाही. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मोहाडी येथील रुग्णालयात दोन दिवसांत दोनशे बेड सुरू करण्याचे सांगितले आहे. तर महिन्याभरात याच ठिकाणी ८०० बेड तयार करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यासाठी महिला रुग्णालयात कामाला गती आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. बेड फुल्ल, रुग्णांचे हाल तालुकास्तरावर ऑक्सिजनच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना जळगाव शहरात उपचारासाठी दाखल केले जात आहे.…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात आजपासून (दि. १ एप्रिल) लसीकरणाच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात होत आहे. यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस टोचून घेता येणार आहे.त्यासाठी शहरात १८ खासगी वाढीव केंद्रांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता मात्र,त्यापैकी फक्त २ केंद्रांनाच परवानगी मिळाली आहे.त्यामुळे शहरातील पूर्वीचे १८ व नवीन वाढीव २ असे २० केंद्रांवर लस घेता येणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या लस पुरवठा करणार्या स्टोअर्सकडे एकही लसीचा डोस शिल्लक नाही. आज गुरुवारी नवीन २७ हजार डोस प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत लसीकरणाचे चार टप्पे झालेत. त्यात १ लाख ४३ हजार ६४९ लाभार्थींना लस देण्यात आली आहे. तसेच पाच टप्प्यात जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख…
पाचोरा ः प्रतिनिधी पाचोरा- भडगाव मतदार संघात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आमदार किशोर अप्पा पाटील हे पुन्हा एकदा ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयात काल दुपारी ३.३० वाजता प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचेसह पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकार्यांची बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. या प्रसंगी त्यांनी पाचोरा व भडगाव शासकीय रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय साधन सुविधांसाठी किती निधी लागतो त्याची माहिती घेत त्वरित साहित्य खरेदी करून गोरगरीब रुग्णांना चांगला उपचार मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही , सोबतच अधिकारी, कर्मचारी व डॉक्टर्स बांधवानी देखील पहिल्या टप्यात केलेल्या कामा प्रमाणेच…
जळगाव ः प्रतिनिधी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगावची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने काल झाली. या सभेत आमदार गिरीश महाजन यांच्या निषेधाचा ठराव मांडून त्यास मंजुरी देण्यात आली. विजय पाटील यांची निवड ऍड. विजय पाटील यांची सर्व सभासदांतर्फे सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या सभेत एकूण आठ विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्व विषय मंजूर करण्यात आले. या वेळी संचालक मंडळातर्फे सर्व सभासद बांधवांना वाढत असलेल्या कोरोना संबंधी काळजी घेण्याचे आवहन करण्यात आले. संस्थेतर्फे कुठलाही आयत्या वेळचा विषय नव्हता. सभासदांमधून विनोद पंजाबराव देशमुख यांनी आयत्या वेळचा विषय मांडला. गेल्या तीन वर्षांपासून गिरीश महाजन यांनी…
जळगाव ः प्रतिनिधी भाईसा स्व.रतनलाल सी बाफना यांच्या स्मरणार्थ डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयाला ३ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. सहज हाताळता येणारे आणि कुठेही घेवून जाता येणारी ही मशिन रुग्णांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात डॉक्टर्स डे निमित्त ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर या उपकरणाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे सदस्य डॉ.वैभव पाटील, डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, सुशिल कस्तुरीचंद बाफना, ड्युटी डॉक्टर परिमल हे उपस्थित होते. याप्रसंगी सुशिल कस्तुरीचंद बाफना म्हणाले की, भाईसा स्व.रतनलाल सी बाफना यांच्या शिकवणीतून आपण समाजाचे एक घटक आहे, त्या भावनेने आपण समाजाचे देणे लागतो तसे संस्कारही आमच्यावर केले आणि आज त्याच…
जळगाव ः प्रतिनिधी तीन दिवसांचा प्रति लॉकडाऊन निमित्त लावण्यात आलेले विशेष निर्बंध आज संपुष्टात आले.त्यापाठोपाठ आगामी १५ एप्रिलपर्यंत विशेष निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केले आहेत. त्यात सिनेमागृह, मॉल, बगीचे, नाट्यगृह, प्रेक्षकगृहे आदी ठिकाणे सुरू करण्यावर बंदी कायम ठेवली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास प्रतिव्यक्ती १० हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. या काळात रात्री १० ते सकाळी ७ वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्र सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. सर्व नॉन इसेन्शियल दुकाने मात्र, सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत.…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा सहकारी दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या सभेत संस्थांना त्यांच्या भाग भांडवलावर १० टक्के लाभांश अदा करण्यात आला आहे. यासह नफा वाटणी करतांना ६० टक्के रिबेट देण्यात आला. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत २० टक्के दूध संकलन कमी झाले आहे. यामुळे संघाचे भागभांडवल वाढविण्यासाठी प्रती लिटर १० पैशांवरून २० पैसे कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. दूध संघाच्या नवीन इमारतीमध्ये ऍपद्वारे ही सभा घेण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनीताई खडसे यांनी अहवालाचे वाचन करीत संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. संस्थेच्या ६४० संस्था सभासद झालेल्या आहेत, त्यात ६४ नवीन आहेत. २ लाख ६० हजार…