Author: saimat team

चाळीसगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार असलेल्या आरोपीला चाळीसगाव शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी जाऊन त्याला रंगेहाथ अटक केली आहे. नेम चाळीसगाव शहर पोलीस स्थानक सरकारतर्फे शैलेंद्र आत्माराम पाटील फिर्याद देतो की मी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गेल्या 02 वर्षापासुन नेमणुकीस आहे. आज दि.13 सप्टेंबी रोजी चाळीसगाव शहरात पोलीस निरीक्षक के.के पाटील यांच्या आदेशाप्रमाणे दिवसा गस्ती करण्याबाबत तोंडी आदेश दिल्याने सपोनि कापडनीस ,सफौ.2727 अनिल अहिरे, पो.काँ.2367 अमोल भोसले असे खाजगी वाहनाने रवाना झालो. त्यावेळी गोपनिय माहीती मिळाली की, चाळीसगांव शहरातुन हद्दपार करण्यात आलेला इसम अक्षय भानुदास पाटील हा चाळीसगांव शहरात बस स्टड चे पाठीमागे फिरत आहे त्यानुसार…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घृण बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना असून एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे. जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे जेणेकरून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी असे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. मुंबईची एक सुरक्षित शहर अशी प्रतिमा आहे आणि या एका घटनेमुळे ती डागाळणार नाही याची काळजी घेण्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. साकीनाका येथील घटनेबाबत…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोळी पेठेतील आंबेडकर नगर येथे सलग दुसऱ्या दिवशीही खून झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. शहरात एकच खळबळ उडाली आहे जळगाव शहरातील निमखेडी रोड परिसरात एकाचा खून झाल्याने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज शहरात पुन्हा एक नवीन खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. सविस्तर माहिती अशी आहे की, शहरातील निमखेडी रोड परिसरात एका व्यक्तीला कौटुंबिक वादातून त्याच्याच दोन्ही मुलांनी संपवण्याची भयंकर घटना घडली होती. याप्रकरणी कालच दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. खुद्द जन्मदात्या बापाचा खून करण्याच्या या कृत्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान यानंतर आज शहरात पुन्हा एक खून झाला…

Read More

अमळनेर, प्रतिनिधी । शहरातील ढेकुरोडवरील एका ३४ वर्षीय विवाहितेने घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शहरातील ढेकूरोडवरील एका तरुण विवाहित महिलेने घरात आेढणी व दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना १२ रोजी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास आनंद कॉलनीत घडली. सोनिया घन:श्याम काटे (वय ३४) असे त्या महिलेचे नाव आहे. सोनिया यांचे पती घन:श्याम मुरलीधर काटे हे मंगळग्रह मंदिरात रात्र पाळीला ड्युटीला गेले असता सोनियाने घरात गळफास घेतला. ती मानसिक रुग्ण होती. धुळे येथील डॉ. गौतम शहा यांच्याकडे उपचार सुरू होते, अशी माहिती पती घन:श्याम…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे. एका विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षाच्या महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करून तिची हत्या केली. गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने अबलेची रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. त्यावरून, विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात कायद्याचा धाक उरला नसल्याचंही भाजपाने म्हटले आहे. त्यामुळे, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात असे कायद्याचेच राज्य आहे. विरोधकांनी साकीनाका बलात्कारप्रकरणी कितीही धुरळा उडवला तरी कायद्याच्या राज्यास तडा जाणार नाही. विरोधी पक्षनेते सांगतात, त्याप्रमाणे त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईल. कोणत्या विषयाचे…

Read More

नवी दिल्ली, प्रतिनिधी । सरकारी तेल कंपन्यांनी आजसाठी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) साठी नवे दर जारी केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज (सोमवार) म्हणजेच, 13 सप्टेंबर रोजी पेट्रोल-डीझेल दोन्ही इंधनांच्या किरकोळ किमतीत कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान, आज सलग आठव्या दिवशी पेट्रोल-डीझेलच्या किमती स्थिर आहेत. देशभरात आजही पेट्रोल-डिझेलचे दर ऐतिहासिक उंचीवर आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमती 101.19 रुपये आणि डिझेलच्या किमती 88.62 रुपये प्रति लिटरवर स्थित आहेत. तर मुंबईत पेट्रोलच्या किमती 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 96.19 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. घरगुती बाजारात इंधनाच्या किमतींमध्ये आज कोणताही बदल झालेला नसला…

