Author: saimat team

जळगाव ः प्रतिनिधी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शहरातील निसर्गमित्र परिवारातर्फे राज्यव्यापी ऑनलाइन ‘हरित वैज्ञानिक दृष्टीकोन चाचणी’ घेण्यात आली. या चाचणीत ३१६ नागरिक सहभागी झाले. त्यात महाराष्ट्रातील ३०४ अन्य पाच राज्यातील ११ व बहरीन येथील १ असे एकूण ३१६ निसर्गप्रेमी नागरिक सहभागी झाले. त्यात चहार्डी, धुळे, पुणे, नाशिक, मुंबई,कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, गडचिरोलीसह विविध जिल्ह्यातील निसर्गप्रेमींचा समावेश होता. पर्यावपण चळवळीसंबधी ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक १९६२ साली प्रकाशित झाले.या घटनेतून प्रसार माध्यमांची ताकद व त्यांचे महत्व व माध्यम स्वातंत्र्याची गरज अधोरेखित होते. हे लक्षात घेऊन या विषयावर आधारित दहा प्रश्‍नांची ‘हरित वैज्ञानिक दृष्टीकोन’ ही चाचणी घेतली.चाचणीतून दिलेल्या उत्तरातून लोकांची भूमिका स्पष्ट झाली. यामध्ये…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी सुरक्षित राहू, पुस्तकं वाचू’ उपक्रमाद्वारे जागतिक पुस्तक दिन साजरा केला.विद्यार्थ्यांना जीवनातील पुस्तक वाचनाचे महत्व समजून सांगण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.ही कोरोना काळाची परिस्थिती बघता विद्यार्थ्यांनी घरी सुरक्षित राहावे व त्यांचा वेळ हा पुस्तक वाचण्यात घालवावा हे उद्दिष्ट ठेवून हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना जागतिक पुस्तकदिनानिमित्त माहिती मिळावी यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्हाट्स ऍप ग्रुपला जागतिक पुस्तकदिनाविषयी माहिती पाठवून त्यांना ती माहिती वाचन करायला तसेच ती माहिती वहीत लिहून घ्यायला सांगितली व आजच्या दिनी कोणत्याही एका पुस्तकाचे वाचन करायला सांगितले.याद्वारे ’पुस्तक वाचू, सुरक्षित राहू’ हा संदेश देण्यात आला. या उपक्रमाला…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी कोरोना महामारीमुळे नागरिक सर्वत्र त्रस्त आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवत आहे. अशावेळी रुग्णांना काहीसा दिलासा देण्यासाठी म्हणून रोटरी क्लब चोपडाने ३ ऑक्सिजन कॉन्ेसंट्रेटर मशीन २३ एप्रिल २०२१ पासून तत्काळ उपलब्ध करून दिले आहे. चोपडा शहरातील रुग्णांसाठी अल्पदरात भाडे घेऊन हे सामान्य नागरिकांना घरी मिळू शकणार आहे.जे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत, मात्र त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार काही काळ ऑक्सिजन लागण्याची शक्यता असते. अशा रुग्णांना हे कॉन्संट्रेटर ऑक्सिजन मशीन मिळू शकणार आहे. यावेळी प्रांत शिंदे व तहसीलदार अनिल गावित यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी रोटरी अध्यक्ष नितिन अहिरराव, सचिव रुपेश पाटील, पुनम गुजराथी, डॉ.ललित चौधरी, एम.डब्लू.पाटील,अरुण…

Read More

यावल ः प्रतिनिधी यावल तहसील कार्यालयात काल खासदार रक्षाताई खडसे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात कोविड संदर्भात महत्त्वाची चर्चासुद्धा झाली.भाजपतर्फे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात रक्तदान शिबिरात ३५ जणांनी रक्तदान केले. राज्यातील कोवीड-१९च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने यावल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दि.२३ रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले.जळगाव येथील केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या डॉक्टरांनी या शिबिरासाठी उपस्थित राहून रक्तदान शिबिर करून घेतले त्यात३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदात्यांना गौरव प्रमाणपत्र याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. शिबिराचे उद्घाटन रावेर लोकसभा मतदार संघाच्या…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट-३०३ द्वारा जळगाव शहरातील निराधार व गरीब मुलीच्या कन्यादान व लग्नांची जवाबदारी नुकतीच पार पडली. यात क्लबद्वारा दोन निराधार आणि गरीब मुलींच्या लग्नासाठी लग्नात लागणारे सर्व साहित्य म्हणजे नवरदेव, नवरी मुलीसाठी सोन्याच्या अंगठ्या, बांगड्या, सोन्याचांदीचे दागिने, मणी मंगळसूत्र, पायल, बेल, वर-वधूसाठी लग्नाचे कपडे, साडी, त्यात प्रमाणे संसारासाठी लागणारे सर्व साहीत्य म्हणजे भांडे, मिक्सर, कुकर सर्व संसार आणि ७ हजार रुपये रोख क्लबच्या वतीने देण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा चेअरमन मीनल लाठी, अध्यक्षा प्रीती दोशी, सेक्रेटरी नीता परमार, श्रीमती स्मिता पाटील, पास्ट प्रेसीडेंट सीमा जाखेटे, वंदना काबरा उपस्थित होत्या. कोरोना रुग्णांसाठी योगदान इनरव्हील क्लब…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील वरणगाव रोडवरील नगरपालीकेच्या खुला भुखंड सि.स.नं.२३३१/२ या जागेवरील बेकायदेशीर बांधकाम पाडून सदर जागा नगरपालिकेने ताब्यात घ्यावी यासाठी शहरातील एका सुज्ञ नागरीकाने मुख्याधिकार्‍यांकडे निवेदन सादर केले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी तसेच विभागीय आयुक्तांनी बेकायदेशीर ठराव असल्याचे आदेश देऊनही, तब्बल तीन महिन्याचा अवधी होवूनही त्यांच्या अर्जावर साधी दखलही घेतली न गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळ नगरपालिका हद्दीतील नगरपालिकेच्या मालकीचा वरणगाव रोडवरील सि.स.नं.२३३१/२ ही ४०५ चौरस मीटर असा खुला भुखंड होता. सदर भुखंडातील ३४ बाय ३४ फुटाचा भुखंड अफसरखान अस्मतखान यांच्या मागणीवरुन दि.३१ मे १९९६ रोजी तत्कालीन सत्ताधार्‍यांनी नगरपरिषदेच्या सभेत ऐनवेळचा विषय मांडून ठराव क्र.१८…

