मुंबई : विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) तृणमूल कांग्रेसने (TMC) दणदणीत विजय मिळवला.तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.ममता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.ममता यांनी या शपथविधी सोहळ्यासाठी पांढरी साडी आणि शाल परिधान केली होती. त्यांनी बंगाली भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बाकीचे सर्व मंत्री ९ मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिवशी शपथ घेतील. आजच्या घडीला ममता बॅनर्जी या भारतातल्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहे. आपलं प्राधान्य करोनाविरुद्धचा लढा हेच असेल असंही त्या शपथ घेतल्यावर म्हणाल्या. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचंही…
Author: saimat team
मुंबई: मराठा आरक्षण रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय व निराशाजनक आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे धक्कादायक आहे. देशातील अन्य राज्यात आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे असतानाही मराठा आरक्षणासंदर्भात त्याचा विचार न होणे हे आकलनापलीकडचे आहे,’ अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. ( राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं १६ टक्के आरक्षण घटनेतील तरतुदींचं उल्लंघन करणारं असल्याचं स्पष्ट करत हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द ठरवलं. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा गायकवाड आयोगाचा निष्कर्षही चुकीचा असल्याचं निरीक्षण पाच न्यायमूर्तींच्या पूर्ण पीठाने…
राज्याच्या राजकारणातील ज्वलंत मुद्दा असलेल्या मराठा आरक्षणावर राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळून लावत राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा रद्द केला आहे. मात्र, हा निकाल देत असताना न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा करण्यात आला होता. या कायद्यामुळे ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादाचा भंग होत असल्याच्या आक्षेपासह इतर मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयात आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून या याचिकांवर सुनावणी सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने…
५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून देण्यात आलेलं आरक्षण अवैध असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुनावलाय. मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मराठा आरक्षण अवैध असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुनावलाय. मात्र ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वैध राहतील, असा निर्वाळाही सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. यामुळे विद्यार्थ्यांना मात्र दिलासा मिळालाय. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली महाराष्ट्र सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय. न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं तसंच…
जळगाव : प्रतिनिधी एमआयडीतील ‘डी’ सेक्टरच्या पश्चिमेकडे अक्षय प्लास्टीकच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेतील कचर्याला आग लागून आगीने रौद्र रुप धारण केले होते. वेळीच प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत माहिती अशी की, अक्षय प्लास्टीकच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत एमआयडीसीतील कचरा टाकला जातो. या जागेपासून काही अंतरावर शेतीसुध्दा केली जाते. उन्हाळा असल्याने या परिसरातील मोकळ्या जागेत असलेले झाडे व गवत सुकलेले आहे. या कंपनीच्या शेजारीच शर्मा इंजिनिअरींग वर्क्स आहे. या कंपनीच्या पाठीमागील आवारात कंपनीने एका भंगारवाल्याला सदर जागा पोटभाडेकरु म्हणून भाड्याने दिली आहे. सदर भाडेकरु इम्तियाज खान हा आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घरुन कंपनीकडे येत असतांना त्यास कंपनीच्या मागील…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील रेणुका नगरात आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत घराच्या छतावरील शेडमध्ये असणार्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या आगीने दोन मुलांसह राहणार्या निराधार महिलेचा संसार उघड्यावर आला आहे. याबाबत माहिती अशी की, रेणुका नगरात रहिवासाला असलेले भिकन निंबा चौधरी यांच्या घराच्या वरच्या मजल्याला पार्टीशनच्या घराला आज सकाळी अचानक आग लागली. या आगीत लाकडी पार्टीशनचे असलेले अख्खे शेड जळून खाक झाले. दरम्यान, सकाळी घरातून आगीचे लोळ येतांना दिसताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला सुचित करत बोलावून घेतले होते. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहचत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तेथे राहणार्या महिलेच्या घरातील जीवनोपयोगी वस्तू जळून खाक…
जळगाव ः प्रतिनिधी जिल्ह्यातील भडगाव, मुक्ताईनगर, चाळीसगाव व जळगाव या चार तालुक्यांमध्ये पोषण आहारात झालेल्या अपहाराबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती. तर याबाबत २०१४ पासून सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे हे देखील लढा देत आहेत. याबाबत एका तक्रारीवरून नुकतेच जिल्हा परिषदचे काही अधिकारी कागदपत्रांसह पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाल्याचे वृत्त आहे. शालेय पोषण आहार योजनेत योजनेचे ठेकेदार, जिल्हा परिषदेतील काही अधिकार्यांनी एकत्रितपणे बोगस बिले काढून शासनाची आर्थिक फसवणूक केली होती. याबाबत जिल्हा परिषदस्तरावरच चौकशी करून ठेकेदाराकडून…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील बाल सुधारगृहातील मुली-महिलांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाचा स्तुत्य उपक्रम रविवारी येथील रोटरी क्लब ऑफ ईस्टच्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आला. या कार्यक्रमात त्वचा व डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी ३५ महिलांना याचा लाभ झाला. त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अमेय कोतकर यांनी मुली व महिलांचे त्वचेच्या संदर्भातील तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. तर नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. पंकज शाह यांनी डोळ्यांची तपासणी करून या कोरोनाच्या काळात डोळ्यांची निगा कशी राखावी याची माहिती दिली. मास्कचे वितरण करण्यात आले. बालसुधारगृहाच्या अधीक्षक जयश्री पाटील, जळगाव जनता बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, प्रोजेक्ट चेअरमन मनीषा पाटील, अध्यक्ष भावेश शाह, उपाध्यक्ष वीरेंद्र छाजेड उपस्थित होते. या वेळी…
फैजपूर ता यावल : प्रतिनिधी जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश असूनही फैजपुर शहरात अनेक दुकाने हाफ शटर बंद करून सुरू असल्यामुळे फैजपूर नगरपालिकेने सोमवार दि. ३ रोजी येथील तीन मोठ्या कापड दुकानावर कारवाई करून सील ठोकले. काल झालेली कारवाई ताजी असतानाच आज सकाळी त्यातील खुशाल भाऊ रोडवर असलेल्या दुकानात चक्क बाजूच्या दरवाजातून गिर्हाईकांना आत सोडून कपड्यांची विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या. त्या दुकानदाराचे असे कृत्य दोन पैशांच्या लालसेपोटी नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. काल मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विपुल साळुंखे यांच्या पथकातील सुनील नंदाने, सुधिर चौधरी अनिकेत…
जळगाव : प्रतिनिधी ‘अमृत’ व ‘मलनिस्सारण’ योजनांतर्गत कामांसंदर्भात माहिती जाणून घेत चर्चेसाठी संबंधित मक्तेदार व पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता, उपअभियंता तसेच प्रकल्प अधिकारी यांची महापौर जयश्री महाजन यांनी आपल्या दालनात बैठक घेतली. त्यामध्ये शहरात प्रभागनिहाय आजवर झालेल्या विविध कामांचा आढावा घेऊन ‘अमृत’ योजनेच्या एजन्सीचे अधिकारी, मक्तेदार, महापालिका अभियंता, उपअभियंता व प्रकल्प अधिकार्यांकडून कामांसंदर्भातील आगामी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच विविध अडीअडचणी समजून घेत अपूर्ण राहिलेली सर्व कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी मक्तेदारांसह अधिकार्यांना दिल्या. याप्रसंगी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, उपमहापौर कुलभूषण पाटील, अमृत योजनेचे मक्तेदार जैन इरिगेशनचे पंकज बर्हाटे, आशिष भिरूड,…