Author: saimat team

मलकापूर : प्रतिनिधी शहरात कोरोना धरतीवर कडकडीत लॉकडाऊन आहे. असे असले तरी विविध सेवा द्यायच्या माध्यमातून पोलीस व विविध विभागाचे कर्मचारी रस्त्यावर आहेत , त्याचबरोबर दवाखाने व मेडिकल साठी नागरिक देखील रस्त्यावर येत आहेत. अशा परिस्थितीत रखरखत्या उन्हात वाटचाल करणार्‍या सर्वांना मोफत थंडगार रस कृष्णा स्टुडिओ च्या माध्यमातून देऊन आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, घटना स्टुडिओ चे संचालक योगेश शर्मा यांनी त्यांच्या शेतातील पाच क्विंटल ऊस उसाचा रस निर्माण करणारी मशीन थंडगार बर्फ त्यास लिंबूची मिश्रण व ग्लास उपलब्ध करून देते थंडगार उसाचा आस्वाद सर्वांना दिला. या उपक्रमात आयोजकांनी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांना…

Read More

चोपडा ः प्रतिनिधी तालुक्यातील तरूणांनी अक्षय प्राणवायूसाठी वृक्ष संवर्धनाचा मामलदेच्या तरूणाई चा संकल्प दि.१४ मे रोजी खान्देशात अक्षय तृतीया सण म्हणजे शेती पर्वाचा मुहूर्ताचा दिवस हा मुहूर्त साधत मामलदे येथे तरूण मित्रांनी एकत्र येत गतवर्षी सामाजिक वनीकरण चोपडा यांनी रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या रोपांना पाणी देवून संगोपन करत ती जगविण्याचा आज मुहूर्त साधला. अक्षय प्राणवायूसाठी अक्षय तृतीयेच्या या मुहूर्ताचे परिसरात कौतुक झाले. फाट्यापासून मामलदे गावापर्यंत रोपांना माती लावून पाणी टाकून ही झाडे जगवण्यासाठी तरूणांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संकल्प केला. दीनानाथ इंगळे, सोहम कोळी, प्रथमेश पाटील, जयदीप पाटील, पवन पाटील, प्रदिप कोळी, हर्षल महाजन, राकेश पाटील, दीपक पाटील, गोपाळ कोळी, सुशिल पाटील,…

Read More

फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या हिंगोणा येथे स्वर्गरथाचे लोकार्पण महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांचे शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामीनारायण गुरुकुलचे अध्यक्ष सद्गुरू शास्त्री भक्ति प्रकाश शास्त्री होते. प्रमुख पाहुणे म्हणून मससाका संचालक नरेंद्र नारखेडे, सदगुरू शास्त्री भक्तीकिशोर दासजी महाराज, माजी सरपंच राजेंद्र महाजन, डॉ. व्ही. जे. वारके, माजी मुख्याध्यापक सदाशिव पाटील यांची उपस्थिती होती. हा स्वर्गरथ स्वर्गीय प्रभाकर गाजरे व स्वर्गीय मिलिंद प्रभाकर गाजरे यांचे समरणार्थ माधवी विनीत चिरमाडे यांनी संपूर्ण खर्च करून हिंगोणा ग्रामस्थांना लोकार्पण केला. या कार्यासाठी लीलाताई गाजरे व प्रसिध्द साहित्यिक प्रा.व.पु. होले सर यांनी प्रेरणा दिली. या सामाजिक कार्याबद्दल मान्यवर पाहुण्यांनी दात्यांचे…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी खरीप हंगामाची लगबग सुरू असतांना बियाणे व खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत. याची दखल घेऊन जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड.रोहिणीताई खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कृषी मंत्र्यांना पत्र लिहून खरिप हंगामासाठी शेतकर्यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली आहे. याबाबत वृत्त असे की, यंदाचा खरिप हंगाम जवळ आला असुन पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. परंतु पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते यांच्यासाठी लागणार्या आर्थिक बाबींची जुडवणुक करण्यासाठी शेतकरी बांधव लागला आहे. परंतु केंद्र शासनाने रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्या मुळे खत उत्पादक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि वर्धमान जैन को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्लाझ्मादानाच्या जनजागृती बाबतचे माहितीपर होर्डिंग जळगाव शहरात लावण्यात आले. या होर्डिंगचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वर्धमान जैन को-ऑपरेटीव क्रेडीट सोसायटी लिमिटेडचे मॅनॅजिंग डायरेक्ट विनोद बोथरा, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, डॉ. अपर्णा मकासरे, पुष्पाताई भंडारी, संदीप काबरा, उज्वला वर्मा आदि उपस्थित होते. प्लाझ्मादान हे सद्य परिस्थितीत मध्यम स्वरूपाच्या कोरोन बाधित रुग्णांवर उपचाराकरिता फार उपयुक्त ठरत आहे असे डॉक्टरांचे मत आहे. यासाठी कोरोनातून बर्‍या झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मादान…

