Author: saimat team

नागपूर : पशुवैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे प्राण्यांच्या आरोग्य विषयक शस्त्रक्रिया  व औषधोपचाराची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर नागपूरसह छत्तीसगड, मध्य प्रदेशातील पशुधनाला याचा फायदा मिळेल, असे प्रतिपादन दुग्ध व्यवसाय विकास, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले. राष्ट्रीय कृषी  विकास योजनेंतर्गत 6 कोटी 91 लाख रुपये निधी खर्चून पशु वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या पशु वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलाचे लोकार्पण केंद्रीय रास्ते विकास  व महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री. केदार बोलत होते. खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार अभिजीत वंजारी, मापसूचे कुलगुरु डॉ. ए. एम. पातुरकर, पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे ए. पी. सोमकुवर, कार्यकारी परिषदेचे डॉ. सुधीर दिवे,…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । हॉकी महाराष्ट्राच्या वतीने बालेवाडी पुणे येथे १४ सप्टेंबर रोजी १९ वर्षाच्या आतील मुलांची राज्य संघासाठी तर महिलांची १७ सप्टेंबर रोजी निवड चाचणी आयोजित केली असल्याने त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट ८ मुलांची तर महिलांमध्ये सहा मुलींची निवड हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांनी शनिवारी घोषित केली. निवड समिती सदस्य म्हणून राज्य प्रशिक्षक अरविंद खांडेकर , एनआयएस प्रशिक्षक लियाकतअली सय्यद, इकराचे क्रीडाशिक्षक मुजफ्फर शेख, निवड करून अंतिम यादी हॉकी जळगाव यांना सुपूर्द केली. मुलांचा संघ हा १३ सप्टेंबरला जळगावहून रवाना होत असून प्रशिक्षक म्हणून सय्यद लियाकत अली व व्यवस्थापक म्हणून सत्यनारायण पवार हे काम बघणार आहेत. महिलांचा संघ…

Read More

यावल प्रतिनिधी । येथील गणपती नगरातील एका आदिवासी तरुणाचा डेंग्यूच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल शहरातील विस्तारित क्षेत्रातील वसाहतील गणपती नगर मध्ये राहणारा उच्चशिक्षित आदीवासी तरूण सादीक गनी तडवी (वय२३ वर्ष) या तरूणास दिनांक ९ सप्टेंबर हिवताप व वांत्या झाल्याने त्यास उपाचारादाखल केले असता निदानात त्यास डेंग्यु झाल्याची पुष्टी मिळाली व दिनांक ११ सप्टेंबर रोजी भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुदैवी मृत्यु झाल्याची घटनासमोर आली. या डेंग्युमुळे मरण पावलेल्या तरूणावर आज सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार (दफनविधी) करण्यात आली. यावल तालुक्यातील ग्रामीण…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत अर्थात गणपती बाप्पाचे शुक्रवार, दि.10 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्रासह देशभरातील विविध ठिकाणी घरा-घरांत अतिशय उत्साहपूर्ण अन् मंगलमय वातावरणात आगमन झाले. त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी जळगाव शहरातील आकाशवाणी चौक ते महाराणा प्रताप चौक म्हणजेच रिंग रोड परिसर, टॉवर चौकाजवळील महात्मा गांधी रोड, अजिंठा चौक, पिंप्राळा या भागांत महापालिकेच्या परवानगीने याहीवर्षी बुधवार, दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी दुपारपासून शुक्रवार, दि. 10 सप्टेंबर 2021 रोजी रात्रीपर्यंत गणेशमूर्ती, पूजा साहित्य, प्रसाद, सुशोभीकरणासह पुष्पहार, विविध फळे यांच्या विक्रीची दुकाने थाटलेली होती. मात्र, संबंधित विक्रेत्यांनी मालाच्या विक्रीनंतर आपापल्या दुकानातील कचरा, निर्माल्याची विल्हेवाट न लावता तो तेथेच रस्त्यावर…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव शहरासह तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह झालेल्या अन्य नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनास सादर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यात येईल, असे राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. चाळीसगाव, भडगाव पाचोरा तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर आणि डोंगरी या नद्यांना पूर आले. त्यात एक महिला वाहून गेली, तर शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री श्री. भुसे यांनी आज सकाळी चाळीसगाव तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडेसह पाचोरा तालुक्यातील दिघी, भोरटेक, कजगाव, ता. भडगाव या गावांना भेट देवून तेथील पूर परिस्थितीची…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील अज्ञात चोरट्यांनी फुले मार्केटच्या समोरून १५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लंपास केल्याची घटना १० रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठ येथील राहणारे राधेश्‍याम कैलास पांडे (वय-२२) हे 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद रोड वरील नवजीवन कलेक्शन समोरील असलेल्या मोकळ्या जागेवर उभे असताना त्यांचा 5 हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि सोबत असलेल्या चंद्रकांत भीमराव पाटील यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल संशयित आरोपी विजय गुलाबराव पवार याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी विजय पवार यांच्या विरोधात गुन्हा…

