फैजपूर : प्रतिनिधी यावर्षी कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन हरिद्वार येथील कुंभमेळा शासन नियमाचे पालन करून यशस्वीपणे पार पडल्याचे सतपंथ संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. नुकतेच त्यांचे फैजपूर येथे आगमन झाले. फैजपूर येथील सतपंथ मंदिरात त्यांच्या मातोश्री यांनी औक्षण करून स्वागत केले. तत्पूर्वी भुसावळ येथे रेल्वे स्टेशनवर आ.संजय सावकारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान, फैजपूर येथे आगमन होताच त्यांनी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांच्यासह गेलेल्या सहकार्यांची कोरोना चाचणी केली. ती चाचणी निगेटिव आली आहे. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले की, हरिद्वार येथील स्वामी जगन्नाथ धाम…
Author: saimat team
यावल ः ता.प्रतिनिधी भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने कहर केला असून दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चाकं गाठले आहेत. भारतात गेल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गुरुवारी २४ तासांमध्ये तब्बल ३ लाख ७९ हजार २५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी असून ३६४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ इतकी झाली आहे. गेल्या…
धानोरा, ता. चोपडा ः प्रशांत चौधरी धानोरा येथे १३ हजार लोकवस्तीच्या गावात एप्रिल महिन्यात तब्बल ७४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत सर्वच स्तर अपयशी ठरले आहे. केंद्रात अजूनही पिण्याच्या पाणीची सोय नसून वॉटर कुलर अजुनही नादुरुस्त आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी भेटी देऊनही सुधारणा नसल्याने रुग्णांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. गेल्या वर्षी गावाने चांगला लढा देत कोरोना संक्रमण चांगले रोखून धरले होते. कोरोनाच्या दुसर्या लाटेत धानोरासह परिसरात गेल्या २६ दिवसात १०२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात तब्बल १६ जणांना आपला जीव…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अकरा लाख अकरा हजार १११ रुपयांची धनादेशाद्वारे मदत करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मंगळवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई, विजयसिंह गवळी, प्रशांत विरकर, भाऊसाहेब महाले, एस. आर. पाटील, एन. एस. पाटील, हेमंत नारखेडे यांनी अकरा लाख अकरा हजार १११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला. या वेळी ग. स.चे कर्मचारी लेखापाल निंबा सोनवणे, प्रशासन अधिकारी वाल्मीक पाटील, उपलेखापाल श्यामकांत सोनवणे, उपशाखाधिकारी अमोल जोशी आदी उपस्थित होते.
जळगाव ः प्रतिनिधी शहरातील लसीकरण केंद्रांवर गैरसोयीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रत्येक केंद्रावर लस उपलब्धतेसंदर्भात फलक लावावा. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सावलीसाठी व्यवस्था करावी अशा सूचना करत नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी समन्वयकाची नियुक्ती करण्याच्या सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या. या वेळी नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता अधिकार्यांची चांगलीच कानउघडणी केली. मनपा कोविड लसीकरण केंद्रांचा आढावा घेण्यासाठी महापौरांनी बुधवारी दुपारी वैद्यकीय अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी आदी उपस्थित होते. लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता उपनगरांमध्ये व्यवस्था होणे गरजेचे आहे. पिंप्राळा, जुने जळगाव, हरीविठ्ठल नगरसह इतर परिसरात लसीकरण केंद्र सुरू…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई आहे. यात सर्वाधिक त्रास हा रुग्णाच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. त्यातच कोविड रुग्णालयात नातेवाईकांना प्रवेश नसल्याने त्यांना दिवसरात्र रस्त्यावर काढावी लागत आहे. या गंभीर परिस्थिती रुग्णांच्या नातेवाईकांना मदत व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ स्टारतर्फे तीन दिवस पुरेल इतका फराळ व पाण्याचे वाटप करण्यात आले. शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ग्रामीण भागातील बहुतांश गरीब रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईक बाहेरच थांबून आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी सुका फराळासोबत पाण्याच्या बॉटल देखील क्लबतर्फे देण्यात…