Read More

जळगाव ः विशेष प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी लाभदायक ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार नसल्याचे व ते पूर्णपणे जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत असले तरीही या औषधीचा सर्रासपणे काळाबाजार सुरू असल्याचे चित्र आहे.गरजवंत लोक हे इंजेक्शन ३ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत खरेदी करीत असून असा गैरफायदा घेण्याचे प्रकार सुरूच आहेत. चोपडा येथील एका कोरोना बाधित रुग्णासाठी डॉक्टरांनी रेमडेसिव्हिर या इंजेक्शन ची आवश्यकता सांगितली तेव्हा रुग्णाच्या मुलांनी त्यासाठी फिराफिर केली परंतु ते कुठेच उप -लब्ध नव्हते,शेवटी वकील असलेल्या मुलाने ते इंजेक्शन कसेतरी ३ हजार रुपयांना मिळविले आपल्या वडिलांना डोस दिले .ही वस्तुस्थिती असून प्रत्यक्ष त्या वकिलानेच साईमत प्रतिनिधी जवळ कथन केली.यावरून शासन-प्रशासन…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व शासकिय यंत्रणा प्रयत्न करीत असतांना, मागील दोन ते तीन महिन्यापासून जळगाव महानगरपालिकेचे सफाई व फवारणी कर्मचारी दिसेनासे झालेले आहेत. महानगरपालिका आरोग्याधिकारी,मुकादम यांना तक्रार करून सुद्धा काही उपयोग होत नाहीये. महानगरपालिका येथे सद्यस्थितीमध्ये ३४ फवारणी कर्मचारी आहेत.काही कर्मचारी कोविंड सेंटर व शासकीय कार्यालय येथे सेवा देत असतीलही परंतु उर्वरित कर्मचारी हे जळगाव शहरामध्ये फवारणी व साफसफाई चे काम करण्यासाठी वार्डात येत नाहीत. त्यांच्याकडून योग्य रीतीने काम करून घ्यायची जबाबदारी मनपा अधिकार्‍यांची व सत्ताधारी महापौर-उपमहापौर व पदाधिकार्‍यांची आहे. प्रत्येक वार्डात फवारणी केली तर डेंग्यु , मलेरिया, टायफाईडसारखे आजार व इतर आजारांपासून जळगाव…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी जळगावच्या माजी नगरसेविका शोभा बारी यांचे पुतणे बबलू बारी व सामाजिक कार्यकर्ते असलेला पुत्र अतुल बारी यांचे शिरसोली हे आत्याचे गाव. त्यांच्या आत्यांचे पती दशरथ बाबुराव अस्वार हे कोरोनाबाधित होते.जळगाव येथे नेण्यासाठी त्यांना १५ किलोमीटर अंतरासाठी पाच हजार रुपये भाडे एका रुग्णवाहिका चालकाकडून सांगण्यात आले होते. हा प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन बारी परिवाराने गावासाठी रुग्णवाहिका लोकार्पण केली. इंधनाची रक्कम देऊन या रुग्णवाहिकेचा कुणीही लाभ घेऊ शकतो. रुग्णवाहिका लोकार्पण माजी सैनिक उत्तम बारी यांच्या हस्ते करण्यात आलेे.सरपंच प्रदीप पाटील (शिरसोली प्र.बो.), सरपंच हिलाल भील (शिरसोली प्र.न.), उपसरपंच श्रावण ताडे (शिरसोली प्र.न.), समाधान जाधव (शिरसोली प्र.बो.), ग्रामपंचायत सदस्य नितीन बुंधे,…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी शहरात सध्या कोरोनामुळे गरीब व हातावर पोट असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा २५ गरजू कुटुंबांना रोटरॅक्ट जळगाव क्लबतर्फे आवश्यक किराणासह धान्य वाटप करण्यात आले. कोरोनामुळे सामान्य जनजीवन आणि कामकाज बंद आहे. त्यामुळे गरीब गरजूंना रोटरॅक्ट क्लब जळगावतर्फे गरजोपयोगी वस्तूंचे किट तयार करून वाटप करण्यात आले. यात गरीब वस्तीमधील कुटुंबाना रोटरॅक्टतर्फे गहू, तांदूळ, साखर, तेल,चहा पावडर, मिरची, हळद वगैरे अशा वस्तूंचे किट तयार करणयात आले असून त्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी जयवर्धन नेवे, आदित्य वाणी, पंकज जैन, तरुण अरतानी, पारस जैन यांनी परिश्रम घेतले.

Read More