Author: saimat team

भुसावळ : प्रतिनिधी येथील श्रीनगर मधील रहिवासी नलिनी दिवाकर भोकरडोळे(वय ८१) यांचे काल ९ एप्रिल रोजी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर तापी नदीकाठी वैकुंठधामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या सायंदैनिक साईमतचे लेखापाल हेमंत भोकरडोळे यांच्या मातोश्री होत. भोकरडोळे परिवारावर कोसळलेल्या दुःखात साईमत परिवार सहभागी आहे.

Read More

जळगाव ः प्रतिनिधी मनपातील शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा बुधवारी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे सादर केला. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून आता नवीन स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. आगामी अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी शिवसेना संघटना व पराभूत उमेदवारांपैकी कोणाला संधी मिळते हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. शिवसेनेसोबत अनेक वर्ष काम करणार्‍या अन्य सदस्यांना संधी देण्यासाठी काही दिवसांपासून स्वीकृत सदस्य बदलाच्या हालचाली सुरू होत्या.दरम्यान, संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी जैन यांना राजीनामा देण्याचे आदेश गेल्या आठवड्यात दिले होते. त्यानुसार सोमवारी अमर जैन हे राजीनामा देण्यासाठी गेले होते. परंतु, आयुक्त सतीश कुलकर्णी नसल्याने ते माघारी परतले होते. दरम्यान,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा परिषदेतील आपल्याच एकेकाळच्या समर्थक पदाधिकार्‍यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेनासे झाल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिथे सत्तांतर घडवून आणण्याच्या हालचाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते,माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सुरू केल्या आहेत.शुक्रवारी सायंकाळी त्या अनुशंगाने खडसे यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे गटनेते या बैठकीला उपस्थित होते. जळगाव महानगरपालिकेत नुकतेच शिवसेनेने सत्तांतर घडवून आणले. त्यात खडसे यांचे काहीच योगदान नव्हते, असा प्रचार या सत्तांतराच्या वेळी करण्याचा प्रयत्न काही बंडखोर नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेत एकहाती सत्तांतर घडवून आणण्याच्या तयारीला खडसे लागले आहेत, असे सांगण्यात येते. त्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी झालेल्या या बैठकीकडे पाहिले…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी यावल रावेर तालुका हा शेती प्रधान आणि केळी व इतर बागायती पिके घेण्यालायक असल्याने तसेच जिल्ह्यात काही श्रीमंत व्यापारी, अधिकारी, कर्मचारी,उद्योजकांकडे आणि दोन नंबर व्यवसाय करणार्‍यांकडे कोट्यावधी लाखो रुपयांची माया जमल्याने मोठ मोठ्या रकमा अडकविण्यासाठी काही जण शेतकरी किंवा शेतमजूर नसताना शेती खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला आहे याची दखल घेत फैजपुर भाग फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रावेर,यावल, सावदा दुय्यम निबंधकांना दि.६एप्रिल २०२१मंगळवार रोजी लेखी आदेश देऊन शेतकरी दाखला असल्याशिवाय खरेदी-विक्री,बक्षीस पत्र व्यवहाराची नोंदणी न करणेबाबत कळविले आहे यामुळे महसूल क्षेत्रासह खरेदी-विक्रीचे व्यवहार करणार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शेतकरी दाखला असल्याशिवाय…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर-धरणगाव दरम्यान भोणे गावानजीक आज सकाळी अहमदाबाद हावडा एक्सप्रेसला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रेल्वे डब्यातील काही प्रवासी जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत मिळालेले वृत्त असे की, पश्‍चिम रेल्वेच्या अंतर्गत येणार्‍या अमळनेर-धरणगाव दरम्यान रेल्वे प्रशासनाचे रेल्वे रुळांचे काम सुरु आहे. या कामात रेल्वे रुळा शेजारुन ट्रकने रुळाच्या कामांच्या अंतर्गत असणार्‍या साधनसामुग्रीची वाहतूक केली जाते. आज सकाळी या कामासाठी जात असलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटल्याने हा ट्रक अहमदाबादहून हावड्याकडे जाणार्‍या हावडा एक्सप्रेसला जावून धडकला. झालेल्या अपघातात रेल्वेचे काही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त असून…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात ‘कोवीशिल्ड’ लसीचा तुटवडा असल्याचे चित्र दोन दिवसांपासून समोर आले. प्रशासनाने तातडीने पाठपुरावा केल्याने आता लसीकरणासाठी ३५ हजार डोस उद्या शनिवारपर्यंत उपलब्ध होणार आहेत.जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला बुधवारी लसीअभावी ब्रेक मिळाला. जिल्ह्यातील १३३पैकी १७ केंद्र बंद पडले. पाठोपाठ गुरुवारी आणखी काही केंद्रांत लस संपल्याने केवळ ४६ केंद्रावरच लसीकरण झाले. उरलेल्या साठ्यातून शुक्रवारी ३७ केंद्रावरच लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गुरुवारी ३ हजार २३२ जणांनी लसीचा पहिला तर ४२५ जणांनी दुसरा डोस घेतला. आतापर्यंत १ लाख ७१ हजार ६७६ लाभार्थ्यांनी पहिला तर १९ हजार ७६७ जणांनी दुसरा डोस अशा एकूण १ लाख ९१ हजार ४४३ जणांनी लस…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत शहरातील विविध भागांत बालवाड्या चालवल्या जातात. मात्र, कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून बालवाड्यांतील कामकाज थांबवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मिळणारे मानधनही संबंधित शिक्षिका व मदतनिसांना मिळालेले नाही.त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शिक्षिका व मदतनिसांना महापालिका प्रशासनाने न्याय द्यावा, अशी मागणी शिक्षिका व मदतनिसांनी महापौर जयश्रीताई महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत चालवल्या जाणार्‍या बालवाड्या ‘कोविड-१९’च्या संसर्गामुळे जवळपास वर्षभरापासून बंदावस्थेत आहेत. त्यामुळे शिक्षिका, मदतनिसांना मानधन मिळू शकलेले नाही. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडूनही पत्रव्यवहार अथवा सूचना प्राप्त होऊ शकलेली नाही. त्यामुळे आम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथे नक्षलवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महानगर शाखेतर्फे रविवारी नक्षलवादी विरोधी फलक घेऊन निषेध करण्यात आला. या हल्ल्यात २२ भारतीय जवान शहीद झाले. जखमी जवानांच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी महानगर मंत्री आदेश पाटील यांनी राष्ट्रद्रोही विचारसरणीचा निषेध करत नक्षलवाद ना मावोवाद, सबसे उपर राष्ट्रवाद अशा घोषणा दिल्या. हर्षल तांबट, चिराग तायडे, मयूर माळी, मनीष चव्हाण, रितेश महाजन, आकाश पाटील, अंकित चव्हाण, दुर्गेश वर्मा यावेळी उपस्थित होते. छत्तीसगड राज्यात बिजापूर येथे नक्षली हल्ल्यात २३ भारतीय जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याचा निषेध करून शहीद जवानांना अभिवादन करताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जळगाव : महा कृषी ऊर्जा अभियानात रावेरचे आ.शिरीष चौधरी यांनीही सहभाग घेऊन दोन कृषिपंपांचे ९५ हजार रुपयांचे वीजबिल भरले. कृषिपंपांच्या वीजबिलांत भरघोस सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान शेतकर्‍यांच्या फायद्याचे आहे. सर्व शेतकर्‍यांनी या अभियानात वीजबिल भरून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन आ. शिरीष चौधरी यांनी केले आहे. या अभियानात कृषिपंपाच्या एकूण थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांंपर्यंत सवलत देण्यात येत आहे. निर्लेखन, व्याज व विलंब आकारामध्ये सूट दिल्यानंतर राहिलेल्या सुधारीत थकबाकीपैकी पहिल्या वर्षात ५० टक्के थकबाकी भरल्यास वीजबिल कोरे करण्याची शेतकर्‍यांना संधी आहे. सोबतच शेतकर्‍यांच्या थकीत व चालू वीजबिलांद्वारे भरणा झालेल्या रकमेपैकी प्रत्येकी ३३ टक्के निधी हा संबंधित ग्रामपंचायत…

Read More

यावल ः सुरेश पाटील हतनूर धरणाचा पाट यावल रावेर तालुक्यातून गेलेला आहे या पाटाच्या आजूबाजूस असलेले बाभळीचे झाड आणि इतर वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्याचा सपाटा लाकूडतोडणार्‍यानी सुरु केला असून यात किनगाव येथील एक कर्मचारी सहभागी असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे तरी हतनुर विभाग उपविभागीय अभियंता एस.एस.चौधरी यांनी वृक्षतोड करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करावी असे बोलले जात आहे. हतनूर धरणाच्या आजूबाजूस मोठ्या प्रमाणात बाभळीच्या झाडासह इतर वृक्ष मोठमोठे झालेली आहेत ही वृक्षतोड किनगाव येथील एक कर्मचारी करीत असून लाकूड तोडणारे हे लाकूड चेरी फॅक्टरीत व इतर व्यवसायिकांना विक्री करून मोठ्या प्रमाणात कमाई करीत आहे काहीजण बाभळीची झाड तोडून त्याचा कोळसा…

Read More