Author: saimat team

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांना मान्यता कांदळवनाचे जतन करा, कांदळवन वृक्ष लागवड करा-मुख्यमंत्री मुंबई  : कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाच्या चौथ्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अहवालानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात १०६  संवेदनशील ठिकाणी एकूण २७९ सीसीटीव्ही  कॅमेरे लावले जातील.  यासाठीची ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम व मध्य मुंबई व तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई…

Read More

मुंबई- प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खार, मुंबई येथील रामकृष्ण आश्रम व मठाला भेट दिली. मठाच्या वतीने मंत्रोचारात राज्यपालांचे स्वागत करण्यात आले. राज्यपाल स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले. रामकृष्ण मिशनच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपालांनी मिशनद्वारे चालविल्या जाणाऱ्या हॉस्पिटलला अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी तसेच मिशनच्या शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडविण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. राज्यपालांनी त्यानंतर शारदा माता मंदिराला भेट दिली व उपस्थित साधुंशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांनी सत्संग भजन ऐकले व नामजपात सहभाग घेतला. रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद यांनी राज्यपालांचे स्वागत करताना आश्रमातर्फे चालविल्या जाणाऱ्या सेवाकार्याची तसेच इस्पितळाची माहिती दिली. मठाचे सहायक सचिव स्वामी अपरोक्षानंद, व्यवस्थापक स्वामी…

Read More

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ    मुंबई- प्रतिनिधी  मुंबईच्या विकासाबरोबरच सौंदर्यीकरणात भर घालून सुरक्षित, स्वच्छ आणि हरित मुंबईसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत पश्चिम द्रुतगती महामार्गावर नागरिकांसाठी सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा पर्यावरण मंत्री तथा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज कलानगर जंक्शन येथे शुभारंभ झाला. एमएमआरडीए चे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यावेळी उपस्थित होते. ही कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत, अशी अपेक्षा श्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी श्री ठाकरे म्हणाले, मुंबईत अधिक प्रमाणावर सुरक्षित आणि सुंदर अर्बन स्पेसेस तयार करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. वांद्रे येथील कलानगर जंक्शन ते विमानतळ या…

Read More

मुंबई- प्रतिनिधी गणेशोत्सव साजरा करतांना कोरोना निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर व सॅनिटायझर या कोरोना त्रिसूत्रीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून पर्यटनस्थळे खुली राहणार आहेत, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.…

Read More

मुंबई – प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून राज्य सरकारने दुसऱ्यांदा सर्वपक्षीय बैठक घेतली. सर्व पक्षांनी एकत्र येत यावर मार्ग काढावा यासाठी ह्या बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकीत ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकावे यासाठी इंपिरिकल डाटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीयांचे एकमत झाल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की भारत सरकारकडे इंपिरिकल डाटा तयार आहे. तो जर राज्याला दिला तर आरक्षणाचा प्रश्न मिटेल. फक्त महाराष्ट्रच नाही तर सर्व राज्यांचा इंपिरिकल डाटावर अधिकार आहे. आरक्षणप्रश्नी आयोजित केलेल्या या…

Read More

कुठल्याही तात्पुरत्या व्यवस्थेला काँग्रेस पक्षाचा विरोध मुंबई- प्रतिनिधी सुप्रीम कोर्टाने ५० टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा घालून दिली आहे त्यामुळे निर्माण झालेल्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी इम्पिरिकल डेटा मागास वर्ग आयोगाकडून प्राप्त करून घ्यावा. त्यासाठी आयोगाला लागणारी आर्थिक तरतूद करून द्यावी. प्रसंगी दोन तीन महिने निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या तर त्या पुढे ढकलाव्या परंतु ओबीसींचे राजकीय आरक्षण निश्चित झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी काँग्रेसची भूमिका असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, कुठल्याही तात्पुरत्या व्यवस्थेला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. कारण त्यामध्ये…

Read More

तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू… चिंता करू नका लवकर बरे व्हा हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार मुंबई-प्रतिनिधी ताई, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू…तुम्ही चिंता करू नका लवकर बरे व्हा, हल्लेखोरांवर निश्चित कडक कारवाई केली जाईल असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी बोलताना सांगून त्यांना धीर दिला. फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना श्रीमती पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यासध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे..ताई तुम्ही काळजी नका तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर शासन केले…

Read More

राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या ईडीचीच चर्चा सुरू आहे. ईडीच्या कारवाईप्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) नाराजी व्यक्त केली. ‘मला सांगा, धाडी कुठे पडल्या’, असा अजित पवारांनी केला. माझा दुरान्वये संबध नसताना बारामतीमधील एका जमिनीबद्दल उच्च न्यायालयामध्ये केस दाखल, अशी बातमी पाहण्यास मिळाली. यात काही संबध नसताना अशा खोट्या बातम्या समोर आणल्या जात आहे.’ यावरून पवार संतप्त पाहायला मिळाले. यावेळी अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “माझा दुरान्वये संबध नसताना बारामतीमधील एका जमिनीबद्दल हायकोर्टात केस दाखल, अशी बातमी पाहण्यास मिळाली. काही संबध नसताना अशा धादांत खोट्या बातम्या समोर आणल्या जात आहेत. यामुळे लोकांमधील माध्यमांवरील विश्वास उडत…

Read More

जळगाव – प्रतिनिधी कोरोनाचा गंभीरकाळ तसेच बदलत असलेले वातावरण यामुळे सुरळीत रक्तपुरवठा होण्याकरिता सर्वोच्च रक्तपेढ्यांमध्ये अडचणीत तसेच खंड पडत असल्याने गंभीर पीडित, प्रसूती करिता आलेल्या माता-भगिनी, हिमोफिलिया रुग्णांना सतत रक्ताची गरज भासते. याकरिता सामाजिक बांधिलकीतून सेंट्रल रेल्वे मजदूर संघ आयोजित सामाजिक सेवाभावी आरोग्य क्षेत्रात निरपेक्ष कार्य करणारी संस्था मुक्ती फाउंडेशन उपार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे विशेष आयोजन प्रवासी,रेल्वे कर्मचारी, अधिकारी आदीसाठी दिनांक 4 सप्टेंबर 2021 शनिवारी रोजी सकाळी 9.30 वाजता जळगाव रेल्वे स्थानक परिसर जुना उड्डाणपुलाजवळ असलेला रेल्वे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या सभागृह येथे आयोजित करण्यात आलेले आहे.जळगाव शासकीय रक्तपेढ्या मध्ये मर्यादित साठा असल्याने…

Read More

मामलदे(ता. चोपडा) – प्रतिनिधी येथे के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथील कृषिदूत चेतन पाटील यांनी ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत गावात शून्य ऊर्जेवर आधारित शीत कक्षाची उभारणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. काढणीनंतर फळांमध्ये काही जैविक आणि रासायनिक क्रिया होत असतात. फळे कमी तापमान व योग्य आर्द्रतेमध्ये साठवल्यास या क्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळे फळांचा साठवण कालावधी वाढण्यास मदत होते. असे वातावरण तयार करण्यासाठी शीतगृहाची आवश्यकता भासते व त्याची उभारणी ही अत्यंत महागडी असून, ती सर्वसामान्य शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसते. त्यांच्यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष प्रत्यक्ष बनवून दाखविले. याप्रसंगी शेतकरी सज्जनसिंग परदेशी , जीवन पाटील, दगडू…

Read More