Read More

यवतमाळ, प्रतिनिधी । पोलिस म्हणजे चोवीस तास जनतेच्या सेवेत तत्परतेने हजर असलेला कर्मचारी. ऊन-वारा-पाऊस काहीही असो, तो कर्तव्यावर हजर दिसणारच. िशवाय पोलिसांची सेवा हीच मुळात चोवीस तास सेवा मानली जाते. हे कर्तव्य बजावताना त्यांना आलेला थकवा आणि इतर अडचणी कर्तव्यापुढे गौण ठरतात. अशा या जनतेच्या सेवकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. किमान साप्ताहिक सुटीचा पुरेपूर आनंद या पोलिसांना आता उपभोगता येईल. कारण, साप्ताहिक सुटीच्या आदल्या दिवशी या पोलिसांना आता रात्रपाळीची ड्यूटी दिली जाणार नाही. रजा असो वा सुटी, अत्यावश्यक सेवा म्हणून कोणत्याही क्षणी कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश आले की पोलिसांना हजर राहावेच लागते. शिवाय साप्ताहिक सुटीचा दिवस कसाबसा तणावाविना जाईल म्हटले…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । स्वर्गीय किसन नाले स्मरणार्थ ऍडव्हान्स आय केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्ररोग तपासणी डॉ,राहुल महाजन यांनी केले, कार्यक्रमाची सुरुवात महापौर जयश्री महाजन व उपस्थितांनी श्री गणेश उत्सवाची आरती करून केली. यावेळी महापौर जयश्री महाजन यांच्या शुभहस्ते सुनिल दाभाडे यांचा महापौरांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर म्हणाल्या की, सुनिल दाभाडे हे जळगांव चे भुषण आहे. उपक्रमशील शिक्षक आहे. सरांचा आम्हाला अभिमान वाटतो. सुनिल दाभाडे यांनी GUINNESS WORLD RECORDS मध्ये नोंद झाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन. त्यांनी कोरोना काळात अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. तसेच कोरोना विषयी जनजागृती केली आहे. त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, एस एस एस…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । संपूर्ण राज्यात महिलांवर व मुलींवर अत्याचार, बलात्काराचे प्रकार समोर येत आहे. पुणे शहरातील १४ वर्षीय चिमुरडीवर पुण्यातील एकूण १३ नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दि. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर या कालावधीत घडली. मुंबईतील साकिनाका येथेही 30 वर्षीय महिलेवर बलात्कार करून गुप्तांगांमध्ये रॉड घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये दिवसंदिवस महिला अत्याचाराच प्रमाण वाढत असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव तर्फ निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना आपले राज्यकर्ते कोणत्या धुंदीत दंग आहेत असा प्रश्न यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. महिला अत्याचारावरील खटले फास्टट्रॅक मोडमध्ये चालावेत व महिला अत्याचारा संबंधित एक…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पैसे मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस काम करतात. काही शारीरिक श्रम करतात, काही बौद्धिक श्रम करतात. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लोक मेहनत करत राहतात. प्रत्येक व्यक्तीला त्याच्याकडे पैशाची कमतरता नसावी, असं वाटतं. वास्तुशास्त्राचाही (Vastu Tips) आधार घेतला जातो. घरात वास्तुशास्त्रानुसार काही बदल केल्यानंतर तुमच्या आयुष्यात आनंदच नाही तर, व्यक्तीच्या आयुष्यातून आर्थिक त्रास आणि सर्व प्रकारचे दु: खही दूर होतात, असं म्हटलं जातं. हे करून पहा देवी लक्ष्मी संपन्नतेची देवता आहे. ती घरात राहण्यासाठी लोक सर्व उपाय करतात. परंतु, जर तुमच्या घरात शांतता नसेल, तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील आणि तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल तर, तुमच्या घरात चांदीचा…

Read More