जळगाव, प्रतिनिधी । शहरापासून थोड्याच अंतरावर असलेले आसोदा येथील एका दुचाकीस्वाराला काठीसह विळ्याने वार केल्याची घटना ७ रोजीच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारेकऱ्यांवर तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसोदा येथे दुचाकीस्वाराला काठीसह विळ्याने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी मारहाण करणार्या तरुणासह त्याच्या कुटुंबातील चार जणांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आसोदा येथील कोळीवाडा येथे दिनेश जगन्नाथ साळुंखे (वय ३६) हा कुटुंबासह राहतो. ७ सप्टेंबर रोजी दिनेश हा बाजारपट्ट्यातून दुचाकीने घरी जात असतांना, रोहित मधुकर सपकाळे हा त्याच्या दुचाकीवर बसला. यावेळी दिनेशने रोहितकडे बघितले, त्याचा राग आल्याने रोहितने वाद घातला. हा वाद मिटल्यानंतर रोहित घरात असतांना, दिनेश याच्यासह…
Author: saimat team
मुंबई, वृत्तसंस्था । गाजलेल्या महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा देत मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. याप्रकरणी आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. मुंबई सत्र न्यायालयाने काल याबाबत निर्णय दिला.दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असे कोर्टाने निर्णय देताना म्हटले आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी या सहा जणांची निर्दोष…
मुंबई, प्रतिनिधी । आपल्या मतांची विभागणी न होवू देता आपण जागा वाटपामध्ये यशस्वी झालो तर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका महाविकास आघाडीकडे यायला निश्चितपणे मदत होईल असे वैयक्तिक मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वतंत्र पणे लढवणार असल्याचे स्टेटमेंट प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. कुणी काय स्टेटमेंट द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न व अधिकार आहे पण उद्याच्या निवडणूकांना सामोरे जात असताना प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय व भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तिघांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवायची की दोघांनी की, स्वतंत्र लढवायची हा तिथल्या जिल्हयाला अधिकार द्यावा असेही वैयक्तिक मत अजित पवार यांनी व्यक्त केले.…
जळगाव, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथे ह्रदय पिळुन टाकणारी घटना घडली आहे. विवाहित मुलासह आईने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. तालुक्यातील अंतुर्ली येथे काल रात्रीच्या सुमारास २४ वर्षीय विवाहित युवकासह त्याच्या आईने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली . आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही . मयत युवकाचे नाव नितीन पंढरीनाथ पाटील असुन त्याच्या आईचे नाव प्रतिभा पंढरीनाथ पाटील ( वय ४५ ) आहे. या दोघा माय लेकाने आत्महत्या का केली याचे कारण समजु शकले नाही. विहीरीतुन पट्टीचे पोहणार्यांनी आधी आईचे प्रेत काढले तर मुलाचे प्रेत नंतर सापडले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांचे प्रेत शवविच्छेदन साठी पाचोरा…
मुंबई, वृत्तसंस्था । मुस्लिमांना धार्मिक आधारावर नव्हे तर अल्पसंख्याक समुदाय म्हणून राजकीय प्रतिनिधित्व दिले पाहिजे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले काल परिक्रमा मार्ग गोपाळखार येथील श्री राधाप्रसाद धाम येथे आयोजित संगीत शिरोमणी स्वामी हरिदास आविर्भाव महोत्सवात सहभागी झाले होते. कार्यक्रमात आठवलेंनी पत्रकारांशी बोलताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवीसी यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. राजकीय पक्षांनी मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याचा विचार केला पाहिजे, पण तो धर्मावर नसून अल्पसंख्याक समुदाय असण्यावर असावा असे आठवले यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटींसह उत्तर प्रदेशात उमेदवार उभे करण्याची…
