नवी दिल्ली, वृत्तसंस्था । खाद्यतेलाच्या वाढत्या भावाला लगाम घालण्यासाठी पाम तेलावरील आयात करात ५.५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे खाद्यतेल स्वस्त होईल. खाद्य तेलावरील आयात करात मागच्या महिन्यातही सरकारने कपात केली होती. मागील वर्षभरात खाद्य तेलाच्या दरात जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यावरून सरकारवर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर सरकारने आयात कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या पाम तेलावरील आयात कर ३०.२५ टक्के होता. तो आता २४.७ टक्के करण्यात आला आहे. नवा दर ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहील. रिफाइंड पामतेलावरील आयात करही ४१.२५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के करण्यात आला आहे. रिफाइंड सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल…
Author: saimat team
मुंबई, वृत्तसंस्था । ऐन गणेशोत्सवात राज्यावर अस्मानी संकट आले आहे. पुढील चार दिवसात मुंबई आणि राज्यभरातील विविध जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे. मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने कहर केला असतानाच आता बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हवामानात झालेल्या या उल्लेखनीय बदलामुळे चार ते पाच दिवसात पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यभरात पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. मुंबईत सातत्याने सरीवर सरी कोसळत असून, श्री गणेशाचे स्वागतदेखील वरूण राजाने मोठ्या थाटामाटात केले. शुक्रवारसोबत शनिवारीदेखील मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । गेल्या काही वर्षांत डिजिटल किंवा ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करण्याकडे कल वाढला आहे. कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाउन किंवा कडक निर्बंधांमुळे प्रत्यक्ष व्यवहारांवर मर्यादा आल्याने बहुतांश जणांनी ऑनलाइन पेमेंट प्रणाली वापरण्यावर भर दिल्याचं दिसून येतं. खरं तर आज ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी फोन पे, गुगल पे, पेटीएम अशी अनेक मोबाइल अॅप्स उपलब्ध आहेत. या अॅप्सवरून बिलं अदा करणं, खरेदी केल्यावर पेमेंट देण्यासह अगदी म्युच्युअल फंड, पॉलिसीचा प्रीमिअम भरण्यापर्यंत अनेक सुविधा दिल्या जातात. या अॅप्समधल्या वैविध्यपूर्ण सुविधांमुळे ऑनलाइन पेमेंट करणं अगदी सोपं झालं आहे. यात `गुगल पे` (Google Pay) हे अॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या लक्षणीय…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सिंधी कॉलनी येथील माहेर असलेली एक महिला पतीसोबत वाद झाल्याने माहेरी आली हाेती. गैरफायदा घेऊन लग्नाचे अामिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला. तत्पुर्वी संबधीत महिलेकडून २ लाख २५ हजार रुपये लाटल्याचा प्रकार घडल्याने पिडीतेच्या तक्रारीवरुन शनिवारी एमआयडीसी पोलिसांत कमलेश ऊर्फ बंटी जयपाल मखिजा रा. सिंधी कॉलनी जळगाव या तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला. ३१ वर्षीय विवाहीतेचे दुसरे लग्न झाले असून ती, विदर्भात पती व मुलासह वास्तव्यास आहे. मे महिन्यात पतीसोबत वाद झाल्याने…
जळगाव, प्रतिनिधी । चाळीसगावसह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर येऊन अनेक गावांतील लोकांचे संसार वाहून गेल्याने ते अक्षरशः रस्त्यावर आले. डोक्यावर छप्पर राहीले नाही. त्यामुळे अशा गरजू लोकांना जोपासण्यासाठी जळगावातील सेवा धर्म परिवारासह लायन्स क्लब, नारी शक्ती ग्रुप, कला सिद्धी फाउंडेशन, झाशीची राणी बचत गट आदी संस्था, संघटनांनी मदतीचा हात दिला आहे. चाळीसगावसह तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांमुळे उघड्यावर पडलेला संसार सावरण्यासाठी या सामाजिक संस्थांतर्फे ही मदत करण्यात आली. यात सामाजिक कार्यकर्त्या बेबी खोडपे, रमेशकुमार मुणोत, भारती रंधे, भारती कुमावत, सुमित्रा पाटील यांनी दिलेल्या मदतीच्या आधारे मोठ्या प्रमाणात कपडे, धान्य, किराणा आणि औषधांचे किट आपत्तीग्रस्त कुटुंबांना वाटप करण्यात आले. मदतीच्या वस्तू असलेल्या…
