बोदवड ः प्रतिनिधी जामठी रोड लगत पाझर तलावाच्या परिसरातील सर्व घातक कचरा जमा करून त्याचे योग्य विल्हेवाट लावून पाझर तलाव प्रदुषण मुक्त करावा अशी मागणी तालुका शिवसेने तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास मोठया प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला आहे. निवेदनात म्हट्ले आहे की, गेल्या तीन वर्षापासुन बोदवड शहरातील केरकचरा, घाण तसेच घातक केमीकलयुक्त कचरा हा जामठी रोड लगत पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात घनकचरा चे ठेकेदार यांचे कडून संकलीत करण्यात येत आहे, गेल्या दोन वर्षापासुन तलावात टाकला जाणारा घातक केरकचरा प्लॉस्टीक व इतर विघातक कचर्याची विल्हेवाट लावण्याबाबत प्रशासनाकडे वेळोवळी लेखी व तोंडी स्वरुपात निर्दषणास आणले…
Author: saimat team
यावल : तालुका प्रतिनिधी नगरपालिका हद्दीत पटेल कॉलनीत यावल नगरपालिकेतर्फे गटारीचे बांधकाम सुरू आहे,गटारीचे बांधकाम न करता आधी डांबरीकरण रस्त्याचे काम बंद करून सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता तयार करावा मग नंतर गटारीचे बांधकाम करावे अशी मागणी पटेल कॉलनीतील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. दि.११मे २०२१ रोजी मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गट नंबर ३९ व ४० या गटातील पटेल कॉलनीत सांडपाण्याचे गटारीचे बांधकाम झालेले नाही परंतु सदर परिसरात डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम होत आहे परंतु सदर भागात डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम न करता आम्हास सिमेंट कॉंक्रीट रस्ता तयार करून द्यावा जोपर्यंत सांडपाण्याचे गटारीचे बांधकाम करून मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम बंद…
जळगाव : प्रतिनिधी शाळेला उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की मुलांना मामाच्या गावी तर महिलांना माहेरी जायचे वेध लागतात आणि यासाठी निमित्त असते आखाजी सणाचे. खान्देशात आखाजी धूमधडाक्यात साजरी केली जाते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट व कडक निर्बंध असल्याने मनात असूनही माहेरी जाणार्या महिलांना सासरीच आखाजी साजरी करावी लागणार आहे. अक्षय्य तृतीयेला खान्देशात घरोघरी पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचं भांडं ठेवून त्यावरती खरबूज आणि दोन सांजोर्या, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घोट देऊन मग नवीन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध, तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचं औक्षण घेऊन पूर्वजांचं स्मरण करून कुंकवाचा एकेक बोट उंबर्यावर उमटवत…
फैजपूर ता यावल : प्रतिनिधी येथील आठवडे बाजार परिसरात मौलाना अब्दुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या समोर फैजपूर नगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या बांधकामात ठेकेदाराने आपला मनमानी सुरू करून बांधकामात चांगल्या वाळूचा वापर न करता घेसूचा वापर करण्यात येत असल्याने सामान्य नागरिकां मधून संताप व्यक्त केला जात आहे. फैजपूर नगरपालिकेने सुमारे एक कोटी रुपयांच्या कॉंक्रीटीकरण आदी बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली होती. त्या निविदेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या बांधकामात नियम धाब्यावर ठेऊन ठेकेदाराने गिरणा किंवा उत्कृष्ट प्रतीच्या वाळूचा वापर न करता परिसरातील नद्या नाल्यातील माती मिश्रित वाळूचा सर्रास वापर करून कॉंक्रीटीकरण केले जात आहे. या बांधकामा ठिकाणी नगरपालिकेच्या अनेक नगरसेवकांनी भेट देऊन पाहणी…
भुसावळ : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तालुका व परिसरातील नागरिकांवर उपचार होत आहेत. ग्रामीण रुग्णालयात अनेक संसाधनांची कमतरता असल्याने मदतीचे हात पुढे येत आहेत. यात माजी नगरसेवक प्रकाश बतरा व त्यांच्या मातोश्री नगरसेविका पुष्पा बतरा यांनी रविवारी ४ कपाट, १२ खुर्च्या, ३ पल्स ऑक्सिमीटर भेट दिले. यावेळी आमदार संजय सावकारे उपस्थित होते. मातृदिनानिमित्त माजी नगरसेवक प्रकाश बतरा यांनी हा उपक्रम राबवला. सुमारे ६२ हजार रुपयांच्या या साहित्याचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते वितरण झाले. यावेळी डॉ.भालचंद्र चाकूरकर, डॉ. शुभांगी फेगडे, डॉ. सिद्धेश पाटील, डॉ. वैभव निकम, डॉ. नी. तू. पाटील, भाजप शहराध्यक्ष परीक्षित बर्हाटे, अजय नागराणी, सरचिटणीस…
