जळगाव ः प्रतिनिधी इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट तर्फे आव्हाने फाटया जवळ कानळदा रस्त्या लगत कट्टा मागील दोन महिन्यापासून तयार करण्यात येत होता तसेच तिथे बसण्यास ५ मोठ्या बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली, त्या कट्ट्याचे लोकार्पण डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी यांचे हस्ते करण्यात आले. हा कट्टा गावातील वयोवृद्ध मंडळी गावाबाहेर सकाळ व संध्याकाळी सैर सपाटा मांरणारी मंडली तसेच बाहेरगावी जाणारे येणारे प्रवासी त्याच्यासाठी खूप सोयीस्कर आहे. त्याच प्रमाणे दत्तक घेतलेला बोरखेडा गावात देखील इनरव्हील कट्टा तयार करून दोन मोठे बाकड्यांचे व्यवस्था करून इनरव्हील चौक तयार करून गावकर्यांसाठी कट्टा तयार करून आज रोजी इनरव्हील कट्ट्याच्या लोकार्पण करण्यात आला. सदर कार्यक्रमाला इनरव्हील क्लब…
Author: saimat team
भुसावळ : प्रतिनिधी कोरोनाची पहिली लाट आम्ही यशस्वीपणे थोपविण्यासाठी सहकार्य केले पण आमच्या व्यथा कोण मांडणार? अशी भावनिक साद घालत राज्यातील बी.ए.एम.एस.डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपा वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्रींसह सर्व संबंधितांना खुले पत्र लिहिले होते. या पत्राची व बी.ए.एम.एस. डॉक्टरांच्या मागणीची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र संयोजक डॉ.अजित गोपछडे यांनी याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्ष वर्धन आणि आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना केला असून राज्यातील या बी.ए.एम.एस. डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेतले जावे अशी विनंती केली आहे. राज्यात बी.ए.एम.एस.पदवी धारक डॉक्टरांना जून २०१९ मधे शासनाने स्थायी पद देऊन सेवेत समाविष्ट केले…
यावल ः तालुका प्रतिनिधी १६ रोजी संध्याकाळी यावल शहरात पाऊस सदृश्य वादळ निर्माण झाले होते यानंतर संध्याकाळ१९ी:३० वाजेच्या सुमारास यावल जंगलातून बकर्या चारुन घरी येत असताना यावल शहरातील मयत व्यक्तींना ज्या ठिकाणी विसावा दिला जातो त्या ठिकाणच्या चौकात हायमस्ट लॅम्प पोल जवळून जात असताना एक राजस्थानी बोकड लाल सोनेरी ठिपके असलेला, तसेच एक गावठी पांढरी बकरी सोनेरी ठिपके असलेली दोघांची किंमत अंदाजे ३० हजार रुपये यांना हायमस्ट लॅम्प पोलचा इलेक्ट्रिक शॉक लागून जागीच मरण पावल्या. याबाबत राहुल माधवराव निंबाळकर वय ३२ धंदा शेती मजुरी राहणार शिवाजीनगर यावल यांनी यावल पोस्टेला खबर दिल्यावरून यावल पोस्टेला या घटनेबाबत दि.१६म२०२१ेरोजी नोंद करण्यात आली…
यावल ः प्रतिनिधी अन्न व औषध मंत्री मा.राजेंद्र शिंगणे यांना दि.१७मे २०२१रोजी दिलेल्या निवेदनात यावल येथील नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य तथा आई हॉस्पिटलचे संचालक डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे की,ऑक्सिजन व रेमडेसिविर प्रमाणे टोसीलिझूमाब व इतर औषधी सुद्धा जिल्हा कंट्रोल रूम मधून वितरित व्हायला पाहिजे जेणेकरून रुग्णांना वेळेवर वाजवी दरात औषधी मिळून रुग्णांच्या नातेवाईकांची फिराफिर/हेळसांड थांबेल. दिलेल्या निवेदनात डॉ.कुंदन फेगडे यांनी म्हटले आहे की राज्यात कोविड संदर्भात औषधीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे अशा वेळी आपण ऑक्सिजन आणि रेमडेसिविर यांच्यासाठी जिल्हास्तरावर कंट्रोल रूम स्थापन केले त्यामुळे पुरवठा काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली व रूग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये या निर्णयाचे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा क्रीडा संकुलातील जुन्या गाळयांबाबत निर्णय घेण्यासाठी ५ जणांची उपसमिती नेमण्यात यावी. त्याचबरोबर जे गाळेधारक अनेक वर्षांपासून थकबाकीदार आहेत. त्यांचे गाळे बंद आहेत त्यांना रितसर नोटीस देऊन त्यांचे गाळे जप्तीबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्याची सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहे. जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत, शिव छत्रपती पुरस्कार विजेते डॉ. प्रदीप तळवेलकर, नगरसेवक नितिन बर्डे, श्याम कोगटा उपस्थित होते.…
