Author: saimat team

मुंबई:  प्रतिनिधी राज्यात कालच्या तुलनेत आज करोना बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. शिवाय मृत्यूची संख्याही वाढली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ५३० इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या २ हजार ७४० इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ६८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार २३३ इतकी होती. तर, आज ५२ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या २७ इतकी होती. (maharashtra registered 3530 new cases in a day with 3685 patients recovered and 52 deaths today) आज राज्यात…

Read More

मुंबई :  प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. त्यानंतर आरोप करणाऱ्या सोमय्यांना योग्य ते उत्तर देण्यासाठी परब यांनी संपूर्ण तयारी केली आहे. या तथ्य नसलेल्या आरोपांमुळे सामान्य माणसांमध्ये माझी प्रतिमा मलिन होत असून कुटुंबाची विनाकारण बदनामी होत आहे. त्यामुळे परब यांनी तब्बल १०० कोटी रुपयांच्या मानहानीचा दाव्याची नोटीस वकिलामार्फत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना बजावली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर ७२ तासाच्या आत माझ्या आरोपांबाबत केलेले सर्व ट्विट डिलिट करण्याचा आणि बिनशर्त माफी मागण्याचा इशारा या नोटिशीच्या माध्यमातून परब यांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना अतिशय उत्तम असून देऊळवाडेकरांनी याच्या माध्यमातून एकजुटीचे दर्शन घडविले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून गावातील एकोप्याला चालना मिळत असल्याने इतर गावांनी देखील याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील देऊळवाडे येथील गणरायाची आरती केल्यानंतर बोलत होते. दरम्यान, पालकमंत्र्यांच्याच हस्ते गावातील विविध विकासकामांचे भूमिपुजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना देऊळवाडेत आधीच विकासकामे सुरू असून लवकरच उर्वरित कामांना गती देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.याबाबत वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील देऊळवाडे येथील ग्रामस्थांनी ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेच्या अंतर्गत गावामध्ये एकाच गणरायाची स्थापना केली आहे. पालकमंत्री…

Read More

यावल प्रतिनिधी । यावल शहरातील व ग्रामीण परिसरातील आणि पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेतीलत ३६ मंडळांनी आज पाचव्या दिवशी शांततेत श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आली. यावल शहरासह पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ९५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्रीगणेशाची उत्साहात स्थापना केली आहे. आज पाचव्या दिवशी शहरातील १९ व ग्रामीण क्षेत्रातील १७ गणेश मंडळांच्या वतीने आजच्या श्रीगणेशचे विसर्जन करण्यात आले. मागील वर्षा प्रमाणे यंदा ही कोरोना संसर्गाचे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार श्रीगणेशाची स्थापना करण्याचे आदेश दिल्याने कोणत्याही श्रीगणेशच्या मंडळाच्या वतीने स्थापनेच्या वेळी मिरवणूक काढण्यात आली नसल्याचे पोलिसांनी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार स्थापना करावयाची असल्याने एकाही मंडळाने श्रीगणेशाच्या विसर्जन…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा एकदा आटोक्यात आली असून काल एकही पेशंट आढळून आला नसतांना आज देखील फक्त एक रूग्ण आढळून आला आहे. आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने एका रिपोर्टच्या माध्यमातून कोरोनाचे अपडेट दिले आहेत. यात गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात एक नवीन कोरोना रूग्ण आढळून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात सुध्दा एका दिवशी एकही रूग्ण आढळून आला नव्हता. यानंतर काल सुध्दा एकही रूग्ण आढळून आला नव्हता. तर आज एक पेशंट आढळून आला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात गत चोवीस तासांमध्ये दोनन रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात आता कोरोनाच्या लसीकरणाला देखील वेग…

Read More

परिवहन मंत्री अनिल परब यांन केला आहे दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली शरद पवारांची भेट सोमय्या यांनी आयकर विभागाला दिले मुश्रीफांच्या घोटाळ्याचे पुरावे प्रतिनिधी । मुंबई भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी मंगळवारी १०० कोटींच्या अबुनुकसानीचा दावा ठोकला आहे. परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमय्या यांना तशी नोटीस पाठवली असून ७२ तासात उत्तर देण्यास सांगतिले आहे. सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हाॅटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसेच प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोप केला होता. त्याबाबतचे पुरावे त्यांनी…

Read More

मुंबई – प्रतिनिधी मुंबईतील साकी नाका परिसरातील घटना  बरोबरच  राज्यातील अन्य भागतही महिलेंवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत . अश्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणे हे महत्वाचे असल्याचे मत मनसेचे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केले आहे . त्यांनी मंत्रालयात आज राज्यच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली . राज्यात पोलिसांचा धाक कोणालाही राहिला नाही . 17 वर्षाचा मुलगा गॅंग रेप मध्ये आरोपी होतो आणि तरी ही त्याचा जामीन होतो अश्यात पोलिसांचा किंवा कायद्याचा धाक राहणार तरी कसा त्यासाठी  शक्ती कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली . यावेळी गृह मंत्री यांनी शक्ती कायदा हा येत्या हिवाळी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगरमधील दारफळ जवळ पावसामुळे एक कौलारू घर कोसळले. त्यात एक तरूण जखमी झाला. घर कोसळल्याने कुटुंबिय रस्त्यावर आले आहे. यावेळी तलाठी यांनी पंचनामा केला. शासनाकडून तातडीने मदत व्हावी अशी मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगर परिसरातील शिवमंदीराजवळ शुभम मोहनलाल पुरोहित यांचे कौलारूसह पत्र्याचे घर आहे. शुभम मोहनलाल पुरोहित हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. काल सोमवारी १३ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे आज १४ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कौलारू व पत्र्याचे असलेले घर कोसळले. यात शुभम किरकोळ जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी घटनास्थळी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेरी नाकाजवळ असलेल्या अशोक हार्डवेअर दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी ९६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, जितू बलराम आहूजा (वय-३४) रा. नानक निवास नवजीवन सोसायटी सिंधी कॉलनी यांचे शहरातील नेरी नाकाजवळ असलेल्या मटनमार्केटच्या बाजूला अशोक हार्डवेअर नावाचे दुकान आहे. १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अडीच ते साडेतीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या बाजूची खिडकीचा पत्रा वाकवून दुकानातून सुमारे ९६ हजार ५०० रुपये किमतीचे प्लॅनेट पॉवर कंपनीचे बोर मशीन, हॅमर मशीन, कटर मशीन आणि डोअरचे ३० किट असा…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील कॅप्टन कॉर्नर येथे राहणाऱ्या एका खासगी डॉक्टराच्या घरातील लोखंडी कपाटातून अज्ञात इसमाने २ लाख ६ हजार रुपये रोखड लंपास केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, विवेक बळवंतराव बोरसे (वय-४०) रा. कॅप्टन कॉर्नर चाळीसगाव हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास असून शहरातील चिरायू दवाखान्यात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान बोरसे हे नेहमीप्रमाणे ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वा. घराला कुलूप लावून दवाखान्यात निघून गेले. दवाखान्यातील काम आटोपल्यानंतर ते सायंकाळी ४:३० वाजता घरी परतले. घरातील सर्व जण मुंबई येथे गेलेले असल्याने त्यांना झोप लागली. सायंकाळी ७ वाजता बोरसे…

Read More