अमरावती : वृत्तसंस्था मुंबईत महिलेवर बलात्कारानंतर अमानुष अत्याचार केल्यानंतर झालेल्या मृत्यूमुळे संताप व्यक्त होत असतानाच अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमध्ये अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली आहे. बलात्कारानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती राहिली होती. पीडितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शवविच्छेदन झाल्यानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी शुक्रवारी येवदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत. पीडितेवर गेल्या नऊ…
दोन्ही कॉंग्रेसने आपल्या वाट्याला अत्यंत महत्त्वाची खाती घेवून आपले पारंपरिक कारभार सुरू ठेवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी त्यांना थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्ता सोडून जाणार नाही, असे माझा मित्र असलेल्या कॅबिनेट मंत्र्यानेच मला सांगितले आहे, अशी माहिती भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या कोणत्याही धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापुरात माध्यम प्रतिनिधीनींशी चर्चा करताना त्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला. पाटील म्हणाले, १२ बलुतेदार आणि नव्या १८ क्षेत्रातील असंघटित कामगारांना दरमहा पाच हजार रुपयांची मदत…
न्यू जनरेशन टोयोटा लँड क्रूजर बरीच चर्चेत असनू डिझाइन-फीचर्सच्या बाबतीत ही कार आकर्षक आहेच, पण सुरक्षेच्या कारणास्तव या दमदार एसयूव्हीच्या पुन्हा विक्री करण्यावर (रीसेल, पुनर्विक्री) कंपनीने बंदी घातली आहे. मात्र, पुन्हा विकणं तर दूरच पण सध्या ही कार खरेदी करणेही एक मोठा टास्क आहे. कारण, Toyota Land Cruiser च्या अनेक व्हेरिअंटवर वर्षांचा वेटिंग पीरियड सुरू आहे. Cars Guide च्या एका रिपोर्टनुसार, कंपनी नेक्स्ट जनरेशन लँड क्रूजरसाठी वेटिंग पीरियड ४ वर्षांपर्यंत वाढवत आहे. रिपोर्टनुसार, सप्लाय चेन अर्थात पुरवठा साखळीतील व्यत्यय यामागे कारण आहे. या एसयूव्हीची डिमांडही खूप जास्त आहे, पण टोयोटाला कम्पोनेंट्स (विशेषत: मायक्रोचिप्स) मिळणे कठीण जात आहे. तथापि, चार वर्षांपर्यंतचा वेटिंग पीरियड…
अमेरिकेतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी फोर्ड मोटर कंपनीने भारतातील आपल्या दोन्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमधील प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीने भारतीय बाजारपेठेतील दीर्घ काळाच्या संघर्षानंतर उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनी आता केवळ प्रीमियम कार पूर्ण बिल्ड युनिट (CBU) म्हणून विकणार आहे आणि विद्यमान ग्राहकांना सेवा, वॉरंटी आणि भागांची उपलब्धता यासारख्या सुविधा मिळत राहतील असे आश्वासन कंपनीने दिले आहे. पण, भारतातून आपला गाशा गुंडाळणारी फोर्ड ही काही पहिली ऑटोमोबाईल कंपनी नाहीये. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ मोठ्या कंपन्यांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये जगातील पाचव्या क्रमांकाची कार-बाजारपेठ असलेल्या भारतातून आपला व्यवसाय बंद केलाय. १. General Motors जनरल मोटर्सने भारतामध्ये १९९६…
लखनौ आगामी वर्षात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. यात उत्तर प्रदेशाचाही समावेश असून, या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलेले असेल. विशेष म्हणजे उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेससह इतर पक्ष मोठ्या तयारीनिशी उतरणार आहे. आणि अशातच शिवसेनेने राज्यातील सर्वच्या सर्व ४०३ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेची प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी भाजपवरही (BJP) गंभीर आरोप करण्यात आले. या बैठकीत शिवसेनेने (Shiv Sena) आरोप केला आहे, की भाजप सरकारच्या शासन काळात राज्यातील कायदा आणि सूव्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली असून महिलाही असुरक्षित आहेत. दारुलशफा येथे झालेल्या या बैठकीत राज्याचे प्रमुख ठाकूर अनिल सिंह म्हणाले, उत्तर प्रदेशातील योगी…