जामनेर : प्रतिनिधी पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्या नंतर सत्तेत आलेल्या तृणमुल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर हल्ला करून तेथील महिला पदाधिकार्यांवर अमानुष पणे अत्याचार केले. तेथील कार्यकर्त्यांची हत्या केली. तसेच अनेक घरांना, व्यवसायांच्या ठिकाणांना आगी लावण्यात आल्या. अशा प्रकारे लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे. सदरील घटना ही भारतीय राज्य घटनेचा अपमान करणारी असून हल्ला करणार्या तृणमुल कॉंग्रेसच्या गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज येथील तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ. गिरीष महाजन, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, मा. जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे…
Author: saimat team
जळगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्या लाटेची तीव्रता अजून ओसरलेली नसतांना आता तज्ज्ञांनी तिसर्या लाटेचा इशारा देखील दिलेला आहे. कोविडचा संसर्ग समोर आल्यापासूनच जिल्हा प्रशासनाने अचूक नियोजन करून याचा यशस्वी प्रतिकार केला आहे. याच प्रमाणे या विषाणूच्या तिसर्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी ऑक्सीजन निर्मितीत स्वयंपूर्ण बनण्याचे उद्दीष्ट आम्ही घेतले असून यासाठी आतापासूनच सुक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. प्रश्न : सध्या कोविडचा हाहाकार सुरू असून याच्या उपाययोजनांसाठी आपण नेमके काय प्रयत्न करत आहात ? ना. गुलाबराव पाटील – कोविडच्या दुसर्या लाटेचा प्रकोप सध्या दिसून येत असला तरी पहिल्या…
जळगाव : प्रतिनीधी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता उपनगरांंमध्ये अग्निशमन केंद्राची मागणी वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंप्राळा परिसरात अग्निशमन दलाचे नवीन केंद्र लवकरच उभारण्यात येणार असल्याची घोषणा महापौर जयश्री महाजन यांनी मंगळवारी केले. जागतिक अग्निशमन सैनिक दिन मंगळवारी गोलाणी व्यापारी संकुलातील तळमजल्यातील महापालिकेच्या अग्निशमन दलात साजरा करण्यात आला. महापौर यांनी केंद्रप्रमुख शशिकांत बारी यांच्यासह विश्वजित गर्डे, गिरीश खडके, तेजस जोशी, सय्यद नासीर अली, प्रकाश चव्हाण, सोपान जाधव, गंगाधर कोळी, राजेश चौधरी, दिवाण इंगळे, युसूफ पटेल, संतोष पाटील, मोहन भाकरे, संतोष तायडे आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महापौर महाजन यांनी कोणत्याही आपत्ती…
जळगाव :प्रतिनिधी मार्च २०२१ अखेरीस जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यात १० कोटींच्या नाविन्यपूर्ण कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून शहरी विभागासाठी ८ अग्निशमन गाड्या खरेदीसाठी २ कोटी ३१ लाखाच्या निधीस मंजूर केल्याने जिल्ह्यातील अनेक नाविन्यपूर्ण १२ कोटीचे नाविन्यपूर्ण मधून कामे होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. ८ अग्निशमन गाड्यांची होणार खरेदी जिल्ह्यात मनपा व नगरपालिका अंतर्गत सर्व आरोग्य संस्थेत अग्निशमन सेवा बळकटीकरण करण्यासाठी खासदार,आमदार व इतर लोकप्रतिनिधींच्या मागणी नुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना धरणगाव, पाचोरा,भडगाव, चोपडा, पारोळा,अमळनेर, जामनेर, शेंदुर्णी या ८ शहरात प्रत्येकी सुमारे ३० लक्ष प्रमाणे २…
जळगाव ः प्रतिनिधी शासनाने लाभार्थ्यांना रेशनचे धान्यासाठी बायोमेट्रिक सक्ती केल्यामुळे कोविड-१९चा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचे शहरातील तसेच तालुक्यातील १०५ सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली आहे. शहर व तालुक्यातील १०५ सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार आहेत. प्रत्येक दुकानात पाचशे ते हजार शिधापत्रिकाधारक आहे. कोरोनाच्या वाढता संसर्ग पाहता सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना कोविड लसची सुविधा उपलब्ध करून द्यावी. शासनाने धान्य घेण्या साठी लाभार्थींची बायोमेट्रिकची सक्ती केली असल्याने शासनाकडून कोविडच्या अनुषंगाने कोणतेही किट, मास्क, सॅनिटायझर असे साधने पुरवले गेले नाहीत. बहुतेक दुकानदार हे वयोवृद्ध आहे. त्यांना मधुमेह व इतर आजार…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरातील जुने गावातील नागेश्वर मंदिराकडून जुने कोथळीतील मुक्ताई मंदिराकडे जाताना, निंबादेवी मंदिराजवळील पूल व त्यासाठीचा निधी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे यांनी नाबार्ड अंतर्गत मंजूर करून आणला. आ. चंद्रकांत पाटील यांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये. त्याऐवजी मतदार संघातील मेळसांगवे-पंचाणे मार्गे सुलवाडी ते ऐनपूर रस्त्यावरील पूल मंजूर करुन आणावा. तसे केल्यास आम्ही जाहीर सत्कार करू. त्यांनी आमचे आव्हान स्वीकारावे, असे जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जुने मुक्ताईनगरातील नागेश्वर मंदिराकडून जुन्या मुक्ताबाई मंदिराकडे जाताना रस्त्यात ढासळलेला पूल आहे. तेथे नवीन पूल उभारणीचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते…
मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. यानिर्णयानंतर राज्यात नाराजी आणि संताप अशी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली. हा निर्णय दुर्दैवी असला, तरी या निर्णयाला गरीब मराठा समाजही दोषी आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय विचार केला जात नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, असं मत आंबेडकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मी दुर्दैव म्हणेन की, गरीब मराठ्यांवर अन्याय झाला आहे. पूर्ण मराठा समाज हा काही श्रीमंत नाही.…
मुंबई : विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) तृणमूल कांग्रेसने (TMC) दणदणीत विजय मिळवला.तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.ममता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.ममता यांनी या शपथविधी सोहळ्यासाठी पांढरी साडी आणि शाल परिधान केली होती. त्यांनी बंगाली भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बाकीचे सर्व मंत्री ९ मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिवशी शपथ घेतील. आजच्या घडीला ममता बॅनर्जी या भारतातल्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहे. आपलं प्राधान्य करोनाविरुद्धचा लढा हेच असेल असंही त्या शपथ घेतल्यावर म्हणाल्या. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचंही…
मुंबई: मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय व निराशाजनक आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे धक्कादायक आहे. देशातील अन्य राज्यात आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे असतानाही मराठा आरक्षणासंदर्भात त्याचा विचार न होणे हे आकलनापलीकडचे आहे,’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. ( राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं १६ टक्के आरक्षण घटनेतील तरतुदींचं उल्लंघन करणारं असल्याचं स्पष्ट करत हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द ठरवलं. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा गायकवाड आयोगाचा निष्कर्षही चुकीचा असल्याचं निरीक्षण पाच न्यायमूर्तींच्या पूर्ण पीठाने…
राज्याच्या राजकारणातील ज्वलंत मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणावर राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळून लावत राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा रद्द केला आहे. मात्र, हा निकाल देत असताना न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा करण्यात आला होता. या कायद्यामुळे ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादाचा भंग होत असल्याच्या आक्षेपासह इतर मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयात आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून या याचिकांवर सुनावणी सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने…