Author: saimat team

अमळनेर : प्रतिनिधी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेचा आग्रह केला जात आहे. नागरिकांनी स्वतःची व परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन शासन व प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. पण परिसराचे सार्वजनिक आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या विभागाने मात्र आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र अमळनेर शहरातील सिंधी कॉलनीत दिसून येत आहे. परिसरात वेळोवेळी साफसफाई व स्वच्छता करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. आमच्या भागात सार्वजनिक ठिकाणी साफसफाई व स्वच्छतेची सुविधा कधी मिळणार असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. सिंधी कॉलनी हा संपूर्ण व्यापारी वर्गाचा परिसर आहे. रहिवासी नेहमीच आपल्या व्यवसायात व्यस्त असतात. व्यवसायासाठी या वस्तीपासून लांब गावात रोज ये -जा करावे लागते. या…

Read More

यावल : प्रतिनिधी येथील नगरपरिषदला आमदार शिरीष चौधरी यांनी वैशिष्ठपुर्ण विविध विकास कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजुर केला असुन तसे पत्र नगरपरिषदला प्राप्त झाले आहे. मागील आठवडयात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर आणी फैजपुर नगरपरिषदेच्या विकास कामांसाठी ४ कोटी ९२ लाखाचा निधी मंजुरीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण रावेर विधानसभा मतदार संघात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि यावल नगरपालिकेला आमदार चौधरी यांनी निधी का दिला नाही? यावल नगरपालिकेत कॉंग्रेसचे अधिकृत एकूण ७ सदस्य असताना निधी का मिळाला नाही? याबाबत राजकारणात चर्चा सुरू झाली होती, परंतु आमदार शिरीष चौधरी यांच्या मतदारसंघात येणारे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात आढळून येणार्‍या म्युकर मासकोसीसच्या रुग्णांवर उपचारासाठी लागणारी साधनसामुग्री व औषधे जिल्ह्यातच उपलब्ध करुन देण्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करुन देण्यात येईल. असे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री श्री. पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील म्युकर मासकोसीस वॉर्डास आज भेट देऊन तेथील पाहणी केली तसेच रुग्णांशीही संवाद साधला. त्यांनतर झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा रुग्णालयाचे प्रशासन डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचेसह महाविद्यालय व सामान्य…

Read More

मुंबई : प्रतिनिधी करोनाच्या दुसऱ्या लाटेत (Coronavirus Second Wave) राज्यभरात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला. परिणामी अनेक ठिकाणी उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. विशेषत: ग्रामीण भागात मृत्यूंचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं. महाराष्ट्रातील तब्बल १२ जिल्ह्यांमध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यूंचं प्रमाण दुप्पट झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, नंदुरबार, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यांत मृत्यूची संख्या पहिल्यापेक्षा दुप्पट झाली आहे. शहरी भागात दुसऱ्या लाटेतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र ग्रामीण भागाच्या तुलनेत चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णसंख्या वाढूनही शहरात मृत्यूंचं प्रमाण फारसं वाढलं नाही. दुसरीकडे,…

Read More

मुंबई :  प्रतिनिधी मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलं. पण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) परळीपुरतं मर्यादित राहिले. मी राज्याची मंत्री म्हणून काम करताना परळीच्या एखाद्या कामाकडे दुर्लक्ष झालं असावं पण धनंजय मुंडेंचं जिल्ह्यामध्ये वास्तव्य करताना इतर ठिकाणी फारसा वावर दिसत नाही. ज्या गुंड प्रवृत्ती आम्ही दाबून टाकल्या होत्या त्या पुन्हा बाहेर आल्या आहेत, अशी टीका पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केली. एका वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हते, म्हणून मी राजकारणात आले. मी राजकारणात येणार नव्हते. तेव्हाच्या परिस्थितीत असे म्हणत होते की, धनंजय निवडून येणार नाही,…