जळगाव, प्रतिनिधी । मालेगाव मित्र या साप्ताहिक पेपरमध्ये सोनार समाजाबद्दल बदनामीकारक लिखाण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे. ३ रोजी ‘मालेगाव मित्र’ या साप्ताहिक पेपरचे संपादक रामदास पगारे, मोबाईल: ८८८८३३९४६६ व उपसंपादक राजाराम पाटील,मोबाईल: ७७५५९७५१३२ यांनी रजि. नं. एम. ए. एच. बि. आय. एल./ ०३०२/२०२१ या साप्ताहिकात आमच्या सुवर्णकार समाजाचा बदनामीकारक मजकूर लिहिलेला आहे. यामुळे सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. सर्व सुवर्णकार समाजाच्या भावनांना ठेच पोहोचून सर्वांच्या आईवरून घाणेरड्या शब्दात उल्लेख करण्यात आलेला आहे. या लिखाणामुळे समाजात प्रक्षोभक पडसाद उमटत आहेत. तसेच सुवर्णकार व सराफ व्यावसायिकांच्या व्यवसायाबद्दल अत्यंत चुकीचे शब्दांकन केलेले आहे यामुळे समाजाच्या व्यवसायाबद्दल गैरसमज पसरू शकतो. अशा विक्षिप्त प्रवृत्तीवर त्वरित आळा बसावा…
काबूल : वृत्तसंस्था । तालिबानने अफगाणिस्तानात आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. पण बंदूकीच्या जोरावर वर्चस्व दाखविण्याची त्यांची जुनी सवय अद्यापही गेलेली नाही. तालिबानी दहशतवाद्यांनी आता काबूल स्थित नॉर्वेचा दुतावास काबीज केला आहे. शस्त्रांसह तालिबानी दूतावासात घुसले आणि सर्वकाही ताब्यात घेतले. तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी सरकार स्थापनेची घोषणा केल्यानंतर सांगितले की, परदेशी राजकारणी आणि दूतावासांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांना अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित वातावरण प्रदान केले जाईल. तालिबानच्या या कृत्याबद्दल इराणमधील नॉर्वेचे राजदूत सिग्वाल्ड हॉज यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी तालिबानचे काही फोटो देखील शेअर केले आहे. ते ट्विट करत म्हणाले, तालिबानने आता काबूलमधील नॉर्वे दूतावासाचा ताबा घेतला आहे.…
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मागील ऑगस्ट महिन्यात ११९ व्यक्तीवर सर्पदंश झाला म्हणून उपचार करण्यात आले आहे. सर्पदंश होऊ नये यासाठी शेतात फिरताना, घराजवळ काम करताना काळजी घ्यावी, सर्पदंश झाल्यावर उपचारासाठी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यावे, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांनी केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकूण ६२ पुरुष व ५७ महिला अशा ११९ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यात २ पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्यात शेतात काम करताना साप निघण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच घरांच्या जवळ असलेले कडेकपारीत देखील साप दडून बसलेले असतात. अशा वेळी…
जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील बालरोग व चिकित्साशास्त्र विभागात कोरोना महामारीमुळे बंद असलेला पोषण पुनर्वसन विभाग हा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा सुरु करण्यात आला. याठिकाणी कुपोषित बालकांवर उपचार करणे, त्यांची काळजी घेणे यासह डॉक्टरांकडून देखरेख ठेवली जाते. जिल्हयातील कुपोषित बालकांचे आहार आणि औषोधपचाराने पुनर्वसन करण्यात येत आहेत. रुग्णालयात बाल रोग व चिकित्सा विभागात ५ खाटांचा हा विभाग असून जिल्हृयातील कुपोषित बालकांसाठीचे हे केंद्र आहे. कोरोना महामारीच्या काळात हे केंद्र बंद होते. हे केंद्र आता सुरु करण्यात आले आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी…
एरंडोल: प्रतिनिधी येथे २०२१ या वर्षात ४५ विजचोरी करणार्या ग्राहक आढळुन आले असता त्यांचेकडून ५लाख ८३हजार ३४५ रूपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहीती पञकार शैलेश चौधरी यांनी विचारलेल्या माहीतीच्या अधिकारातून एरंडोल विज उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता महाजन यांनी दिली आहे. शैलेश चौधरी यांनी विजप्रशासनाकडे माहीतीच्या अधिकारात सन २०२०ते१९जुलै २०२१ दरम्यान च्या शहरातील एकूण विजचोर्या,सन २०ते२१ मधील विजचोरी मोहीमेचा कालावधी कुठुन कुठपर्यंत होता/आहे,औद्योगिक प्रतीष्ठानांना असलेले दर ई. बाबत माहीती मागीतली असता विजचोरी प्रकरणातील ग्राहकांची विगतवारी दिली नाही या मागे नेमके गौडबंगाल काय? तसेच जिल्हा भरारी पथकाकडून सुचना आल्यावरच स्थानिक विज प्रशासन विजचोरी ची मोहीम राबवते.अशी तोंडी माहीती उपअभियंता महाजन…