Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच गुढीपाडव्याच्या दिवशी सुधर्मा संस्थेने शहरातील अत्यंत गरीब अशा दहा कचरावेचक महिलांना किराणा सामानाचे वाटप केले. कोरोनामुळे समाजातील सर्व जणांचे आर्थिक चक्र थांबले आहे.या गरीब महिलांना यामुळे पुरेसा कचरा,प्लास्टिक कुठे आता मिळत नाहीत त्यामुळे अक्षरशः उपासमारीची त्यांच्यावर वेळ आली आहे.त्यामुळे या आर्थिक संकटात त्यांना किराणा वाटपची मदत देण्यात आली. त्यामध्ये गहू,तांदूळ,तूरडाळ, मूगडाळ, हरभरा डाळ, बेसन, साखर,तेल,साबण, पोहे, गुळ, मटकी, शेंगदाणे, बिस्किट इत्यादी साहित्य देण्यात आले. यावेळी या सर्व महिलांना नवीन साडी देखील देण्यात आली. लाभार्थी महिलांमध्ये तांबापुरा येथील गंगाबाई सोनवणे,मंगलाबाई गायकवाड, किरणबाई पवार, आरती सोनवणे,माया सुर्यवंशी, कमलाबाई सोनवणे,कलाबाई सोनवणे, मंगलाबाई लोंढे,यांचा समावेश आहे. वाटप कार्यक्रम…

Read More

जळगाव ः जिल्हा प्रतिनिधी कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना… या सदराखाली शेतकर्‍यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकर्‍यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकर्‍यांनी शेतीशी निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्र करणे आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टलचे हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॅप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र , ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु…

