Author: saimat team

 न्यू जनरेशन टोयोटा लँड क्रूजर बरीच चर्चेत असनू डिझाइन-फीचर्सच्या बाबतीत ही कार आकर्षक आहेच, पण सुरक्षेच्या कारणास्तव या दमदार एसयूव्हीच्या पुन्हा विक्री करण्यावर (रीसेल, पुनर्विक्री) कंपनीने बंदी घातली आहे. मात्र, पुन्हा विकणं तर दूरच पण सध्या ही कार खरेदी करणेही एक मोठा टास्क आहे. कारण, Toyota Land Cruiser च्या अनेक व्हेरिअंटवर वर्षांचा वेटिंग पीरियड सुरू आहे. Cars Guide च्या एका रिपोर्टनुसार, कंपनी नेक्स्ट जनरेशन लँड क्रूजरसाठी वेटिंग पीरियड ४ वर्षांपर्यंत वाढवत आहे. रिपोर्टनुसार, सप्लाय चेन अर्थात पुरवठा साखळीतील व्यत्यय यामागे कारण आहे. या एसयूव्हीची डिमांडही खूप जास्त आहे, पण टोयोटाला कम्पोनेंट्स (विशेषत: मायक्रोचिप्स) मिळणे कठीण जात आहे. तथापि, चार वर्षांपर्यंतचा वेटिंग पीरियड…

Read More

अमेरिकेतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी फोर्ड मोटर कंपनीने भारतातील आपल्या दोन्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमधील प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीने भारतीय बाजारपेठेतील दीर्घ काळाच्या संघर्षानंतर उत्पादन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनी आता केवळ प्रीमियम कार पूर्ण बिल्ड युनिट (CBU) म्हणून विकणार आहे आणि विद्यमान ग्राहकांना सेवा, वॉरंटी आणि भागांची उपलब्धता यासारख्या सुविधा मिळत राहतील असे आश्वासन कंपनीने दिले आहे. पण, भारतातून आपला गाशा गुंडाळणारी फोर्ड ही काही पहिली ऑटोमोबाईल कंपनी नाहीये. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ मोठ्या कंपन्यांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये जगातील पाचव्या क्रमांकाची कार-बाजारपेठ असलेल्या भारतातून आपला व्यवसाय बंद केलाय. ​१. General Motors जनरल मोटर्सने भारतामध्ये १९९६…

Read More

लखनौ आगामी वर्षात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत. यात उत्तर प्रदेशाचाही समावेश असून, या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलेले असेल. विशेष म्हणजे उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेससह इतर पक्ष मोठ्या तयारीनिशी उतरणार आहे. आणि अशातच शिवसेनेने राज्यातील सर्वच्या सर्व ४०३ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेची प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी भाजपवरही (BJP) गंभीर आरोप करण्यात आले. या बैठकीत शिवसेनेने (Shiv Sena) आरोप केला आहे, की भाजप सरकारच्या शासन काळात राज्यातील कायदा आणि सूव्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली असून महिलाही असुरक्षित आहेत. दारुलशफा येथे झालेल्या या बैठकीत राज्याचे प्रमुख ठाकूर अनिल सिंह म्हणाले, उत्तर प्रदेशातील योगी…

Read More

श्री गणेशाचे जल्लोष व प्रसन्न वातावरणात अनेकांकडे आगमन झाले आहे. गणेशाच्या आगमनाची तयारी आधीच आपल्याकडे सुरु होते. श्रीगणेशाला प्रिय नैवेद्य असो वा पत्री फुलं दुर्वा सर्व गोष्टीची जमवाजमव होत असते. गणपती बाप्पाला वाहण्याकरीता आवडीची फुले पत्र इत्यादी आणतांना त्यांची औषधी गुण त्यांचे आकार रुप गंध याची माहीतीही मिळते. निसर्ग आपल्या आरोग्याची किती काळजी घेतो हे देखील कळते. गणपतीला प्रिय असलेल्या वनस्पतींची आरोग्य हितकर माहिती बघूया – दूर्वा – गणपतीला दूर्वा अवश्य वाहिल्या जातात. दूर्वा या ऋतुत भरपूर उपलब्ध असतात. या दूर्वाचे औषधी गुण काय तर या उत्तम रक्तस्तंभक आहेत. नाकातून रक्त निघण्याचा त्रास होत असेल तर नाकात दूर्वारसाचे थेंब उपयुक्त…