यावल ः प्रतिनिधी यावल तालुक्यात अवैध गौण खनिज वाळू वाहतूकदारांनी विनापरवाना वाळू वाहतुकीची सर्रास तस्करी सुरू केल्याने गेल्या आठ दिवसांपासून यावल तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मंडळ अधिकार्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बेधडक कारवाई करून अवैध वाळू वाहतूक करीत असताना २ ट्रॅक्टर आणि २ डम्पर पकडून पुढील कार्यवाही सुरू केल्याने वाळू वाहतूक दारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अवैध वाळू वाहतूकदारांना महसूलकडून कायदेशीर लस टोचण्यात आल्याने अवैध वाळू वाहतूकदारांचे मानसिक आर्थिक आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. तसेच यावल पोलीस दुसरा कायदेशीर डोस अवैध वाळू वाहतूक दारांना केव्हा देणार? याकडे सुद्धा यावल तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधून आहे. किनगाव मंडळ अधिकारी एस.टी.जगताप…
जळगाव ः प्रतिनिधी रविवारी मध्यरात्रीनंतर मृत झालेल्या ११ वर्षीय मुलीचा मृतदेह आज सकाळी कबरीतून काढून शवविच्छेदन करण्यात आले.या घटनेने पिंप्राळा परिसरात एकच खळबळ उडाली असून हा चर्चेचा विषय ठरला आहे.ही मुलगी अपशकुनी आहे या समजातून तिचा सातत्याने छळ करणार्या सुशिक्षित बापानेच तिला मारले असावे, असा संशय त्या मुलीच्या मामाने एका अर्जाद्वारे पोलिसांकडे व्यक्त केल्याने पोलिसांनी हे पाऊल उचलले असून शवविच्छेदन अहवालानंतर कारवाईबाबत पोलिस निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे. पिंप्राळातील हुडको वसाहतीत तीन महिन्यांपूर्वीच राहायला आलेल्या जावेद अख्तर शेख या केमिस्टचे काम करणार्या तरुणाची ही मुलगी आहे. तिचा एक काका डॉक्टर तर दुसरा वकील आहे. तिच्या जन्मानंतर काही दिवसांत जावेदच्या आईचे…
जळगाव : प्रतिनिधी अचल संपत्तीबाबत वारस नोंद करतांना पाळधी बु॥ येथील तलाठ्याने कुठलीही चौकशी न करता आलेल्या अर्जावर एकाच दिवसात पोलीस पाटलाच्या दाखल्यावरुन वारस नोंद लावत स्वत: सर्कल, तहसिलदार व न्यायाधीशाचीही भूमिका बजावत वारस नोंद लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पाळधी बु॥ तलाठ्यांच्या अनागोंदी कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असून या महाशयांना कुणाचा वरदहस्त आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान, सदर प्रकाराबाबत वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करावी असा सूर सुज्ञ नागरिकांमधून येत आहे. याबाबत समजलेले हकीकत अशी की, पाळधी बु॥ येथील रहिवासी राजेंद्र प्रल्हाद नन्नवरे यांचा ८ फेबु्रवारी २०२१ रोजी मुंबई येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात…
यावल ः ता.प्रतिनिधी यावल व रावेर तालुक्यात गेल्या एक ते दोन महिन्यापासून काही खाजगी फायनान्स कंपन्यांच्या एजंटांनी लोनचा ईएमआय हप्ता भरण्याचा तगादा लावल्याने ग्रामीण भागातील महिलांचे, नागरिकांचे, लहान व्ययसायिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जसे काही त्यांच्या आनंददायी जीवनावर विरजण पडले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावल व रावेर तालुक्याचे शासन प्रशासनाकडून कोरोना आटोक्यात आणणेसाठी खुप प्रयत्न सुरु आहेत मात्र लॉकडाऊन काळात अनेकांना लोनचे हप्ते भरणे मुश्किल झाले आहे.लोनचा १ ईएमआय मासिक हप्त्याचा एक दिवस चुकला तर कर्जधारकाकडून ५०० ते २००० हजार रुपयापर्यंत पेनल्टी/व्याज/ किंवा दंड वसूल करण्यात येत असल्याने खाजगी फायनान्स कंपन्यांकडून लोन घेणारे वैतागले आहेत. या अनधिकृत…