Read More

यावल ः तालुका प्रतिनिधी दि.१३ रोजी ‘गुढीपाडवा मुहूर्त वाळूतस्करांसाठी मोठी सुवर्णसंधी, महसूलच्या नाकावर टिच्चून अवैध गौण खनिज वाहतूक’असे वृत्त सायंदैनिक ‘साईमत’ मध्ये प्रसिद्ध झाल्याने त्याची दखल यावल महसूल विभागाने घेतली असून काल दि.१४ रोजी शासकीय सुटीच्या दिवशी महसूल पथक थोरगव्हाण- मनवेल परिसरात गेले असता यावल महसूल पथक नेमके कोणत्या ठिकाणी चौकशी किंवा कारवाई करणार यासाठी खुद्द काही अवैध वाळू तस्करांनीच मोटर सायकलीवरून महसूल पथकाचा पाठलाग करून पथकावर पाळत ठेवल्याचे तसेच महसूल पथक अवैध वाळू वाहतूकदारांवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे. महसूल गस्ती पथकात नेहमी- नेहेमी, तेच- तेच चेहरे राहात असल्यामुळे वाळू तस्करांवर कारवाई करताना संशय…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे अनुभव येत असले आणि त्याची भीती लसीकरण केंद्रांवरील गर्दीतून जाणवत असली तरी गेल्या वर्षभरात या आजाराची ‘दहशत’ मात्र पुष्कळशी कमी झाल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. त्यातून कोरोना मृतांच्या नातलगांचे वर्तन बदलले असून ते धोकादायक असले तरी माणुसकी परतत असल्याचीच अनुभूती देणारे आहे. अर्थात, हा बदल टिपलाय नेरी नाका स्मशानातील सहायकाने. मागच्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गाची साथ आली तेव्हा मृतांच्या नातलगांमध्ये या साथीची प्रचंड दहशत होती. त्यामुळे नेरी नाका स्मशानभूमीत कोरोना संसर्ग झालेले मृतदेह येत होते तेव्हा त्यांचे नातलग १०० मीटर दुरूनच अंत्यसंस्कार पाहात होते. क्वचित एखादा नातलग मृताचा चेहरा पाहण्याची इच्छा…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी शहरातील ग्रामिण रुग्णालय व ट्रामा कोविड डीसीसीएचमध्ये १४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. मात्र, बुधवारी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. पुरवठादारालाच एजन्सीकडून ऑक्सिजन मिळत नसल्याने स्थिती बिकट झाली. अशा बिकट स्थितीत भाजपचे तथा अध्यक्ष, ओमः सिध्दगुरू नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ नी.तू.पाटील यांनी स्वखर्चातून सात हजार रुपयांचा १० सिलेंडरचा पुरवठा करुन दिला. भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना रुग्णालयात मागील एक वर्षापासून ऑक्सिजन पुरवठादाराचे सव्वादोन लाख रुपये थकीत आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाने ठेकेदाराला एक दमडी देखील दिली नाही. पुरवठादारांवरही एजन्सीचे देणे वाढल्याने तसेच तीव्र टंचाई असल्याने डिस्टीब्युटरने बुधवारी ऑक्सिजन पुरवठा बंद केला. यामुळे ग्रामिण रुग्णालयातही सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत. बुधवारी सकाळी केवळ पाच सिलेंडर…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी १४ एप्रिल बुधवारी रमजान महिन्याचा पहिला रोजा सर्व भारतात करण्यात आला.महाराष्ट्र राज्यात असलेल्या कडक निर्बंधात उपवासाला सुरुवात झाली. नमाज व रोजा घरातूनच साजरे करा-आवाहन रमजानची नमाज व रोजा हे आपआपल्या घरातूनच साजरे करण्याबाबत शासनाचे परिपत्रक असल्याने त्याची अंमलबजावणी पुरेपूर करण्यात यावी असे आवाहनसुद्धा शहर ए काझी मुफ्ती अतिकउर रहेमान व ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक,सचिव फारूक शेख यांनी काल झालेल्या उलमा व ट्रस्टी च्या सभेत केले. रात्री फिरू नका आव्हान रात्री आठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत १४४ कलम असल्याने कोणीही नमाज घरी पठण केल्यानंतर बाहेर फिरू नये तसेच दिवसासुद्धा गर्दी करू नये असे आवाहन मुस्लिम कब्रस्तान…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा एक संसाररथ मार्गावर आणला आहे. समुपदेशाने घटस्फोटाचा विचार रद्द करुन विभक्त होण्याच्या मार्गावरील दांम्पत्य यामुळे एकत्र आले. आसोदे येथील भूषण चिरमाडे व गोजेरे येथील कीर्ती उर्फ भारती यांचा २०१८ मधे विवाह झाला. विवाहानंतर एक वर्ष सर्वकाही सुरळीत होते. पण हळूहळू त्यांच्यात वादविवाद सुरू झाले. याच दरम्यान दोघांच्या संसारात एक फुलही उमलले. लहानसहान भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात झाल्याने, कीर्ती बाळाला घेऊन माहेरी गोजोरे येथे आली. काही दिवसांनी भुसावळ येथील भोरपंचायत कार्यालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. परंतू समुपदेशन कक्षात कीर्ती व भूषण या दोघांचे आधी वैयक्तिक व नंतर एकत्र समुपदेशन करण्यात आले.…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी शिवसेना नगरसेविका संध्या नरेश महाजन यांनी चोपडा नगपरिषद सन २०१९-२० वर्षासाठी शहरातील हद्दीत वृक्षारोपण कंत्राटातील केवळ १२ लक्षाच्या रोपांची मागणी असताना व ३२०० रोपे मोफत मिळाली असताना २१.५० लक्ष एवढा प्रचंड खर्च कसा केला. त्याबाबत माहिती मागितली असता गैरव्यवहार निदर्शनास आला होता. त्यासंबंधीची तक्रार करण्यात आली होती. ज्याची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली असून चोपडा नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातील वृक्षारोपण प्रकरणात घोटाळा सिध्द झाला आहे. दरम्यान, चौकशी समितीने विशेष करुन समिती सदस्य नितीन सुतार न.प.यावल लेखापाल यांच्या पक्षपाती धोरणामुळे आपल्या अहवालात संबंधित अधिकार्‍यांना पाठिशी घालण्याचा पुरेपुर प्रयत्न केला गेला व चार महिन्यानंतर महत्वाच्या मुद्यांना बगल देत प्रत्यक्षात १ हजार…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील लिंपस क्लब परिसरातील रिक्षा स्टॉपजवळच्या मोकळ्या जागेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून त्याचा खून झाला असावा अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.पोलीसांनीदेखील त्या दिशेने तपास सुरु केल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ शहरातील लिम्पस क्लब रिक्षा स्टॉप जवळ मोकळ्या जागेत रात्री उशिरा एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाच्या चेहर्‍याला दगडाने ठेचल्याचे दिसून येत असल्यामुळे त्याचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांना मिळाली आहे.मयताच्या उजव्या हातावर ‘एस’ असे गोंदलेले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चाडंक, शहर पोलीस स्टेशनचे बाबासाहेब ठोंबे, पोकॉ संकेत…

Read More

यावल ः प्रतिनिधी १३ रोजी गुढीपाडवा तसेच दि.१४ बुधवार रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आणि २ दिवस शासकीय सुट्टी असल्याने यावल परिसरात व तालुक्यात वाळू तस्करांना मोठी सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. काल १२ रोजी संध्याकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान यावल नगरपालिका,यावल न्यायालय व ऐतिहासिक किल्ला जवळील नदीपात्रातून वाळू तस्कर यांचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर वाहतूक करीत असताना यावलकरांनी बघितले. दोन दिवस शासकीय सुट्ट्या आल्याने तसेच गुढीपाडव्याचे शुभमुहूर्त वाळू तस्करांना एक मोठी सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.यावल शहरात ठिकठिकाणी नवीन घरांचे,इमारतीचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.फैजपुर रोडवर हॉटेल भाग्यश्री समोर तडवी कॉलनी रोडवर नवीन यावल तहसील कार्यालयापासून…

Read More