Read More

सांगवी : वृत्तसंस्था । व्याजाने पैसे देण्याच्या बहाण्याने एका 38 वर्षीय शिक्षिकेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अवस्ती नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपीने महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून शाळेत आणि घरच्यांना दाखवेन अशी धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. तसेच “मी निवृत्त एसीपी आहे, माझं कोणी काही करू शकत नाही.ही बाब कोणाला सांगितल्यास घरच्यांना जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. विकास अवस्ती असे आरोपीचे नाव असून त्याने तो एसीपी असल्याची बतावणी केली.प्रत्यक्षात मात्र तो एसीपी नसल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली आहे. या…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे. काय आहे प्रकरण – शुक्रवारी मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली होती. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा धक्कादायक प्रकार…

Read More

काबुल, वृत्तसंस्था । अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष आणि स्वत:ला राष्ट्राध्यक्ष घोषित करणारे अमरुल्ला सालेह यांच्या भावाला तालिबान्यांनी ठार केल्याची माहिती समोर येत आहे तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा मिळवला आहे, मात्र पंजशीरमध्ये अद्यापही संघर्ष सुरु आहे. याच संघर्षादरम्यान अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहुल्लाह सालेह ठार झाला आहे. तालिबानने रोहुल्लाह सालेह याची ओळख पटल्यानंतर त्याचा छळ करुन नंतर फासावर लटकवले अशी माहिती आहे. रोहुल्लाह सालेहचा भाचा इबदुल्लाहने तालिबान यावेळी वारंवार मृतदेह सडला पाहिजे म्हणत होते असे सांगितले आहे.“त्यांनी गुरुवारी हत्या केली असून आम्हाला दफन करण्यासाठीही मृतदेह देत नाही आहेत.ते वारंवार मृतदेह सडला पाहिजे असे म्हणत आहेत,” असे इबदुल्लाहने सांगितले असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले…

Read More

पालघर , वृत्तसंस्था । तारापूर औद्योगिक वसाहती मधली फ्लॉट नंबर 9/4 रंग रसायन या फॅक्टरीमध्ये मध्यरात्रीनंतर भीषण स्फोट होऊन आग लागली. सणानिमित्ताने कंपनी बंद असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याच्या सुमारास या कंपनीमध्ये स्फोट होऊन आग लागली. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि पहाटेपर्यंत आग नियंत्रणात आली आहे. घटनास्थळी बोईसर पोलिस स्टेशनचे अधिकारी उपस्थित आहेत. आग विझल्यानंतर संभाव्य जखमींचा शोध घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. कोविड-19 च्या संसर्गाविरूद्ध चार महिन्यांची, जीवघेणी लढाई जिंकल्यानंतर, मुंबईचे देवानंद तेलकोटे नागरी सेवा परीक्षांच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यास तयार आहेत. प्रिलीम आणि मेन्स…

Read More