Author: saimat team

श्री गणेशाचे जल्लोष व प्रसन्न वातावरणात अनेकांकडे आगमन झाले आहे. गणेशाच्या आगमनाची तयारी आधीच आपल्याकडे सुरु होते. श्रीगणेशाला प्रिय नैवेद्य असो वा पत्री फुलं दुर्वा सर्व गोष्टीची जमवाजमव होत असते. गणपती बाप्पाला वाहण्याकरीता आवडीची फुले पत्र इत्यादी आणतांना त्यांची औषधी गुण त्यांचे आकार रुप गंध याची माहीतीही मिळते. निसर्ग आपल्या आरोग्याची किती काळजी घेतो हे देखील कळते. गणपतीला प्रिय असलेल्या वनस्पतींची आरोग्य हितकर माहिती बघूया – दूर्वा – गणपतीला दूर्वा अवश्य वाहिल्या जातात. दूर्वा या ऋतुत भरपूर उपलब्ध असतात. या दूर्वाचे औषधी गुण काय तर या उत्तम रक्तस्तंभक आहेत. नाकातून रक्त निघण्याचा त्रास होत असेल तर नाकात दूर्वारसाचे थेंब उपयुक्त…

Read More

संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या मनोहर उर्फ मामा भोसले (वय ३९, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला बारामतीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी पाच दिवस (१६ सप्टेंबरपर्यंत) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. शुक्रवारी (दि.१०) सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्महाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसले याला ताब्यात घेतले होते. त्याला सायंकाळी उशीरा बारामती तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. शनिवारी (दि.११) न्यायाधिशांपुढे त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. संत बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीची फसवणूक करण्यात आली असल्याची तक्रार आल्याने गुन्हा दाखल…

Read More

नाशिक – प्रतिनिधी  राज्यात अतिवृष्टीमुळे दुर्दैवी घटना घडत आहेत. दुर्दैवाने काही ठिकाणी अल्प पाऊस असून धरणसाठादेखील कमी आहे. तर काही भागात अतिवृष्टीमुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागणार असून, जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. नांदगाव मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील सभागृहात नांदगाव व मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुहास कांदे, जिल्हा परिषद सदस्य अश्विनी आहेर, पंचायत समिती सदस्य सुभाष कुटे,…

Read More

पारोळा – श्री गुरूमाऊली सेवानंदजी गुरू सुपडूनंदजी धुनिवाले महाराज यांच्या ८व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार ता, 13 रोजी भव्य रक्तदान शिबीर सांगवी, दरबार येथे आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षी पुण्यतिथी निमित्त सांगवी दरबार येथे विविध समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात.मात्र गेल्या दोन वर्षापासुन कोरोनाची परिस्थिती आहे. कोरोना काळात रक्ततुटवडा भासल्याने या वर्षी शासनाच्या नियमांचे पालन करुन सांगवी दरबारात रक्तदान शिबीर होणार असुन परिसरातील नागरिकांनी व तालुका पातळीवर रक्तदात्यांनी सहभागी होवुन या रक्तदान महायज्नात सहभागी होण्याचे आवाहन दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान सांगवी कडून करण्यात आले आहे. यावेळी रक्तदात्यांनी छोटू पाटील, सांगवी दरबार भ्रमणध्वनी 9960966100 यावर संपर्क करावा असे सुचित करण्यात आले आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । नेट-सेट परीक्षांच्या तयारीदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्या संदर्भग्रंथांचे वाचन केले पाहिजे, विविध घटकांचा अभ्यास करतांना कोणत्या अभ्यासपद्धती स्वीकारल्या पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरे मिळवीत याकरिता नेट-सेट परीक्षा प्रशिक्षण कार्यशाळा अत्यावश्यक आहेत. अशा कार्यशाळांचा उपयोग परीक्षार्थी विद्यार्थ्यांना निश्चितपणे होतो असे मत मू. जे. महाविद्यालयातील सामाजिकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. देवेंद्र इंगळे यांनी व्यक्त केले. मू. जे. महाविद्यालयातील भाषा प्रशाळेच्या वतीने दि. १ ते ९ सप्टेंबरदरम्यान आयोजित केलेल्या नेट-सेट परीक्षा प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयातील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या विषयांचे दुसऱ्या पेपरसाठीचे मार्गदर्शन दि. १ ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान या कार्यशाळेत करण्यात आले. डॉ.…

Read More

गांधीनगर  | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असून यामुळे राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. आता त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या एका वर्षाचा कालावधी उरला असताना रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा 7 वा वर्धापन दिन शनिवार दि.11 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त असोसिएशनतर्फे देशभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड, वृध्दाश्रम तसेच अनाथालयांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही प्रत्येक जिल्ह्यात असे सामाजिक उपक्रम राबवून वर्धापन दिन साजरा करण्यात येत असल्याची माहिती असोसिएशनचे महाराष्ट्र उपअध्यक्ष प्रशांत पांडे यांनी दिली. या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना जगताप यांनी सांगितले की, देशात मोबाईल रिटेलर्स क्षेत्रात लाखो बांधव कार्यरत आहेत. व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकीही असोसिएशनने कायम जपली आहे. संघटनेचा सातवा वर्धापन दिन साजरा करतानाही समाजपयोगी उपक्रम राबविण्याचे निर्देश संस्थापक चेअरमन कैलाश…

Read More

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील श्रीमती कसळाबाई शंकर पवार प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा, वरसाडे तांडा येथील विद्यालयातील कलाशिक्षक परशुराम पवार यांनी श्री चित्रगणेशाची स्थापना केली आहे. तसेच, ग्राम विकास मंडळाचे संचालक मिलिंद देव व क्षमा देव यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली आहे. यावेळी दोन्ही विभागातील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थितीत होते. पर्यावरण रक्षणासाठी, प्रदूषण रोखण्याची अत्यावश्यक गरज आहे. त्यासाठी प्लॅस्टिक, थर्माकोलपासून होणारे प्रदूषण टाळले पाहिजे. त्याच बरोबर सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारात आलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळेही प्रदूषणात दरवर्षी वाढ होत असते. कापडावर किंवा फळ्यावर चित्र साकारल्या मुळे कोणतेही नुकसान होत नाही. शंभर टक्के प्रदूषणमुक्त गणरायाची निर्मिती करून…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरातून २ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी महिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासाने दिलेल्या अहवालात आज जळगाव शहरातून दोन बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७२६ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे त्यापैकी १ लाख ४० हजार १२६ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसचे २ हजार ५७५ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सध्या जिल्ह्यात २५ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे अशी…

Read More

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारला जोरदार झटका बसलाय. निवडणुकांच्या तारखांत बदल करण्याचा, निवडणुका पुढे ढकलण्याचा किंवा निवडणुकांचं वेळापत्रक ठरवण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलंय. त्यामुळे ठाकरे सरकारसमोरचा पेच वाढणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसंबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले होते. त्यावर दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. यावेळी ठाकरे सरकारनं सर्वपक्षीय बैठकीत झालेला निर्णय न्यायालयापुढे मांडला. यावर आक्षेप घेत राज्य सरकार निवडणूक आयोगाच्या अधिकारांत हस्तक्षेप करत…

Read More