Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या स्नातकांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात उत्तम यश संपादन करण्याचा प्रयत्न जरूर करावा, मात्र त्या आधी उत्तम वर्तन असलेला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा किंबहूना उत्तम मनुष्यत्व हिच प्राथमिकता असायला हवी असा सल्ला महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात स्नातकांना उद्देशून दिला. निरक्षर असून ही बहिणाबाईंनी जगण्याचे मोठे तत्वज्ञान जगाला सांगीतले असे ते म्हणाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा एकोणतिसावा दीक्षांत समारंभ आज सोमवार, दि.३ मे रोजी दुरदृश्य प्रणाली (ऑनलाईन) द्वारे पार पडला. यावेळी कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यक्षस्थानावरून दीक्षांत भाषण केले. उच्च…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या २८ व्या वर्धापन दिनी रक्तदान शिबीर, लसीकरण मोहीम, नवीन ऑक्सिजन सिस्टीम्सचे लोकार्पण आणि मातोश्री आनंदाश्रमात फळे व किराणा साहित्याचे वितरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे रोटरी वेस्ट तर्फे कोरोना काळातील चौथे रक्तदान शिबीर रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. त्यात ४० पेक्षा अधिक व्यक्तींनी रक्तदान करुन सहभाग घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहकार्याने लसीकरण मोहीम ही राबविण्यात आली. रोटरी वेस्ट तर्फे मोहाडी येथील शासकीय महिला रुग्णालयात ५० बेडसाठी ऑक्सिजन पाईप लाईन उभारण्यात आली असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यासाठी रोटरी वेस्ट परिवारातील सौ.चेतना सतरा…

Read More

जळगाव : प्रतिनीधी तालुक्यातील तरसोद येथिल जि.प.शाळेचे उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे यांची महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखेच्या कार्यकारीणीच्या सदस्यपदी पंचवार्षिक सन २०२१ ते २०२६ कालावधीसाठी निवड झाली आहे. सदरहू निवड मसाप जळगाव शाखेचे अध्यक्ष प्रा.ए.पी.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शाखेच्या दि.२६ एप्रिल २०२१ रोजी आभासी पद्धतीने झालेल्या सर्व साधारण सभेत लुल्हेंची सर्वानुमते निवड घोषित करण्यात आली.लुल्हे पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आजीव सभासद आहेत. लुल्हे यांच्या कविता वाड़मयीन नियतकालीकात प्रकाशित होत असतात.त्यांच्या कविता,प्रासंगिक शैक्षणिक लेख,समिक्षण,विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती दर्जेदार वृत्तपत्रातून व दिवाळी अंकातून प्रकाशित होत असतात.कै.कविवर्य नीळकंठ महाजन स्मृती प्रतिष्ठानचे लुल्हे संस्थापक माजी अध्यक्ष आहेत.त्यांनी नवोदित कवींना संस्थेतर्फे राज्यस्तरीय ५००० रुपयांचे पुरस्कार स्मृतिचिन्ह…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतीष कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसिलदार सुरेश थोरात, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. तर पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीताची धुन वाजविली. लसीकरणासाठी तरूणांनी…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी केंद्र आणि राज्यात सरकार असल्याने शंभर कोटी रूपये आणू, अशा वल्गना करीत भाजपच्या नेत्यांनी जळगाव शहरासाठी काहीही केले नाही. निधीसाठी शासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून दरवर्षी ३० कोटी रूपये दिले असते तर, तीन वर्षात १०० कोटी रूपये खर्च होवू शकले असते. परंतु, त्यांनी काहीही केले नाही. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आपण तातडीने ६० कोटींचा निधी मंजुर केला असून अवघ्या पंधरा दिवसात ही सर्व कामे प्रत्यक्ष सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मनपात भाजपची सत्ता आली तेव्हा केंद्र व राज्यात भाजपचीच सत्ता होती. स्थानिक पालकमंत्री आणि जळगाव महापालिकेची जबाबदारी घेणारे माजी…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेंदुर्णी येथील मूळ रहिवाशी व पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ . सागर गरुड आणि मित्र परीवाराने कोरोना रुग्णांना दोन्ही वेळेचा जेवणाचा मोफत डबा थेट रुग्णालयांमध्ये पोहचविण्याच्या सेवाकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील भुमीपुत्र असलेले डॉ . सागर गरुड यांचे पाचोरा शहरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल असुन तेथे कोरोना रुग्णांवर उपचार करून ते सेवा देत आहेत. तसेच शेंदुर्णी येथे सुद्धा ते आरोग्य सेवा देत असतात, त्यांची आरोग्यसेवा संपुर्ण जिल्ह्याला परीचीत असुन गरीब गरजु रुग्णांसाठी ते देवदुत आहे . जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसुन येत आहे. शहरातील उपजिल्हा…

