Author: saimat team

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने चंद्रपूरची दारूबंदी (liquor-ban-lifting) उठवली आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीकास्त्र सोडले. यासोबतच वाघ यांनी पाटील यांचा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. यवतमाळमधील दारूबंदीचं काय झालं? क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी ! असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी पाटील यांना केला आहे. वाघ यांनी ट्विट करून जयंत पाटील यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. सोबत त्यांनी विधानसभेतील जयंत पाटलांच्या भाषणाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. https://twitter.com/ChitraKWagh/status/1398530609585090562?s=20 क्या हुवा तेरा वादा… जयंतरावजी! सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळमध्ये दारूबंदी करणार…..इस आश्वासन का,…

Read More

सतत आमच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या भावनेतून शहर शिवसेनेतील राठोड समर्थक गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातूनच आता आगामी महापौरपदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेतील रिता शैलेश भाकरे व रोहिणी संजय शेंडगे (Rohini Shagane) या दोन नावांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. परवा, गुरुवारी शहरातील शिवसेनेचे काही पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मुंबईत गेले होते. या गटाचा महापौरपदासाठी राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा विचार असल्याने राठोड समर्थक गटाने आक्षेप नोंदवला आहे. त्या विरोधात आता निष्ठावान गट इच्छुक उमेदवार रिता भाकरे यांना समर्थन देण्यासाठी पुढे सरसावला आहे. उमेदवारी आणि सेनेच्या जास्तीत जास्त नगरसेवकांचा आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी रिता भाकरे यांनी काल, शुक्रवारी रात्री स्नेहभोजनासहित बैठक…

Read More

मुंबई :  प्रतिनिधी राज्य शासनाने वादळग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. मालवणमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळं मोठं नुकसान झालं असताना येथील आमदार, खासदार काय करतात? मदत फक्त भाजप  करत आहे, असेही ते म्हणाले .तौक्ते चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. फळबागा, शेतींनाही वादळाचा फटका बसला आहे. तर, अनेक गावं अजूनही अंधारात आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचा पाहणी दौरा सध्या सिंधुदुर्ग भागात सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही वादळग्रस्त भागांचा दौरा केला होता. त्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनीही शुक्रवारी दुपारी देवबाग येथील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद पोलिस स्टेशन हद्दीत महामार्गालगत जळगाव खुर्द शिवारात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. महामार्गा नजीक मुंजोबा मंदीराजवळ अंदाजे तिस वर्ष वयोगटातील तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. मृताचा चेहरा छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. मयताच्या हातावर इंग्रजीत एस जान, व एस एम तसेच स्टारचे चित्र गोंदलेले आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सदर मयत तरुणाबाबत कुणाला काही माहिती असल्यास नशिराबाद पोलिस स्टेशनला माहीती देण्याचे आवाहन करण्यात आले

Read More

नाशिक : प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीचे गंभीर आरोप झाल्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासह परिवहन विभागातील अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचा आरोप या तक्रारीत केला गेला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलीस…

Read More

नाशिक :  प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून जिल्ह्यात 40 ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण करण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाला 37 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकले असल्याचे प्रतिपादन, राज्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी.गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक…

Read More

सातारा, दि.28 (जिमाका) : जिल्ह्यातील प्रत्येक कोविड रुग्णालयात पूर्ण वेळ ऑडिटर नेमावेत तसेच मोठ्या गावात 30 बेडचे रुग्णालय सुरु करावे, कोविड सेवेतले कर्मचारी सोडून इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर विविध जबाबदाऱ्या द्या. येत्या काही दिवसात कोरोना संसर्ग साखळी तुटली पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री तथा…

Read More

सातारा : कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करता यावे यासाठी राज्य शासनाकडून सातारा जिल्ह्यासाठी 13 रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज झालेल्या लोकार्पण कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून 13 रुग्णवाहिका मिळालेल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार असून…

Read More

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ‘चंद्रकांत पाटील जागे असताना बोलले की झोपेत बोलले,’ असं म्हणत अजित पवार यांनी आपल्यावरील टीकेला उत्तर दिलं आहे. ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, अशी नवी गर्जना करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘राज्यात सत्ता नसल्याने भाजप नेते असह्य झाले आहेत. आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत आहे. आमचे सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं,’ असा सवाल यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड-१९ विषाणू…

Read More

रावेर : प्रतिनिधी गुरुवारी वादळी पावसाने तालुक्यातील तापी पट्ट्याला तडाखा दिल्यावर शुक्रवारी लोकप्रतिनिधी शेतकर्‍यांचे व नुकसानग्रस्तांचे आसू पुसण्यासाठी थेट बांधावर पोहचले. माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे, व मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील व तहसीलदार उषाराणी देवगुणे, श्वेता संचेती यांनी नुकसानग्रस्तांच्या घरांची व शेती शिवारात जाऊन केली बागांची नुकसानीची पाहणी केली. १५० कोटींच्या नुकसानीचा अंदाज रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील केळीचे सुमारे १५० कोटींच्या नुकसानीचा अंदाज ज्येष्ठ केळी तज्ञ के.बी. पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी केली. सर्व नुकसानीचे पंचनामे करा – खा. रक्षाताई खडसे खासदार रक्षाताई खडसे यांनी निंभोरासीम,…

Read More