Author: saimat team

आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची राज्य शासन पूर्ण काळजी घेईल रेल्वे कर्मचाऱ्यांचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचेही सहकार्य मागणार मुंबई-प्रतिनिधी  पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल. पुणे पोलिसांनी गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुन्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षात घेता रेल्वे राज्यमंत्र्यांशी…

Read More

मुंबई – प्रतिनिधी – भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकार्‍यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दिल्ली येथे आयपीएस व मुंबई येथेही काही अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी बैठका घेतल्याचे पुरावे असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. ईडी व सीबीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मविआच्या मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे. केंद्रसरकार या एजन्सींचा दुरुपयोग करत आहे. भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या विरोधात एक कहानी तयार करण्यात आली आहे असेही नवाब मलिक म्हणाले. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात…

Read More

चांदीवाल आयोगासमोर गैरहजर राहिल्याने वाॅरंट आयोगासमोर हजर राहून मिळावा लागेल जामीन प्रतिनिधी । मुंबई राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपयांच्या वसुलीसंदर्भात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधीत वॉरंट जारी केले आहे. वारंवार निर्देश देऊनही परमबीर सिंह आयोगापुढे हजर राहात नसल्याने मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान परमबीर यांनी चांदिवाल आयोगाच्या चौकशीला याचिकेतून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ज्यावर आता लवकरच सुनावणी होणे अपेक्षीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांच्यावरील १०० कोटी वसुली प्रकरणी याचिकेची दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. तर महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची समांतर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ढगफुटीमुळे 30 व 31 ऑगस्ट 2021 रोजी विविध नदी-नाल्यांना पूर येऊन चाळीसगावसह तालुक्यातील जवळपास 20 ते 25 गावांना त्याचा जोरदार फटका बसला. यात अनेकांच्या घरांसह विविध व्यावसायिक दालनांत पुराचे पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होऊन त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली. या आपत्तीग्रस्त कुटुंबांकरिता सामाजिक दातृत्व निभावत आपले कर्तव्य समजून जळगाव शिवसेनेने शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींना हाक दिली. या हाकेला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत विविध संसारोपयोगी वस्तू सस्नेह देण्यासाठी अनेकजण सरसावले. यामध्ये एका कुटुंबाला साधारणपणे 15 दिवस पुरेल एवढ्या संसारोपयोगी वस्तूंचे किट बॉक्स 510 कुटुंबांसाठी तयार करण्यात येऊन ते रविवार,…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भवरलाल जैन यांच्या पत्नी ‘कांताई’ यांचा आज स्मृती दिन तसेच शेती-मातीत राबणा-या शेतकऱ्यांचा सखा बैल यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. यानिमित्त शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी विचार जाता-येता डोळ्यांसमोर असावे, यासाठी भूमिपूत्राने घराच्या दर्शनी भागावर भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारांचे फलक अनावरण केले. धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील जी.नाना.पाटील गोशाळेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील हे त्या भूमिपूत्राचे नाव आहे. फलक अनावरणप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहकारी अनिल जोशी, अखिल भारतीय महिला बचत गटाच्या अध्यक्षा कृषीभुषण सौ.सुनंदा पाटील, सचिव छाया पाटील, सतखेडा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच कृषिभुषण शरद पाटील, आदर्श शेतकरी गंगाधर पाटील,…

Read More

जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील गावांना रात्री चक्रीवादळासह मुसळधार पावसाने झोडपले असून यामुळे मोठी हानी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच चाळीसगाव तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला होता. याच्या पाठोपाठ आता काल रात्री जामनेर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले आहे. तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे भागदरा तोंडापूर ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शासन स्तरावर तात्काळ पाहणी करावी अशी मागणी होत आहे. ओझर गावांमध्ये सोमवार रोजी रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ अतिवृष्टी झाली यामध्ये सुमारे ९० टक्के गावातील नागरिकांचे घरावरील पत्रे उडाले. घराची पडझड झाली. त्याचबरोबर संसार उपयोगी साहित्य यांचे मोठे नुकसान झाला आहे. भागदरा या…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । सिंगल वुमन फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना नारीरत्न पुरस्कार २०२० – २०२१ देऊन त्यांचा गौरव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या हस्ते मेहरुणमधील श्रीराम माध्यमिक विद्यालय येथे झाला. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी, सुदाम पाटील, विकास पवार , अशोक पाटील, पिनाझ फनीबंदा आदी उपस्थित होते. फाउंडेशनच्या अध्यक्ष मीनाक्षी चव्हाण यांनी संस्थेच्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली. या उपक्रम कार्यक्रमाचे कौतुक मान्यवरांनी केले. रोहिणी खडसे खेवलकर, अश्र्विनी देशमुख, सुषमा चौधरी, वंदना मधुकर पाटील यांना नारीरत्न पुरस्कार 2020 ते 21 चे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन वाय. एस. महाजन यांनी केले.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । वाघूर धरणाची पाणी पातळी आज दुपारी तीन वाजता 232.350 मीटर आहे. वाघुर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. रात्रीपर्यंत वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असा इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिला आहे. नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । येथील कोंबडी बाजार परिसरातील पंकज ऑटो शोरूममध्ये रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयाने लिफ्टच्या गाळ्यातून शोरूममध्ये प्रवेश करीत लॅपटॉप, मोबाईलसह किरकोळ रक्कम चोरून नेल्याची घटना आज दि. ७ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे. सविस्तर माहिती अशी आहे की, शहरातील कोंबडीबाजार परीसरातील पंकज ऑटो शोरूममध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत शोरूममधील लॅपटॉप, मोबाईलसह किरकोळ रक्कम चोरी केल्याचे सकाळच्या सुमारास उघडकीस आले. तसेच तिजोरी देखिल तोडल्याचे निदर्शनास आले, मात्र यातून किरकोळ रक्कम चोरी गेल्याचे देखील निदर्शनास आले आहे. घटनेची माहिती कळताच शहर पोलीस स्थानकात सदर घटनेची…

Read More

चाळीसगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पुन्‍हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सध्या तरी पाऊस कमी झाला आहे. मात्र नदीतील पाण्याची पातळी वाढली असून सावधानता म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असल्याची माहिती चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली आहे. चाळीसगाव तालुक्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे तालुक्‍यातील सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाल्याचे पाहायला मिळत आहेत. चितेगाव आणि उंबर ओहळ धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहत आहे. तितुर व डोंगरी या दोन्ही नद्यांना पाणी पातळी वाढत आहे. वाढत्या पाणी पातळी मुळे सावधानता म्हणून नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.

Read More