Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी वयाच्या साठाव्या वर्षी शंभराव्यांदा रक्तदान करुन रामचंद्र दिगंबर देशपांडे यांनी समाजासमोर आदर्श स्थापित केला आहे. आतापर्यंत ३०० जणांना जीवनदान देण्यात यशस्वी झाल्याबद्दल स्वत:ला भाग्यवान समजतो, अशा भावना त्यांनी रविवारी रेडक्रॉस रक्तपेढीत रक्तदान केले, यावेळी व्यक्त केल्या. कोरोनाला घाबरून न जाता रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. वृत्तपत्राच्या कार्यालयातून निवृत्त झालेल्या देशपांडे त्यांच्या पत्नी शुभांगी देशपांडे यावेळी उपस्थित होत्या. राज्य रक्त संक्रमण परिषदेने वयाच्या ६५ वर्षांपर्यंत रक्तदान करण्याची मर्यादा वाढवल्याने माझ्यासारख्या रक्तदात्यांना रक्तदान करणे शक्य झाले,अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कोरोना काळातही निवृत्त झाल्यानंतर वयाच्या ६० व्या वर्षी रक्तदान करणे हे कौतुकास्पद आहे. मला विश्वास आहे…

Read More

जळगाव ः विशेष प्रतिनिधी महापालिकेचे उपयुक्त संतोष वाहुले यांनी शनिवारी आपल्या पथकासह शहरातील फुले मार्केट,सेंट्रल फुले मार्केट,सुभाष चौक,घाणेकर चौक आदी परिसरातील अतिक्रमण धारक, हॉकर्स व फळभाजी विक्रेत्यांवर धडक कारवाई केली.दुकानदार,रस्त्यावर फिरणारे आदींवर मास्क न लावल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली.त्याचप्रमाणे दुकानात व दुकानाबाहेर सोशल डिस्टनसिंग न पाळणार्‍या दुकानदारांवरही त्यांनी कारवाईचा बडगा उगारला.ते खरोखरच कौतुकास्पद आहे मात्र उपायुक्त संतोष वाहुळे जेव्हा स्वतःच ५० लोकांचा ताफा घेऊन फिरतात तेव्हा सोशल डिस्टनसिंगचा पार फज्जा उडविला जात असल्याने त्यांनी त्याचे भान राखायलाच नको काय? असा प्रश्न शनिवारी दंड भरलेल्या लोकांना पडला आहे. महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याकडे अतिक्रमण विभागाची जबाबदारी देण्यात आली असून ते अत्यंत प्रामाणिकपणे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोविड-१९ संक्रमणाच्या महामारीमध्ये जिल्ह्यातील केमिस्ट संघटनेचे सर्वच सभासद फ्रंट लाईनवर उभे राहून ‘रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा’ समजून अहोरात्र परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यात रेमडिसीवीर इंजेक्शनच्याबाबत सोशल मीडियावरुन व्हायरल होणार्‍या पोस्टबाबत नागरिकांनी गैरसमज करुन बळी पडू नये, तसेच जिल्ह्यात रेमडिसीवीरचा मुबलक साठा असून सर्वच कोविड सेंटरमधील मेडिकल स्टोअरसह इतरत्र मेडिकल स्टोअरमध्ये रेमडिसीवीरचा साठा उपलब्ध आहे त्यामुळे रेमडिसीवीरची कुठेही साठेबाजी किंवा काळाबाजार झालेला नसल्याचा खुलासा जिल्हा केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. औषधी विक्री करतांना केंद्र शासनाच्या नियमानुसार (डीपीसीओ) असलेल्या एमआरपीने केमिस्ट लोक विक्री करतात. एमआरपी पेक्षा कोणताही केमिस्ट हा जास्त दराने रुग्णांकडून जास्त पैसे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे शिरसोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना मास्क आणि ग्लोजचे वितरण करण्यात आले.रोटरी सेंट्रलचे सदस्य राजेंद्र पिंपळकर यांचे यासाठी सहकार्य लाभले. कार्यक्रमास अध्यक्ष प्रा.डॉ. अपर्णा भट-कासर, म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश अग्रवाल, आरोग्य सेवक निलेश चौधरी,अनिल महाजन, आरोग्य सेविका रेणुका आदिंची प्रमुख उपस्थिती होती. रोटरी क्लब जळगावतर्फे चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जळगाव – येथील रोटरी क्लब जळगावतर्फे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मोहाडी येथील शासकीय रुग्णालयास चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आल्या. चारही मशीनचे प्रायोजकत्व रोटरीचे जेष्ठ सदस्य कंवरलाल संघवी यांनी स्वीकारले होते. यापूर्वी रोटरी…