Read More

यूएफओवर(UFO) चित्रपट बनवणाऱ्या एका चित्रपट निर्मात्याने रडार फुटेज दाखविणारी एक व्हिडिओ क्लिप(Video clip) सामायिक केली असून दावा केला की सुमारे दोन वर्षांपूर्वी सॅन डिएगोच्या (San Diego) किनाऱ्यावरील अमेरिकेच्या नौदलाच्या (US Navy) जहाजावर कमीतकमी १४ यूएफओ दाखविण्यात आल्या आहेत. २०१९ मध्ये यूएसएस रसेलवर फिरत असलेल्या तीन यूएफओ दर्शविणार्‍या एका व्हिडिओची या वर्षाच्या सुरुवातीस नौदलाने पुष्टी केली आहे, हे उल्लेखनीय. अमेरिकेचे माजी नेव्ही लेफ्टनंट रायन ग्रेव्ह्स यांनी हा यूएफओना एक अज्ञात मिशनचा भाग असल्याचे म्हटले आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचेही ते म्हणालेत. एका मुलाखतीत ते म्हणाले की, त्यांनी २०१५ ते २०१७ दरम्यान अनेकवेळा यूएफओसारख्या वस्तू आकाशात उडताना बघितल्या आहेत.…

Read More

पुणेः करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील बाणेर कोविड सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याआधीही राज्यातील काही कोविड सेंटरमध्ये असे प्रकार घडले होते. बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रूग्ण व मृत्यू झालेल्या रूग्णांच्या अंगावरील दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:शुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे. शारदा अंबिलढगे आणि अनिल तुकाराम संगमे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये हे दोन कर्मचारी कामाला होते. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आलेले रुग्ण व करोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंगावरील दागिने हे दोन कर्मचाऱ्यांनी सापळा…

Read More

औरंगाबाद : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील मराठवाड्याचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज देवस्थान आणि परिसराचा विकास होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या देवस्थानाचा कायापालट करण्याचे आश्वासन सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना दिले होते. दिलेला शब्द खरा करत सत्तार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून दोन कोटींच्या निधीला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवली आहे. मागच्या अधिवेशनात या देवस्थानाचा ‘ ब ‘ वर्गाच्या तीर्थक्षेत्रात समावेश करून घेतल्यानंतर या क्षेत्राच्या विकासासाठी निधी मिळवण्याचा सत्तार सतत प्रयत्न करत होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोन कोटींच्या निधीला मंजुरी दिल्याने सत्तारांच्या प्रयत्नाला मोठे यश आले आहे. श्री सिद्धेश्वर…

Read More

करोनाच्या संसर्गामुळे सर्वच जण आरोग्याची काळजी घेत असताना दुधामध्ये भेसळ करून त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे. अंधेरी येथील एका चाळीमध्ये छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे तीनशे लिटर भेसळयुक्त दूध हस्तगत केले आहे. नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये हे दोघे पाणी आणि सुमार दर्जाची भुकटी मिसळून त्याची विक्री करीत होते. अंधेरी चार बंगला परिसरात पहाटेच्या वेळी दूध वितरण करण्यापूर्वी त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळले जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १०चे सहायक पोलिस निरीक्षक धनराज चौधरी यांना मिळाली. या परिसरातून दूध भेसळीच्या अनेक तक्रारी देखील पुढे आल्या. या…

Read More

डोंबिवली (ठाणे) : प्रतिनिधी कल्याण डोंबिवली महापालिकेने एप्रिल महिन्यापासून घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसुलीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, या वसुलीला भाजपने जोरदार विरोध केला असून, भाजप आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी शहरामध्ये ठिकठिकाणी पोस्टर लावत थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच लक्ष्य केले आहे. तसेच त्यांनी केडीएमसी प्रशासनावर देखील टीका केली आहे. “कचरा कर लादणाऱ्या केडीएमसीचा निषेध”, अशा शब्दात भाजपने शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी या कराच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मात्र आता हा वाद आता आणखीनच…

Read More