भुसावळ : प्रतिनिधी भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे, भुसावळ विभागतर्फे पुनर्विवाहोत्सुक घटस्फोटित, विधवा, विधूर तसेच प्रौढ, अपंग, शेतकरी आणि व्यावसायिक युवक, युवतींची परिचय पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या वर्षीचे पुस्तिका निर्मितीचे सलग नववे वर्ष आहे. परिचय पुस्तिकेक विवाहेच्छुकांनी विनामूल्य नावनोंदणी करावी, असे आवाहन प्रकल्प प्रमुख आरती चौधरी यांनी केले आहे. पाडळसे येथील भोरगाव लेवा पंचायत ही संस्था अनेक वर्षांपासून समाज बांधवांसाठी सामाजिक, कौटुंबिक, विवाह विषयक तंटे या बाबत योग्य मार्गदर्शन करत आली आहे. लेवा पाटीदार समाजातील विवाहोत्सुक वधु-वरांचे परिचय संमेलन भुसावळात होणार आहे. समाजातील इच्छुकांनी विनामूल्य नाव नोंदणीसाठी पुरुषोत्तम मेडिकल, मामा पाचपांडे पान सेंटर, किंवा जामनेर रोडवरील…
Author: saimat team
जळगाव : प्रतिनिधी क्रांतिसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची ४८१ व्या जयंती निमित्त विविध राणाप्रेमीचा जळगाव शहरातील सर्व सामाजिक संघटनांनी कोविड १९ चे नियमाचे पालन करून एकत्रित येवून श्री महाराणा प्रतापसिंह यांचे जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले. शहरातील संघटनाच्या समन्वयाचे कार्य क्रांतीसुर्य बहुउद्देशिय मंडळ (पुतळा समिती) सर्व सामाजिक संघटनांच्या अनमोल सहकार्य घेवून समितीचे उपाध्यक्ष उदयसिंग जी.पाटील यांनी सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने स्वतः रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ.राजूमामा भोळे व महापौर जयश्री महाजन यांच्या शुभहस्ते गरजूंना शिधा वाटप करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते राणाप्रेमी महाराणा…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात सर्वत्र लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. १८ वर्षे पूर्ण असलेल्या युवकाला लसीकरणाची संधी मिळत आहे. यंदा कोरोनाने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत; परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या आगामी काही महिन्यांमध्ये होणार आहेत. या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी शासनाने नियमांमध्ये शिथिलता आणून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे अशी मागणी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे मराठे यांनी सांगितले. बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेदरम्यान या संपूर्ण विद्यार्थ्यांचे आरोग्य कसे जपले जाईल व या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोनाची बाधा होणार नाही, यासंबंधीची काळजी…
जळगाव : प्रतिनिधी शिवसेना जळगाव महानगर व इंडियन रेडक्रॉस सोसायटीची जळगाव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ९ मे २०२१ रोजी ‘कोरोना’ अर्थात ‘कोविड-१९’ ऍन्टीजेन मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शहरातील तुकारामवाडी-गणेशवाडी परिसरातील पडकी विहीर, चिंचेच्या झाडाजवळ सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत शिबिर घेण्यात आले. महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा प्रमुख, विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसैनिक तथा युवाशक्ती फौंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना महिला आघाडीच्या महानगरप्रमुख शोभा चौधरी,…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील उस्मानिया पार्क येथे अंगणात खेळत असलेल्या दीड वर्षाच्या बालकांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज गुरूवारी सकाळी १० वाजता घडली. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेने वेळीच बालकाला वाचविले. जखमी बालकाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अधिक माहिती अशी की, शहरातील उस्मानिया पार्क येथे शाहरूख खान हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते पेंटर काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्याचा दीड वर्षाचा मुलगा इरफान शाहरूख खान राहत्या घराच्या अंगणात आज गुरूवारी सकाळी १० वाजता एकटाच खेळत होता. अचानकपणे एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकटा खेळत असलेल्या बालकांवर हल्ला केला. कुत्र्याने बालकाच्या मानेवर मोठ्याने चावा घेतला.…