Read More

मलकापुर : प्रतिनिधी कोरोनाच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत एक अंदाजे ४५ वयोगटातील महिला एकटीच फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने पत्रकार गजानन ठोसर यांनी प्रसंगावधान राखत सदर महिलेस विश्‍वासात घेवून पोलीसांशी संपर्क साधत महिलेजवळ असलेल्या कागदपत्रांच्या आधारे मलकापूर पोलीसांनी महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेवून मुलाचा पत्ता लावत माय-लेकांची भेट घडवून आणली. तब्बल सहा महिन्याच्या विरहानंतर पुत्राने आईला भेटल्यानंतर मुलाच्या चेहर्‍यावर आनंदाश्रू तराळले. दरम्यान, माय-लेकांच्या भेटीसाठी पोलीस व पत्रकारांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंचक्रोशीत कौतुक होत आहे. शहरात सद्यस्थितीत कडक लॉकडाऊन सुरू असुन संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अश्यातच सायंकाळी सहा वाजेदरम्यान पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर शहर पो.स्टे कडे जात असतांना तहसील चौकात अंदाजे पंचेचाळीस वर्षीय…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती ही जळगाव शहरात विविध उपक्रमांद्वारे थोर महापुरुषांच्या विचारांचा जागर करत असते. या समिती तर्फे छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त पुजन करण्यात आले. छत्रपती संभाजी राजे हे वीर योद्धे होते, त्यांनी त्यांच्या ३२ वर्षाच्या आयुष्यात २१० लढाया लढल्या व त्यातील एकही लढाई ते हरले नाहीत, तसेच राजे लेखक होते, बुधभूषण या ग्रंथाचे लेखन केले होते. असा अंजिक्य व योद्धा राजा मराठा साम्राज्याचा छत्रपती होता. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतिक असलेल्या राजांची जयंती जळगाव शहरातील हिंदू व मुस्लिम बांधवांनी साजरी केली. राजांची वंदन व अभिवादन सभा जळगाव शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तर्फे करण्यात आली…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी कोरोनाची परिस्थिती पाहता सर्वांनी घरीच राहून छ. संभाजी महाराजांची प्रतिमेचे पुजन करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी मराठी समाज अध्यक्ष किरण पाटील यांनी प्रतिमा पूजन करताना आणि तरुणांना मार्गदर्शन करताना आपण सगळ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या गुणांचे आचरण करुन त्यांच्यासारखे आपण व्हावे असे प्रतिपादन या प्रसंगी करण्यात आले. श्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा समाज शहर तालुकातर्फे रेल्वे स्टेशन जवळील भव्य अशा अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा ठेवून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख माजी नगरसेवक राजेंद्र आवटे उपस्थित होते. यावेळी नाना पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी छावा संघटनेचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भगवान परशुराम हे शस्त्र आणि शास्त्राचे प्रतीक मानले जातात.त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त अजय डोहोळे यांनी प्रकाशित केलेला ब्रह्मदंड मासिकाचा विशेषांक ज्ञानवर्धक व संग्राह्य आहे असे ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांनी प्रतिपादन केले. जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथे गादीपतींच्या हस्ते विशेषांकाचे ऑनलाईन पद्धतीने प्रकाशन करण्यात आले.या वेळी संपादक अजय डोहोळे,श्रीराम महाराज जोशी, सुशांत नाईक व अनय डोहोळे यांची उपस्थिती होती. ब्राह्मण डॉट कॉम परिवाराने २० वर्षाची परंपरा जोपासत भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाच्या विशेषांकाचे सलग १० व्या वर्षी प्रकाशन व विनामूल्य वितरणाचे सातत्य कायम राखले, तसेच कोरोनामुळे सामाजिक भान जपले असे मंगेश महाराज ह्या वेळी म्हणाले. दरवर्षी भगवान परशुराम…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भगवान परशुराम जयंतीचे औचित्य साधून महर्षी श्रुंगऋषी (सिखवाल ब्राह्मण समाज) बहुउद्देश्यीय संस्थेतर्फे आज रक्तदान शिबराचे आयोजन करण्यात आले. सध्या कोरोनाची आपत्ती सुरू असून रक्ताची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे. या अनुषंगाने आज भगवान परशुराम जयंतीचे औचित्य साधून महर्षी श्रुंगऋषी (सिखवाल ब्राह्मण समाज) बहुउद्देश्यीय संस्थेतर्फे आज रक्तदान शिबराचे आयोजन करण्यात आले. शहरातील ओक मंगल कार्यालयाच्या समोर या कार्यक्रमाचे कोरोनाच्या नियमांचे पालन करून आयोजन करण्यात आले. महापौर जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला. मंडळातर्फे भगवान परशूरामाची आरती करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी…

Read More