Read More

संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या मनोहर उर्फ मामा भोसले (वय ३९, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला बारामतीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी पाच दिवस (१६ सप्टेंबरपर्यंत) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. शुक्रवारी (दि.१०) सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्महाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसले याला ताब्यात घेतले होते. त्याला सायंकाळी उशीरा बारामती तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. शनिवारी (दि.११) न्यायाधिशांपुढे त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. संत बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीची फसवणूक करण्यात आली असल्याची तक्रार आल्याने गुन्हा दाखल…

Read More

नाशिक – प्रतिनिधी  राज्यात अतिवृष्टीमुळे दुर्दैवी घटना घडत आहेत. दुर्दैवाने काही ठिकाणी अल्प पाऊस असून धरणसाठादेखील कमी आहे. तर काही भागात अतिवृष्टीमुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागणार असून, जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. नांदगाव मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील सभागृहात नांदगाव व मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुहास कांदे, जिल्हा परिषद सदस्य अश्विनी आहेर, पंचायत समिती सदस्य सुभाष कुटे,…

Read More

पारोळा – श्री गुरूमाऊली सेवानंदजी गुरू सुपडूनंदजी धुनिवाले महाराज यांच्या ८व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार ता, 13 रोजी भव्य रक्तदान शिबीर सांगवी, दरबार येथे आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षी पुण्यतिथी निमित्त सांगवी दरबार येथे विविध समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात.मात्र गेल्या दोन वर्षापासुन कोरोनाची परिस्थिती आहे. कोरोना काळात रक्ततुटवडा भासल्याने या वर्षी शासनाच्या नियमांचे पालन करुन सांगवी दरबारात रक्तदान शिबीर होणार असुन परिसरातील नागरिकांनी व तालुका पातळीवर रक्तदात्यांनी सहभागी होवुन या रक्तदान महायज्नात सहभागी होण्याचे आवाहन दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान सांगवी कडून करण्यात आले आहे. यावेळी रक्तदात्यांनी छोटू पाटील, सांगवी दरबार भ्रमणध्वनी 9960966100 यावर संपर्क करावा असे सुचित करण्यात आले आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । नेट-सेट परीक्षांच्या तयारीदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्या संदर्भग्रंथांचे वाचन केले पाहिजे, विविध घटकांचा अभ्यास करतांना कोणत्या अभ्यासपद्धती स्वीकारल्या पाहिजेत. या प्रश्नांची उत्तरे मिळवीत याकरिता नेट-सेट परीक्षा प्रशिक्षण कार्यशाळा अत्यावश्यक आहेत. अशा कार्यशाळांचा उपयोग परीक्षार्थी विद्यार्थ्यांना निश्चितपणे होतो असे मत मू. जे. महाविद्यालयातील सामाजिकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. देवेंद्र इंगळे यांनी व्यक्त केले. मू. जे. महाविद्यालयातील भाषा प्रशाळेच्या वतीने दि. १ ते ९ सप्टेंबरदरम्यान आयोजित केलेल्या नेट-सेट परीक्षा प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयातील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या विषयांचे दुसऱ्या पेपरसाठीचे मार्गदर्शन दि. १ ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान या कार्यशाळेत करण्यात आले. डॉ.…

Read More

गांधीनगर  | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असून यामुळे राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. आता त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या एका वर्षाचा कालावधी उरला असताना रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा 7 वा वर्धापन दिन शनिवार दि.11 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त असोसिएशनतर्फे देशभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड, वृध्दाश्रम तसेच अनाथालयांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही प्रत्येक जिल्ह्यात असे सामाजिक उपक्रम राबवून वर्धापन दिन साजरा करण्यात येत असल्याची माहिती असोसिएशनचे महाराष्ट्र उपअध्यक्ष प्रशांत पांडे यांनी दिली. या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना जगताप यांनी सांगितले की, देशात मोबाईल रिटेलर्स क्षेत्रात लाखो बांधव कार्यरत आहेत. व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकीही असोसिएशनने कायम जपली आहे. संघटनेचा सातवा वर्धापन दिन साजरा करतानाही समाजपयोगी उपक्रम राबविण्याचे निर्देश संस्थापक चेअरमन कैलाश…

Read More