Author: saimat team

जळगाव प्रतिनिधी | आज राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी दिलेले राजीनामे मागे घ्यावेत असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अभिषेक पाटील यांनी केले आहे. कालच अभिषेक पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. याचे आज अतिशय संतप्त पडसाद उमटले. आज पक्षाच्या जिल्हा कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधून १२ आघाड्यांचे प्रमुख आणि कार्यकारण्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन अभिषेक पाटील यांना पाठींबा दिली. यानंतर सायंकाळी अभिषेक पाटील यांनी आपल्या समर्थकांना राजीनामे मागे घेण्याचे आवाहन केले. या संदर्भात अभिषेक पाटील यांनी जारी केलेले पत्र खालीलप्रमाणे आहे. :- पक्षातील माझ्या मित्र मंडळी साठी, संकटाच्या किंवा वाईट काळात जो सोबत असतो तोच…

Read More

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील मौजे विचखेडा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या बांधकामासाठी ठिकठिकाणी खड्डे करण्यात आले आहे. दरम्यान, बैलांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह दोन्ही बैल, माळी कुटुंब खड्ड्यात बुडाले. ही घटना सभोवतालच्या नागरिकांना कळताच माळी कुटुंबा वाचविण्यात यश आले. मात्र, या घटनेत दोघ बैलांच्या मृत्यु झाला आहे. तालुक्यातील मौजे विचखेडा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात बोभाट्या नाल्यावर पुल बांधकामासाठी शेतकऱ्यांसाठी दळणवळणाच्या भर शेतरस्त्यात खोलवर खोदकाम करून खड्डे करण्यात आलेले आहे. सदर ठिकाणी कुठेही सुचना फलक अथवा मार्गदर्शन चिन्ह लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यावरून वापरणाऱ्यांना कुठलाच अंदाज येत नाही. दिनांक १०…

