जळगाव: विशेष प्रतिनिधी सद्य स्थितीत कोरोनाचा भयंकर प्रकोप सुरू आहे .जळगाव जिल्ह्याचीच स्थिती पाहता रोजची रुग्ण संख्या हजाराच्या पुढेच असून मृत्यू दर सुद्धा वाढलेला दिसून येतो .ह्या कोरोना महामारी ची दुसरी लाट पहिल्या पेक्षा जास्तच भयंकर असल्याचे तज्ञांचे म्हणणे असून ते रास्तच असल्याचे आपण पहात आहोत .या आजाराबद्दल अनेक रुग्णांच्या मनात विनाकारण धास्ती असते आणि त्यामुळे ते घाबरलेले असतात ,‘‘आपणास कोरोना झाला ,आता आपले काही खरे नाही‘‘ अशीच भीती काहींच्या मनात घर करते व त्यातूनच अनर्थ घडल्याची उदाहरणे आहेत. वास्तवात कोरोना आपल्या घरात कसा आला ? या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे .कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्याचा संसर्ग आपणच ओढवून…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी कोरोनाच्या कहराने रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी कृत्रिम प्राणवायुची प्रचंड मागणी वाढू लागली आहे. या तुलनेत पुरवठा होत नाही तसेच ऑक्सिजन सिलेंडरचे दर चार ते पाच पट वाढल्याने खाजगी कोविड सेंटर अडचणीत आल्याचे चित्र उभे राहिले आहे. असे झाल्यास हे खाजगी कोविड सेंटर बंद होवून कोरोना विरुध्दच्या लढाईला अंतिम घटीका मोजाव्या लागतील. या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून ज्या पध्दतीने कोविड रुग्णांच्या उपचाराचे दर ठरविले गेले आहे, त्याच पध्दतीने ऑक्सिजन पुरवठा करणार्या कंपन्यांनाही दरपत्रक ठरविणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने कहर केला आहे. यावेळेस कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात चार…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलचा रक्तदान शिबिराचा उपक्रम हा स्तुत्य असून संकटकाळी काम करतो तोच खरा कार्यकर्ता असतो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले. शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी आघाडीच्यावतीने आयोजीत रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी खडसे बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील तर प्रमुख म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनिष जैन उपस्थित होते. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ओबीसी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या सूचनेनुसार जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे…
जळगाव ः प्रतिनिधी सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कुसुंबा येथील तरुणाच्या विवाहसप्रसंगी वधू-वरांसह २१ जणांनी रक्तदान करुन आदर्श विवाह घडवून आणला. औरंगाबादचे समाजसेवक सुमित पंडित यांच्या प्रस्तावातून चेतन व स्वाती यांचा विवाह लोणी (ता. जामनेर) येथील श्री गजानन महाराज मंगल कार्यालयात झाला. या विवाह सोहळा प्रसंगी रक्तदान शिबिर घेण्यात आले. विवाहबद्ध होण्या आधी अगोदर वधू-वरांनी रक्तदान केले. यानंतर वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या वरिष्ठ मंडळी, तरूण समाज बांधव असे एकूण २१ जणांनी रक्तदान केले. माणुसकी ग्रुपचे सदस्य यांनी सहभाग नोंदवला. रक्तसंकलन कामी माधवराव गोळवलकर रक्तपेढी जळगाव यांनी सहकार्य केले. माणुसकी ग्रुपचे जिल्हाअध्यक्ष गजानन क्षीरसागर, चंद्रकांत गीते, योगेश वाणी, अनिल पाटील,…
धरणगाव ः जिल्हा प्रतिनिधी कोरोना चे दुसर्या लाटीचा प्रतिकार करण्यासाठी सर्वच स्तरावरून जोरदार प्रयत्न सुरू आहेत कोरोना युद्धाच्या लढाईत शासन, प्रशासन, राजकीय, सामाजिक संघटना व समाजसेवक मंडळी अहोरात्र लढून संघर्ष करीत असताना धरणगाव शहर व तालुक्यातील माध्यमिक शिक्षक संघटनेचे योगदान असावे या भावनेतून शिक्षक बांधवांनी आज धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला आठ जंबो ऑक्सीजन सिलेंडर किट सहित भेट देण्यात आले शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्यांनी केलेल्या आवाहनाला तालुक्यातील शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला साधारण दीड लाख रुपये शिक्षक वर्गणी जमा झाली. यातून आठ जंबो ऑक्सिजन सिलेंडर घेण्यात आले ऑक्सीजन अभावी रुग्ण दगावायला नको यासाठी शिक्षकांनी हा लहानसा प्रयत्न केलेला आहे. सर्व सिलेंडर आज ग्रामीण रुग्णालयात…
यावल ः प्रतिनिधी जिल्ह्यात मिनी मंत्रालय समजल्या जाणार्या जळगाव जिल्हा परिषद सदस्य संघटनेच्या अध्यक्षपदी यावल तालुक्यातील कॉंग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांची निवड राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली. याबाबत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे पाटील व मार्गदर्शक राम जगदाळे यांच्याकडील नियुक्ती पत्र प्रभाकर सोनवणे यांना प्राप्त झाले आहे. जि.प.सदस्य व खेड्यापाड्यातील व अतिदुर्गम भागातील नागरिकांवर होणार्या अन्यायाविरुध्द वाचा फोडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांच्या संघटनेची आवश्यकता असून त्याची जाणीव ठेवून जि.प.सदस्यांची संघटना स्थापन करण्यात आली आहे. शासनाकडून येणार्या निधीचा जिल्हा परिषदेत समान वाटप होऊन कुठल्याही सदस्यांवर अन्याय होणार नाही व शासकीय कामात दैनंदीन येणार्या अडीअडचणी…
जळगाव ः प्रतिनिधी शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना बघता जळगाव पोलिसांनी रस्त्यावर उतरत वाहनांची कसून चौकशी सुरू केली आहे वाहनाच्या कागदपत्रांची पूर्तता आहे की नाही ? यासंदर्भात बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी आपल्या प्रभागातील भागांमध्ये जाऊन वाहनांची कसून चौकशी केली आहे. यामध्ये वाहनांची कागदांची पूर्तता आहे की नाही. नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंडे यांनी दिले आहेत. आज जळगाव शहरातील कांचननगर परिसर,…
सोयगाव ः तालूका प्रतिनिधी तालुक्यातील सावळदबारा येथे श्री स्वामी चक्ररधर स्वामी मंदीर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी पं.स.कार्यालयाच्या मैदानात करण्यात आलेले आमरण उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मधुकर ओंकार गावडे, विनोद ओंकार गावडे, सुधाकर ओंकार गावडे, शे.अमन शे.बिसमिल्ला यांनी तत्कालीन ग्रामसेवकांना हातचे करुन ग्रामपंचायत मूळ रजिष्टरमध्ये खाडाखोड करुन खोटे व बोगस नमुना नंबर ८ अ उतारा करवून घेतला. रहदारीच्या हमरस्त्यावरच अतिक्रमण केले.त्यातच आपआपल्या घरातील साडपाण्याची चारीही काढली. यामुळे परिसरात दुर्गंधीमुळे पसरत असून रहिवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याने जाताना तारेवरची कसरत करावी लागते. हा सार्ववजनिक वापराचा रस्ता पुर्वीप्रमाणे अतिक्रमण मोहीम राबवून ग्रा.प. सावळदबारा व पं.स.सोयगाव…
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे सध्या रक्त टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शासनाला मदत करण्यासाठी जामनेर तालुक्यातील एकुलती येथे महाविकास आघाडी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, गोदावरी फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले.त्यात ५५ दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन जामनेर तालुकाध्यक्ष एस.टी.पाटील, प्रदेश सरचिटणीस मुलचंद नाईक, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील, संजय पाटील,उपसरपंच पंकज पाटील, माधव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात ५५ दात्यांनी रक्तदान केले. या वेळी रामधन पाटील, मुन्ना महाजन, संजय सोनवणे, रामकृष्ण पाटील, योगेश पाटील उपस्थित होते. शिबिरात पंकज पाटील, पंकज कोळी, शशांक पाटील, ज्येष्ठ कार्यकर्त इक्बाल पटेल, प्रदीप पाटील, विजय सोनवणे, पंकज लोनिया, पंकज राऊत, शुभम पाटील, किशन पाटील,…
जळगाव ः प्रतिनिधी जामनेर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलासंदर्भात ग्रामविकास विभागाने गठीत केलेली चौकशी समिती सध्या जळगावात आली आहे. या प्रकरणातील मुळ तक्रारदार ऍड. विजय भास्कर पाटील यांनी काल जिल्हा परिषदेत या समितीची भेट घेतली. तक्रारीच्या अनुशंगाने पुरक माहितीसाठी त्यांनी समितीच्या अध्यक्षांना निवेदन देवून चर्चा केली. चौकशी करण्यासाठी ग्रामविकास विभागाने गठीत केलेली समिती दोन दिवसांच्या जळगाव दौर्यावर आलेली आहे. शुक्रवारी ऍड. पाटील यांनी समितीतील अधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच तक्रारीतील मुळ जागेची पाहणी करण्यासाठी जामनेर येथे जाण्याबाबत त्यांनी चौकशी समितीचे अध्यक्ष मनिष सांगळे यांच्याशी चर्चा केली. समितीचे सदस्य सहाय्यक आयुक्त राजन पाटील, सहाय्यक लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे,…