Author: saimat team

जळगाव प्रतिनिधी | बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून जळगाव महापालिकेचे सहायक आयुक्त आकाश डोईफोडे यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नगरविकास खात्याने जारी केलेल्या निर्देशानुसार जळगाव महापालिकेत सध्या सहायक आयुक्तपदी असणारे आकाश डोईफोडे यांची बोदवड येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. डोईफोडे आता बोदवड येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ते लवकरच आपला कार्यभार सांभाळण्याची शक्यता आहे. बोदवड नगरपंचायतीच्या विकासकामांना आकाश डोईफोडे यांच्या नियुक्तीने वेग येण्याची शक्यता आहे.

Read More

लातूर, वृत्तसंस्था । लातूर जिल्ह्यातील लातूर आणि उदगीर बाजार समितीमध्ये मराठवाड्यातील अनेक भागातून तसेच कर्नाटक,आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतूनही शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. उदगीर आणि लातूर मार्केट यार्डात खरिपातील नवीन मुगापाठोपाठ उडदाची आवक सुरू झाली आहे. यामुळे बाजारात उत्साह संचारला असून शेतमालाला आधारभूत किमतीपेक्षा अधिकची रक्कम मिळत आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. पावसामुळे शेतमालाला डाग पडल्याने भावात फरक पडला आहे, असं असून ही सहा हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव आता उडदाला मिळत आहे. तो भाव आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि लातूर मोठी बाजारपेठ…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलीय. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या शहरात महिलेवर अशाप्रकारे अत्याचार होत असतील तर इतर शहरांमधील परिस्थितीत काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले आहे. पोलिसांना संबंधित परिसरात काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपीचे दुष्कृत्य कैद झालं आहे. रात्रीच्या अंधारामुळे सीसीटीव्हीत फारसं स्पष्ट दिसत नाहीय. पण परिसरात संशयास्पद घटना घडतेय, ते स्पष्टपणे जाणवत आहे. काय आहे प्रकरण मुंबईच्या साकीनाका…

Read More

अहमदनगर, वृत्तसंस्था । पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता अहमदनगरमध्ये अशाच प्रकारची संतापजनक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील उक्कडगावच्या महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण व अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सरपंच महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. महिला सरपंचाला मारहाणीच्या लागोपाठच्या घडलेल्या घटनांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून महिला सरपंचावरील मारहाणीविरोधात आवाज उठवला आहे. ही मारहाण करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि गुंडशाहीचा धुडगूस थांबवण्यात यावा, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे. महिला सरपंचाने व्हिडीओमधून गंभीर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । मराठीतले सुप्रसिद्ध कवी पद्मश्री कविवर्य ना. धो. महानोर यांच्या पत्नी सौ सुलोचना महानोर यांचे वृद्धापकाळाने आज (दि.१० सप्टेंबर) रोजी दुपारी बारा वाजता दुःखद निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. मृत्युसमयी त्यांचे वय 79 वर्षे होते. शेती, साहित्य आणि रानात रमलेल्या कविवर्य महानोर यांच्या सहचारिणी म्हणून त्यांनी भक्कम साथ दिली. त्यांच्या पश्चात पती, 2 कन्या, 2 पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सौ महानोर यांच्यावर जळगाव येथे इलाज सुरू होता. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती, अस्वस्थता ही वाढली होती. त्यांना जळगाव येथून त्यांच्या पळसखेडे येथील शेतात नेले व तिथे त्यांनी अंतिम श्वास घेतला.

Read More

यावल प्रतिनिधी  आ.शिरीष चौधरी यांच्या स्थानिक विकास निधीतून यावल ग्रामीण रुग्णालयास अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या कार्डियाक रुग्णवाहिका देण्यात आली असून शुक्रवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार शिरीष चौधरी यांनी कोरोना संसर्गाच्या अतिश्य दुदैवी व संकटमय काळातील घटनांवर प्रकाश टाकून रुग्णालयास ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिकेची गरज असल्याचे सांगितले असता येथील ग्रामीण रुग्णालयात स्थानिक आमदार विकास निधीतून आमदार शिरीष चौधरी यांनी रुग्णांच्या सेवेसाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात कार्डियाक ही अत्याधुनिक यंत्रणा असलेली रुग्णवाहिका अर्पण केली. या रुग्णवाहीका लोकापर्ण सोहळ्याच्या प्रसंगी जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

Read More

यावल प्रतिनिधी । येथील शिवाजीनगरातील एका तरुणाने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तरुणास तात्काळ उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल शहरातील शिवाजीनगर या परिसरातील खालच्या वाड्यातील राहणारे दिलीप भगवान पाटील (वय४oवर्ष) शेतमजुर यांनी आज दि.१० सप्टेंबर रोजी सकाळी १o वाजेच्या सुमारास यांच्या शेतात संतापाच्या भरात काही तरी विषारी द्रव्यसेवन करुन आत्महत्याचा प्रयत्न केला. ही बाब कळताच दिलीप पाटील यांना युवकांच्या मदतीने तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांनी प्रथम औषद्य उपचार केले. मात्र रूग्णाची प्रकृती ही अधिक खालावल्याने दिलीप…

Read More

पाचोरा प्रतिनिधी । आ.किशोर पाटील यांचे भडगाव रोडवरील “शिवालय” या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. आमदार किशोर पाटील यांनी विधिवत पूजन करून श्री गणेशाची स्थापना केली. यावेळी आ. किशोर पाटील यांनी गणरायाकडे कोरोना महामारी संपुष्टात येवु दे, नागरिकांना उत्तम आरोग्य लाभु दे तसेच शेतकऱ्यांवर ओढवले आसमानी संकट पेलण्याची शक्ती दे असे साकडे घातले. अतिशय भक्तिमय वातावरणात श्री गणेशाचे आगमन झाले.

Read More

राज्यात आज दिवसभरात ४ हजार ५२४ रूग्ण करोनामधून बरे झाले, तर ४ हजार १५४ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली. याशिवाय, ४४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९९,७६० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०५ टक्के एवढे झाले आहे. आता…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील सराफा दुकानात अज्ञात दोन जणांनी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बहाणाकरून सुमारे ६ लाख ६१ हजार ५०० रूपये किंमतीचे दागिने घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी दुकान मालक यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरुण मुरलीधर बाविस्कर (वय-७१) रा. राजेंद्र प्रसादरोड, पीपल्स बँकेजवळ चाळीसगाव यांचे त्यांच्या घरासमोर उदय ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे. काल ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता दोन व्यक्ती त्यांच्या दुकानावर आले. आपण ग्राहक असल्याचे भासवून त्यांनी सोन्याचे दागिने पाहण्यासाठी घेतले. दोन्ही संशयितांनी ७० हजार रुपये किमतीचे १०…

Read More