Read More

पुणे, वृत्तसंस्था । मुंबई, पुण्यासह आज राज्यभरात गणरायाचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. कोरोनाचे नियम पाळून सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका भक्तानं तब्बल 10 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. सध्या पुण्यासह संपूर्ण राज्यात या 10 किलो सोन्याच्या मुकुटाची चर्चा सुरू आहे. या सोन्याच्या मुकुटाची किंमत सुमारे 6 कोटी रुपये इतकी आहे. सोन्याचा मुकूट बाप्पाचरणी देणाऱ्याचं नाव मात्र मंदिर प्रशासनानं गुपित ठेवलंय. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं ट्रस्टच्या 129व्या वर्षी सकाळी श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानंतर हा 10 किलो सोन्याचा मुकूट बाप्पाला घालण्यात आला. ऑनलाईन आरतीची…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ४० वर्षीय शेतमजूराने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत झालेल्या शेतमजुरांचे नाव प्रेमराज ठाकूर राठोड (वय ४०) हे आहे. तालुक्यातील वसंतवाडी येथे प्रेमराज राठोड हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. शेतमजुरी करून कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करायचे. पत्नी बाहेरगावी गेली होती. त्यामुळे ते व त्यांचे मुले हे घरी होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी दोन्ही मुले कामाला निघून गेले. त्यातच घरात कुणी नसताना प्रेमराज राठोड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. काही लहान मुले राठोड यांच्या घराबाहेर लपाछपी खेळीत होते. एक चिमुकला हा राठोड यांच्या घराकडे लपण्यासाठी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । रोटरीच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य, मदत गरजूंपर्यंत पोहचवा. गरजूंना मिळालेल्या सुविधेमुळे त्यांच्या चेहऱ््यावरील समाधान आणि दुसऱ््यांसाठी काही तरी चांगले काम केल्याचा आनंद वेगळाच असतो. या सामाजिक कार्याच्या सुखा, समाधानाचे धनी व्हा, असे आवाहन रोटरी क्लब जळगाव ईलाइटच्या ऑफिशियली क्लब व्हिजिटप्रसंगी प्रांतपाल रमेश मेहर (नाशिक) यांनी केले. हा समारंभ मायादेवीनगरातील रोटरी सभागृहात झाला. व्यासपीठावर मेहर यांच्यासह सहाय्यक प्रांतपालक विष्णू भंगाळे, क्लबचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप असोदेकर उपस्थित होते. प्रांतपाल मेहर यांनी जळगाव दौऱ््याप्रसंगी रोटरी क्लब जळगाव ईलाइटला भेट दिली. त्यांनी या क्लबच्या कार्याचा आढावा घेतला. मेहर यांनी क्लबच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पदाधिकारी यांचा गौरव केला. तर नूतन सदस्य व…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील बालनाट्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे जुने जाणते रंगकर्मी संजय निकुंभ यांच्या समता नगर परिसरातील धामणगाव वाडा भागातील पार्टीशन वजा पत्रीघरावर अतिवृष्टीदरम्यान अंगणातील झाड कोसळून घर जमीनदोस्त झाले. या दुर्घटनेत संजय निकुंभ हे त्यांच्या कुटुंबियांसह थोडक्यात बचावले आहे. झाड कोसळण्याच्या काही क्षण आधी संजय निकुंभ तांदूळ धुण्यासाठी म्हणून घराबाहेर आले होते. घराच्या आतील खोलीवर मागील बाजूस राहणाऱ्या श्री.तडवी यांच्या अंगणातील झाड वादळी पावसाने कोसळले. झाड कोसळल्याने संजय निकुंभ यांच्या घराचा सरा तुटून पत्रे व दगडगोटे घरावर पडून त्यांच्या संपूर्ण घराचे अतोनात नुकसान झाले आहे. पुढील खोलीत बसलेले संजय निकुंभ यांचे वडील थोडक्यात बचावले आहे. झाड कोसळल्यानंतर निकुंभ…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर येथील एकाच गाव मध्ये राहणाऱ्या व एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी पहूर पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील पहूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारे दोन भाऊ कुटुंबियांसह १६ वर्षाची आणि दोन १५ वर्षाच्या अशा तीन मुलींसह राहतात. ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११.३० वाजेच्या सुमारास घरातच्या वाड्यातून तीनही अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली. याप्रकरणी पालकांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतू मुली कुठेच आढळून आल्या नाहीत. रात्री १० वाजता पालकांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे मंगळवार, दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी 100 टक्के पूर्ण भरले. त्या अनुषंगाने हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आज गुरुवार, दि. 9 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, शिवसैनिक श्री.गजानन मालपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणस्थळी मेहरुणमधील रहिवासी श्री.युवराज तांबे व सौ.वंदना तांबे या दाम्पत्याला जलपूजनाचा मान देण्यात आला. त्यानंतर तांबे दाम्पत्याने सपत्नीक साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व केमिस्ट श्री.श्यामकांत भांडारकर, विद्युत अभियंता श्री.विलास पाटील यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी तांबे दाम्पत्यासह महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 पासून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दौरा असा : शुक्रवार 10 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता पाळधी, ता. धरणगाव येथून ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेरकडे प्रयाण, सकाळी 9 वाजता ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सकाळी 9.20 वाजता ओझर बु. व ओझर खु. ता. जामनेर येथून हिंगणे न.क. ता. जामनेरकडे प्रयाण, सकाळी 9.30 वाजता हिंगणे न.क. ता. जामनेर येथे आगमन व पूरग्रस्तांच्या भेटी, सकाळी 9.50 वाजता हिंगणे न.क. ता.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । रोटरी क्लब जळगाव ईलाइटतर्फे आयोजित मोफत २० दिवसीय बेसिक ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोप स्वातंत्र्य चौकाजवळील इंडिया प्लाझामध्ये झाला. या शिबिराचा लाभ ४० प्रशिक्षणार्थिंनी घेतला. त्यांना प्रांतपाल रमेश मेहर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर सहाय्यक प्रांतपाल विष्णू भंगाळे, प्रशिक्षिका लीना झोपे, क्लबचे अध्यक्ष नितीन इंगळे, सचिव संदीप असोदेकर, व्होकेशनल कमिटी चेअरमन मनीषा पाटील उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे आत्मनिर्भर होऊन स्वयंरोजगाराची प्रेरणा मिळाली. या प्रशिक्षणात बेसिक ब्युटी पार्लरचे ज्ञान मिळाले. यात अॅडव्हाॅन्स कोर्सची भर टाकून स्वमालकीचे ब्युटी पार्लर सुरू करता येईल. त्यामुळे स्वयंरोजगार उभारुन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल, असे मत प्रशिक्षणार्थी हर्षदा पाटील, नम्रता…

Read More