Read More

जामनेर : प्रतिनिधी कोरोना विषाणू संक्रमणाचे हॉटस्पॉट ठरलेल्या जामनेर व पहूर येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली .याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांची ही उपस्थिती होती . दोन दिवसांपूर्वी अर्जून जाधव य प्राथमिक शिक्षकांचा मृत्यू झाला. आज (ता.३) सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍यांसह महिनाभरात ११ जणांचा कोरानाने बळी घेतला असून बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.प्रशासनाची नजर चुकवून शेतशिवारात लग्न सोहळे धूमधडाक्यात होत असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे.ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांमुळे उपलब्ध यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यात लसीकरणासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध नाही.आज घडीला २१ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळातदेखील महावितरणकडून ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा सुरळीत व अविरतपणे देण्यात येत असून गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीतील तब्बल ८ लाख २ हजार ७८२ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.त्यात जळगाव परिमंडलातील ४५ हजार १७४ जोडण्यांचा समावेश आहे.दरम्यान आवश्यक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात येत असल्याने प्रलंबित वीजजोडण्या देखील ताबडतोब कार्यान्वित करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. महावितरणकडून दरवर्षी मागणीनुसार साधारणतः ९ ते १० लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मागील वर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याचा वेग मंदावला होता. तरीही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विदगाव येथील एका ७० वर्षीय वृध्दाने आपल्याला असलेल्या दुर्धर आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील विदगाव येथे श्रीराम जीवराम कोळी (वय ७०) हे पत्नी व दोन मुलांसह रहिवासाला आहे. ते दोन्ही मुलांसह शेतीचे कामकाज करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना दुर्धर आजार जडला होता. अनेक ठिकाणी उपचार करुनही ते त्या आजारातून बरे होवू शकले नाहीत. वारंवार उपचार घ्यावा लागत असल्याने ते ह्या आजाराला कंटाळले होते. काल रात्री कुटुंबियांसोबत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पहाटे शतपावलीसाठी निघालेल्या ४३ वर्षीय इसमाला अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर ईच्छादेवी चौकात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरात काळे नगरात वास्तव्यास असलेले सतिश शंकर परदेशी (वय ४३) हे वकिलीचा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मागील काही दिवसांपासून त्यांचे काका हे आजारी असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २ एप्रिल रोजी रात्रभर ते जिल्हा रुग्णालयातच मुक्कामाला होते. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास ते शतपावलीसाठी सिंधी कॉलनीच्या मार्गाने शतपावली करत राष्ट्रीय महामार्गावरील…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मोहाडी येथील शासकीय महिला रूग्णालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. या ठिकाणी १०० खाटांचे कोविड रूग्णालय सुरू करण्याची तयारी सुरू आहे. सोमवार, ५ एप्रिलपासून येथे सर्व सुविधा उपलब्ध होणार असून या ठिकाणी कोरोना रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. शासनाने २०१६-१७ या वर्षात जळगाव जिल्ह्यासाठी ७५ कोटी रूपयांचे स्वतंत्र महिला हॉस्पिटल बांधण्यास मंजुरी दिली होती. हे हॉस्पिटल बांधून तयार झाले आहे. हॉस्पिटलचे काम अंतीम टप्प्यात असतांना या ठिकाणी तातडीने १०० खाटांचे कोवीड हॉस्पिटल सुरू करण्यात येत आहे. याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली. १०० खाटांची तात्पुरती व्यवस्था केली असून गरजेनुसार येथे ८०० रूग्णांची व्यवस्था…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महापालिका प्रशासनाकडून गाळे भाडे थकबाकीपोटी करण्यात येत असलेल्या सीलच्या कारवाईच्या विरोधात शहरातील १६ अव्यावसायिक मार्केट बंद ठेवले असून रोज वेगवेगळ्या मार्केटमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी चौबे मार्केटमधील गाळेधारकांनी घंटानाद आंदोलन केले. दुपारी गाळेधारकांनी दुकानासमोरील पत्र्यांच्या छतावर चढून घंटा वाजवून मनपा प्रशासनाच्या कारवाईचा निषेध केला. यामुळे रस्त्यावरुन येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष वेधून घेतले. धर्मशाळा मार्केट गाळेधारकांची विनंती धर्मशाळा मार्केटमधील गाळेधारकांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना महिना २५ हजार भाडे कसे भरणार असा सवाल उपस्थित केला आहे. २०१३ पर्यंत दरमहा ६ हजार रुपये भाडे भरलेले आहे. पालिकेने आता सर्व भाडे व ट्रॅक्स मिळून प्रतिवर्षी २ लाख ४०० रुपये प्रमाणे आदेश…

Read More