फैजपूर ता यावल : प्रतिनिधी येथील आकाश मनोजकुमार पाटील या युवकाने अमेरिकेतील स्याडी यगो येथे आकाशात सुमारे १३५०० फूट उंचीवरून स्काय ड्रायव्हिंग करून एक चित्तथरारक यशस्वी कामगिरी केली आहे. ही अत्यंत धाडशी अशी ड्रायव्हिंग असून भारतीय युवकांना ही कामगिरी निश्चित प्रेरणादायी ठरेल. आकाश हा युवक फैजपूर येथील दादा साहेब वसंतराव पाटील औद्योगिक वसाहतचे चेअरमन मनोजकुमार वसंतराव पाटील यांचा मुलगा आहे. आकाशने अमेरिकेत एम. एस. अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली असून अमेरिकेत वास्तव्याला व उच्च सेवेत आहे. त्याने केलेल्या या धाडसी कामगिरीस आई वैशाली पाटील व वडील मनोजकुमार पाटील यांचे सतत मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. या धाडसी कामगिरी बद्दल आकाश पाटील यांचे…
यावल : तालुका प्रतिनिधी कोरोनाचा सत्सर्ंग रोखण्यासाठी तसेच वाढू नये म्हणून जिल्हास्तरावरून प्रशासन रात्रंदिवस परिश्रम घेत आहे,जिवनावश्यक, अत्यावश्यक गरजा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले असतांना मात्र यावल शहरात मुख्य रस्त्यावर आणि ठिक-ठिकाणी गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पायदळ चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे अनेक दुकानदार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पद्धतशीरपणे पायमल्ली करीत असून यावल नगरपालिका आणि यावल पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दंडात्मक कारवाई करताना दुकानदाराचे व्यवसायाचे स्वरूप, रूप, हितसंबंध वशिलेबाजी लक्षात घेऊन नाम मात्र कारवाई केले जात असल्याने नागरिकांमध्ये मात्र तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे याकडे जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी फैजपूर, डीवायएसपी फैजपूर यांनी लक्ष केंद्रीत करून…
रावेर : प्रतिनिधी सध्या कोरोनाची दुसरी लाट ही अतिशय घातक सिद्ध झाली आहे, सर्व सामान्य माणसाच्या जीवनात मोठं संकट उभे करत आहेत, या लाटेत खूप मोठ्या प्रमाणात युवा महिला पुरुष मरण पावत आहेत, याचं पार्श्वभूमीवर रावेर तालुक्यातील कुंभारखेडा गावांत ही मृत्यू दर दिवसेंदिवस वाढत असून गेल्या महिन्यात सुमारे २४ महिला- पुरुष यांचें अल्पशा आजाराने निधन झाले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि २१मार्च रोजी निर्मला बाई विकास बेलदार वय( ४२) यांचें निधन झाले . त्यांच दिवसांपासून सुनिल जंगले वय (४४ ),संतोष पाटील, वय (३५) बापू वेडू चौधरी, वय( ४०) संकू बाई विष्णू म्हसकर वय (६५) न्याजुदिद्न तडवी, वय( ३५)…
पाचोरा ः प्रतिनिधी तालुक्यातील डोगरगावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पंढरीनाथ मागो पाटील यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने डोगरगाव परिसरात शोककळा पसरली आहे. डोगरगावातील जनसामान्यांचा देव माणूस , एक सच्चा समाजसेवक आपल्यातून हरवला असल्याची भावना ग्रामस्थामधून उमटत आहे. गावांतील सरपंच म्हणून आपल्या कार्यकाळात अतिशय प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकिक होता. शनिवारी दु ३.३० वा. त्यांचे निधन झाले. गावात कोणीही आजारी पडले किंवा डीलव्हेर ऑपरेशन वैद्यकीय उपचार करायचे असले तर स्वता हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉ चर्चा करून सहकार्य करत होते. काही रुग्णांना स्वतः घरून जेवणाचा डब्बा पुरविणे, आर्थिक मदत करणे हे माणुकीचे काम करायचे तसेच लग्न कार्यात देखील आर्थिक…
जामनेर : प्रतिनिधी शेरी ग्रामपंचायतकडे मोफत पाणीसाठा असतांना विहीर अधिग्रहित करून शासनावार गरज नसतांना आर्थिक बोजा टाकून या विहिरी मधून पाणी उपसण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, पाझर तलावामध्ये आणी त्यातील विहीरींना मुबलक पाणी असतानां शेरी गावातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाई भासविण्याचा प्रकार शेरी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुरु असल्याचे चित्र आहे. मौजे शेरी तालुका जामनेर येथील १५०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात मागील १५ वर्षापासून शासनामार्फत साठवण तलाव बांधण्यात आला आहे त्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसात किमान २ वर्ष पुरेल एवढे पाणी साचत असते आणि शेरी ग्रामपंचायतने काही वर्षापूर्वी स्वखर्चाने साठवण तलावासाठी ज्या जमीनी अधिग्रहीत केल्या आहे. त्यामध्ये किमान ६० फूट खोल विहीरीचा उन्हाळ्यात पाझर…