फैजपूर ता.यावल ः प्रतिनिधी सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघाने सामाजिक जाणिवेतून न्हावी (ता. यावल) ग्रामीण रुग्णालयाला तीस हजार रुपये किमतीचे प्लस ऑक्सिमीटर, पॅरामॉनिटर भेट दिले. ग्रामीण रुग्णालयाला पॅरामॉनिटरची आवश्यकता होती. गरज ओळखून शिक्षक संघाने रुग्णालयाला पल्स ऑक्सिमिटर भेट देण्याचा निर्णय घेतला. रुग्णांचे इसीजी, एच. आर, एस.पी.ओ २, एन.आय.बी.पी., तापमान अशा विविध बाबींचे मापन ही मशीन करते. रूग्णांचे प्राथमिक निदान करण्यासाठी ही मशीन अतिशय उपयोगी ठरणार आहे. रुग्णालयाला कोणतेही मदत लागल्यास शक्य ती मदत करण्याचे आश्वासन महासंघाने दिले. सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघ अध्यक्ष प्रसन्न बोरोले, सचिव विक्रांत चौधरी व सदस्य सुरेश इंगळे, विजय कोल्हे, हरीश बोंडे, जितेंद्र फिरके, कुंदन वायकोळे,…
जळगाव ः प्रतिनिधी केंद्र सरकारने कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. याबाबत सावध रहावे व योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने मेहरुण, तांबापूर, रामेश्वर कॉलनी या परिसरातकरिता महापालिकातर्फे जुने टी.बी.रुग्णालय येथे १०० बेड कोविड रुग्णालय तातडीने सुरु करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्षाचे महानगराध्यक्ष संदीप मांडोळे यांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे केली आहे. शहरातील मेहरुण परिसरात असलेले टी.बी.रुग्णालय बंद पडलेले रुग्णालय अतिशय मोठे असून जागा निसर्गरम्य परिसरात आहे. तसेच मेहरुण, तांबापूरा, रामेश्वर कॉलनी यांची एकूण लोकसंख्या एक लाखांच्या घरात आहे. महापालिका नियमानुसार या भागाकरिता आधीपासूनचा मनपा संचलित रुग्णालय आवश्यक आहे. कोविड रुग्णालयाचे नंतर…
भुसावळ : प्रतिनिधी भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे, भुसावळ विभागतर्फे पुनर्विवाहोत्सुक घटस्फोटित, विधवा, विधूर तसेच प्रौढ, अपंग, शेतकरी आणि व्यावसायिक युवक, युवतींची परिचय पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या वर्षीचे पुस्तिका निर्मितीचे सलग नववे वर्ष आहे. परिचय पुस्तिकेक विवाहेच्छुकांनी विनामूल्य नावनोंदणी करावी, असे आवाहन प्रकल्प प्रमुख आरती चौधरी यांनी केले आहे. पाडळसे येथील भोरगाव लेवा पंचायत ही संस्था अनेक वर्षांपासून समाज बांधवांसाठी सामाजिक, कौटुंबिक, विवाह विषयक तंटे या बाबत योग्य मार्गदर्शन करत आली आहे. लेवा पाटीदार समाजातील विवाहोत्सुक वधु-वरांचे परिचय संमेलन भुसावळात होणार आहे. समाजातील इच्छुकांनी विनामूल्य नाव नोंदणीसाठी पुरुषोत्तम मेडिकल, मामा पाचपांडे पान सेंटर, किंवा जामनेर रोडवरील…
जळगाव : प्रतिनिधी क्रांतिसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची ४८१ व्या जयंती निमित्त विविध राणाप्रेमीचा जळगाव शहरातील सर्व सामाजिक संघटनांनी कोविड १९ चे नियमाचे पालन करून एकत्रित येवून श्री महाराणा प्रतापसिंह यांचे जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले. शहरातील संघटनाच्या समन्वयाचे कार्य क्रांतीसुर्य बहुउद्देशिय मंडळ (पुतळा समिती) सर्व सामाजिक संघटनांच्या अनमोल सहकार्य घेवून समितीचे उपाध्यक्ष उदयसिंग जी.पाटील यांनी सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ.राजूमामा भोळे व महापौर जयश्री महाजन यांच्या शुभहस्ते गरजूंना शिधा वाटप करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते राणाप्रेमी महाराणा…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात सर्वत्र लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवकाला लसीकरणाची संधी मिळत आहे. यंदा कोरोनाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत; परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या आगामी काही महिन्यांमध्ये होणार आहेत. या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी शासनाने नियमांमध्ये शिथिलता आणून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे अशी मागणी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे मराठे यांनी सांगितले. बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेदरम्यान या संपूर्ण विद्यार्थ्यांचे आरोग्य कसे जपले जाईल व या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोनाची बाधा होणार नाही, यासंबंधीची काळजी…