Read More

यावल ः ता.प्रतिनिधी शहरातील तिरुपतीनगर मधील महिला गार्डनचे संरक्षण भिंतीचे काम दक्षिण बाजुने अपूर्ण ठेवल्याने ठेकेदाराने संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण का ठेवले? बांधकामास कोणी विरोध केला आहे का? तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून ठेकेदाराने किंवा नगरपालिका मुख्याधिकारी, नगरसेवकानी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई का केली नाही? इत्यादी अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात असून महिला उद्यानाच्या संरक्षण भिंतीचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातील तिरुपतीनगर परिसरातील खुल्या जागेवर, ओपन स्पेस जागेवर यावल नगरपरिषदेमार्फत महिलांसाठी उद्यानाचे बांधकाम करण्यात येत आहे. या खुल्या जागेला चारही बाजुने संरक्षण भिंत बांधण्यात आली. उद्यानासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवलेले असताना सुद्धा दक्षिणेकडील रस्त्यावर एक…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने एप्रिल महिन्यात लॉक डाऊन ची घोषणा केल्यामुळे संघटनेची बैठका होऊ शकली नव्हती, त्यामुळे शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करत भोई समाज सेनेची ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले . सदर ऑनलाइन बैठक नुकतीच नितीन भोई यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली . सदर बैठक नियोजना नुसार झूम ऍप च्या साहाय्याने घेण्यात आली . बैठकीत सामाजिक विषयावर ऑनलाइनच्या माध्यमातून समाजहिताचे तसेच शासनाच्या धोरणांच्या पार्श्‍वभूमीवर जास्तीत जास्त जनतेची हिताची असल्याचे कामे समाजाच्या माध्यमातून कसे करण्यात येईल याचे मंथन करण्यात आले. यासाठी सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचेही ऑनलाइन बैठकीत निष्पन्न झाले. यावेळी शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या निर्णयात एक मे पासून अठरा…

Read More

जळगाव : जिल्हा प्रतिनीधी धरणगाव शहरातील भाजपचे जेष्ठ पदाधिकारी अँड.वसंतराव भोलाणे व माजी नगरसेविका चंद्रकलाताई भोलाने यांचे चिरंजीव डॉ.शुभम भोलाणे यांनी एम.बी.बी.एस च्या अंतिम वर्षात घवघवीत यश प्राप्त केले. त्या निमीत्त त्यांचा भाजपातर्फे सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी गटनेते कैलास माळी सर आपल्या मनोगतात म्हटले की डॉ. शुभम भोलाने यांची परीक्षा चालू होती तरी सुद्धा त्यांनी वेळोवेळी गोदावरी हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट करण्यासाठी मदत केली तसेच जे कोणी धरणगाव तालुक्यातील पेशंट गोदावरी हॉस्पिटलमध्ये होते त्यांची ते विचारपूस करून काळजी घेत असत. डॉ.शैलेश सूर्यवंशी हे म्हणाले की, डॉ.शुभम यांनी पुढील एम.डी चे शिक्षण घेऊन धरणगावातच सेवा द्यावी कारण त्यांना राजकीय व सामाजिक वारसा…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी ३० गरजू कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आला. आरोग्य विभाग प्रमुख भानुदास येवलेकर आणि टीम यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून नेरी नाका येथील पांचाळ वस्तीत राहणार्‍या नागरिकांना लॉकडाऊन दरम्यान उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत्र उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक उपासमार होत आहे. अशा कुटुंबांना मदत करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला तांदूळ, चना डाळ, तुरडाळ, तेल, आटा, साखर, चहा पावडर, मीठ, हळद, मिरची पावडर या वस्तू देण्यात आल्या. गोळवलकर रक्तपेढीचे संचालक विवेक पलोड यांच्या आर्थिक सहकार्यातून शिधा वाटप करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा पलोड, भानुदास येवलेकर, सागर येवले, कुणाल शुक्ला, हर्षल दुसाने उपस्थित होते.

Read More