यावल : तालुका प्रतिनिधी वाघुर धरण व डावे व उजवे कालवे साधारणतः तात्कालीन प्रभारी मुख्य अभियंता मोरे यांच्या आदेशाने कडा कार्यालयाकडे अंतर्गत जळगाव पाटबंधारे विभाग अंतर्गत पाटबंधारे उपविभाग यावल व चोपडा यांच्याकडे हस्तांतरण करण्याचे प्रयत्न केले गेले परंतु सद्यस्थितीचे कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता स्वामी यांनी केलेले हस्तांतरण पूर्णतः चुकीचे असून वाघुर धरण व कालवे यांचे संपूर्ण कामे करून तसेच कम्प्लिशन रिपोर्ट झाल्यावर सिंचनक्षमता निर्माण झाल्यावर हस्तांतरण करून घेणे आवश्यक होते. याबाबत दोन्ही विभात सदर आदेशाची प्रतीक्षा लागुन आहे. सदर वाघुर धरणाचे व कालव्याचे हस्तांतरण शासन निर्णय व वेळोवेळी शासनाच्या निर्णयाच्या अधीन राहून अधीक्षक अभियंता यांच्या दोघांच्या म्हणजे बांधकाम विभाग…
जळगाव : प्रतिनिधी धरणगाव येथील तहसिलदार नितीन देवरे यांनी रुजू झाल्यापासून तालुक्यात हुकूमशाही पध्दतीने मनमानी कारभार करत नागरिकांवर व प्रशासकीय सेवेतील कर्मचार्यांविरुध्द वाईट हेतूची वागणुक देत असतात आदी कारणांमुळे त्यांचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे, बांभोरी येथील माजी सरपंच राकेश नन्नवरे यांच्यासह भाजप पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी तहसिलदार नितीन देवरे यांच्याविरुध्द वारंवार वरिष्ठांकडे त्यांच्या कारभाराबद्दल तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र त्यांच्याविरुध्द कुठलीही कारवाई न झाल्याने सौ. अत्तरदे यांनी ३ मे रोजी जिल्हाधिकार्यांना लोकशाही दिनानिमित्त तक्रारी अर्ज देत उपोषणाचा ईशारा दिला…
जळगाव ः प्रतिनिधी राज्य सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. सुरुवातीपासून तिन्ही पक्षांमध्ये मराठा आरक्षणाबाबत एकवाक्यता नव्हती. तिन्ही पक्ष भांडत होते. नेते वेगवेगळी मते मांडत होती. हे आरक्षण व्हावे असे सरकारमधील मंत्र्यांना वाटत नव्हते. नियोजनाचा व समन्वयाचा अभाव होता. तिन्ही पक्षांच्या विसंगतीमुळे हे आरक्षण टिकवण्यात सरकार अपयशी ठरले असा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत निषेध व्यक्त केल्यानंतर भाजपतर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी महाजन यांनी संवाद साधला. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये ३८ टक्के मते भाजपच्या पारड्यात टाकली. पूर्वी तीन आमदार होते. आता ७५ आमदार झाले.…
यावल ः तालुका प्रतिनिधी शहरातील दोन मुले काल दि.५दुपारी दुपारी पाटात वाहून गेल्याने त्यांचा शोध सुरू आहे यामुळे यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे यावल शहरातील समाजसेवक गणेश महाजन व त्यांच्या वार्डातील नागरिक पाटात वाहून गेलेल्या मुलांचा शोध घेत आहेत. काल दुपारच्या सुमारास बोरावल रस्त्याकडील पाटावर पोहण्यासाठी गेलेले यावल शहरातील युवराज निलकंठ दुसाने वय१५दीपक जगदीश शिंपी वय१३परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाटात पाटाच्या पाण्याने काल दुपारी वाहून गेले त्यातील त्यांच्यासोबत असलेले दोन जण बघून घाबरून घरी पळून आले. त्यांनी उशीराने संध्याकाळी बेपत्ता मुलांच्या घरी घडलेली घटना सांगितल्याने एकच खळबळ उडाली त्यावेळपासून दोघांचा शोध सर्वत्र सुर आहे.
जळगाव : प्रतिनीधी नियमांचे काटेकोर पालन, वेळीच लसीकरण करून आपण कोरोनापासून बचाव करू शकतो. त्यामुळे पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने लस घ्यावी, असा सल्ला अमेरिका येथील पूजा चौधरी यांनी दिला. लेवा यूथ फोरमने आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यापासून बचावासाठी निर्माण केलेल्या लसीबद्दल अनेकांमध्ये गैरसमज व भिती आहे. ही भीती दूर करण्यासाठी लेवा यूथ फोरमने ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात लस : वाईट की चांगली, लसीकरणाचे फायदे समजवण्यात आले. प्रथम फोरमच्या डोंबिवली येथील सदस्या भाविका पाटील यांनी प्रास्ताविक केले. डोंबिवली येथील अंकिता महाजन यांनी गणेश वंदन केले. यानंतर फोरमचे अध्यक्ष हर्षल भंगाळे यांनी संवाद…