Author: saimat team

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद ते माहिजी दरम्यान २२ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सागर गणेश खडसे (वय-२२) रा. दहीगाव संत ता. पाचोरा असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, सागर गणेश खडसे (वय-२२) रा. दहीगाव संत ता. पाचोरा या तरूणाने म्हसावद ते माहेजी रेल्वे अपलाईन खंबा क्रमांक ३९४/११-१२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read More

भुसावळ, प्रतिनिधी । राज्यस्तरीय बॉक्सींग चॅम्पियनशीप स्पर्धा नुकतीच बुलढाणा येथे झाली. या स्पर्धेत भुसावळ तालुका बॉक्सींग असोसिएशनच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने या खेळाडूंचा भुसावळात सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत भुसावळ तालुका बॉक्सींग असोसिएशनमार्फत 12 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. नागेश अर्जुन खरारे या स्पर्धकाने क्रीडा प्रबोधिनी, अकोला येथील बॉक्सरला नमवत सुवर्ण पदक पटकावल्याने त्याची कर्नाटक येथे होणार्‍या राष्ट्रीय एलिट मेन बॉक्सींग स्पर्धेसाठी निवड झाल्याने खरारे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात मो.साजीद, साकेत तायडे, शुभम निकम, मंगेश सावत, सिद्धार्थ सपकाळे, महेश खरात, चेतन आव्हाड, नागेश खरारे, अजय सपकाळे, शेख मोहम्मद जैद, अक्षय मोरे तसेच कोच अनिल सपकाळे, रोहित जंजाळे आदींचा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेप्रसंगी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही जिल्हाध्यक्ष आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी केली. आ.सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना अतिशय उत्तम असून देऊळवाडेकरांनी याच्या माध्यमातून एकजुटीचे दर्शन घडविले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून गावातील एकोप्याला चालना मिळत असल्याने इतर गावांनी देखील याचा आदर्श घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील देऊळवाडे येथील गणरायाची आरती केल्यानंतर बोलत होते. दरम्यान, पालकमंत्र्यांच्याच हस्ते गावातील विविध विकासकामांचे भूमिपुजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना देऊळवाडेत आधीच विकासकामे सुरू असून लवकरच उर्वरित कामांना गती देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.याबाबत वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील देऊळवाडे येथील ग्रामस्थांनी ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेच्या अंतर्गत गावामध्ये एकाच गणरायाची स्थापना केली आहे. पालकमंत्री…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, शिक्षण फी, परीक्षा व इतर शैक्षणिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर शिष्यवृतीचे अर्ज भरण्यासाठी ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. कोविड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे काही महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाइन पध्दतीने अभ्यासक्रम शिकवला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केले नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून शिष्यवृत्तीचे अर्ज…

Read More

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅप झोमॅटोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांना त्यांच्या या निर्णयामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. ई-किराणा व्यवसायातून बाहेर पडण्याची घोषणा कंपनीने केल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. फूड डिलिव्हरीसह किराणा मालाची विक्रीही झोमॅटोने सुरु केली होती. झोमॅटोने नुकताच किराणा मालाची डिलिव्हरी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. गौरव गुप्ता झोमॅटोचे पुरवठा प्रमुख होते. एक मेल पाठवत कंपनी सोडत असल्याचे गौरव गुप्ता यांनी जाहीर केल्याचे मनीकंट्रोलने आपल्या वृत्तात म्हटले आहे. कंपनीत सहा वर्षे टॉप एक्झिक्युटिव्ह म्हणून घालवल्यानंतर आता एक नवीन अध्याय सुरु करणार असल्याचे त्यांनी…

Read More

इस्लामाबाद, वृत्तसंस्था । पाकिस्तानमध्ये शालेय पातळीवर शिकवणाऱ्या शिक्षकांना जीन्स व टी शर्ट परिधान करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच शिक्षिकांनाही त्यांनी घट्ट कपडे परिधान करू नयेत असे आदेश जारी करण्यात आले आहेत. देशाच्या शिक्षण महासंचालकांनी या बाबतचे पत्र सर्व शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्य यांना पाठवले आहे. पाकिस्तानमधील शाळांमध्ये शिकवण्याचे काम करणाऱ्या महिलांना जीन्स व टी शर्ट घालण्यात प्रतिबंध करण्यात आला आहेच शिवाय असे काम करणाऱ्या पुरुषांनाही शाळेत जीन्स व टी शर्ट घालता येणार नाहीत अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याशिवाय सर्व शिक्षकवर्गाने नियमित काळामध्ये केस कापणे दाढी करणे नखे कापणे आणि स्वछता राखणे आणि अत्तराचा वापर करणे अनिवार्य असल्याचेही…

Read More

जळगाव प्रतिनिधी । दहिगाव संत येथील राहणाऱ्या २२ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दहिगाव संत ता. पाचोरा येथील राहणार मयत सागर गणेश खडसे (वय-२२) असे नाव आहे. मयत सागर या तरूणाने म्हसावद ते माहेजी रेल्वे अपलाईन खंबा क्रमांक ३९४/११-१२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read More

मुंबई : प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसची (Congress) आजची अवस्था एखाद्या हवेली मोडकळीस आलेल्या जमीनदारासारखी असल्याचे पवार म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी पवारांच्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण दिले आहे . देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची पवारांची ही भूमिका असल्याचे ते म्हणाले. त्या संदर्भात त्यांनी केलेली टीका काँग्रेसने सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे,असेही मलिक म्हणाले. दरम्यान शरद पवारांच्या टीकेला उत्तर देत त्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले होते. शरद पवारांनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत नाही. शरद पवारांच्या विचाराने काँग्रेसच्या…

Read More

यावल, प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक आणि यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांचा रविवार दि.12 सप्टेंबर 2021 रोजी अभिष्टचिंतन सोहळा श्री गजानन महाराज मंदिरात आणि त्यानंतर संध्याकाळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि नियोजन पूर्वक पार पडला. या अभिष्टचिंतन सोहळ्याची जय्यत तयारी आणि नियोजन यावल नगरपरिषदेचे गटनेता राकेश कोलते.एजाज पटेल,फारूक हाजी,गणेश महाजन धिरज महाजन,मोसिन कुरेशी,असलम मेंबर,समीर मेंबर,आशिष पाटील यांच्यासह सानेगुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील सर यांनी आपल्या मालकीची जागा स्नेह भोजनासाठी उपलब्ध करून उत्कृष्ट नियोजन केले होते. यावल नगरपरिषद माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान गटनेता राकेश कोलते नगरपरिषद संचालित सानेगुरुजी विद्यालयातील उपशिक्षिका सौ. कविता…

Read More